Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात ३ जूनला सरासरी ३०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. वादळी वायासह आलेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. औरंगाबादसह जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांतही पावसाने हजेरी लावली. बीड जिल्ह्यात अंजनवती या गावात सावित्रीबाई शिवाजी येडे (४०), धारूर तालुक्यातील सोनीमोहा येथील शाहू ज्योतिराम नेहरकर (३०) व दोन बैल मरण पावले. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील बंदेवाडीचे रहिवासी विष्णू अंबादास जगताप यांचाही वीज पडून मृत्यू झाला.
  June 5, 12:21 AM
 • भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाच्या विरोधात योगगुरू रामदेवबाबा यांनी नवी दिल्लीत सुरू केलेल्या उपोषणाला मराठवाड्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पतंजली योग समिती आणि भारत स्वाभिमान न्यासतर्फे ठिकठिकाणी सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले असून, आंदोलनाला विविध पक्ष, संघटनांच्या स्थानिक शाखांनी पाठिंबा दर्शविला आहे.नांदेडमध्ये धरणे आंदोलन नांदेड । नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध पक्ष, संघटनांतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात राष्टीय स्वयंसेवक संघ, भारत स्वाभिमान...
  June 5, 12:15 AM
 • सन २००८ साली झालेल्या गुरुग्रंथसाहिब त्रिशताब्दी सोहळ्याने नांदेड शहराचा कायापालट झाला. सुमारे साडेपाच लाखांवर लोकसंख्या असलेल्या या शहरात भौतिक सुविधा मोठ्या प्रमाणावर निर्माण झाल्या, मात्र पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून फारसे प्रयत्न झाले नाही. ती जबाबदारी उचलली पंजाबातून आलेल्या संतांनी. नांदेडातील ग्रीनसिटी प्रकल्प राबविण्यात आला आहे. त्या माध्यमातून दीड लाख वृक्षारोपण करून ते जगविण्याची किमया करण्यात आली आहे. शीख धर्माचे दहावे धर्मगुरू श्री गुरुगोविंदसिंघजी महाराज यांची...
  June 5, 12:13 AM
 • औरंगाबाद - दौलताबाद ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अतिक्रमण काढत असताना ग्रामसेवक पुंडलिक शंकरराव पाटील (एन-९ सिडको ) यांना शेख रहीम शेख अजीम आणि शेख बाबा शेख सत्तार (रा. दौलताबाद) या दोघांनी मारहाण केली. ही घटना शुक्रवारी साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. पाटील यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध सरकारी कामात अडथळा केल्याचा गुन्हा दाखल क रण्यात आला आहे. छावणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
  June 4, 11:30 PM
 • वाळूज - औद्योगिक परिसरातील कारखानदार रसायनयुक्त घनकचरा मोकळ्या जागेत टाकत असल्याने परिसरातील वातावरण धोक्यात आले आहे. कच-याच्या ठिकाणी साचलेले पाणी प्यायल्याने जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. रसायनयुक्त पाणी जमिनीत मुरल्याने परिसरातील विहिरी आणि इतर जलसाठे दुषित झाले आहेत.वाळूज औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमनीपणा सुरु केला आहे. रसायनयुक्त घनकचरा मोकळ्या जागेवर टाकण्यात येत आहे. या कचयाची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येत नाही. त्यामुळे...
  June 4, 11:23 PM
 • वाळूज - विरंगुळ्यासाठी उद्यान नसल्याने बजाजनगरातील बसथांब्यावरच ज्येष्ठ नागरिक बसत आहेत. घरात चांगली वागणूक मिळत नसल्याने अनेक वृद्ध बसथांब्यावर बसतात. या गप्पात कधी हसवणूक तर धीरगंभीर वातावरण असते. घरात वाईट वागणूक मिळत असल्याने कायद्याच्या माध्यमातून मदत मिळावी अशी अपेक्षा काही वृद्धांनी केली आहे. जागृत हनुमान मंदिर परिसरातील बसथांब्यावर गेल्या दहा वर्षांपासून वृद्ध बसतात. या परिसरात बहुतेक कामगार वास्तव्यास राहतात. वसाहतीला वाळूज औद्योगिक विकास महामंडळाकडून नागरी सुविधा...
  June 4, 11:14 PM
 • अहो, तुमच्या मुलात गुणवत्ता आहे. त्यालाही पाठवा खेळायला...... असे विवेक देशपांडेच्या वडिलांना त्यांच्या मित्राने सांगितले. त्यानंतर लगेचच सांस्कृतिक मंडळावर जिम्नॅस्टिक खेळण्यासाठी विवेकला त्याचे वडील सुधीर देशपांडे यांनी पाठविले. येथूनच जिम्नॅस्टिक खेळाची कारर्कीदीस सुरुवात झाली. खेळात काही तरी करून दाखवायचे या जिद्दीने विवेक गेल्या अकरा वर्षांपासून राष्ट्रीय जिम्नॅस्टिकपटू म्हणून नावारूपास आला आहे. आई-वडिलांनी घेतलेला निर्णय विवेकच्या कारकीर्दीस आकार देणारा ठरला. विवेक सात...
  June 4, 11:11 PM
 • औरंगाबाद - जोपर्यंत देश भ्रष्टाचारमुक्त होत नाही आणि देशाची राष्टीय संपत्ती असलेले अब्जावधींचे काळे धन देशाला परत मिळत नाही तोपर्यंत महासत्तेचे स्वप्न साकारणे अशक्य आहे. त्यासाठीच रामदेवबाबांची भ्रष्टाचाराविरोधात लढाई आहे. त्या लढाईत आम्ही स्वत:ला झोकून दिले आहे. ही देशासाठीची लढाई जिंकणारच. बाबांचा विजयही देशाचा विजय असेल, असा सूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणासाठी जमलेल्या आंदोलनात सहभागी तरूणांमधून उमटला. दिल्लीतील रामलीला मैदानावर शनिवारी (४ जून) रामदेवबाबांचे...
  June 4, 10:59 PM
 • लातूर - ठाकरे घराण्यातील एखाद्याने वादग्रस्त विधान केले की त्याला ठाकरी भाषा असे म्हणत सहजपणे घ्यायचे. मात्र, त्याला आम्ही प्रत्युत्तर दिले की लगेच शिवराळ भाषा वापरली, अशी आवई उठवायची. आता इथून पुढे हे चालणार नाही. ठाकरीला ठणकावलेच जाईल, असा इशारा देत उपमुख्यमंत्री यांनी शिवसेनेवर शुक्रवारी दुसरा हल्लाबोल केला.विचार व्यक्त करण्याचा घटनेने जसा त्यांना अधिकार दिलाय, तसाच तो आम्हालाही आहे..आणि ज्या गावच्या बोरी आहेत, त्याच गावच्या बाभळी आहेत, हेदेखील शिवसेनेने लक्षात ठेवावे, असा इशाराही...
  June 4, 04:05 AM
 • अलिबाग - मुरूड येथील जंजिरा किल्ला पाहण्यास येणा-या लाखो पर्यटकांना गाइड असल्याचे भासवून नावाडी खोटा इतिहास सांगून त्यांची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे देशातीलच नव्हे तर पारदेशातील पर्यटकांमध्ये या किल्ल्याबाबत चुकीची माहिती जात आहे. त्याकडे पुरातत्व विभागाचे मात्र अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिम अंगाला अरबी समुद्र (जुने नाव सिंधुसागर) आहे. या समुद्राला लागूनच मुरूड तालुका वसलेला आहे. मुरूडमधून चार-पाच किलोमीटर अंतरावर राजापुरी हे गाव आहे. येथून जंजिरा किल्ल्यावर...
  June 4, 03:27 AM
 • भर रस्त्यावर दिवसाढवया ट्रकचालकाकडून लाच घेणारे उमाकांत पाटील आणि तुकाराम राठोड हे दोन वाहतूक पोलिस अखेर निलंबित झाले. डीबी स्टार टीमने या लाचखोरांचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांचे बिंग उघडकीस आणले होते. त्यानंतरही वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त एस. आर. ठाकूर यांनी आपल्या या दोन पोलिसांना वाचवण्यासाठी आटापिटा चालवला होता. निवेदन देणा:या अभियंता संघटनेच्या प्रवीण जाधव यांनाही आपल्या कार्यालयात बोलावून ठाकूर यांनी हवा तसा जबाब लिहून घेतला होता. त्याचेही डीबी स्टार टीमने स्टिंग...
  June 4, 03:21 AM
 • सर्व प्रकारच्या सुविधा असुनही औरंगाबादच्या प्री-आयएएस कोचिंग सेंटरमधून फक्त एक आयएएस झाला. सेंटरने तब्बल २५ वर्षांनंतर हा पराक्रम केला आहे. १९८६ मध्ये राज्यात चार ठिकाणी रिजनल स्टेट इन्स्टिट्यूट फॉर अॅडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर सेंटर सुरू करण्यात आले. प्रशासनात मराठी टक्का वाढावा हा यामागे उद्देश होता. औरंगाबादसह नागपूर, मुंबई आणि कोल्हापूर या ठिकाणी या संस्था कार्यरत आहेत. गेल्या वर्षापर्यंत औरंगाबादमधील केंद्रामध्ये दरवर्षी ६ जागांची प्रवेश क्षमता होती. यंदा प्रथमच...
  June 4, 03:19 AM
 • राजकारण ही कुणा एकाची मक्तेदारी नाही. मी आणि माझे पती दोघांनाही राजकारणाचा वारसा नसताना देखील समाजकारणाच्या माध्यमातून राजकारणाची संधी मिळाली. महापौर म्हणून काम करताना शहरासोबत महिलांचाही विकास करणार आहे. असे मत महापौर अनिता घोडेले यांनी डीबी स्टारच्या प्रश्न वाचकांचे या सदरात वाचकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना व्यक्त केले.आपल्या शहरात ठिकठिकाणी रस्त्यावर भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. कायमस्वरूपी भाजी मंडया का नाहीत? -अमित वसमतकरटी.व्ही.सेंटर चौक, जाधववाडी, औरंगपुरा...
  June 4, 03:16 AM
 • झाडांनाही मन असते. त्यांनाही हसत-खेळत बागडावेसे वाटते, ही दादासाहेब देशमुख यांची भावना. त्यांना जिव्हाळा-प्रेम दिला तर ती आनंद आणि फळे देतात, हा विचार. यातूनच अवघे पाऊणशे वयमान असलेल्या दादासाहेबांनी झाडांशी नाते जोडले. सिडको एन-८ भागात दादासाहेब हे सेवानिवृत्त अभियंता राहतात. या भागात त्यांचे सुंदर घर आहे. त्यांच्या घराची चार हजार चौरस फूट जागा आहे. या घराचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी बाग फुलवण्यासाठी मोठी जागा सोडली आहे. या बागेत त्यांनी पंधरा प्रकारची विविध झाडे फुलवली आहेत. त्यात...
  June 4, 03:11 AM
 • शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या समतानगर, कोटला कॉलनीमधील नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई, कचरा, खराब रस्ते, फुटलेली ड्रेनेजलाइन यामुळे समतानगर 'समस्यानगर' बनले आहे. या वसाहतीत मनपाची स्वतंत्र जलवाहिनी नसल्याने नागरिकांना विशेषत: महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. वसाहतीत सर्वत्र कच:याचे ढिग साचले आहेत. कच:यावर कुत्री, मांजरी, गायी, डुकरे यांचा मुक्त संचार असतो. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. रस्ते अरुंद असल्यामुळे रात्री-अपरात्री...
  June 4, 03:09 AM
 • औरंगाबाद - रोहिणी नक्षत्रातील वळवाच्या पावसाने औरंगाबादसह मराठवाड्याला शुक्रवारी झोडपून काढले. मुंबई, पुण्यासह राज्याच्या बहुतांश भागात या पावसाने हजेरी लावली. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काहिसा दिलासा मिळाला, तर मान्सूनपूर्व पावसामुळे यंदा पाउसपाणी चांगले राहणार असल्याचे आडाखे शेतकर्यांनी बांधले आहेत. निर्धारित वेळेआधीच मान्सून केरळात धडकला. त्यामुळे मृगातच समाधानकारक पाउस होण्याची आशा पल्लवीत झाली आहे. मृगात पेरणी झाली की हंगाम साधतो, असा...
  June 4, 01:55 AM
 • औरंगाबाद - गेल्या दहा वर्षांत औरंगाबादमध्ये फारसे शत्रुत्व नसलेले शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस तीन दिवसांपासून एकमेकांवर तुटून पडत आहेत. परस्परांच्या नेत्यांचे पुतळे जाळण्यापासून ते शिव्यांची लाखोली वाहण्यापर्यंत ते पोहोचले आहेत. नेत्यांविषयी निष्ठा दाखविण्याशिवाय वैयक्तिक गड राखण्यासाठी स्थानिक नेतेमंडळी कार्यकत्र्यांना वेठीस धरत आहेत. या दोन्ही पक्षाच्या वादाला भीमशक्तीची किनार असल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीच काही प्रमाणात शिवशक्ती-भीमशक्तीचा प्रयोग झाला. रामदास...
  June 4, 01:54 AM
 • औरंगाबाद -औरंगाबाद शहरातील वीजपुरवठ्याचे कंत्राट महिनाभरापूर्वी महावितरणने जीटीएल या खाजगी कंपनीला दिल्यानंतर दर शुक्रवारी शहरवासीयांना रखरखत्या उन्हाळ्यात असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तब्बल पाच शुक्रवार दिवसभर सात ते आठ तास वीजपुरवठा ठरवून खंडित केला गेल्याने लोक अक्षरशा संतप्त झाले आहेत. आज पाचव्या शुक्रवारीही शहरातील वीज ३ तास गुल होती. वीजयंत्रणा सुरळीत होण्यासाठी आणखी सहा महिने लागणार असल्याचे कंपनीने म्हटले असल्याने किमान २७ शुक्रवार जीटीएलचा उपद्व्याप लोकांना सहन...
  June 4, 01:52 AM
 • औरंगाबाद- सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या व्यसनमुक्त्ती धोरणात मद्यप्राशनाची वयोमर्यादा निश्चित केली आहे. मद्यप्राशन करण्याचे वय अठरावरून पंचवीस करण्यात आले, तर बिअरसाठी एकवीस वर्षे झाले आहे. मात्र राज्य सरकारचे नवे धोरण शहरात कुचकामी ठरले असल्याचे दिव्य मराठीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनने आज सिद्ध केले. जुने नियमच पाळले जात नाही. अल्पवयीन मुलांना सर्रास मद्य विकले जाते. अनेक दुकानदारांचे पितळ या स्ंिटग ऑपरेशनने उघडे पाडले. सिडको बसस्थानक ,टीव्ही सेंटर भागातील दारू...
  June 4, 01:50 AM
 • डॉ. रामदास गवळी । औरंगाबाद- ज्ञानेश्वरचा फोन आला तेव्हा काळजात धस्स झालं आणि शेवटी अघटित घडल्याची भीती खरी ठरली. दिलीपच्या मोटारसायकलला अपघात झाल्याचं कळलं. जखमी दिलीपला २३ मे २११ रोजी रात्री ९.३ वाजता कन्नड येथून तातडीने औरंगाबादला आणले. दुनाखे रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी घाटीत नेण्याचा सल्ला दिला. मीदेखील घाटीत पोहोचलो. दिलीपचा मृतदेह स्ट्रेचरवर होता. प्रयत्न करण्यापूर्वीच सगळं काही संपलं होतं. क्षणार्धात दिलीपचा जीवनपट डोळ्यासमोरून तरळून गेला. दिलीप माझा शालक होता, परंतु...
  June 4, 01:48 AM
 
जाहिरात

RECOMMENDED