Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • नागपूर- औरंगाबादमध्ये काही समाजकटंकांनी धार्मिक तेढ निर्माण करून दंगल घडवण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने 24 तासांत दंगल आटोक्यात आणली. मात्र, आजही काही जण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. तसेच फ्लिपकार्टवरून शस्त्रे विकणाऱ्या देशाच्या विविध भागांतील 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल केले असून शस्त्रे पोहोचवणाऱ्या 12 जणांना अटक केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली....
  July 18, 10:43 PM
 • नागपूर - गेल्या अनेक महिन्यांपासून अाैरंगाबादकरांना भेडसावणारा कचऱ्याचा प्रश्न बुधवारी विधान परिषदेत उपस्थित झाला. कचऱ्याचे ढीग, रस्त्यांची दुरवस्था, भुयारी गटार योजनेचा बोजवारा आणि रखडलेली समांतर पाणीपुरवठा योजना या प्रश्नांवरून काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या अामदारांनी औरंगाबाद महापालिकेत सत्तेवर असलेल्या शिवसेनेला लक्ष्य केले. गेल्या अधिवेशनापासून हे प्रश्न मांडले जात असताना राज्य सरकारही त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला. अखेरीस, या प्रश्नांच्या...
  July 18, 06:39 PM
 • औरंगाबाद- १६ फेब्रुवारीला सुरू झालेल्या कचराकोंडीचा मंगळवारी १५१ वा दिवस होता. कचराकोंडी आता द्विशतकाकडे वाटचाल करत आहे. असे असतानाही महापालिका आजही १६ ऑक्टोबर २०१७ ला होती तेथेच आहे. दीर्घकालीन प्रकल्पासाठी निघालेल्या निविदा एवढीच काय ती प्रगती. गतवर्षी १६ ऑक्टोबरला एेनदिवाळीत नारेगावकरांनी कचराकोंडी करून चार महिन्यांची मुदत दिली होती. या मुदतीत प्रक्रिया प्रकल्प उभा करता आला असता. पण महापालिकेने काहीही केले नाही. त्यानंतर १६ फेब्रुवारीला थेट कचराकोंडी झाली. तेव्हाही हातपाय...
  July 18, 08:31 AM
 • औरंगाबाद- आदर्श गाव, आदर्श दिंडी या घोषवाक्याखाली लोहसर खांडगाव (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथून निघालेली ३०० वारकऱ्यांची विनावर्गणी दिंडी सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरत आहे. भगव्या ध्वजासोबत राष्ट्रध्वज घेऊन निघालेल्या या दिंडीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात कीर्तन-प्रवचनासोबत सकाळ-संध्याकाळ दोन वेळा राष्ट्रगीतही होते. ज्या मार्गावरून जात आहेत तिथे घाण असेल तर ती साफ करत ही दिंडी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहे. पंढरपूरला आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र-कर्नाटकातून सुमारे दोन...
  July 18, 08:17 AM
 • नागपूर- मराठवाड्यात उस्मानाबाद येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा मंगळवारी विधान परिषदेत करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयांमधील प्रादेशिक कोटा पद्धतीमुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या लक्षवेधी प्रश्नावरून मंगळवारी विधान परिषदेत गदारोळ झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी ही घोषणा केली. मराठवाड्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील ७०-३० चा कोटा रद्द करण्याची विराेधी अामदारांची प्रमुख मागणी होती. त्यावर हा कोटा १९८५ पासून...
  July 18, 07:23 AM
 • औरंगाबाद- पडेगाव आणि चिकलठाणा येथे कचरा टाकण्यास विरोध होत असल्याने गेल्या सात दिवसांपासून शहरातील कचराच उचलण्यात आला नाही. परंतु मंगळवारपासून महापालिकेने पोलिस बंदोबस्तात दोन्हीही ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली. पडेगावात जमावाने महापालिकेच्या वाहनावर दगडफेक केली. पोलिसांची कुमक जास्त असल्याने नागरिकांचा विरोध अयशस्वी झाला. त्यामुळे दिवसभरात मिळून दोन हजार टन कचरा शहरातून उचलून नेण्यात आला. असेच राहिले तर शहरातील २० हजार टन कचरा ८ दिवसांत उचलला जाईल, असा दावा महापौर नंदकुमार...
  July 18, 06:19 AM
 • आैरंगाबाद- बावीसवर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झालेले पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे आणि पीडित तरुणीत १३५० वेळा व्हॉट्सअॅप मेसेजची देवाणघेवाण झाली आणि ५५० वेळा चॅटिंगही झाल्याची बाब श्रीरामे यांच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणीदरम्यान मंगळवारी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. भीष्मा यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतला असून आता अटकपूर्व जामिनावर निकाल अपेक्षित आहे. पीडित तरुणीने व्हॉट्सअॅपवर...
  July 18, 05:59 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यातील ५०० शेतकऱ्यांनी अवघ्या सव्वासहा महिन्यांत आत्महत्या केल्या आहेत. ८ जिल्ह्यात दररोज २.७ या प्रमाणे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे विभागीय आयुक्तालय प्रशासनाने घेतलेल्या नोंदीवरून स्पष्ट होते. तसा अहवाल विभागीय उपायुक्तांनी कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनला पाठवला आहे. हवामानातील बदल, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, कपाशीवरील गुलाबी बोंडअळी, शेतमालाला हमी भाव असूनही त्यापेक्षा कमी दर मिळणे अशा विविध कारणांमुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला आणि उत्पन्न...
  July 18, 05:55 AM
 • औरंगाबाद- शहरातील कचरा वाढू लागल्यानंतर सत्ताधारी अस्वस्थ झाले आहेत. त्यातच कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी 55 किलोमीटर अंतरावरून आपल्या मतदारसंघात कचरा टाकण्याचे आवतन दिले. त्यामुळे खासदार चंद्रकांत खैरे अस्वस्थ झाले आहेत. महापालिकेविषयी निर्णय घेणारे जाधव कोण, असा सवाल करतानाच या मागे विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर असल्याचा थेट आरोप त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना केला. कचरा प्रकरणात शिवसेना बदनाम व्हावी आणि भाजपला मदत व्हावी अशी त्यांची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तिकडे...
  July 17, 04:09 PM
 • औरंगाबाद- बलात्काराचा अाराेप असलेले पोलिस उपायुक्त राहुल श्रीरामे यांना तत्काळ अटक करण्यात यावी. श्रीरामे यांना का अटक होत नाही व कोणाच्या आशीर्वादाने हे खुलेआम फिरत आहे. गेल्या 22 जूनला त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. आज किमान 20 ते 22 दिवस झाले तरी आरोपीला अटक का होत नाही. सर्व सामान्य पोलिस किंवा नागरीकास लगेच अटक होते. राहुल श्रीरामे यांच्यावर कुणाचे वरद हस्त आहे, असा सवाल रिपब्लिकन पार्टी अाॅफ इंडिया उपस्थित केला अाहे. आरोपीस कोण पाठीशी घालीत आहे. याचा शोध घ्यावा व पीडितेस...
  July 17, 03:38 PM
 • बदनापूर- गावाच्या मध्यवस्तीत पत्र्याच्या शेडमध्ये राहत असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध महिलेवर गावातीलच तरुणाने तोंड दाबून बलात्कार करत खून करण्यात केल्याची घटना राजेवाडी येथे सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. रतन महाजन गुसिंगे (३०) या संशयित आरोपीला बदनापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेची मुले ही पुणे येथे नोकरीस असतात. यामुळे ही महिला घरी एकटीच असते. सोमवारी सकाळी हा प्रकार नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांना पाहताच आरोपीने नग्नावस्थेत पळून जाण्याचा प्रयत्न केला....
  July 17, 12:14 PM
 • औरंगाबाद- भुसावळवरून औरंगाबादकडे येणारी शिवशाही वातानुकूलित बस सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास हर्सूल येथील साकला नर्सरीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या खाली घसरली. यात वाहक संतोष जाधव आणि प्रवासी जोशी यांना किरकोळ मार लागला. त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. बसमध्ये २८ प्रवासी होते. मध्यवर्ती आगारातील एमएच ०६, बीयु ९९६ क्रमांकाची शिवशाही बस भुसावळ येथून येत होती. साकला नर्सरीजवळ चालक विशाल सावंत यांचे बसवरील नियंत्रण सुटले. बस रोडवरून खाली पाच फूट...
  July 17, 10:52 AM
 • औरंगाबाद- अवैध सावकारीविरोधात वृत्तमालिकेतून प्रकाश टाकल्यामुळे डीबी स्टारचे पत्रकार रवी रामभाऊ गाडेकर यांच्यावर शनिवारी रात्री गजानन महाराज मंदिर रोडवर हेडगेवार रुग्णालयासमोर भ्याड हल्ला करण्यात आला. पल्सर दुचाकीवरून आलेल्या गुंडांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील वरिष्ठ लिपिक यशवंत देवकर यांच्या नादी का लागतोस? असे म्हणत चाकूहल्ला करत पळ काढला. याप्रकरणी जवाहरनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. १४ जुलै रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास गाडेकर हे गजानन महाराज मंदिर रस्त्याने...
  July 17, 09:05 AM
 • पैठण- जायकवाडी धरण क्षेत्रात सोमवारी तब्बल दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली असली तरी या पावसाच्या पाण्याने धरणात काही वाढ होत नसून वरील धरणातून पाणी आले तरच जायकवाडीत वाढ होण्यास सुरू होते. आज नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने नांदूर-मधमेश्वर या धरणातून गोदावरी नदीपात्रात १४ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले असून हे पाणी जायकवाडीत मंगळवारी दाखल होण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चारुदत्त बनसोड यांनी दिली. जायकवाडी धरणात सध्या १८...
  July 17, 08:13 AM
 • परभणी- यंदाच्या हंगामातील मृग नक्षत्रानंतर जिल्ह्यात सर्वदूर प्रथमच सोमवारी(दि.१६) दिवसभर पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार सायंकाळी उशिरापर्यंत सुरूच होती. यामुळे दिवसभरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. सोमवारी सकाळपासून दुपारी अडीच वाजेपर्यंत झालेल्या पावसाची नोंद ४३ मिमी एवढी असल्याने या वर्षीचा हा सर्वात मोठा पाऊस ठरणार आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम केंद्रात हा पाऊस नोंदला गेला. सकाळी आठपर्यंत ०.९४ मिमी पावसाची...
  July 17, 07:53 AM
 • औरंगाबाद- जेट एअरवेजने ऑक्टोबरपासून सकाळच्या वेळी दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमान सुरू करण्याची घोषणा केली आहे. तब्बल ४ वर्षांच्या खंडानंतर सकाळी दिल्ली-औरंगाबाद हवाई सेवेने जोडले जाणार आहे. औरंगाबादेतील बैठकीत जेट एअरवेजचे वरिष्ठ महाव्यवस्थापक नवील मेहता ही घोषणा केली. यासाठी दिल्लीत स्लॉट मिळण्याची अपेक्षाही त्यांनी विमानतळ प्राधिकरणाकडे व्यक्त केली. सध्या दिल्लीसाठी एअर इंडियाचे एकमेव विमान संध्याकाळी आहे. जेट एअरवेजचे एरिया मॅनेजर सईद अहमद जलील म्हणाले, हे विमान सकाळी ८:३० ते...
  July 17, 07:28 AM
 • औरंगाबाद/ पुणे- अखेर पावसाने अवघा महाराष्ट्र चिंब करून टाकला. रविवार, सोमवारी राज्यभरात सर्वदूर पाऊस बरसला. मराठवाडा, मुंबई, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र व कोकणात अनेक ठिकाणी पावसाने झड लावली. धरणांच्या जलसाठ्यातही वाढ नोंदवण्यात आली आहे. काही धरणांतून विसर्गही सुरू झाला आहे. अाैरंगाबाद शहरातही साेमवारी दिवसभर संततधार सुरू हाेती. शहरात ४७ मिमी पावसाची नाेंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून सह्याद्री डोंगररांगांमध्ये सुरू असलेल्या पावसाचा जोर गेल्या २४ तासांत वाढला आहे....
  July 17, 06:59 AM
 • औरंगाबाद - राज्यातील शासकीय कर्मचारी, अधिकारी, शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करावा, यासाठी आमदार विक्रम काळे यांनी वित्त मंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्याची तातडीने दखल घेण्यात आली असून आ. काळेंना लिहिल्या उत्तरात वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी समितीचा अहवाल ४ महिन्यांत शासनाला प्राप्त होईल. यंदा दिवाळी पूर्व सातवा वेतन आयोग लागू करण्याचा विचार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. त्याच प्रमाणे...
  July 16, 10:38 PM
 • औरंगाबाद- शहरातील उस्मानपुरा भागात एका नराधमाने आठ वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना समाेर साली अाहे. आरोपी फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत अाहेत. मिळालेली माहिती अशी की, बालिका घरात झाेपली हाेती. नराधमाने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. उस्मानपुर्यातील छोटा मुरलीधर नगर भागात रविवारी (ता. 15) रात्री घटना घडली. विशाल प्रताप रिडलॉन (23, रा. छोटा मुरलीधरनगर) आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल आहे. सूत्रांनुसार, पीडित मुलगी लासूर येथून...
  July 16, 07:24 PM
 • परभणी- जिंतूर-परभणी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने सोमवारी (दि.16) मावस बहीण-भावाचा बळी घेतल्याची घटना घडली. औंढा फाट्यावर भरधाव वेगाने जाणा-या ट्रकला साईड देण्याच्या प्रयत्नात त्यांची मोटारसायकल खड्ड्यात गेली. यादरम्यान दोघेही ट्रकखाली चिरडून मृत्यू पावले. लक्ष्मण सुदाम खरात (वय18) व मनिषा प्रल्हाद पाचंगे (वय25) अशी या मावस बहीण-भावाची नावे आहेत.
  July 16, 06:17 PM
 
जाहिरात

RECOMMENDED