जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • औरंगाबाद- शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी दोषी स्वस्त धान्य दुकानदारास माफी दिल्यापमुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. शिवाय, त्यांनी बहाल केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द केला. बीड जिल्ह्यातील मुरंबी (ता. अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाचे मालक बिभिषण नामदेव माने यांच्याविरोधात अनेक तक्रारी गावातील नागरिक व रेशन कार्डधारक साहेबराव वाघमारे यांनी विविध...
  03:17 PM
 • बदनापूर : हृदयरोगाची तपासणी केल्यानंतर दवाखान्यातून बाहेर पडताच एका वृद्धाला भरधाव आयशर ट्रकने चिरडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. जालना-औरंगाबाद रोडवरील नूर हॉस्पिटलजवळ दुपारी ३.३० सुमारास हा अपघात झाला. शेख कमरुद्दीन शेख मुनीर असे या अपघातातील मृताचे नाव आहे. अपघातानंतर त्यांची मुलगी शाहिन भर रस्त्यावर जवळपास अर्धा तास पित्याच्या मृतदेहाजवळ बसून होती. जालना शहरातील टांगा स्टँड परिसरात राहणारे शेख कमरुद्दीन शेख मुनीर (७०) हे आपल्या हृदयरोगाच्या उपचारासाठी मुलगी शाहिन...
  09:48 AM
 • औरंगाबाद : आम्ही धुळे कारागृहात बाॅम्ब ठेवलाय, बाहेरूनही बॉम्ब टाकणार आहोत... अज्ञात क्रमांकावरून गुरुवारी औरंगाबाद पोलिसांना आलेल्या कॉलवर हे शब्द कानी पडताच सुमारे तीन तास औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण आणि धुळे पोलिसांची धावाधाव सुरू झाली. धुळे पोलिसांनी कारागृह पिंजून काढत सुरक्षा वाढवली. मात्र, तीन तासांच्या तपासानंतर परिस्थिती नियंत्रणात असल्याचे लक्षात येताच सर्वांनीच नि:श्वास टाकला. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास औरंगाबाद कंट्रोल रूमचा (१०० क्रमांक) फोन खणखणला....
  09:41 AM
 • औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांचा क्रांती चौकातील पुतळा उड्डाणपुलामुळे झाकोळला गेला. गतवर्षी १९ फेब्रुवारीला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची घोषणा महापौर नंदकुमार घोडेले यांनी केली होती. वर्ष संपत आले असताना एकदाच्या यासाठी निविदा मागवण्यात आल्या. परंतु पहिल्या वेळी यासाठी फक्त दोनच निविदा पुढे आल्या आहेत. सन २००० मध्ये उस्मानपुरा भागात शीख समाजाचा स्तंभ उभारण्यात आला तेव्हा सरदारजींनी शून्य टक्के दराने निविदा भरत वेगात काम केले होते. येथे मात्र उलट चित्र...
  09:32 AM
 • औरंगाबाद : शिक्षण संस्थेत शिपाई म्हणून नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तीन लाखांचे कर्ज काढायला लावून ते पैसे लाटल्याने निराश झालेल्या कृष्णा ऊर्फ किशोर रतनराव चिलघर (३२, रा. सी-३, संजयनगर) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी ११.३० वाजता उघडकीस आली. संस्थाचालक, बँकेच्या पदाधिकाऱ्यांकडून वर्षभरापासून सुरू असलेल्या छळाची तक्रार पोलिस नोंदवून घेत नसल्याने हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या दोन पानाच्या चिठ्ठीत म्हटले आहे. पोलिसांनी एकाही अर्जाची...
  09:25 AM
 • औरंगाबाद : लोकसभेला काँग्रेसकडून इच्छुकांची नावे श्रेष्ठींकडे पाठवण्यासाठी जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी गुरुवारी गांधी भवनात बोलावलेल्या बैठकीत उमेदवारीसाठी स्वत:चेच घोडे दामटवले. माजी उमेदवारांनी त्यांचेच नाव पुढे केले. सत्तारांसह आमदार सुभाष झांबड, माजी मंत्री राजेंद्र दर्डा, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांच्यासह १४ जणांची नावे प्रदेश अध्यक्षांकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. यापूर्वी चार भिंतींत उमेदवार निश्चित होत होते. परंतु आता उमेदवार निवडीत पारदर्शकता...
  09:20 AM
 • लातूर- शेतीच्या वादातून लातूरशेजारी असलेल्या खाडगावमध्ये एका तरुणाला त्याच्या चुलत भावांनी बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास जबर मारहाण केली. गुरुवारी पहाटे उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. शेतीची वाटणी तसेच शेतातील सामायिक विहिरीचे पाणी कोणी घ्यायचे यावरून जनार्दन साठे आणि त्यांच्या भावात वाद झाला. जनार्दन यांचा मुलगा आकाशने चुलत्याच्या शेतातील वीजपुरवठा बंद केला होता. त्यामुळे त्याचे चुलत भाऊ त्याच्यावर नाराज होते. बुधवारी रात्री आकाश एकटाच जात असल्याचे चुलत...
  08:39 AM
 • बीड- पेन्शनची रक्कम घेऊन बँकेतून बाहेर पडलेल्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिकेला दोघांनी आपण हरिद्वारहून आल्याचे सांगत तुमच्या धाकट्या मुलावर आघात होणार आहे, संकट येणार आहे, अशी भीती दाखवून त्यावर उपाय म्हणजे अंगावरील दागिने, पैसे काढून ठेवून दहा पावले चालत मंत्राचा जप करा म्हणत रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज लुबाडून पोबारा केला. सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सुशील पुरुषोत्तम कुलकर्णी (रा. तिरुपती कॉलनी, पिंपरगव्हाण रोड, बीड) बुधवारी दुपारी पेन्शन घेण्यासाठी...
  08:35 AM
 • माजलगाव- एकादशीच्या उपवासासाठी खाल्लेल्या भगरीच्या पिठामुळे माजलगाव तालुक्यातील कोथरूळ, उमरी, रोषणपुरी, छत्र बोरगाव, गंगामसला, नागडगाव, माळेवाडी, भाटवडगाव या गावांतील ११२ जणांना विषबाधा झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. माजलगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यात सध्या ग्रामस्थांवर उपचार करण्यात येत आहेत. अत्यवस्थ रुग्णांना बीडच्या रुग्णालयात पाठवले आहे. दरम्यान, किराणा दुकानावरील भगरीचे पीठ ग्रामस्थांनी खाऊ नये, अशी दवंडी तालुक्यातील गावागावांत देण्यात आली आहे....
  08:26 AM
 • नांदेड- वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यात जर आम्ही अडसर असू तर काँग्रेसने अॅड. प्रकाश आंबेडकरांना सन्मान द्यावा, प्रतिष्ठा द्यावी. त्यांच्या ताकदीनुसार त्यांना जागा द्याव्यात, आम्ही वेगळे होऊ. आमचा प्रचार स्वतंत्रपणे करू, असे काँग्रेसला आव्हान देत एमआयएमचे अध्यक्ष बॅ. असदुद्दीन ओवेसी यांनी गुरुवारी आघाडीचा चेंडू काँग्रेसच्या कोर्टात टाकला. तर ओवेसींच्या या भूमिकेची तारीफ करत अॅड. प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे आभारही मानले. परंतु आघाडीत घेण्यात ओवेसी नाही, तर ओबीसी काँग्रेससाठी अडचण...
  08:24 AM
 • औरंगाबाद- दुष्काळग्रस्त मराठवाड्यात सूक्ष्म सिंचनासाठी ८० टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. त्यासाठी विशेष निधीची तरतुद केली जाईल, अशी घोषणा अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी येथे केली. याशिवाय, परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाला कमी पाण्यात जास्तीचे उत्पादन देणाऱ्या जातींचे संशोधन करण्यासाठी १०० कोटीचा निधी देण्याची देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच औरंगाबादच्या धर्तीवर परभणी, लातूरमध्ये वनक्षेत्र वाढवण्यासाठी इको बटालीयन स्थापन करण्यात येणार...
  08:07 AM
 • पुणे,औरंगाबाद : पक्षाध्यक्ष अमित शहा यांचा पावलावर पाऊल टाकत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही आता शिवसेनेबाबत पटक देंगेची भाषा करू लागले आहेत. राज्यातल्या ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा पूर्ण झाला आहे. त्यापैकी ४० ठिकाणी आम्ही युतीशिवाय जिंकू, असा दावाही त्यांनी गुरुवारी पुण्यात केला. जे येतील त्यांच्यासह व जे येणार नाहीत त्यांना सोडून निवडणूक लढवण्यास भाजप सज्ज झाला आहे, असे सांगताना त्यांनी युतीची शक्यताही कायम ठेवली. दुसरीकडे भाजपचे नेते व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...
  08:01 AM
 • औरंगाबाद- शिधापत्रिकाधारकांना धान्य न देता काळ्या बाजारात विक्री केल्याप्रकरणी दोषी स्वस्त धान्य दुकानदारास माफी दिल्यापमुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अन्न व पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले. शिवाय, त्यांनी बहाल केलेला स्वस्त धान्य दुकानाचा परवानाही रद्द केला. बीड जिल्ह्यातील मुरंबी (ता. अंबाजोगाई) येथील स्वस्त धान्य दुकानाचे मालक बिभिषण नामदेव माने यांच्याविरोधात अनेक तक्रारी गावातील नागरिक व रेशन कार्डधारक साहेबराव वाघमारे यांनी विविध...
  07:09 AM
 • औरंगाबाद- बनावट कागदपत्रे सादर करून मुथूट होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला सुमारे ४४ लाख ९१ हजार ४९८ रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी ८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात या कंपनीच्या रिलेशनशिप अधिकाऱ्याचाही समावेश आहे. शेख अथर शेख अहेमद (२३), फरीदा अहेमद शेख (दोघे रा. कटकट गेट परिसर), फरीना बेगम मुझफ्फर अली, मुझफ्फर अली नुसरत अली, मृत बिल्डर सय्यद मुजम्मील अहेमद सय्यद मंजूर अहेमद, मुथूट होम फायनान्स, भाग्यनगर शाखा, अदालत...
  January 17, 11:03 AM
 • औरंगाबाद-औरंगाबादेत स्काय बस सुरू करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ३१ डिसेंबर २०१८ रोजी केली होती. बुधवारी शहरात झालेल्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेत डॉपल मायर या ऑस्ट्रेलियन कंपनीने ही सेवा कशी देता येईल, याबाबत गडकरींच्या उपस्थितीत सादरीकरण केले. यानंतर सिटी बसच्या तिकीट दरात स्काय बसमध्ये प्रवास करता येऊ शकेल, असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला. १२५ वर्षे जुन्या, ६० देशांना स्काय बस पुरवणाऱ्या या कंपनीने गुुगल मॅपिंगद्वारे शहरातील गर्दीच्या ठिकाणांचे...
  January 17, 10:40 AM
 • परभणी / हिंगोली- मला शेतातले काही कळत नाही, पिकातलं काही कळत नाही, मी शहरी बाबू आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ समोर दिसत असताना व सरकार चुकत असताना बोलणार नाही तर काय करणार, असे उद््गार युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी(दि.१६) येथे काढले. एरंडेश्वर(ता.पूूर्णा) येथे आ.डाॅ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित दुष्काळ निवारण परिषदेत ठाकरे बोलत होते. त्यांच्या हस्ते मराठवाड्यातील महिलांच्या पहिल्या जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले....
  January 17, 08:49 AM
 • कन्नड- व्याजाने घेतलेले पैसे परत दिल्यानंतरही सावकार पैशासाठी त्रास देऊन जिवे मारण्याची धमकी देत असल्याने कंत्राटदाराने पंख्याला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली असल्याची घटना शहरातील हॉटेल रामकृष्ण महल येथे घडली. याप्रकरणी कन्नड शहर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान हॉटेल रामकृष्ण महल येथील खोली क्रमांक १०३ मध्ये मेहेगाव येथील कंत्राटदार भाऊसाहेब घुगे (५०) यांनी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली....
  January 17, 08:47 AM
 • जालना- जिल्ह्यात चोऱ्या व दरोड्यांचे प्रमाण वाढलेले असताना त्या प्रमाणात तपासाचे प्रमाण कमी आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेले अनेक गु्न्ह्यांतील आरोपी पोलिसांना ताब्यात घेता येत नाहीत. त्यामुळे तपासात हलगर्जी करणाऱ्या १८ अधिकारी व ५९ कर्मचाऱ्यांना एसपींनी कारणे दाखवा नोटिसाही काढल्या. तर काहींचा अहवाल आयजींकडेही पाठवला. तरीही पोलिसांचा ढिसाळपणा जैसे थेच आहे. एकीकडे सहा वेळा कोम्बिंग ऑपरेशन, ५५ पोलिसांची पेट्रोलिंग, चार चेक पोस्ट असूनही नवीन वर्षातील सोळा दिवसांत नऊ ठिकाणी...
  January 17, 08:46 AM
 • केज- तालुक्यातील मस्साजोग येथील रहिवासी अरुण उत्तरेश्वर घाटूळ (वय ५५)यांच्यावर बँकेचे कर्ज होते, त्यातच नापिकीचा ताण आल्याने त्यांनी शेजारी असणाऱ्या शाहू गायकवाड यांच्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. मृताचा मुलगा सचिन घाटूळ यांच्या खबरीवरून केज पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान , बीडमधील माळी गल्ली येथे अंबादास दुधाळ (६०) या वृद्धाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवारी...
  January 17, 08:41 AM
 • औरंगाबाद- तेलंगणा, कर्नाटकसारख्या राज्याचे सिंचन बजेट महाराष्ट्रापेक्षा तिपटीने अधिक आहे. ही राज्ये महाराष्ट्रापेक्षा छोटी आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष द्यावे, असा सल्ला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि जलसंसाधनमंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी येथे दिला. ९ व्या आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन परिषदेच्या उद्घाटनावेळी बोलत होते. केंद्र शासनाच्या वतीने अजंता ॲम्बेसेडर येथे नवव्या तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय सूक्ष्म सिंचन...
  January 17, 08:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात