जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • कोल्हापूर- पंचगंगा नदी पात्रात प्रदूषणामुळे हिरवीगार जलपर्णी पसरल्याने नदीला मैदानाचे स्वरूप आले आहे. ढिम्म प्रशासनाला जागे करण्यासाठी शिवसेनेने चक्क पंचगंगेच्या जलपर्णी मैदानात प्रतिकात्मक फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करून अनोखे आंदोलन केले. यावेळी शिवसेनेने प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि जिल्हा प्रशासनाचा जाहीर निषेध केला. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर येथील प्रदूषित पंचगंगेच्या काठावरील 28 गावांनी आंदोलन सुरू केले आहे. चार पाच दिवसांपूर्वी हातकणंगले गावच्या कोळी बांधवांनी नदी...
  June 19, 10:52 AM
 • कोल्हापूर - अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापन राज्य शासनाच्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून केले जाते. राज्य शासनाकडून श्री.करवीर निवासिनी अंबाबाई विश्वस्त व्यवस्था अधिनियम 2018 हा कायदा 12 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कायद्यानुसार वंशपरंपरागत पूजा-यांचे हक्क संपुष्टात आले आहेत. त्यामुळे आता देवस्थानच्या अखत्यारीत व्यवस्था व कार्यभार रहाणार आहे. अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. तात्पुरता पुजारी पगारी नेमणुकीसाठी 117 अर्ज आले...
  June 18, 08:55 PM
 • कोल्हापूर- बंगळुरुतील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येतील मारेकरी परशुराम वाघमारेसह अन्य सहाजणांना कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. डॉ.कलबुर्गी, कॉ. पानसरे आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या एकाच पिस्तूलातून केली गेल्याचे अंदाज पुढे आले असून पानसरे हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिस परशुरामचा चौकशीसाठी ताबा घेणार आहेत. दरम्यान पानसरे हत्याकांडातील सीबीआयचे साक्षीदार असलेले संजय साडविलकर यांनी परशुराम वाघमारे याचे छायाचित्र दाखवले अथवा ओळख परेड साठी बोलावण्यात आले तर मी नक्की त्याला...
  June 18, 06:45 PM
 • कोल्हापूर- यंदाचा राजर्षी शाहू पुरस्कार प्रा.पुष्पा भावे यांना जाहीर करण्यात आला आहे. ही माहिती कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांनी पत्रकार परिषदेत दिली. एक लाख रुपये, स्मृती चिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. 26 जुलै रोजी राजर्षी शाहू जयंती दिनी सायंकाळी 6 वाजता शाहू स्मारक भवन येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली हा...
  June 18, 06:23 PM
 • शिर्डी- बाळासाहेब विखे यांनी केलेल्या वैचारिक संघर्षामुळे प्रवरा परिसर उभा राहिला. त्यांच्या विकासाच्या विचाराला समृद्ध करतानाच भूमिकेशी प्रामाणिक राहूनच भविष्यातील सामाजिक परिवर्तनाच्या संघर्षास कटिबद्ध व्हावे लागेल. येणाऱ्या काळात राजकीय, सामाजिक आव्हाने मोठी असली, तरी विकासाच्या प्रक्रियेत आपण कोठेही मागे राहणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच या विकासाच्या कामाला गालबोट लावणाऱ्यांची कारस्थान संघटितपणे हाणून पाडावी लागतील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...
  June 16, 10:25 AM
 • काेल्हापूर -पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिराप्रमाणेच अाता काेल्हापुरातील श्री महालक्ष्मी मंदिरातही सर्व जातींतून पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय पश्चिम देवस्थान मंदिर प्रशासन समितीने शुक्रवारी घेतला. त्यासाठी मंगळवारपासून मुलाखतीही हाेणार अाहेत. या नियुक्तीत विद्यमान पुजाऱ्यांना प्राधान्य देण्याची तरतूद देवस्थानने केली अाहे. मात्र, एकाही विद्यमान पुजाऱ्याने त्यासाठी अर्ज केलेला नाही, हे विशेष. श्री महालक्ष्मी देवीच्या मूर्तीला घागरा-चाेळी नेसवण्याच्या प्रकारानंतर...
  June 16, 03:43 AM
 • कोल्हापूर- पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, अंबाबाई मंदिरात सर्व जातीचे पूजारी नेमण्यात येणार आहे. येत्या मंगळवारपासून (ता.19) अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येणार आहे. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याची मागणी करवीरवासियांनी केली होती. यासाठी कोल्हापूरमध्ये आंदोलनही झाले होते. पंढरपूर आणि शिर्डीच्या धर्तीवर कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याच्या निर्णयाला विधानसभेत...
  June 15, 05:16 PM
 • कोल्हापूर-गेल्या 20 वर्षांपासून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेली कोल्हापुरातील पंचगंगा नदी आज चक्क चोरीला गेली आहे. शंभरहून अधिक जणांनी आज (सोमवारी हातकणंगले पोलिस ठाण्यात धाव घेऊन कोल्हापुरातील पंचगंगा नदी चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली आहे. त्यामुळे कोल्हापूर पोलिस सुद्धा आवाक् झाले आहेत. सकाळी शंभरहून अधिक लोक मासे पकडण्याचे जाळे आणि हलगी घेऊन पोलिस ठाण्यात हजर झाले. या सर्वांनी पंचगंगा नदी चोरीला गेल्याच्या वैयक्तिक लेखी तक्रारी पोलिसांना दिल्या आहेत. या तक्रारीमध्ये आम्ही...
  June 11, 07:36 PM
 • सांगली- शहरातील गजानन काॅलनीत राहणा-या दहावीतील एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दुपारी दहावीचा आॅनलाईन निकाल जाहीर झाला होता. त्यात त्याला 53 % गुण मिळाले होते. त्याने याबद्दल रात्री मिंत्राना पेढेही वाटले आणि नंतर घरी आपल्या खोलीत आत्महत्या केली. साहिल वडगू कोलवेकर वय 15 असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. साहिल सायंकाळी मित्रांना पेढे वाटण्यासाठी गेला होता. रात्री घरी परत आल्यानंतर तो आपल्या बेडरूममध्ये गेला. परंतु तो बराच वेळ तो बाहेर न...
  June 9, 12:46 PM
 • कोल्हापूर- शिरोली येथील हौसिंग सोसायटी मधील बंगल्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यावेळी लागलेल्या आगीत दहा जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (बुधवारी) सकाळी साडे 7 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये दऱ्याप्पा काडगोंड, सुधाराणी काडगोंड, श्रावणी काडगोंड, दानाम्मा पाटील,कृष्णा केदारी पाटील, महेंद्र कृष्णा पाटील, सागर जनार्दन पाटील, निलेश सुखदेव पाटील, निलेश सहदेव आढाव, मारूती सुतार यांचा समावेश आहे. अधिक माहिती अशी की, शिरोली माळवाडी भागात एक हौसिंग सोसायटी आहे. या...
  May 30, 02:45 PM
 • कोल्हापूर- बारावी परीक्षेच्या निकालाच्या धास्तीने चिंताग्रस्त विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना इचकरंजी येथे घडली आहे. महेश जोशी (18) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. शहरातील स्वामी अपार्टमेंटमध्ये आज सकाळी ही घटना घडली. मिळालेल्या माहीतीनुसार, एका कनिष्ठ महाविद्यालयात महेश शिकत होता. या वर्षी त्याने बारावीची परिक्षा दिली होती. परिक्षा झाल्यापासून तो निकालाच्या चिंतेत होता. या चिंतेतून त्याने मध्यारात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर आज सकाळी आठ...
  May 27, 04:37 PM
 • कोल्हापूर- महाराष्ट्रात विधानसभेसाठी शिवसेना भाजप युती झाली नाही तर काँग्रेस पुन्हा विजयी होईल व काँग्रेसचा कारभार जनतेला माहिती आहे म्हणूनच सर्वसामान्य जनता व महाराष्ट्राच्या हितासाठी भाजप शिवसेनेशी युती करण्यासाठी आगतिक आहे. तरीही शिवसेनेला युती करायची नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी त्यांनी पालघर मध्ये वनगा यांना उमेदवारी देताना उद्धव ठाकरे यांनी चुकीचे राजकारण...
  May 26, 05:04 PM
 • कोल्हापूर -जिल्हा परिषद आणि मनपाच्या सत्तेसाठी दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेत्यांच्या झालेल्या सामंजस्य करारानुसार आज बिनाआवाजाच्या बॉम्बचीच वात काढून टाकत कोल्हापूरच्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शोभा पंडितराव बोंद्रे या विजयी झाल्या तर उपमहापौर पदावर राष्ट्रवादीच्या महेश सावंत यांची वर्णी लागली. आत्ता पर्यंत सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेने महापौरपदाच्या निवडणुकीत तटस्थ राहण्याचा निर्णय गुरुवारी रात्रीच घेतल्याने काँग्रेसच्या विजयाचा मार्ग सुकर झाला....
  May 25, 02:55 PM
 • कोल्हापूर- अंबाबाई मंदिरामध्ये प्राथमिक आरोग्य उपचार केंद्राचे उद्घाटन सोहळा उद्या (ता. 25) सकाळी 9 वाजता श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. मंदिरामध्ये प्राथमिक उपचार केंद्र हे सामाजिक बांधिलकी म्हणून सुरू करण्यात येणार आहे. मंदिरामध्ये दिवसेंदिवस होणारी भक्तांची गर्दी आणि त्यांना सुविधा पुरवणे हा उद्देश ठेवून हा उपक्रम राबविण्यात येत आहे, असे...
  May 24, 01:12 PM
 • कोल्हापूर- चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून निर्घृण हत्या केल्याची घटना उचगाव येथील जानकी नगरात बुधवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास घडली. विद्या शिवाजी ठोंबरे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. खून करून पतीनेही स्वतःच्या गळ्यावर विळ्याने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जखमी पती शिवाजी प्रभाकर ठोंबरे (40) याला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मयत विद्याचा भाऊ प्रकाश दत्ता धायगुडे (रा.कुर्डुवाडी, जि.सोलापूर) याने गांधीनगर पोलिस ठाण्यात तक्रार...
  May 23, 01:10 PM
 • कोल्हापूर- घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे गज वाकवून शुक्रवारी पहाटे पलायन केले होते. त्यामुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली होती. मात्र अवघ्या 24 तासाच्या आत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या आरोपींना पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर घुणकी गावाजवळ अटक केली. हे आरोपी पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला होता.सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी,...
  May 19, 06:28 PM
 • सांगली-महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धाराने सुरू केलेल्या जलयुक्त शिवार अभियानातून आतापर्यंत ११ हजार गावे दुष्काळमुक्त झाली अाहेत. यंदा ६ हजार गावे दुष्काळमुक्त करण्यात येतील, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला.सांगली जिल्ह्यातील आवंढी (ता. जत) येथील भटकीमळा डोंगर परिसरात पाणी फाउंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारण कामांची पाहणी करून त्यांनी श्रमदान केले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी आमदार विलासराव जगताप, आमदार...
  May 19, 02:30 AM
 • सातारा- क-हाडमधील एका डाॅक्टरसह पाच जणांना पॅथाॅलाॅजीस्टचा खोटा रिपोर्ट देवून फसवणूक केल्याबद्दल दोन वर्षे सक्तमजुरी व प्रत्येक दोन हजार अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे. फौजदारी न्यायाधीश टी. आर. गोगले यांनी आज ठोठावली आहे. नेमके काय आहे प्रकरण..... परभणी येथे राहणारे संजय गायकवाड कामानिमित्त 6 फेब्रुवारी 2012 रोजी कऱ्हाडला आले होते. त्यावेळी त्यांना लघवीचा त्रास होत होता. गायकवाड यांनी लाईफलाईन लॅबमध्ये तपासणीसाठी नमुना दिला होता. त्यावेळी त्यांना पॅथॉलॉजिस्ट नसतानाही रिपोर्ट देण्यात...
  May 18, 04:37 PM
 • कोल्हापूर-घरफोडी आणि दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या चार सराईत गुन्हेगारांनी लॉकअपच्या दरवाजाचे ग्रील वाकवून धूम ठोकल्याने पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे. आज शुक्रवारी पहाटे 4 ते 5 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार शाहूवाडी पोलीस ठाण्यातच घडला. पोलिसांच्या हातावर तुरी ठेवून गुन्हेगार पळाल्याने संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. सूरज सर्जेराव दबडे (वय 22, रा. वाठार पैकी कासारवाडी, ता. हातकणंगले),ओंकार महेश सूर्यवंशी (वय 19, रा. बँक ऑफ इंडियासमोर, कासेगाव, ता. वाळवा, जि. सांगली), गोविंद वसंत...
  May 18, 04:06 PM
 • कोल्हापूर- कागलचे तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे याला खरेदी जमिनीचे सातबारा पत्रकी नाव नोंद करण्यासाठी तब्बल 2 लाख 50 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.तहसीलदार घाडगे याच्या बरोबरच सुळकूड येथील महिला तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला आणि एकोंडी येथील तलाठी मनोज आण्णासो भोजे या दोघांनाही या प्रकरणात सहभागी असल्याने ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत कोल्हापूर एसीबी कडून प्राप्त माहिती अशी, तक्रारदार संजय धोंडीराम...
  May 17, 07:16 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात