जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- दिल्लीत जंतर-मंतरवरमोर्चा करुन परत येणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची गाडी चुकीच्या दिशेने धावली. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी कोल्हापुरातून सुमारे 1500 शेतकरी 4 दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. हे आंदोलन झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला शेतकरी निघाले. त्यावेळी या विशेष गाडीचा रस्ता चुकला आहे. मथुरेत मिळाला चुकीचा सिग्नल मथुरेत स्वाभिमानी एक्स्प्रेसला चुकीचा सिग्नल मिळाला. त्यामुळे तब्बल 160 किलोमीटरपर्यंत गाडी...
  November 22, 03:15 PM
 • कोल्हापूर-कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयासमोर साक्षीदार म्हणून जबाब देणाऱ्या संजय साडवीलकर याने आपण काही वर्षांपूर्वी अवैध शस्त्रे विकत असल्याचा व दुरुस्त करत असल्याचा जबाब दिला होता. अशी शस्त्रे त्यांनी कुणाकुणाला विकली आणि त्यातून पुढे काय झाले याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आणि सद्या तुरुंगातून जामिनावर सुटलेल्या समीर गायकवाडने कोल्हापूरच्या जुना राजवाडा पोलिस ठाण्यात केली...
  November 21, 05:51 PM
 • सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तत्पूर्वी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट केल्याप्रकरणी एकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली होती. अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते....
  November 21, 03:11 PM
 • सातारा/पुणे/कोल्हापूर- छत्रपतीचे शिवाजी महाराजांचे वंशज आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि दमयंतीराजे भोसले यांनी आपल्या लग्नाचा वाढदिवस आज साजरा केला आहे. सातारकर या ट्विटर हँडलवर उदयनराजे आणि दमयंतीराजे भोसले यांचे दोन फोटो आहेत. यात त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यात दोघे जण एक कापताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये राजे दमयंतीराजेंना केक भरवत आहेत. उदयनराजे यांचे लग्न 20 नोव्हेंबर 2003 रोजी झाले आहे. त्यामुळे...
  November 20, 06:38 PM
 • सांगली/कोल्हापूर- अनिकेत कोथळे खूनप्रकरणी शहर पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी सीआयडीने एकाला ताब्यात घेत त्याची चौकशी केली आहे. अनिकेत कोथळे याच्या पोलिस ठाण्यातील मृत्यू आणि त्यानंतरची सर्व घटना पोलिस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. मात्र संशयित कामटे याने सीसीटीव्हीमधील हे सर्व फुटेज डिलीट करुन सीसीटीव्ही बंद पाडला होता. या खून प्रकरणात सगळ्यात महत्त्वाचे हे पुरावे होते. मात्र ते डिलीट करण्यात आले. याप्रकरणी ज्या...
  November 20, 02:33 PM
 • पुणे/कोल्हापूर-वीरांगणा झाशीची राणीलक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता. धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणाऱ्या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या....
  November 19, 12:01 AM
 • सांगली- शिराळा तालुक्यातील डोंगरावरील मंदिरात एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाच्या बाजूला लिंबू, काळी बाहुली सापडल्याने नरबळीचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. शिराळा तालुक्यात शिरची शिवरवाडी येथे रस्त्यापासून दोन किलोमीटर अंतरावर एक डोंगर आहे. या डोंगरावर चक्रोबा मंदिर असून या मंदिरात भाविकांची फारशी वर्दळ नसते. सध्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम सुरु असून शनिवारी सकाळी मजूर कामासाठी मंदिरात गेला....
  November 18, 06:18 PM
 • कोल्हापूर/सांगली-राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सल्ल्यानेच सरसकट शेतकरी कर्जमाफी केली नाही, असा दावा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केला आहे. संपूर्ण कर्जमाफी होण्यास उशीर लागणार आहे, पण त्याचे चांगले परिणाम दिसतील असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने विविध कार्यकारी सेवा सोसायटी यांच्या सक्षमीकरण कार्यशाळेच्या निमित्ताने सांगलीत आल्यावर त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी त्यांनी...
  November 18, 04:27 PM
 • मुंबई/कोल्हापूर/सांगली-जनता म्हणजे किडा-मुंगी वाटते काय? आणिआमदारांना पाच पाच कोटी देऊन पक्षात घेण्यासाठी भाजपकडे कुठून पैसे आले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.मनसेचे राज ठाकरे पाच पाच कोटी देऊन आपले नगरसेवक पळविल्याचे सांगत आहेत, तर खुद्द भाजप प्रदेशाध्यक्षांचे जावई आमदार हर्षवर्धन जाधव यांनी भाजपकडून सुरू असलेला घोडेबाजार चव्हाट्यावर आणला आहे, त्यामुळे हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. अनिकेत कोथळेच्या कुटुंबीयांची भेट पोलिस मारहाणीत...
  November 18, 03:31 PM
 • कोल्हापूर- मुंबईच्याकळंबोलीमधून सहायक पोलिस निरीक्षक पदावर कार्यरत एकमहिला पोलिस अधिकारीगेल्या दीड वर्षापासूनबेपत्ता झाली आहे. अश्विनी राजू गोरेअसे या महिला पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. वारंवार तक्रार करूनही याप्रकरणाचा तपास करण्यास दस्तुरखुद्दपोलिसच टाळाटाळ करतआहेत, असा खळबळजनकआरोपयामहिला पोलिस अधिकाऱ्याच्या पतीनेआणि वडिलांनीकेला आहे. पोलिस ठाण्यात सिनिअर पीआय म्हणून कार्यरत असणाऱ्या अभय कुरुंदरकर या पोलिस अधिकाऱ्यानेच प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचा घातपात केल्याचा...
  November 18, 01:10 PM
 • कोल्हापूर- शारीरिक सुखाच्या मागणीसाठी नकार दिल्याने चुलत दीराने डोक्यात दगड घालून भावजयीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे.लक्ष्मी टेकडी परिसरात ही घटना घडली. राजाराम गुंडू कागले (वय- 42) असे आरोपीचे नाव आहे. कागल पोलिसांनी आरोपी राजाराम गुंडू कागले याला गजाआड केले आहे. आरोपीला कोर्टासमोर हजर केले असता त्याला 5 दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पी.आय.पाटील,भालके,कागल पोलीस, करवीर पोलीस ठाण्याचे डीबी कर्मचारी,सायबर सेल व कोल्हापूर एलसीबी, हातकणंगले पोलिस ठाण्याचे...
  November 17, 09:12 PM
 • कोल्हापूर- सासरा आणि दिरासह जाऊ आणि तिच्या आई-वडिलांकडून शारीरिक, मानसिक त्रास, मारहाण केला जात असल्याने आणि पोलिसांना वारंवार तक्रार देऊनही कारवाई केली जात नसल्याने कंटाळून अखेर शफीका समीर शिकलगार (रा.इचलकरंजी) या विवाहितेने पती आणि दोन मुलांसह कोल्हापूर जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर अंगावर रॉकेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. पोलिसांनी हस्तक्षेप करत शफीका हिच्या हातातून रॉकेलचा डबा हिसकावून घेऊन तिला ताब्यात घेतले. या...
  November 17, 04:37 PM
 • कोल्हापूर- वारंवार तक्रार देऊनही पोलिस कारवाई करत नाही, असा आरोप करत कोल्हापूर पोलिस अधिक्षक कार्यालयात एका दाम्पत्याने 3 मुलांसह अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्वरीत हस्तक्षेप करुन दाम्पत्याची समजून काढल्यामुळे पुढील हानी टळली. शिकलगार असे या दाम्पत्याचे आडनाव असल्याची माहिती आहे. ते इचलकरंजी येथील रहिवासी आहे.
  November 17, 03:44 PM
 • मुंबई- सांगलीतील अनिकेत कोथळेच्या कोठडीतील मृत्यूनंतर गृह विभाग खडबडून जागा झाला आहे. पोलिस कोठडीतील आरोपींचे मृत्यू रोखण्यासाठी आणि तुरुंगात आरोपींना चांगली वागणूक देण्यासंदर्भात महत्त्वाची पावले गृह विभागाने उचलली आहेत. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची समिती नियुक्त करण्याचा निर्णय गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला. केसरकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर आहे, नगर गोळीबाराची स्थानिक दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी...
  November 17, 12:27 AM
 • कोल्हापूर- पती-पत्नीच्या किरकोळ वादातून चिडून जाऊन पत्नीचा खून करून पतीनेही विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज रात्री 7 वाजून 45 मिनिटांनी येथील शुक्रवारपेठेतील पंचगंगा तालमीसमोर घडली. घटनेची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली आहे. याबाबत शववच्छेदनाचा अहवाल आल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणे कठीण असल्याचे पोलिसांचे मत आहे. खून झालेल्या महिलेचे नाव राजश्री सुभाष कुंभार (वय 38) असे असून तिच्या खुनानंतर आत्महत्या करणाऱ्या पतीचे नाव सुभाष दत्तात्रय कुंभार (वय 45) असे आहे. या...
  November 15, 10:11 PM
 • कोल्हापूर-आम्ही तुम्हाला देवीच्या एका रहस्यमय मंदिराची माहिती देत आहोत. या रहस्याचे उत्तर विज्ञानाकडे देखील नाही. कोल्हापुरात असणाऱ्या महालक्ष्मी मंदिरातील खांबांची मोजदाद आजपर्यंत कोणीही करु शकलेले नाही. येथे लपविण्यात आलाय अब्जावधीचा खजाना -मंदिरात अब्जावधीचा खजाना लपविण्यात आल्याचेही काही जण सांगतात. हा खजाना 3 वर्षांपूर्वी उघडण्यात आला होता. तेव्हा सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने यात असल्याचे समोर आले होते. याचे बाजारमूल्य अब्जावधी रुपये आहे. - खजान्यात सोन्याची मोठी...
  November 15, 06:31 PM
 • कोल्हापूर-येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपत्याखालील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या आणि कोल्हापूर शहरातील सर्वात जुन्या रक्तपेढीत सध्या खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. याचे प्रमुख कारणही असे आहे की या रुग्णालयात सर्व आजारावरील शस्त्रक्रिया चांगल्या प्रमाणात केल्या जात आहेत. त्यामुळे दर महिन्याला सर्व रक्तगटाच्या सुमारे 1500 बॅगची आवश्यकता भासत आहे. मात्र रक्तदात्यांची कमतरता असल्याने केवळ 700 रक्ताच्या बॅग उपलब्ध होत आहेत....
  November 15, 04:34 PM
 • कोल्हापूर- कागल तालुक्यातील बामणी या गावात 90 वर्षांच्या एका वृध्द महिलेने आपली चिता स्वत:च रचत त्यात स्वत:ला पेटवून घेत जीव दिला. सकाळी जेव्हा गावकऱ्यांनी पाहिले त्यावेळी केवळ तिच्या अस्थी उरल्या होत्या. ती वृध्द महिला अनेक वर्षांपासून एकटीच राहत होती. काय आहे पूर्ण प्रकरण - कल्लवा दादू कांबळे (वय 90) या बामणी गावात एकट्याच राहत होत्या. - सोमवारी रात्री त्यांनी स्वत:साठी जेवण बनवले. त्यानंतर शेजाऱ्यांशी गप्पा मारल्या आणि झोपण्यास गेल्या. - मध्यरात्री त्या उठल्या आणि त्यांनी सरपण रचले....
  November 15, 03:43 PM
 • कोल्हापूर-येथील कळंबा मध्यवर्ती कारागृहातील खुनाच्या गुन्ह्यात गेली 4 वर्षे शिक्षा भोगणाऱ्या एका कैद्याने आज सकाळी नैराश्येतून शौचालयात जाऊन स्वत:वर वार करून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला तात्काळ येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गणेश पोपट शिंदे (वय 30) असे या कैद्याचे नाव आहे. यापूर्वीही 2015 मध्येदेखील त्याने असा प्रयत्न केला होता. तो मुळचा सोलापूर जिल्ह्यातील कुरुडवाडी गावचा आहे.याबाबत अधिक माहिती अशी, आज सकाळी गणेश पोपट शिंदे याने...
  November 15, 02:14 PM
 • सांगली- अनिकेत कोथळे खून प्रकरणामुळे पोलिस ठाणे हे सरकारी गुंडांचे अड्डे बनले असल्याचे समोर आल्याचे मत शिव प्रतिष्ठानाचे संभाजी भिडे गुरूजी यांनी व्यक्त केले आहे. दोषी पोलिसांना शिक्षा व्हावी यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. काय आहे पूर्ण प्रकरण - विश्रामबाग पोलिस ठाण्यात अनिकेत कोथळेचा थर्ड डिग्रीमुळे मृत्यू झाला होता. पोलिसांनी हे प्रकरण दाबण्यासाठी त्याचा मृतदेह 100...
  November 14, 03:55 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात