जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Western Maharashtra >> Kolhapur

Kolhapur News

 • सातारा- देशभरात दिवसेंदिवस बलात्काराच्या घटनांत वाढ होत आहे. नुकतीच कठुआ येथे चिमुरडीची बलात्कार करुन हत्या केल्याने देशभरात संतापाची लाट उसळली होती. अशातच साता-याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राजेशाही असती तर बलात्का-यांना गोळ्या घालून मारण्याची सजा दिली असती असे विधान केले आहे. ते साता-यातील एका आंदोलनात बोलत होते. जिल्हा परिषदेच्या समोर एनआरएचएमच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनस्थळी खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट दिली म्हणाले, जनतेने निवडून दिलेले सदस्य,...
  April 19, 08:15 PM
 • सांगली- शहरातील आपटा पोलीस चौकी समोरील एका अपार्टमेंटमध्ये एका व्यक्तीचा खून झाल्याचे बुधवारी सकाळी उघडकीस आले. हल्लेखोरांच्या हल्ल्यात त्या व्यक्तीची आजी देखील गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरु केला आपटा चौकीसमोरील श्री अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर पारेख कुटुंबीय राहते. या कुटुंबातील टिलूभाई पारेख आणि त्यांची आजी राहत होती. मध्यरात्रीच्या अज्ञात हल्लेखोर टिलू पारेखच्या फ्लॅटमध्ये घुसले व...
  April 18, 02:00 PM
 • कोल्हापूर - राजकीय श्रेयवादाच्या विळख्यातून सुटलेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा आज अखेर विकासाच्या दिशेने झेपावले. केंद्र सरकारच्या उडाण योजनेअंतर्गत कोल्हापूरची गेल्या सहा वर्षांपासून बंद पडून रखडलेली कोल्हापूर-मुंबई विमानसेवेचा शुभारंभ आज दुपारी तीन वाजता एअर डेक्कन कंपनीच्या विमानाच्या टेकऑफने झाला. कोल्हापूरकरांनी आज पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेल्या विमानसेवेचे अनोख्या जल्लोषात स्वागत केले. मुंबईच्या दिशेने झेपावलेल्या आजच्या पहिल्या विमानातून चक्क दिव्यांग मुले,...
  April 17, 05:46 PM
 • कोल्हापूर- उत्तप्रदेशातील विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवाराने इचलकरंजीतील एका घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला आहे.अरुणकुमार उमाशंकर उपाध्याय (वय 44, मुळ-भीमपूर ता बदलापूर, जिल जौनपूर. उत्तरप्रदेश) यांनी आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुणकुमार यांनी गेल्या वर्षी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीकडून मडियाहू मतदारसंघातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्न केले...
  April 16, 08:24 PM
 • बेळगाव- सांगलीच्या शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरोधात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येळ्ळूर येथील महाराष्ट्र मैदानावर झालेल्या सभेत प्रक्षोभक विधाने केल्याने निवडणूक आयोगाने पोलिसात तक्रार दिली होती. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून बेळगाव पोलिसआयुक्तालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिडे हे येथील कुस्त्यांना उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रक्षोभक विधाने केली होती.
  April 13, 11:30 PM
 • कोल्हापूर तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमणे काढण्याची कारवाई रोकण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार व अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला निर्णय आहे. त्याता माझा वैयक्तिक काही हस्तक्षेप नाही. तरी देखील विरोधक माझ्यावर बेताल आरोप करीत आहेत, त्यामुळे आता माझी सटकली आहे, असे वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना केले आहे. कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या वीस...
  April 13, 07:04 PM
 • कोल्हापूर- तेजस्विनी सावंत हिने राष्ट्रकुल स्पर्धेत नेमबाजीत रौप्य पदक पटकावल्यानंतर तिच्या कोल्हापूर येथील घरी फटाक्यांच्या आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तेजस्विनी सावंतने 50 मी. रायफल शुटिंग प्रकारात रौप्यपदकाची कमाई केली आहे. नेमबाजीत भारताला मिळालेलं हे १२ वं पदक ठरलं आहे. तेजस्वीनीचे पती समीर दरेकर म्हणाले की, तेजस्विनीने आज देशाला पदक मिळून दिल्याने तिचा सार्थ आभिमान वाटतो. तिच्या या यशामागे तिने गेले 19 वर्ष घेतलेली मेहनत आहे. आज तिला यशस्वी झालेले पाहून खूप आनंद...
  April 12, 08:21 PM
 • पुणे - पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटात (जि. सातारा) ३२ कामगारांना घेऊन जाणारा टेम्पो घाटातील धोकादायक एस कॉर्नर वळणावर उलटला. मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात १८ जण ठार, तर २० हून अधिक जण जखमी झाले. या अपघातात टेम्पोचालकही मृत्युमुखी पडला. मृतांमध्ये ७ महिला आणि एका मुलासह अकरा पुरुषांचा समावेश आहे. रात्रभर सुरू असलेल्या प्रवासामुळे चालकाला झोपेची गुंगी येत होती आणि त्यामुळेच हा अपघात घडल्याचे समजते. खंडाळा तालुका पोलिसांनी दिलेल्या...
  April 11, 01:02 AM
 • सांगली - पतीसाेबत हाेणाऱ्या सततच्या भांडणामुळे त्रस्त झालेल्या एका महिलेने अापल्या तीन मुलींसह विहिरीत उडी घेऊन अात्महत्या केली. ही घटना सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वज्रचाैंडे या गावात साेमवारी सकाळी उघडकीस अाली. सुनीता सुभाष राठोड (३२), जुळ्या बहिणी आशा (४), उषा (४) व ऐश्वर्या (२) अशी मृतांची नावे अाहेत. मूळ कर्नाटकातील विजापूर तालुक्यातील रहिवासी असलेले राठाेड कुटुंबीय कामाच्या निमित्ताने सांगली जिल्ह्यात तीन महिन्यांपासून स्थलांतरित झाले हाेते. रविवारी कामाला सुटी...
  April 10, 01:22 AM
 • सातारा- धनंजय मुंडे यांनी साता-यातील पाटणमध्ये हल्लाबोलआंदोलनातशिवसेनेवर घणाघाती टीका केली आहे.शिवसेना आता शिवसेना राहिली नाही, ती भीवसेना झाली आहे. पाच ते सहा मंत्रीपदांसाठी भाजपसमोर लाळ गाळण्याचे काम शिवसेना करत आहे. वेळोवेळी सत्तेला लाथ मारण्याची भाषा केली जाते मात्र राजीनामे काही खिशातून बाहेर निघत नाहीत. असे धनंजय मुंडे यांनी शिवसेनेला खडे बोल सुनावले. राष्ट्रवादीचे नेते पूर्ण ताकदीने सत्ताधारी भाजप शिवसेनेवर हल्ला चढवत आहेत. हल्लाबोल यात्रेचा चौथा टप्पा पश्चिम...
  April 9, 06:39 PM
 • कोल्हापूर- जगातील पाचव्या क्रमांकाचे ज्वेलरी रिटेलर असलेले मलाबार गोल्ड आणि डायमंड्स यांच्या 215 व्या शोरुमचे आज कोल्हापुरात बॉलीवूड स्टार अनिल कपूर यांच्या हस्ते उद्घाटन मोठ्या जल्लोषात झाले. यावेळी समुहाचे इंडिया ऑपरेशन्सचे व्यवस्थापकीय संचालक ओ.आशेर, रिजनल हेड एम.पी.सूबेर आणि विशेष निमंत्रितांसह मान्यवर उपस्थित होते. सर्व वयोगटातील ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन बनवण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी हे मलाबार गोल्ड आणि डायमंड्सचे खास वैशिष्टय आहे. रोजच्या वापरातील दागिने,...
  April 8, 03:49 PM
 • सांगली- एका 24 वर्षीय तरुणाने एकतर्फी प्रेमातून नववीत शिकणा-या मुलीच्या गळ्यावर ब्लेडने वार केले. यानंतर स्वत: चा गळा कापून हाताची नस कापली आहे. यात दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस घटनास्थळी पोहचले असून दोघांनाही हाॅस्पिटलमध्ये दाखल केले आहे. जतमधील मध्यवर्ती भागात सकाळी 10 वाजता ही घटना घडली. पीडित मुलगी सकाळी शाळेत जाण्यासाठी निघाली होती. त्यावेळी कृष्णा जालिंदर पिसाळ (24) हा मुलीच्या जवळ आला आणि तिच्या गळ्यावर ब्लेडने वार केला. यात ती गंभीररित्या जखमी झाली. त्याने यानंतर स्वत: गळा आणि...
  April 7, 02:11 PM
 • कोल्हापूर-जयसिंगपूरातील येथील जैन श्वेतांबर मंदिरात महिन्यापूर्वी झालेल्या चोरीचा गुन्ह्यात एलसीबीने राजस्थानमधील दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोकड, दागिने असा 12 लाख 43 हजार रुपये किंमतीचा ऐवज जप्त केला. मंदिरातील सहायक पुजार्यानेच राजस्थान येथील कुख्यात टोळीला हाताशी धरून चोरीचा कट रचल्याचे उघड झाले आहे. यामध्ये चोरीमध्ये सामिल इतर चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांची पथके तयार केली आहेत. शंकर उर्फ सिकाराम भारमाजी गरासिया (वय 26), धन्नाराम दौलाराम गरासिया (19, पाट्रीयाकी...
  April 7, 01:37 PM
 • कोल्हापूर/सोलापूर- हवामान विभागाने येत्या शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही भागात गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. मात्र, एक दिवस आधीच गारांसह जोरदार पावसाने कोल्हापूर आणि सोलापूर जिल्हाला झोडपले आहे. कोल्हापूरात गारांसह मुसळधार पाऊस कोल्हापूर जिल्ह्यातील काही ठिकाणी गुरुवारी सायंकाळी गारांच्या वर्षावात मुसळधार पावसाने झोडपून काढले. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. फेरीवाल्यांची,फळ विक्रेत्यांची सुद्धा आजच्या या...
  April 5, 06:36 PM
 • कोल्हापूर- भाजपसोबत सत्तेत बसायचं... कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची...आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा...अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे...त्याचे तोंड इकडे की तिकडे कळत नाही, तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टीका माजी उपमुख्यमंत्री आणि विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथील जाहीर सभेत केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही...
  April 3, 06:59 PM
 • कोल्हापूर- हे सरकार संविधान बदलण्याची भाषा करते आहे. यांचा एक केंद्रीय मंत्री अनंतराव हेगडे हे अशी भाषा कशी वापरू शकतता. यांना कसली मस्ती चढली आहे असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला. कोल्हापुर येथील दसारा चौकात जाहीर राष्ट्रवादी पक्षाची जाहीर सभा पार पडली. यावेळी अजित पवार यांनी सरकारवर चौफेर टोलेबाजी केली. मुख्यमंत्री, चंद्रकांतदादा पाटील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी...
  April 3, 01:59 AM
 • कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नाकर्त्या भाजप-सेनेच्या सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले असून हे आंदोलन आता पश्चिम महाराष्ट्रात धडकणार आहे. या हल्लाबोल आंदोलनाच्या चौथ्या टप्प्याची सुरुवात आजपासून (2 एप्रिल) कोल्हापूरच्या अंबाबाईचे दर्शनाने झाली. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते रविवारी रात्रीच कोल्हापूरात दाखल झाले आहेत. त्यांनी अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. यानंतर आज सकाळी मुरबाड येथील हल्लाबोल आंदोलनासाठी रवाना झाले. पीएनबी घोटाळा, उद्याोजक आणि...
  April 2, 12:39 PM
 • अकोला/कोल्हापूर- शेतकऱ्यांची संपुर्ण कर्जमुक्ती, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावासह विविध ज्वलंत प्रश्न सोडविण्यासाठी संसदेचे सात दिवसांचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली. दिल्लीत झालेल्या गोलमेल परिषदेत देशातील 193 शेतकरी संघटना व भाजप वगळता 32 राजकीय पक्षांच्या नेत्यांनी या ठरावाला पाठिंबा दिल्याने सत्ताधारी भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे. शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला अच्छे दिन...
  March 31, 07:20 PM
 • कोल्हापूर- महाराष्ट्राचे आराध्य दैवत दख्खनचा राजा श्रीक्षेत्र जोतिबाची चैत्र पोर्णिमा यात्रा आज महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, गोवा आणि आंध्र प्रदेशातून आलेल्या तब्बल पाच लाखाच्यावर भाविकांच्या उपस्थितीत गुलाल, खोबऱ्याची उधळण करत आणि जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटे शासकीय अभिषेक, दुपारी आकाशाला गवसणी घालणाऱ्या उंचच्या उंच सासनकाठ्यांची हलगीच्या तालावर नाचवत निघालेली मिरवणूक आणि संध्याकाळी जोतिबाची यमाई देवीच्या भेटीला गेलेली पालखी अशा...
  March 31, 06:30 PM
 • पुणे- चिथावणीखोर वक्तव्य करून कोरेगाव भीमामध्ये हिंसाचार भडकवल्याचा आरोप असलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याविराेधात ठाेस पुरावे नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले अाहे. त्यामुळे अाता भिडे गुरुजींवरील गुन्हे मागे घ्यावेत, या मागणीसाठी त्यांच्या लाखाे समर्थकांनी (धारकरी) बुधवारी राज्यभर सन्मान माेर्चा काढले. मुंबईत मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन दिले. पुणे, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी,...
  March 29, 05:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात