Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- अंबाबाई मंदिरामध्ये प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उद्घाटन सोहळा उद्या (ता. 25) सकाळी 9 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिरामध्ये प्राथमिक उपचार केंद्र हे सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये दिवसेंदिवस होणारी भक्तांची गर्दी आणि त्यांना सुविधा पुरवणे हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे...
  May 24, 01:12 PM
 • कोल्हापूर- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना उचगाव येथील जानकी नगरात बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. विद्या शिवाजी ठोंबरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. खून करून पतीनेही स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पती शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40) याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत विद्याचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (रा.कुर्डुवाडी, जि.सोलापूर) याने गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार...
  May 23, 01:10 PM
 • कोल्हापूर- घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे गज वाकवून शुक्रवारी पहाटे पलायन केले होते. त्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घुणकी गावाजवळ अटक केली. हे आरोपी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता.सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी,...
  May 19, 06:28 PM
 • सांगली-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली अाहेत. यंदा ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.सांगली जिल्ह्यातील आवंढी (ता. जत) येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार विलासराव जगताप, आमदार...
  May 19, 02:30 AM
 • सातारा- क-हाडमधील एका डाॅक्टरसह पाच जणांना पॅथाॅलाॅजीस्टचा खोटा रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली आहे. नेमके काय आहे प्रकरण..... परभणी येथे राहणारे संजय गायकवाड कामानिमित्त 6 फेब्रुवारी 2012 रोजी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांना लघवीचा त्रास होत होता. गायकवाड यांनी लाईफलाईन लॅबमध्ये तपासणीसाठी नमुना दिला होता. त्यावेळी त्यांना पॅथॉलॉजिस्ट नसतानाही रिपोर्ट देण्यात...
  May 18, 04:37 PM
 • कोल्हापूर-घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील वाकवून धूम ठोकल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार शाहूवाडी पोलीस ठाण्यातच घडला. पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून गुन्हेगार पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले),ओंकार महेश सूर्यवंशी (वय 19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत...
  May 18, 04:06 PM
 • कोल्हापूर- कागलचे तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे याला खरेदी जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तहसीलदार घाडगे याच्या बरोबरच सुळकूड येथील महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला आणि एकोंडी येथील तलाठी मनोज आण्णासो भोजे या दोघांनाही या प्रकरणात सहभागी असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर एसीबी कडून प्राप्त माहिती अशी, तक्रारदार संजय धोंडीराम...
  May 17, 07:16 PM
 • सांगली - दाढी करुन चकाचक राहाणे ही अनेक पुरुषांची हौस असते. जर कोणी सोन्याच्या वस्तऱ्याने दाढी करुन देणार असेल तर... होय सोन्याचा वस्तरा! सांगलीच्या चिंचोळ्या गल्लीत असलेल्या वस्तरा मेन्स स्टुडिओचे मालक रामचंद काशिद हे ग्राहकांची दाढी करण्यासाठी सोन्याचा वस्तरा वापरत आहेत. आपला व्यवसाय अधिक वाढावा यासाठी त्यांनी आपला व्यवसाय ज्या हत्यारावर चालतो, तो वस्तरा सोन्याचा करुन घेतला आहे.त्यांनी लढवलेली ही शक्कल त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठीही फायद्याची ठरली आहे. सोन्याचा वस्तऱ्याने दाढी...
  May 17, 06:53 PM
 • कोल्हापूर- मुसळधार पावसाने आज सलग दुसऱ्या दिवशी कोल्हापूर शहरासह संपुर्ण जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले. आज सायंकाळी सुमारे पाच वाजता जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड उष्मा जाणवत होता. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सायंकाळी चार वाजल्यानंतर वळवाचा मुसळधार पाऊस पडत असल्याने काही अंशी नागरीकांना उष्म्यापासून दिलासा मिळाला आहे. बुधवारी सायंकाळी देखील सोसाट्याचा वारा आणि मुसळधार...
  May 17, 06:13 PM
 • कोल्हापूर- नुकत्याच झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणूक झाली. त्यात बेळगावच्या मतदारांनी महाराष्ट्र एकीकरण समितीला स्पष्ट नाकारले. महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. भाजपचे उमेदवार अभय पाटील यांच्या समर्थकांनी एकीकरण समितीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या घरावर दगडफेक करून फटाके फोडले. या प्रकारामुळे सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे. सुदैवाने कोणतीही दुखापत नाही.. घरावर फटाके फोडण्यात आले तेव्हा किरण ठाकूर घरात नव्हते. त्यामुळे ठाकूर यांच्यासह त्यांच्या...
  May 17, 03:51 PM
 • सांगली- पलूस- कडेगाव विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार संग्रामसिंग देशमुख यांच्यासह सात उमेदवारांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे काँग्रेसचे माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 28 मे रोजी निवडणूक होणार होती. विश्वजित कदम यांच्यासह 8 उमेदवार रिंगणात होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा सोमवारी अखेरचा दिवस होता. काँग्रेसने या मतदारसंघात बिनविरोध निवडणूक...
  May 14, 06:52 PM
 • कोल्हापूर- कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा सांगली जिल्ह्यामध्ये गुरुवारी दुपारी वादळी वा-यासह पाऊस झाला. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र दुसरीकडे या अवकाळी पावसासह गारा पडल्याने शेतमालाचे नुकसान झाले आहे. कोकणात तसेच गोव्यात काही काही ठिकाणी तर साता-यातील पाटणमध्ये मुसळधार पाऊस झाला. यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काजू, आंबा या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कोल्हापुरात सायंकाळी 5.15...
  May 10, 07:21 PM
 • सांगली- दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी पाणी फाऊंडेशनमार्फत राज्यभरात महाश्रम अभियान राबवण्यात येत आहे. फाउंडेशनच्या आवाहनानंतर राज्यातील विविध घटकांतील लोक या अभियानात सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. समाजाकडून नेहमीच उपेक्षित ठरलेल्या वेश्यासुद्धा या अभियानात मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन श्रमदान करत आहेत. सांगली शहरातील वेश्या महिलांनी नुकतेच हातात खोरे-पाटी घेऊन तासगावच्या चिखलगोठण गावात श्रमदान केले. सांगली शहरातील सुंदरनगर वेश्या वस्तीतील वेश्यांनी कधी बाहेरचे जग माहिती...
  May 5, 02:47 PM
 • कोल्हापूर- टेंबलाईवाडी परिसरात चार भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बालकांसह २६ जण गंभीर जखमी झाले.जखमींना तात्काळ उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने संतप्त नागरिकांनी चार पैकी दोन कुत्र्यांना पाठलाग करून ठार मारून टाकले. या घटनेची अधिक माहिती अशी की, कोल्हापुरातील टेबलाईवाडी परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर मोठया प्रमाणात झाला आहे. परिसरात राहणाऱ्या लोकांना व लहान मुलांना या...
  May 4, 08:29 PM
 • महाबळेश्वर- भिलारला संमेलन व्हावे ही मनापासून इच्छा आहे. आता हा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या येथील शाखांनी आणि तसेच महामंडळाने घ्यावा, शासन त्याला पूर्ण मदत करेल, किंबहुना शासन साहित्य संमेलनाला मदत करतच असते अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. याला मात्र महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने ठाम विरोध दर्शविला आहे. महाबळेश्वर तालुक्यातील भिलारला पुस्तकांचे गाव वसवुन एक वर्ष झाले या निमित्त त्यांनी दिव्य मराठीशी विशेष संवाद...
  May 4, 05:42 PM
 • सांगली- शेतकऱ्यांची 34 हजार कोटींची कर्जमाफी करत 89 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा मुख्यंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली. मात्र फडणवीस यांनी ते सिद्ध करून दाखवावे, आम्ही निवडणुका सोडून देऊ असे आव्हान काँग्रेस प्रवक्ते खासदार अशोक चव्हाण यांनी दिले. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्यावतीने मिरजेतील किसान चौकात एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यामुळे कुठे नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा? याचे देवेंद्रजींनी उत्तर द्यावे,...
  May 3, 04:06 PM
 • कोल्हापूर- यावर्षी हज यात्रेला राज्यातून 12 हजार तर देशभरातून सव्वा लाख यात्रेकरू जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हज कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष अधिकारी इम्तियाज काझी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मुस्लिम समाजात पवित्र मानल्या जाणाऱ्या हज यात्रेचा नियोजन केंद्र आणि राज्य हज समितीकडून सुरू आहे. अल्पसंख्यांक कल्याण मंत्रालयांतर्गत हज कमिटी ऑफ इंडिया ही सर्वोच्च संस्था या यात्रेचं संपूर्ण नियोजन करते. महाराष्ट्र राज्याची हज कमिटी ही महाराष्ट्र राज्यातून जाणाऱ्या हज...
  April 28, 07:15 PM
 • कोल्हापूर- तळसंदे येथील इंजिनिअरिंग काॅलेजध्ये तिसर्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याने रेल्वेसमोर उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना शनिवारी सकाळी समोर आली. हा विद्यार्थी काल रात्रीपासून बेपत्ता होता. मिळालेल्या माहितीनुसार तिस-या वर्षाला शिकत असलेला राहुल परेकर याने काल सीएमपीएसचा शुक्रवारी पेपर दिला होता. हा पेपर त्याला अवघड गेला होता. यामुळे तो निराश होता. सायंकाळी मित्रांना फिरुन येतो असे सांगून तो रुमबाहेर पडला मात्र रात्र झाली तरी तो परतला नाही. आज सकाळी त्याने...
  April 28, 06:04 PM
 • सांगली- खानापूर तालुक्यातील रेवणगाव घाटात एसटी आणि टिप्परची समोरासमोर धडक होऊन 3 जण जागीत ठार झाले आहेत तर चार प्रवासी जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एसटीला धडक दिल्यांतर डिप्पटर दोन तीन वेळा उलटला. हा अपघात मंगळवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात तानाजी विलास जाधव (वय47 रा. भडकेवाडी) विजय जालिंदर कुंभार ( 46), आणि सुनंदा उत्तम यादव (वय 49 रा.वाटूंबरे ता. संगोला) यांच्या मृत्यू झाला आहे तर सत्वशीला श्रीरंग धाने, दत्तू सुनील धाने आणि साई...
  April 24, 02:21 PM
 • सातारा- पुणे-बंगलुरु महामार्गावार पाचवड उडड्णा पुलाजवळ डिझेल टॅंकर पलटी झाल्याने वाहतुक विस्कळीत झाली. डिझेलची वाहतूक करणारा टॅंकर (एमएच 06 बीपी 1355) पुण्याहून साता-याकडे निघाला होता. ड्रायवरचे नियंत्रण सुटल्याने टॅंकर पलटी झाला. यामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहने रोखून ठेवण्यात आली होती. अपघातग्रस्त टॅंकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
  April 24, 12:27 PM
 
जाहिरात

RECOMMENDED