Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • औरंगाबाद- आयुष्यभर खासगी आणि निमशासकीय विभागात काम करणाऱ्या देशभरातील ६२ लाख २३ हजार कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अवघ्या ९०० तेे २२५० रुपयांची पेन्शनवर समाधान मानावे लागत आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्मचारी निवृत्ती योजनेअंतर्गत शासनाने ६ ते १० लाख रुपये कापले. ही रक्कम बँकेत किंवा पोस्टात ठेवली तरी महिन्याकाठी सरासरी किमान ७५०० रुपये व्याज मिळू शकते. शासनाकडे हक्काचे पैसे शिल्लक असताना कर्मचाऱ्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. वाढती महागाई, आरोग्याचे प्रश्न आणि अन्य...
  November 10, 10:28 AM
 • बीड- शहरातील नामदेव नगर भागात एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. मिळालेली माहिती अशी की, गणेश शिंदे यांनी गळफास घेतला असून त्यांची पत्नी आणि मुलगी यांचे मृतदेह घरात आढळून आले. मात्र, या आत्महत्या आहेत की, हत्या कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस तपास सुरू असून शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आल्या आहेत.
  November 9, 12:55 PM
 • माजलगाव- बीड-माजलगाव-परभणी या राज्य महामार्गावर पवारवाडीजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर हा अपघात झाला. या अपघातात एक गंभीर जखमी झाला आहे. मिळालेली माहिती अशी की, माजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील छत्रपती साखर कारखान्यातून साखरच्या पोते भरलेला ट्रक दुपारी 12 वाजून 35 मिनिटांला निघाला. पवारवाडीजवळील गॅस गोडाऊनसमोर ट्रक रस्त्यावर पलटी झाला. समोरून येणारे दोन मोटरसायकल ट्रकआणि...
  November 8, 03:58 PM
 • परळी- येथील औष्णिक विद्युत केंद्रातून बाहेर पडणाऱ्या राखेचे प्रमुख मार्गावर प्रदूषण होत असल्याने औष्णिक विद्युत केंद्राच्या मुख्य अभियंत्यांनी राख वाहतुकीवर कडक निर्बंध घातले आहेत. रात्रीच्या वेळी राख उचलण्यास व वाहतूक बंद करण्यात आली आहे. दिवसा होणारी राख वाहतूक नियमाप्रमाणेच करावी, अशा सूचना दिल्या आहेत. दाऊतपूर, वडगाव येथील राखेच्या तळ्यातून सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच राखेची उचल व वाहतूक करता येणार असून वाहतूक करणाऱ्या वाहनात समतल प्रमाणात राख भरावी लागणार आहे. राखेच्या...
  November 8, 11:58 AM
 • वाळूज- ट्रकच्या (एमएच ४३ यू ६५७०) धडकेने भाचीला घेऊन दुचाकीवरून (एमएच २० बीबी १६५२) निघालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. मुंबई-नागपूर महामार्गावरील खोजेवाडी फाट्यावर बुधवारी सकाळी ९ वाजता हा अपघात झाला. दीपक पूनमचंद महेर (१८, रा. बेंडेवाडी, ता. वैजापूर) असे त्यांचे नाव आहे. भाची वैष्णवी पोपटसिंह सत्तावन (५, रा. जोगेश्वरी) ही गंभीर जखमी झाली असून तिच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. एमआयडीसीवाळूज ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिस उपनिरीक्षक उंबरे तपास करत आहेत.खोजेवाडी फाट्याजवळ अपघात; घाटीत...
  November 8, 11:06 AM
 • हिंगोली-मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास पुसद येथे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्यामुळे कळमनुरी येथे ती बसस्थानकाजवळील लमानदेव मंदिराजवळील सभा मंडपाला या बसने धडक दिली. बसचालकाने प्रसंगावधान दाखवल्याने बसमधील २२ प्रवासी बालंबाल बचावले. हिंगोली-नांदेड महामार्गावरून एम. एच. ४० एन. ८५६७ या क्रमांकाची पुसद आगाराची बस हिंगोलीमार्गे जात होती. मात्र, कळमनुरी शहरापासून काही अंतरावर बसचे ब्रेक निकामी झाले. ही बाब चालकाच्या लक्षात येताच चालकाने बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला....
  November 8, 10:27 AM
 • परभणी- शहरातील मेहराजनगर भागात किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेलेल्या एका सहा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी ३५ वर्षीय आरोपी विरोधात नानलपेठ पोलिस ठाण्यात बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम (पोस्को) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलाने याबाबत पोलिसात तक्रार दिली आहे. सदर मुलगी ही तिच्या अत्याकडे गेली होती. ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ च्या दरम्यान सदर मुलगी सेवक नगरातील किराणा दुकानावर चॉकलेट आणण्यासाठी गेली असता याच...
  November 8, 07:57 AM
 • लातूर-अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव असलेल्या लातूर लोकसभा मतदारसंघात कोणत्याच पक्षाने बाहेरचा उमेदवार लादू नये. स्थानिक व्यक्तीला संधी द्यावी यासाठी सर्वच पक्षांवर दबाव टाकण्यासाठी ऐन दिवाळीत लातूर लोकसभा विचार मंचाची स्थापना करण्यात आली आहे. यासाठी अनुसूचित जातीमधील काही विचारवंतांनी पुढाकार घेतला आहे. सर्वसाधारणपणे एखादा मतदारसंघ अनुसूचित प्रवर्गासाठी राखीव झाला की तेथील मातब्बर नेते स्थानिकांना डावलून बाहेर जिल्ह्यातला उमेदवार तेथून उभा करतात आणि त्याला निवडून...
  November 8, 07:44 AM
 • नांदेड- हल्ली संकेतस्थळावरून लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र या संकेतस्थळावरूनही फसवणूक होऊ शकते हे देगलूर येथील एका महिलेच्या अनुभवावरून उघडकीला आले. एका संकेतस्थळावरून एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मूळ नायजेरियाचा रहिवासी असलेला आणि सध्या दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या थियोफिलस मारो याचे एका मॅट्रिमोनियल...
  November 8, 07:25 AM
 • परभणी- पालम तालुक्यातील रोकडेवाडीत डीसीजी व डीपीडी या प्रतिबंधात्मक लसीकरणानंतर प्रत्येकी ३ महिन्यांच्या गोपाळ रामकिशन सकनूर, राम निळे या दोन बालकांचा मृत्यू झाला. तर विद्या भकाणे, लखण निळे या बालकांवर अंबेजाेगाई येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रोकडेवाडीतील आरोग्य केंद्रात कर्मचारी निलेवाड यांनी बुधवारी सकाळी काही बालकांचे लसीकरण केले. सकाळी ११ वाजता गोपाळचा मृत्यू झाला. व्यंकटेश श्यामराव निळे यांची जुळी मुले राम-लखण व दत्तराव रावजी भकाणे यांची मुलगी विद्या या तीन बालकांनाही...
  November 8, 07:15 AM
 • गंगापूर- गंगापूर तालुक्यातील मांजरी येथे सोमवारी दुपारी कपाशीच्या शेतामध्ये पतीने पत्नीचा साडीने गळा दाबून खून केला. त्यानंतर पसार होऊन राहाता येथे जाऊन वीज प्रवाह सुरू असलेल्या तारेला धरून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. फकीराबादवाडी (ता. वैजापूर)येथील विजय अंबादास थोरात हा आपला जमीनजुमला विकून मांजरी येथील शेती घेऊन शेतवस्तीवर ४ महिन्यांपूर्वी स्थायिक झाला होता. सोमवारी दुपारी त्याने कपाशीच्या शेतामध्ये पत्नी ज्योती (32) हिचा तिच्या साडीने गळा दाबून खून करून पळ काढला....
  November 7, 04:19 PM
 • साेयगाव देवी-यावर्षी भोकरदन तालुक्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच हिवाळ्यातच पाणीटंचाई आणि चारा टंचाई जाणवत आहे. पशुधन जगवावे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. भोकरदन तालुक्यातील बरंजळा लोखंडे येथील शेतकरी भगवान लोखंडे यांनी विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथून सोयाबीनचे भुस ट्रेकटरच्या सहाय्याने खरेदी करूनआणले आहे. भुसाशी गंजी दोन ते तीन हजार रुपये व ट्रॅक्टरचे भाडे ४ हजार असा एकूण ७ ते ८ हजार रुपये खर्च झाला आहे. यासाठी शंभर...
  November 7, 11:17 AM
 • वडवणी - जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. या निवड प्रक्रियेत निष्ठावंत व चांगले काम असणाऱ्या शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मंगळवारी नाराज शिवसैनिकांची वडवणीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शिवसेना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत काम न करणाऱ्यांची पदे जातात. परंतु काम करणाऱ्यांची येथे पदे जातात हे दुर्दैव वाटते. आम्ही शिवसेनेवर नाराज...
  November 7, 11:08 AM
 • औरंगाबाद-तुमच्या ऑइल कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण महामंडळाची कारवाई थांबवायची असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या इरफान शहा हारुण शहा (२७, रा. नारेगाव) व शेख रशीद शेख महेमूद (४०, रा. पडेगाव) या दोघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते. कलीम...
  November 7, 11:00 AM
 • उस्मानाबाद- मराठवाड्यातील अनेक गावांसाठीमहत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम निश्चित कालावधीत म्हणजे ४ वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नाबार्डकडून २२०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्पासाठी आतापर्यंत ८०० कोटी रुपये दिले असून, योेजनेचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,...
  November 7, 07:29 AM
 • उस्मानाबाद- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. वाघीण मृत्यू प्रकरणात त्यांचा यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर उठलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी...
  November 6, 05:52 PM
 • औरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. नारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग...
  November 6, 12:21 PM
 • वैजापूर- नाशिक पाटबंधारे विभागाने वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या नांदूर - मधमेश्वर प्रकल्पातील चार सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचन तसेच औद्योगिक सिंचनाचे लागू केलेले आरक्षण रद्द करण्याची याचिका शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे प्रमुख डाॅ.राजीव डोंगरे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाखल केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुकणे,भावली,भाम,वाकी या चार धरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या धरणाद्वारे...
  November 6, 08:00 AM
 • नांदेड-एका बाजूस उसाची एफआरपी वाढवून द्यायची, दुसऱ्या बाजूस पाकिस्तानमधून साखर आयात करून साखरेचे भाव बाजारात कमी करायचे, या दृष्टचक्रात साखर कारखानदारी अडकली असून हा उद्योगच मोडीत काढण्याचे षड्यंत्र केंद्र आणि राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केला. सोमवारी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र.१ मधील बॉयलर प्रदीपन व गाळप शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ....
  November 6, 07:55 AM
 • नांदेड- काही वर्षांपूर्वी दिवाळीचे अभ्यंगस्नान म्हटले की अंगावर नुसता काटा येत असे. पांघरुणातून शरीराचा थोडा जरी भाग बाहेर पडला तरी अंगात हुडहुडी भरत असे. आता चित्र एकदम पालटले आहे. या वर्षी दिवाळीत अंगात हुडहुडी तर जाऊ द्या, उलट घाम फुटत आहे. ढगाळ वातावरणाने तर उकाडा अधिकच वाढला आहे. दक्षिणेकडे उठलेल्या चक्रीवातामुळे ऐन थंडीच्या दिवसांत उकाडा आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमीन कोरडीच आहे. त्यामुळे जमिनीतून निघणारी भाप आणि आकाशात...
  November 6, 07:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED