जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • औरंगाबाद -काेल्हापुरातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वच पातळीवरून मदतीचा अाेघ सुरू झाला अाहे. शहरातील मुस्लिम समाजातील कार्यकर्तेही यात अग्रेसर अाहेत. शहरातील ३५० मशिदींमध्ये व्हेज पुलाव आणि डाळ-भात बनवण्याचे काम सुरू असून जवळपास ५००० मुस्लिम कार्यकर्ते जेवणाची पाकिटे पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवत आहेत. सुमारे ७ हजार पूरग्रस्तांच्या भाेजनाची साेय येथून केली जात अाहे. साेमवारची ईद साधेपणाने साजरी करतानाच बकऱ्याची कुर्बानी न देता त्याचे पैसे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खर्च...
  August 12, 07:44 AM
 • कोल्हापूर - अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरु आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कोयना धरणामधून 53,882 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज सकाळी दिली. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 50 फूट 11 इंच असून, एकूण 104 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.26 टीएमसी पाणीसाठा आहे....
  August 11, 01:26 PM
 • कोल्हापूर -अलमट्टी धरणातून ५ लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित ४ दरवाजे उघडण्यात आले असून त्यामधून ७,११२ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस. एम. शिंदे यांनी दिली. शनिवारी सकाळी सात वाजता कोयना धरणामधून ७७,९८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी सांगितले. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणीपातळी सकाळी ५२ फूट २ इंच असून एकूण १०७ बंधारे...
  August 11, 08:29 AM
 • मिनाज लाटकर कोल्हापूर - जिवावर बेतलेल्या पूरस्थितीत बचावलेल्या कोल्हापूरमधील महिलांनी विस्थापितांसाठी अत्यावश्यक साहित्याची जमवाजमव सुरू केली. स्वत:चे घर सोडून मुला-बाळांसह शाळा, समाज मंदिरांमध्ये आसरा घेतलेल्या, घरांतील दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर जीव मुठीत घेऊन बसलेल्या नागरिकांसाठी या समयसूचकता दाखवत या महिलांनी मदतीचा हात पुढे केला आहे. या कामात प्रिया देसाई, शुभलक्ष्मी देसाई आणि वनिता ढवळे यांनी पुढाकार घेतला आहे. तर काही महिला वैयक्तिकरित्या गरजूंच्या मदतीसाठी पुढे येत आहेत....
  August 10, 11:59 AM
 • कोल्हापूर, सांगलीतील पुराच्या वेढ्यातून बचावलेल्या तसेच ही स्थिती प्रत्यक्ष अनुभवणाऱ्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आम्ही मिळवल्या आहेत. पहिल्या दिवशी महत्त्वाची कागदपत्रे, पैसे, दागदागिने घेऊन बाहेर पडलेले नागरिक तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी तर फक्त आपली माणसं आणि स्वत:चा जीव मुठीत घेऊन बचाव पथकाच्या हवाली होत आहेत. पुराने वेढलेल्या सांगली व कोल्हापूरवासीयांना कपडे, अन्न, पिण्याचे पाणी, महत्त्वाची औषध या सर्वांची नितांत गरज आहे. चार दिवसांपासून भिजलेल्या कपड्यांवरच, औषधेही नाहीत...
  August 10, 11:40 AM
 • एकनाथ पाठक/औरंगाबाद : संततधार पाऊस अाणि पुराच्या पाण्यामुळे सांगलीसह काेल्हापूर शहर अाणि जिल्ह्यातील गावेच्या गावे पाण्याखाली अाली अाहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. याचा माेठा फटका सर्वसामान्यांपेक्षा प्रतिभावंत मल्लांनाही बसला अाहे. सांगली अाणि काेल्हापुरामधील एेतिहासिक वारसा लाभलेल्या मानाच्या कुस्ती तालमींचे नुकसान झाले. सर्वच तालीम संघांमध्ये प्रचंड पाणी जमा झाले अाहे. अागामी सहा महिन्यांमध्ये हाेणाऱ्या विविध स्पर्धांसाठी तयारी करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसला अाहे....
  August 10, 10:14 AM
 • गणेश जोशी | सांगली २००५ पेक्षाही यावर्षी आलेला सांगलीचा पूर हा भीषण आहे. २००५ साली सांगलीतील पाण्याची पातळी ५२ फुटांपर्यंत होती. आज सांगलीत ५७.६ फुटांवर पाणी आले आहे. मागील पूराच्या तुलनेत ही अधिक आहे. २००५ चा पूर हा अलमट्टी धरण नव्याने बांधल्याने आला होता. धरणातील बॅकवॉटर शहरात घुसले आणि एकच हाहाकार माजला. त्यावेळी यंत्रणा सतर्क नव्हती, अधिकारी प्रशिक्षित नव्हते. मात्र तरीही वेळीच मदतकार्यास सुरूवात झाल्याने अनेकांचे प्राण वाचले व मोठी हानी टळली होती. यंदाच्या पुराच्या फटक्याला सरकारी...
  August 10, 09:54 AM
 • औरंगाबाद - राज्यातील सांगली, काेल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, जळगाव आणि गडचिराेली या जिल्ह्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलेच झाेडपून काढले आहे. सांगलीसह राज्यात पुरामुळे आजवर २९ जणांचा मृत्यू झाला, तर अजूनही ११ जण बेपत्ता आहेत. या परिसरामध्ये आणखी तीन दिवस अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यात एकीकडे पाऊस सुरू असला तरी मराठवाडा आणि विदर्भात काही भागांत अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. रौद्र रूप धारण केलेल्या कृष्णा नदीच्या धोक्याच्या पातळीत...
  August 10, 08:47 AM
 • कोल्हापूर - कोल्हापूर आणि सांगलीला मागील दोन दिवसांपासून पाण्याने वेढा घातला आहे. एनडीआरएफचे पथक पुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढत आहे. यातच आज सकाळी पथकाने कोल्हापुरातील आंबेवाडीतील शिवाजीपूल परिसरात बचाव कार्य राबवले. या दरम्यान एका कुटुंबाला पथकाने बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण प्राधान्य म्हणून महिला व मुलांना हे पथक बाहेर काढत असताना एक मुलीने मात्र बाबांचे नाव घेत टाहो फोडला. आधी माझ्या बाबांना बाहेर काढा, तरच मी बोटीत बसणार, असे ती म्हणताच उपस्थितांचे डोळे पाणावले. या...
  August 9, 08:50 AM
 • सांगली -काेल्हापूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, कार्यालय व सहकारी उद्याेगांवर गुरुवारी सकाळपासून प्राप्तिकर खात्याच्या पथकाने छापे टाकले. कोल्हापुरात दोन ठिकाणी, कागल, संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज आणि पुणे या ठिकाणी छापे टाकण्यात आले. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर दिली होती. ती धुडकावल्यामुळेच हे छापासत्र सत्ताधाऱ्यांनी सुरू...
  July 26, 07:32 AM
 • सातारा - कराडजवळील विंग येथे ३० फूट खोल विहिरीत पडलेल्या १३ वर्षांच्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले. काही ट्रेकर्सनी त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेवटी त्याचा मृतदेहच वर काढावा लागला. विंग येथील १३ वर्षीय मुलगा आदित्य बाबू कदम हा विहिरीत पडला हाेता. त्याला बाहेर काढण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यात आले. परंतु यश येत नव्हते. अखेर कराड पाेलिसांनी सातारा येथील आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ट्रेकर्सचे चंद्रसेन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांना पाचारण केले. ही...
  July 24, 08:49 AM
 • रत्नागिरी - चिपळूण परिसरात झालेल्या जाेरदार पावसामुळे तिवरे धरण मंगळवारी काठाेकाठ भरले. तलाठ्याकडून परिसरातील गावात सतर्कतेचा इशारा रात्री ८.३० च्या सुमारास देण्यात आला. मात्र, ही सूचना सर्वांपर्यंत पाेहाेचण्यापूर्वीच म्हणजे रात्री ९.३० च्या सुमारास धरणाचा बंधारा फुटून परिसरातील सात गावांमध्ये पाणी शिरले. यात १२ घरे वाहून गेल्याने त्यांचे संसार उद्ध्वस्त झाले, तर २४ माणसे वाहून गेली. यापैकी १३ जणांचे मृतदेह बुधवारी सायंकाळपर्यंत हाती लागले, तर उर्वरित ११ जणांचा शाेध सुरू हाेता....
  July 4, 09:20 AM
 • रत्नागिरी : कोकणातसुरू चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात असलेले तिवरे धरण फुटले आहे. धरण फुटल्याने जवळपासच्या परिसरात पूर आला आहे. धरणाजवळ असलेली 10-12 घरे या पुरात वाहून गेली. आतापर्यंत या पुराच्या पाण्यातून 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले. यामध्ये 7 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.24 जण अजुनही बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.तिवरे धरणाची पाणीसाठा क्षमता 0.8 TMC आहे. ही घटना मंगळवारी रात्री 9.30 वाजता घडली. परंतु, प्रशासन आणि माध्यमांमध्ये हे वृत्त सकाळी...
  July 3, 04:31 PM
 • रत्नागिरी- आई-मुलाच्या नात्यालाच काळिमा फासणारी घटना रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात असलेल्या साटवली गावात घडली आहे. घरगुती भांडण आणि कर्जबाजारी झालेल्या मुलाला त्याच्या आईने तिचे सोन्याचे दागिने दिले नाही, म्हणून रागाच्या भरात सख्या मुलाने आईला दगडाने ठेचून मारले आणि त्यानंतर तिचा मृतदेह जाळून हा सर्व प्रकार लपवण्याचा प्रयत्न केला. पण लांजा पोलिसांच्या नजरेतून हा गुन्हेगार सुटला नाही. फातीमा काळसेकर असे दुर्दैवी आईचे नाव आहे, तर मजहर असे निर्दयी मुलाचे नाव आहे. आई-मुलाचे...
  June 19, 04:25 PM
 • सातारा - जैसी करनी वैसी भरनी या न्यायातून कोणालाच सूट मिळत नाही. आमदार शिवेंद्रराजे आमचे बंधू असले तरी ते याला अपवाद नाहीत. लोकसभेला आमदार शिवेंद्रराजेंनी आमचे कामच केले असल्याने आमच्या दिलेल्या शब्दात फरक पडणार नाही. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघात आमचे पाठबळ राहील. त्या भूमिकेत बदल होणार नाही. मात्र, त्यांच्या करणीमुळे जर काही बरेवाईट घडले तर त्यास सर्वस्वी तेच जबाबदार असतील, असा इशारा साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे. त्यांच्या या...
  June 19, 09:16 AM
 • नवी दिल्ली - कधी पाऊस, तर कधी बर्फवृष्टी, कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात राहणाऱ्या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षांच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंजमधील १४,४०० फूट उंचीवरील हमता पास सर केला. एवढ्या लहान वयात हे यश मिळवणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली. मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्णकरत एका विक्रमाची नाेंद नावावर केली हाेती. दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्रात आलेल्या उर्वीने आपल्या विक्रमाविषयी...
  June 12, 09:41 AM
 • शिर्डी -साईबाबा मंदिराजवळ असलेल्या गुरुस्थानाजवळ एका महिलेने शुक्रवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अवघ्या सहा महिन्यांच्या चिमुरडीस बेवारस सोडून पलायन केले. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून शिर्डी पोलिस व साई संस्थान प्रशासन या महिलेचा शोध घेत आहे. दरम्यान, ही चिमुरडी सुखरूप असून तिला साई संस्थानने पोलिसांकडे साेपवले आहे. साईबाबांची आरती झाल्यानंतर मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येतात. या वेळी भाविकांची मोठी गर्दी होते. या गर्दीचा फायदा घेत एका महिलेने सहा महिन्यांची चिमुकली...
  June 1, 09:54 AM
 • कोल्हापूर- हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीच्यावेळी 459 मते जास्त निघाल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर एकच खळबळ माजली असून पुन्हा एकदा ईव्हीएमवर संशय व्यक्त केला जात आहे. राजू शेट्टींनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यांनी सांगितले, हातकणंगले मतदारसंघात ईव्हीएमद्वारे एकूण 12 लाख 45 हजार 797 मतदान झाले होते. मात्र, मतमोजणीदरम्यान ईव्हीएममध्ये 12 लाख 46 हजार 256 मते मोजली गेली. याप्रमाणे झालेल्या...
  May 31, 12:52 PM
 • सांगली । हरहुन्नरी मराठी अभिनेते वैभव मांगले शुक्रवारी अलबत्या-गलबत्या या नाटकाचा प्रयोग सुरू असताना अचानक चक्कर येऊन कोसळले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने त्यांना चक्कर आली. सांगलीत सध्या तापमान ४२ अंशांच्या घरात आहे. नाट्यगृहात एसी नसल्याने उकाडा प्रचंड होता. शिवाय चेटकिणीची जाड वेशभूषा असल्याने श्वासोच्छ्वासाचा त्रास झाल्याने मांगले यांनी सांगितले.
  April 27, 10:42 AM
 • कोल्हापूर/सांगोला -मनोहर पर्रीकर यांना राफेल विमानांचा करार मान्य नव्हता, यामुळेच ते संरक्षणमंत्रिपद सोडून गोव्यात परतले, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत केला. पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २०१४ मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. राज ठाकरेंच्या प्रचाराबाबत ते म्हणाले, मोदी-शहा जोडी देशाला घातक आहे, हे त्यांना सांगायचे आहे. त्यांनी ही निवडणूक लढवली नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार...
  April 14, 10:03 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात