जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • रत्नागिरी - चिपळूण परिसरात झालेल्या जाेरदार पावसामुळे तिवरे धरण मंगळवारी काठाेकाठ भरले. तलाठ्याकडून परिसरातील गावात सतर्कतेचा इशारा रात्री ८.३० च्या सुमारास देण्यात आला. मात्र, ही सूचना सर्वांपर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच म्हणजे रात्री ९.३० च्या सुमारास धरणाचा बंधारा फुटून परिसरातील सात गावांमध्ये पाणी शिरले. यात १२ घरे वाहून गेल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर २४ माणसे वाहून गेली. यापैकी १३ जणांचे मृतदेह बुधवारी सायंकाळपर्यंत हाती लागले, तर उर्वरित ११ जणांचा शाेध सुरू हाेता....
  July 4, 09:20 AM
 • रत्नागिरी : कोकणातसुरू चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले तिवरे धरण फुटले आहे. धरण फुटल्याने जवळपासच्या परिसरात पूर आला आहे. धरणाजवळ असलेली 10-12 घरे या पुरात वाहून गेली. आतापर्यंत या पुराच्या पाण्यातून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.24 जण अजुनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.तिवरे धरणाची पाणीसाठा क्षमता 0.8 TMC आहे. ही घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजता घडली. परंतु, प्रशासन आणि माध्यमांमध्ये हे वृत्त सकाळी...
  July 3, 04:31 PM
 • रत्नागिरी- आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या साटवली गावात घडली आहे. घरगुती भांडण आणि कर्जबाजारी झालेल्या मुलाला त्याच्या आईने तिचे सोन्याचे दागिने दिले नाही, म्हणून रागाच्या भरात सख्या मुलाने आईला दगडाने ठेचून मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण लांजा पोलिसांच्या नजरेतून हा गुन्हेगार सुटला नाही. फातीमा काळसेकर असे दुर्दैवी आईचे नाव आहे, तर मजहर असे निर्दयी मुलाचे नाव आहे. आई-मुलाचे...
  June 19, 04:25 PM
 • सातारा - जैसी करनी वैसी भरनी या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही. आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी ते याला अपवाद नाहीत. लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केले असल्याने आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. मात्र, त्यांच्या करणीमुळे जर काही बरेवाईट घडले तर त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. त्यांच्या या...
  June 19, 09:16 AM
 • नवी दिल्ली - कधी पाऊस, तर कधी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात राहणाऱ्या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षांच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४,४०० फूट उंचीवरील हमता पास सर केला. एवढ्या लहान वयात हे यश मिळवणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली. मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्णकरत एका विक्रमाची नाेंद नावावर केली हाेती. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात आलेल्या उर्वीने आपल्या विक्रमाविषयी...
  June 12, 09:41 AM
 • शिर्डी -साईबाबा मंदिराजवळ असलेल्या गुरुस्थानाजवळ एका महिलेने शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीस बेवारस सोडून पलायन केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून शिर्डी पोलिस व साई संस्थान प्रशासन या महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, ही चिमुरडी सुखरूप असून तिला साई संस्थानने पोलिसांकडे साेपवले आहे. साईबाबांची आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येतात. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेने सहा महिन्यांची चिमुकली...
  June 1, 09:54 AM
 • कोल्हापूर- हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्यावेळी 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राजू शेट्टींनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या...
  May 31, 12:52 PM
 • सांगली । हरहुन्नरी मराठी अभिनेते वैभव मांगले शुक्रवारी अलबत्या-गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना चक्कर आली. सांगलीत सध्या तापमान ४२ अंशांच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्याने उकाडा प्रचंड होता. शिवाय चेटकिणीची जाड वेशभूषा असल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने मांगले यांनी सांगितले.
  April 27, 10:42 AM
 • कोल्हापूर/सांगोला -मनोहर पर्रीकर यांना राफेल विमानांचा करार मान्य नव्हता, यामुळेच ते संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. राज ठाकरेंच्या प्रचाराबाबत ते म्हणाले, मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचे आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार...
  April 14, 10:03 AM
 • पुणे / कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील आपल्या पहिल्याच सभेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या कुटुंबावर टीका केली होती. त्या टीकेला आता राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे या सर्वांनीच चोख प्रत्युत्तरे दिली आहेत. पुण्यातील एका सभेत बोलताना अजित पवारांनी भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांची खरडपट्टी काढली. बारामती येथे बोलताना सुप्रिया सुळेंनी मोदींना एकटे राहण्यात अभिमान वाटतो असे म्हटले. तर कोल्हापूर येथे बोलताना शरद...
  April 3, 05:05 PM
 • कोल्हापूर - सैतानालाही लाजवेल अशा क्रूर हत्याकांडाच्या मुख्य सूत्रधार असलेल्या या तिघी भारतात फाशी सुनावलेल्या पहिल्याच महिला होत्या. या तिघी आपसात आई आणि मुली आहेत. यातील आईचे नाव अंजनीबाई तर मुलींची नावे रेणुका आणि सीमा अशी आहेत. स्वतः आई असलेली ही महिला तिच्या दोन मुलींच्या मदतीने इतरांच्या बालकांना पळवून नेत होती. त्यानंतर दमदाटी करून त्यांच्याकडून गुन्हेगारी किंवा भीक मागून घेतले जात होते. एखाद्या मुलाने जर या बाबत कुणाला काही सांगितले, तर त्याला ठार मारले जात होते. अशा प्रकारे...
  April 3, 12:02 AM
 • काेल्हापूर -माेदी सरकारविराेधात महाआघाडीत ५६ पक्ष एकवटले असल्याचा दावा विराेधक करत आहेत. मात्र देश चालवण्यासाठी ५६ पक्षांची नव्हे तर ५६ इंचांची छाती लागते, असा टाेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला लगावला. देशातील जनतेनेच ठरवले आहे की पुढचा पंतप्रधान पण नरेंद्र माेदीच हाेणार आणि लवकरच ते दिसूनही येईल. विराेधकांना आता उमेदवारही मिळेनासे झाले आहेत. आता त्यांच्या कॅप्टननेसुद्धा (शरद पवार) माघार घेतली आहे. त्यांच्या...
  March 25, 08:31 AM
 • बेळगाव- गोव्यात होळी साजरी करून घरी परतत असलेल्या तरूणांचा बेळगावमध्ये भीषण अपघात झाला. हे सर्व तरूण ज्या क्रूझर गाडीने येत होते, त्या गाडीने टँकरला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, अपघातात गाडीतील 9 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. सर्व मृत तरूण कलबुर्गी जिल्ह्यातील चित्तापूरचे रहिवासी आहेत. होळी साजरी करण्यासाठी हे सर्वजण गोव्याला गेले होते. होळी साजरी करून ते गोव्याहून घरी परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. क्रझरचा चालक गाडी अतिवेगाने...
  March 22, 06:18 PM
 • मुंबई - लोकसभा निवडणूकीचा बिगूल वाजला असून सर्व पक्ष आपापले उमेदवार जाहीर करत आहेत. शिवसेना महाराष्ट्रात 23 लढवणार असून त्यापैकी 21 जागांची यादी आज जाहिर केली. सातारा आणि पालघर या दोन मतदार संघाच्या जागा शिवसेनेने अजून जाहिर केल्या नाहीत. शिवसेना हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी यांच्याविरोधात धैर्यशील माने यांना रिंगणात उतरवणार आहे. धैर्यशील माने यांची ही पहिलीच लोकसभा निवडणूक आहे. मात्र त्यांची राजकीय पार्श्वभूमी दांडगी आहे. माने यांचे आजोबा...
  March 22, 05:02 PM
 • कोल्हापूर- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथे काळ्या जादूचा प्रकार समोर आला आहे. आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोनदा भानामती करण्यात आली आहे. अमावास्येच्या रात्री (बुधवारी) पांढर्या कपड्यात हळद-कुंकू आणि बाहुली बांधून सतेज पाटलांच्या बंगल्यासमोरील झुडपांत टाकण्यात आली आहे. या प्रकारामुळे आमदार पाटील यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. त्या प्रकारावर काय म्हणाले आमदार सतेज पाटील? आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यासह...
  March 8, 02:57 PM
 • कोल्हापूर-ड्रेस कोड धुडकावून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतल्याने भाविकांनी त्यांना मारहाण केली. भाविकांच्या तावडीतून सोडवून त्यांना बाहेर आणताना पोलिसांची तारांबळ उडाली. रात्री त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. तृप्ती यांनी साडी घालून दर्शन घ्यावे, अशी स्थानिकांची मागणी होती. मात्र, त्यांनी पंजाबी ड्रेस घालून देवीचे दर्शन घेतले. दरम्यान, मला ठार मारण्याचा...
  January 3, 07:21 PM
 • सांगली - येथील जत तालुक्यात अत्यंत धक्कादायक अशी घटना घडली आहे. एका महिलेने तिच्या स्वतःच्या एका महिन्याच्या चिमुरड्या बाळाची बादलीत बुडवून हत्या केली. त्यानंतर या महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला. पण त्यातून ती बचावली. पण या संपूर्ण प्रकरणाच्या तपासानंतर धक्कादाय माहिती समोर आली आहे. जत तालुक्यात पोलिसांना दोन दिवसांपूर्वी एका महिन्याच्या एका बाळाचा मृतदेह आढळला होता. त्याचा मृत्यू नेमका कसा झाला याचा मात्र तपास पोलिसांना लागत नव्हता. पाण्यात बुडून त्या बाळाचा मृत्यू...
  December 28, 11:13 AM
 • कोल्हापूर- शहरातील एका कर्तव्यदक्ष पोलिस अधिकार्याची सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु आहे. एवढेच नाही तर या पोलिस अधिकार्यावर कौतुकाचा वर्षावही होताना दिसत आहे सुरज गुरव असे या वरीष्ठ पोलिस अधिकार्याचे नाव असून त्याने मंत्री मंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. एकतर घरी नाहीतर गडचिरोलीला जायची तयारी आहे. पण भीती घालू नका, आम्ही कर्तव्य जबावतो. साहेब, आम्ही राजकारण करत नाही आणि करायचेही नाही. कोणाच्या वर्दीवर येण्याची गरज नाही, आपण घरी जावे, अशा शब्दात उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी)...
  December 10, 04:55 PM
 • कोल्हापूर- महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे विचारवंत व कम्युनिस्ट कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथकाने दोन जणांना अटक केली आहे. शनिवारी दोन्ही आरोपींना कोल्हापूर कोर्टात हजर करण्यात आले. एक आरोपी हा गौरी लंकेश आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित आहे. भरत कुरणे याला कर्नाटकातील बेळगाव येथून तर वासुदेव सूर्यवंशी याला बंगळुरु येथून अटक करण्यात आली आहे. वासुदेव याच्यावर गौरी लंकेश आणि पानसरे यांची हत्या करण्यासाठी मारेकर्यांना पिस्तूल...
  December 1, 06:07 PM
 • काेल्हापूर/ मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या तथा हातकणंले (जि. काेल्हापूर) येथील माजी खासदार निवेदिता माने यांनी बुधवारी पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सुपूर्द केला. त्यापाठाेपाठ त्यांचे पुत्र धैर्यशील यांनीही पक्षाचा राजीनामा देत शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांची माताेश्रीवर जाऊन भेट घेत त्यांच्या हाताने शिवबंधनही बांधून घेतले. निवेदिता माने यांनी अद्याप पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट केली नसली तरी त्याही शिवसेनेतच दाखल हाेतील,...
  November 29, 08:37 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात