Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • बीड - कर्जतहून नाळवंडीकडे जाणा-या इंडीका- कार व ट्रक्टरचा अपघात होऊन एक जण जागीच ठार झाला, तर चौघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. दोन) रात्री मोचीपिंपळगावजवळ घडली. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले, चौघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबादला हलविले आहे. गणेश म्हेत्रे (२३, नाळवंडी) असे ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. नगर जिल्ह्यातील कर्जत येथून भावाच्या मुलाला सेाडून परत नाळवंडीकडे येत होते. रात्री अकराच्या सुमारास मोचीपिंपळगावाजवळ ट्रक्टर-कार(एमएच-२३-४१७) चा अपघात झाला....
  June 4, 01:08 AM
 • औरंगाबाद - श्री संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम येथे सुरु असलेल्या वारकरी सांप्रदायिक प्रशिक्षण शिबिराचा आज समारोप झाला. महिनाभर सुरु असलेल्या या शिबिरात सुसंस्कृत सदाचारी पिढी घडविण्याच्या दृष्टीने अभंग, भजन, किर्तन, मृदंग वादन याचे प्रशिक्षण शिबीरार्थींना देेण्यात आले. १२ ते १८ वयोगटातील मुले यात सहभागी झाले. मृदंग सराव, प्रार्थना, गीतापाठ, भजन प्रशिक्षण, विविध विषयावरील व्याख्याने संत चरित्रे व पारंपारिक खेळ विद्याथ्र्यांना शिकविण्यात आले. पावली खेळण्याचे प्रशिक्षणही मुलांनी...
  June 4, 01:06 AM
 • औरंगाबाद - सलमान खान अभिनीत रेडी या चित्रपटाने चित्रपटगृहांना आलेली अवकळा दूर केली आहे. रेडी चित्रपटाला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे तिकीट खिडकीवर गर्दी दिसली. शहरातील प्रमुख चित्रपटगृहात ८0 टक्के प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे सलमानची चलती पुन्हा स्पष्ट झाली आहे. शहरातील अप्सरा, नूपुर, ईस्कवेअर, अभिनय, फेम तापडीया, पीव्हीआर, बीग अंजली या चित्रपटगृहात रेडी प्रदर्शित झाला आहे. कॉमेडी आणि अॅक्शनचा समावेश असलेल्या रेडीला चांगला प्रतिसाद मिळाला. मूळ...
  June 4, 01:03 AM
 • औरंगाबाद - लाइफस्टाइल, फॅशन आणि तरुणाई असं घट्ट समीकरण आहे. पण आता बच्चे कंपनीने अवघ्या फॅशन जगताचं लक्ष वेधले आहे. लहान मुलांच्या फॅशन इंडस्ट्रीवर मोठी गुंतवणूक करण्यात येत आहे. तरुण आणि प्रौढ व्यक्तीच फॅशनेबल राहतात असा रुढ समज आहे.त्यामुळे लहान मुलांच्या फॅशनबाबत फारसा विचार होताना दिसत नाही. लहान मुलांच्या फॅशन इंडस्ट्रीवर लक्ष केंद्रीत करण्यात आलेच नाही. सध्या लहानग्यांच्या फॅशनेबल होजिअरी कपडयांना मोठी मागणी आहे. अत्यंत मुलायम असल्याने या कपड्यात मुलांना मोकळेपणाने खेळता...
  June 4, 12:58 AM
 • औरंगाबाद - हिंदू- मुस्लिम धर्माच्या एेक्याची महती सांगताना दोन्ही धर्माचा सुवर्णमध्य साधणारे राजूबाबा शेख कुतूहलाचा विषय आहेत. मुस्लिम असूनही त्यांनी समाजप्रबोधनासाठी किर्तनाच्या माध्यमाचा नितांतसुंदर उपयोग केला आहे. झी मराठीवरील मराठी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमातून बाबा प्रकाशझोतात आले आहेत. या स्पर्धेत राजूबाबा यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक जिंकले. आयुष्यभर केलेल्या कष्टाचे चीज झाले अशी प्रतिक्रिया राजूबाबा यांनी दिली. या स्पर्धेनिमित्त त्यांच्याशी केलेली खास बातचित......
  June 4, 12:56 AM
 • औरंगाबाद - जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषद आयोजित ८ व्या अखिल भारतीय मराठा साहित्य संमेलनाचे उद्घाटन उद्या ( दि. ४ जून ) न्यायमूर्ती बी. एन. देशमुख यांच्या हस्ते होणार आहे. सिडकोतील जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात सकाळी १ वाजता हा उद्घाटन सोहळा होईल. या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील, स्वागताध्यक्ष पद्माकर मुळे, आमदार सतीश चव्हाण, भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. साहेब खंदारे, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे, प्राचार्य डॉ. स्मिता...
  June 4, 12:53 AM
 • नांदेड - त्यामुळे इतर गुंतवणूकदार चिंतित झाले आहेत. जी भीती त्यांना वाटत होती, ती खरी ठरल्याने शनिवारी (दि. ५) हे गुंतवणूकदार पोलिसांत तक्रार देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ज्ञानेश्वर माऊली, विश्वनाथ खंडरे आणि बालाजी हिमगिरे या तिघांना प्रत्येकी २ लाख रुपयांचे चेक मिळाले.कंपनीचा स्थानिक व्यवस्थापक संतोष चेपुरवार याने १ लाख ते १५ कोटी रुपयांचे कर्ज देतो म्हणून २, ७ लोकांकडून २ ते ५ हजार रुपयांपर्यंतची रक्कम उकळली होती. कर्जाचे चेक देण्यासाठी अलिगड येथील मुख्य शाखेचे सल्लागार २९ मे...
  June 4, 12:46 AM
 • औरंगाबाद - गँगरीनमुळे चार-पाच दिवसांपूर्वीच पाय कापण्याची शस्त्रक्रिया झालेली... ना कुठली पट्टी ना बँडेज, फक्त कंबरेवर लोंबकळणारा लेहंगा... पाच-सहा वर्षांच्या मुलाशिवाय कुणी नातेवाईकही नाही...अशा विषण्ण व भग्न मनोवस्थेतील एका रुग्णाने घाटीतील वॉर्ड क्रमांक १८ मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र 'दिव्य मराठी'च्या टीमने त्याची समजूत काढली. तसेच घाटीची 'जागृत' यंत्रणा हलवून त्याला पुन्हा वॉर्डमध्ये दाखल करायला लावले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) निराधारांचे आधार...
  June 4, 12:43 AM
 • औरंगाबाद - एकीकडे पावसाचा मारा, दुसरीकडे प्रत्येक चौकात ट्रॅफिक जाम यामुळे वाहनचालकांचे प्रचंड हाल झाले. मुंगीच्या पावलाने वाहने पुढे सरकत होती. शुक्रवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास जोरदार वा-यासह पाऊस सुरू झाला. अनेक रस्त्यांवर तळी साचली. त्यातून वाट काढता काढता सर्वांच्या नाकी नऊ आले. त्यातच सेव्हन हिल्स उड्डाणपुलाच्या दुरुस्ती कामाची भर पडली. सिडकोकडून येणा-या वाहनांना पुलाखालून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एमजीएमकडून येणारी वाहनेही होतीच. क्रांती चौकातही पुलाचे काम सुरू...
  June 4, 12:39 AM
 • औरंगाबाद - महापालिकेच्या सर्व शिक्षा अभियानात विभागाने विनानिविदा साडेबारा लाखांचे साहित्य खरेदी केल्याचा गैरव्यवहार उघड झाला आहे. तीन वर्षांपूर्वी झालेल्या गैरव्यवहाराचा अहवाल महापौरांसह सर्व पदाधिका-यांकडे पोहोचला; पण त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सर्व शिक्षा अभियानात केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणावर पैसा येतो. त्यातून साहित्य खरेदीचे अधिकार अभियान विभागप्रमुखांना असतातच; पण नगरसेवकांचा त्यात अप्रत्यक्ष हस्तक्षेप असतोच. त्यामुळे अधिकारी-नगरसेवक संगनमताने...
  June 4, 12:38 AM
 • जालना- जिल्हा समन्वय समितीची बैठक आज खा. रावसाहेब दानवे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीस आ. कैलास गोरंट्याल, अब्दुल हाफीज, कार्यकारी अभियंता संपत नवगिरे आदी उपस्थित होते. बैठकीत खा. दानवे यांनी सिंगल फेज यंत्रणेचे काम वेळेत होत नसल्याचे सांगत अनेक गावांचा राष्ट्रीय पेयजल योजनेत सहभाग नोंदविला आहे. मात्र, त्या गावांना वीज कनेक्शनच नाही. वीज वितरण कंपनीचे अधिकारी काय करतात? असा सवाल करून दहा मिनिटांतच बैठकीतून काढता पाय घेतला. सिंगल फेज योजनेच्या कामाची पाहणी न करता तुम्ही बिले कशी काय...
  June 4, 12:37 AM
 • औरंगाबाद - खाम नदीपात्रातील अतिक्रमित जनतेचे संसार उघड्यावर आले आहेत. मान्सूनपूर्वी सर्वांच्या निवा-याची सोय करण्यात यावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जनशक्ती शहर विकास मंचने जिल्हाधिका:यांना सादर केलेल्या निवेदनात दिला आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. लोकांना राहण्यासाठी घरे नाहीत. तेव्हा प्रशासनाने गरजू व गरीब कुटुंबांंना तात्पुरते सरकारी, निमसरकारी रिकाम्या इमारतीत किंवा शेड उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्था करावी. पोलिस आयुक्तांनी खाम नदीपात्रातील...
  June 4, 12:35 AM
 • औरंगाबाद - शहरातील रिक्षाभाडे बारा रुपये व पुढच्या प्रतिकिलोमीटरसाठी दहारुपये करण्यास परिवहन कार्यालयाने सहमती दर्शविली आहे. हा प्रस्ताव आता परिवहन समितीपुढे ठेवण्यात येईल. रिक्षा संघटनांचे पदाधिकारी, ग्राहक पंचायत सदस्य आणि प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही सहमती झाली. पेट्रोल दरात सात रुपये वाढ झाल्याने रिक्षांच्या मीटर भाड्यात वाढ करण्याची मागणी रिक्षा संघटनांनी केली होती. रिक्षाचे मीटर बारा रुपयांनी सुरू करावे व नंतरच्या प्रत्येक...
  June 4, 12:33 AM
 • औरंगाबाद - शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेतात. मात्र, या कर्मचा:यांच्या कुटुंबीयांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पोलिस वसाहतीतील महिलांनी पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे यांची भेट घेऊन पाण्याची समस्या सोडविण्याची मागणी केली. पोलिस आयुक्तालयाच्या पाठीमागे पोलिस वसाहत आहे. या जुन्या वसाहतीत २१८ घरे असून कुठल्याही सुविधा पुरविल्या जात नाहीत. अनेक वर्षांपासून बसविलेली नळाची फिटिंगही खराब झाली आहे. येथील बहुतेक घरांत...
  June 4, 12:31 AM
 • औरंगाबाद - शहरात तपासणी मोहीम सुरू आहे. त्यामुळे अंगठी आणि पैसे रुमालामध्ये बांधून ठेवा असे सांगत तोतया पोलिसांनी पंधरा हजार रुपयांची लुबाडणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हडको एन- ११ परिसरात ही घटना घडली. हडको येथे राहणारे मारुती गायकवाड यांनी महाराष्ट्र बॅंकेतून ३ हजार रुपये काढले आणि गजानननगर येथे घरी जाण्यास निघाले. त्यावेळी दोन जणांनी त्यांना अडवून आम्ही सीआयडी पोलिस आहोत, अशी बतावणी केली.शहरात तपासणी मोहीम सुरू असून तुम्ही हातातील...
  June 4, 12:30 AM
 • औरंगाबाद- महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील १३ ठिकाणचे नाले साफ केल्याचा दावा केला. २ मे ते २ जून या काळात ही मोहीम राबवली. महिनाभरात १३ नाले स्वच्छ करण्यात आले. बारूदपुरा, कबाडीपुरा, टाऊन हॉल, नूर कॉलनी, सुराणा बिल्डींग, औषधी भवन, श्रीमान-श्रीमती, चुनाभट्टी, जाहगिरदार कॉलनी, राजनगर परिसरात ही स्वच्छता मोहीम राबवली. या मोहीमेसाठी ३९लाख रुपये खर्च आल्याचा अंदाज आहे. जुलै ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असल्याचे कार्यकारी अभियंता एम.डी. सोनावणे यांनी सांगितले. दाव्यात किती तथ्य.. - औषधी...
  June 4, 12:28 AM
 • नांदेड - संचालकांनी दिवाळखोरीत काढलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तिजो-या विकण्याची वेळ आली आहे. तिजो-या कोणाला विकायच्या याचा निर्णय शनिवारी (दि.४) समितीच्या बैठकीत होणार आहे. कर्मचा-यांचा पगार व दैनंदिन खर्च भागविण्यासाठी ३१ मे च्या बैठकीत तिजो-या विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हा बँकेला राजकीय पुढारी, संचालक, अध्यक्ष व साखर कारखानदारांनी लुटून दिवाळखोरीत काढले. लाखो रुपये उचलून त्याची परतफेड केली नाही. तत्कालीन संचालक मंडळाने बँकेत अनेक घोटाळे केले....
  June 4, 12:26 AM
 • औरंगाबाद - विष्णू भागवतचा अंगरक्षक नागेश छगनराव राऊत यास १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नागेशचा आर्थिक गुन्ह्यात संबंध नसल्याचा युक्तिवाद योग्य ठरवत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी शैलजा पांडे यांनी हे आदेश दिले. अंगरक्षक राऊत हा १ मार्च २११ पासून विष्णू भागवतकडे कामाला होता. कंपनीचे श्रीरामपूर येथील एजंट दीपक वल्लभ क्षत्रिय यांच्याशी त्याची बाचाबाची झाली होती. राऊत १ मे २११ पासून फरार होता. न्यायालयात हजर केले असता सरकारी वकिलांनी सात दिवसांची पोलिस...
  June 4, 12:23 AM
 • औरंगाबाद । न्यायालयाच्या परवानगीने नांदायला आलेल्या महिलेला पती गणेश बारवाल याने पेटवून देण्याची घटना गुरूवारी घडली. ज्योती बारवाल असे या महिलेचे नाव आहे. ज्योती हिला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
  June 4, 12:22 AM
 • औरंगाबाद - मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत शुक्रवारी (दि. ३) मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळपासून मराठवाड्यावर काळ्या ढगांनी गर्दी केली होती. दुपारनंतर अनेक जिल्ह्यांत पाऊस कोसळला. उस्मानाबादेत तो मुसळधार कोसळला. अनेक भागांत सलग अर्धा ते पाऊण तास पाऊस झाल्याने नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. पावसामुळे शहरवासीयांची धावपळ उडाल्याचेही दिसून आले. दरम्यान मुखेड तालुक्यातील धामनगाव येथे वीज कोसळून ४ जण गंभीर भाजले. हिंगोलीत जोरदार हजेरी हिंगोली । शहरासह जिल्ह्यात दुपारी...
  June 4, 12:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED