Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • बीड - शहरातील श्रीरामनगर भागात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर बीड पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी छापा मारून पर्दाफाश केला. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक म्हणून रुजू होताच रोशन पंडित यांनी कारवाईचा श्रीगणेशा केला. शहरातील श्रीरामनगर भागात एक महिला इतर महिला, मुलींना बोलावून घेत वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची माहिती बीड पोलिसांना मिळाली होती. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक म्हणून नुकतेच रुजू झालेले रोशन पंडित यांना या कुंटणखान्यावर कारवाईबाबत...
  September 15, 06:46 PM
 • औरंगाबाद- मोठ्या भक्तिभावाने प्रतिष्ठापणा केलेल्या दीड दिवसाच्या गणपतीच्या विसर्जनासाठी महापालिकेने विहिरींची स्वच्छताच केली नसल्यामुळे गणेशाच्या मूर्ती विसर्जनाविनाच विहिरींजवळच ठेवून देण्याची वेळ शुक्रवारी औरंगाबादकरांवर आली. शहरातील एन-१२ टीव्ही सेंटर, जिल्हा परिषद मैदान, शिवाजीनगर, मुकुंदवाडी, सातारा गावठाण विहिरीत कचरा आणि घाण खच्चून भरलेली असल्यामुळे औरंगाबादकरांनी या घाणीत विसर्जन करण्याऐवजी गणेशमूर्ती तशाच विहिरींजवळ ठेवून देणेच पसंत केले. गणेशोत्सव तोंडावर...
  September 15, 10:40 AM
 • नांदेड- कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्याशी संबंधित सात आरोपींची मालमत्ता जप्त करण्याबाबत शुक्रवारी नायगाव येथील न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला. मालमत्ता जप्त करण्याच्या अर्जात इंडिया मेगा कंपनीचा मालक अजय बाहेती, वाहतूक ठेकेदार राजू पारसेवार यांच्यासह ट्रेडिंग कंपन्यांच्या मालकांचाही समावेश आहे. कृष्णूर येथे इंडिया मेगा कंपनीत सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्याची वाहतूक करणारे दहा ट्रक पोलिसांनी पकडले. तेव्हापासून या प्रकरणातील आरोपी फरार झाले आहेत. ते परदेशात पळून गेले असावेत...
  September 15, 07:20 AM
 • नांदेड- एका चार वर्षीय बालिकेच्या मृत्यूप्रकरणी वजिराबाद ठाण्यात शुक्रवारी माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णांसह ८ जणांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशावरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत हैदराबादच्या शहागंज येथील पवन वर्मा यांनी न्यायालयात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांची नांदेड येथील सुधा (२४) या तरुणीची सोशल मीडियावरून ओळख झाली. नंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. २१ मे २०१३ रोजी त्यांनी रंगारेड्डी जिल्ह्यातील बोडउपल येथील आर्य समाजात रीतिरिवाजानुसार लग्न केले. या लग्नाला सुधाच्या...
  September 15, 07:14 AM
 • उस्मानाबाद- तालुक्यातील ढोकी येथे जमिनीच्या हव्यासापोटी पत्नी व सासऱ्याचा चाकू व खोऱ्याचे (फावडे) वार करून निर्घृण खून करणाऱ्या आरोपीला जिल्हा न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच आरोपीने न्यायाधीशांकडे कमी शिक्षा देण्याची याचना केली. मात्र, न्यायाधीशांनी हे अमानवी कृत्य असल्याचे नमूद करत कोणतीही दयामाया न दाखवता त्याला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अशी शिक्षा सुनावण्याची जिल्ह्यातील पहिलीच वेळ असून खटल्यात आरोपीच्या दोन...
  September 15, 07:06 AM
 • बीड - शहरातील महिलांनी एकत्र येत बीडच्या इतिहासात प्रथमच गणेशाची स्थापना केली आहे. शहरातील विविध क्षेत्रातील आणि जातीधर्मातील दोनशे ते अडिचशे महीलांनी एकत्र येत गणेश मंडळ स्थापन केले आहे. गुलालाची ऐवजी फुलांची उधळण, डीजे मुक्त मिरवणूक, पर्यावरण पुरक गणेश मुर्ती, पारंपारिक नृत्य, लेझिम, ढोल ताशांच्या गजरात शहरात प्रथमच स्त्री - शक्ती प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा जयश्री विधाते यांच्या संकल्पनेतून आणि स्त्री-शक्ती प्रतिष्ठानच्या महिला सदस्यांनी एकत्र येऊन स्त्री शक्ती महीला...
  September 14, 10:35 PM
 • औरंगाबाद- कांचनवाडीच्या नगरसेविकेने पैठण रोडवरील ७० वर्षे जुने वडाचे झाड कापण्याची परवानगी मनपाच्या उद्यान विभागाला मागितली. मात्र, मनपाने त्यावर कारवाई करण्याआधीच सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकार नसताना लाकूडतोड्याला झाड कापण्याची परवानगी देऊन टाकली. धक्कादायक बाब म्हणजे जुने वडाचे झाड कापण्याऐवजी लाकूडतोड्यांनी दुसरेच झाड कापलेे. हा प्रकार लक्षात येताच नागरिकांनी केलेल्या विरोधामुळे एक झाड वाचले. झाड कापणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेविकेने केली आहे....
  September 14, 10:12 AM
 • औरंगाबाद- सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार सध्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव समीर यांची औरंगाबाद युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली. त्यांना ३२९९ मते मिळाली. यापूर्वी ते जालना युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. दोन्ही महत्त्वाच्या पदांवर सत्तार कुटुंबाची सत्ता प्रस्थापित झाली आहे. काँग्रेसमध्ये दिल्लीपासून गल्लीपर्यंत घराणेशाही असल्याचा टीका होते. त्याचाच प्रत्यय पुन्हा आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. मग इथे मतपत्रिका...
  September 14, 09:54 AM
 • औरंगाबाद- ऐन सणासुदीत शहराला वेळेत पाणी मिळत नाही, दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी दिवे लागत नाहीत. त्यामुळे नागरिक पदाधिकारी तसेच नगरसेवकांच्या विरोधात संतप्त झाले आहेत. प्रशासनाला वेळोवेळी सांगूनही कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे व पथदिव्यांची जबाबदारी सांभाळणारे उपअभियंता के. डी. देशमुख यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिले. गुरुवारी महापौरांनी वाॅर्ड अधिकारी तसेच...
  September 14, 09:43 AM
 • अंबाजोगाई- परळी येथील जगमित्रनागा सूतगिरणीसाठी बीड जिल्हा बँकेकडून मालमत्ता तारण न ठेवताच घेतलेल्या ३ कोटी रुपयांच्या थकीत कर्जापोटी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह त्यांच्या पत्नी राजश्री मुंडे व अन्य आठ संचालकांच्या मालमत्ता इतरत्र गहाण ठेवू नयेत किंवा त्या हस्तांतरित करू नयेत, असे आदेश अंबाजोगाईचे दुसरे अप्पर सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी गुरुवारी दिले. कोर्टाने २० आॅक्टोबर रोजी मुंडे यांना म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. बीडचे पोलिस अधीक्षक जी....
  September 14, 07:12 AM
 • औरंगाबाद- डाॅ. नरेंद्र दाभाेलकर हत्येप्रकरणी अटक केलेला सचिन अणदुरे व शरद कळसकर यांनी हत्येच्या अाठ दिवस अाधी अाैरंगाबादेतील बीबी का मकबऱ्याच्या मागे निर्जन भागात गाेळीबाराचा सराव केला हाेता, अशी माहिती तपासात समाेर अाली. बुधवारी पथकाने या भागाची पाहणी करून नकाशा सीबीअायला पाठवला. सराव पूर्ण झालाय, अाता मुहूर्त काढा असा सांकेतिक निराेपही या दाेघांनी जालन्याचा माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरला पाठवला हाेता, अशीही माहिती सूत्रांनी दिली. सचिन व शरद सध्या सीबीआयच्या ताब्यात आहेत....
  September 14, 06:20 AM
 • औरंगाबाद- पोलिसांची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सारा वैभव, जटवाडा येथे मंगळवारी (११ सप्टेंबर) रात्री चोरट्यांनी दोन तासांत चार घरे फोडली आणि सुमारे ३ लाख रुपयांचा ऐवज पळवला. पोळा, गणपती आणि महालक्ष्मीच्या सणासाठी गावाला गेलेल्या कुटुंबीयांचे घर हेरून चोरट्यांनी घर फोडून सामान लंपास केले. चारही घरे फोडण्याची पद्धत सारखीच आहे. समोरच्या दरवाजाच्या कोंडा तोडून आत प्रवेश केला आणि बेडरूममध्ये ठेवलेल्या कपाटातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरली. शिवानंद रामचंद्र शेळके हे...
  September 13, 09:15 AM
 • बीड- संपूर्ण शहर बुधवारी सकाळी सव्वा नऊ ते साडे नऊच्या सुमारास गूढ आवाजाने हादरले. मोठा आवाज झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरातील काही नागरिकांनी मोकळ्या जागेवर जाऊन सुरक्षित होण्यासाठी प्रयत्न केला. मागील काही वर्षांपासून बीड शहरासह जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती होती मात्र एक-दोन वर्षात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढ झाली. यंदाच्या पावसाळ्यामध्ये देखील बीड शहरासह जिल्ह्यात मोठा खंड निर्माण झाला आहे. त्यातच वेगवेगळ्या...
  September 13, 08:37 AM
 • उस्मानाबाद- उस्मानाबाद विमानतळावर चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या आणि काही महिन्यांतच बंद पडलेल्या वैमानिक प्रशिक्षण केंद्राचा बुधवारी पुन्हा एकदा श्रीगणेशा झाला. बारामती येथील ब्लू रे एव्हिएशन कंपनीने २०१२ मध्ये हे वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू केले होते. मात्र काही महिन्यानंतर ते बंद झाले. मात्र कंपनीची विमाने जागीच उभी होती. अहमदाबाद येथील उद्योजक राजीव गांधी यांनी हेे केंद्र विकत घेतले आहे. या केंद्रात सध्या दुबईसह दिल्ली, अहमदाबाद, बंगळुरू, पुणे, केरळ येथील विद्यार्थी...
  September 13, 08:28 AM
 • फुलंब्री- आयशर कंटेनर व लुना दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत लुनावर परीक्षा देण्यासाठी जाणारी विद्यार्थिनी कंटेनरखाली चिरडल्याने जागेवरच ठार झाली आहे. हा अपघात बुधवार, दि.१२ रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास घडला आहे. शीतल श्रीपत भालेराव (१७, रा.कृष्णपूरवाडी, ता.औरंगाबाद) असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. औरंगाबाद तालुक्यातील कृष्णपूरवाडी येथील शीतल भालेराव ही मयूर पार्क येथील दादोजी कोंडदेव माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीची विद्यार्थिनी होती. दररोज...
  September 13, 07:50 AM
 • औरंगाबाद- मच्छिंद्र नागरे (रा. निफाड, जि. नाशिक) यांनी दहा वर्षांपूर्वी दहा गुंठे जमीन घेत एका गाईवर गोठा सुरू केला. आता त्यांच्याकडे १४ गाई- म्हशी आहेत. ते दररोज १२५ लिटर दूध विकून ५,५०० रुपये मिळवतात. असे हजारो नागरे नाशिक जिल्ह्यात असून त्यांनी नाशिक जिल्हा समृद्ध केला आहे. दररोज किमान ३.५ लाख लिटर दूध नाशिकमध्ये संकलित केले जाते. ही सारी गोदावरी नदीची कृपा असल्याचे दिसते. दुसरीकडे हीच गोदावरी औरंगाबाद जिल्ह्यात येते तेव्हा तिची कृपा आटल्यासारखी दिसते. कारण येथे येथे फक्त १ लाख ४० हजार...
  September 13, 07:49 AM
 • लातूर- लातूर महापालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. महापालिकेने एखाद्या कामाची निविदा काढली तरी ती कुणी भरायला तयार नाही. कारण सत्ताधाऱ्यांना १५ टक्के दिल्याशिवाय कोणतीच निविदा अंतिम होत नाही, असा घणाघाती आरोप आमदार अमित देशमुख यांनी केला. लातूर शहरातील सम्राट चौकामध्ये वडार समाज भवन उभे करण्याच्या कामाचा प्रारंभ मंगळवारी रात्री आमदार देशमुख यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे, दीपक सूळ, अशोक गोविंदपूरकर यांची उपस्थिती होती.
  September 13, 07:40 AM
 • जालना- डॉ. दाभोलकर हत्या व नालासोपारा स्फोटके प्रकरणात एटीएसने जालन्यातून आणखी एकास ताब्यात घेतले आहे.गणेश कपाळे असे संशयिताचे नाव असून यापूर्वी अटक केलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकरचा ताे साथीदार असल्याचे सांगितले जाते. गणेशचे जालन्यातील शनिमंदिर चौकात डीटीपी व झेरॉक्सचे दुकान आहे. पांगारकर याच दुकानात बसत हाेता. त्यामुळे गणेशवरही एटीएसला संशय अाहे. पोलिसांनी त्याच्या दुकानातील संगणकाची हार्डडिस्क जप्त केली. तसेच गणेश याला औरंगाबाद येथे चौकशीसाठी नेले. डॉ. दाभोलकर हत्या...
  September 13, 07:09 AM
 • नेकनूर- बीड तालुक्यातील नेकनूर येथे दर वर्षी गणेशत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा होत असतो. या वर्षी नेकनूरचे मॉं साहेब गणेश मंडळ या वर्षी आदर्श उपक्रम राबवत आहे. गणेशत्सवातील खर्चाला फाटा देत जमा होणारी रक्कम केरळ पूरग्रस्तांना मदत करणार असल्याने मॉं साहेब गणेश मंडळाच्या हया आदर्श उपक्रमामुळे मंडळाचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. मॉं साहेब गणेश मंडळाचे हे सहावे वर्ष आसुन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष शिंदे यांनी सुचवलेल्या कल्पनेला मंडळातील सर्वांनीच सहमती दर्शवल्याणे या...
  September 12, 06:01 PM
 • औरंगाबाद- राज्यातले दुसरे मराठा वसतिगृह औरंगाबादमध्ये सुरू करण्याच्या प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे. गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांनी एक सप्टेंबरला हे वसतिगृह सुरू करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश आले नाही. आता १७ सप्टेंबरचा मुहूर्त साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या निमित्ताने १७ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही शहरात अाहेत. त्यांच्या हस्ते उद््घाटन करण्यासाठी काही राजकीय नेते, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याची...
  September 12, 10:47 AM
 
जाहिरात

RECOMMENDED