Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • वडवणी - जिल्ह्यात दोन दिवसापूर्वीच शिवसेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर झाल्या. या निवड प्रक्रियेत निष्ठावंत व चांगले काम असणाऱ्या शिवसैनिकांना डावलल्याने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी मंगळवारी नाराज शिवसैनिकांची वडवणीत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीत आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. परंतु शिवसेना न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेत काम न करणाऱ्यांची पदे जातात. परंतु काम करणाऱ्यांची येथे पदे जातात हे दुर्दैव वाटते. आम्ही शिवसेनेवर नाराज...
  November 7, 11:08 AM
 • औरंगाबाद-तुमच्या ऑइल कंपनीतून निघणाऱ्या धुरामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. प्रदूषण महामंडळाची कारवाई थांबवायची असेल तर महिन्याला एक लाख रुपये द्यावे लागतील, अशी धमकी देत खंडणी मागणाऱ्या इरफान शहा हारुण शहा (२७, रा. नारेगाव) व शेख रशीद शेख महेमूद (४०, रा. पडेगाव) या दोघांना जिन्सी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांचे दोन साथीदार मात्र पसार झाले. स्पेशल २६ चित्रपटाप्रमाणे हे दोघे आम्ही मोदी सरकारची खास टीम असल्याचे सांगत व्यापारी, व्यावसायिकांना धमकावून लुटत होते. कलीम...
  November 7, 11:00 AM
 • उस्मानाबाद- मराठवाड्यातील अनेक गावांसाठीमहत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम निश्चित कालावधीत म्हणजे ४ वर्षांत पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले असून त्यासाठी नाबार्डकडून २२०० कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. प्रकल्पासाठी आतापर्यंत ८०० कोटी रुपये दिले असून, योेजनेचे काम गतीने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळी आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,...
  November 7, 07:29 AM
 • उस्मानाबाद- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे स्वत: बंदूक घेऊन वाघिणीला मारायला गेले नव्हते. वाघीण मृत्यू प्रकरणात त्यांचा यांचा राजीनामा मागणे चुकीचे असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी मुनगंटीवार यांची पाठराखण केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी उस्मानाबाद जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अवनी वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर उठलेल्या वादंगावर प्रतिक्रिया दिली. याप्रकरणी आपण मनेका गांधी यांच्याशी बोलणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी...
  November 6, 05:52 PM
 • औरंगाबाद- नारेगाव कचरा डेपोपासून ५०० मीटर अंतरावर असलेल्या ३० बाय १०० फुटांच्या फोमच्या बंद गोदामाला सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. अग्निशमन विभागाचे सहा बंब आणि खासगी २० टँकरच्या मदतीने रात्री नऊ वाजता आग आटोक्यात आली. यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. नारेगावात तीन लाइनमध्ये प्रत्येकी तीन अशी नऊ पत्र्यांची गोदाम आहेत. सय्यद साबेर यांच्या मध्यभागी असलेल्या फोमच्या गोदामाने सर्वप्रथम पेट घेतला. सर्व गोदामे एकमेकांना लागून चारही बाजूंनी बंद आहेत. त्यामुळे आग...
  November 6, 12:21 PM
 • वैजापूर- नाशिक पाटबंधारे विभागाने वैजापूर, गंगापूरसाठी असलेल्या नांदूर - मधमेश्वर प्रकल्पातील चार सिंचन प्रकल्पाच्या पाण्यावर बिगर सिंचन तसेच औद्योगिक सिंचनाचे लागू केलेले आरक्षण रद्द करण्याची याचिका शेतकरी मित्र प्रतिष्ठानचे प्रमुख डाॅ.राजीव डोंगरे यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाकडे दाखल केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील नांदूर-मधमेश्वर जलद कालव्यासाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुकणे,भावली,भाम,वाकी या चार धरणांची निर्मिती करण्यात आलेली आहे. या धरणाद्वारे...
  November 6, 08:00 AM
 • नांदेड-एका बाजूस उसाची एफआरपी वाढवून द्यायची, दुसऱ्या बाजूस पाकिस्तानमधून साखर आयात करून साखरेचे भाव बाजारात कमी करायचे, या दृष्टचक्रात साखर कारखानदारी अडकली असून हा उद्योगच मोडीत काढण्याचे षड्यंत्र केंद्र आणि राज्य सरकारने रचले असल्याचा आरोप राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी केला. सोमवारी भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या युनिट क्र.१ मधील बॉयलर प्रदीपन व गाळप शुभारंभ प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आ....
  November 6, 07:55 AM
 • नांदेड- काही वर्षांपूर्वी दिवाळीचे अभ्यंगस्नान म्हटले की अंगावर नुसता काटा येत असे. पांघरुणातून शरीराचा थोडा जरी भाग बाहेर पडला तरी अंगात हुडहुडी भरत असे. आता चित्र एकदम पालटले आहे. या वर्षी दिवाळीत अंगात हुडहुडी तर जाऊ द्या, उलट घाम फुटत आहे. ढगाळ वातावरणाने तर उकाडा अधिकच वाढला आहे. दक्षिणेकडे उठलेल्या चक्रीवातामुळे ऐन थंडीच्या दिवसांत उकाडा आणि ढगाळ वातावरण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या वर्षी अत्यल्प पाऊस पडल्याने जमीन कोरडीच आहे. त्यामुळे जमिनीतून निघणारी भाप आणि आकाशात...
  November 6, 07:42 AM
 • परळी-लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले तिसरे अपत्य म्हणून जोपासलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्यापुढे अनेक संकटे उभी आहेत, परंतु ऊस उत्पादक शेतकरी व संचालक, कर्मचाऱ्यांच्या मदतीने वैद्यनाथ कारखाना पुन्हा उभारी घेऊन गतवैभव प्राप्त करेल, असा विश्वास खा. प्रीतम मुंडे यांनी व्यक्त केला. परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा १९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ खा. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. अध्यक्षस्थानी...
  November 6, 07:26 AM
 • जालना/अंबड - पाऊस नसल्यामुळे अगोदरच अनेक गावे दुष्काळाच्या छायेखाली वावरत आहेत. त्यातच भुरट्या चोऱ्या, दरोडे, लूटमारीच्या घटनांमध्ये भर पडल्यामुळे खेडेगावांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे. दरम्यान, अंबड तालुक्यातील पिंपरखेड येथे सोमवारी सकाळी ३ वाजेच्या सुमारास घरात झाेपलेल्या पुरुषांना उठवून चाकू व गुप्तीने चार दरोडेखोरांनी वार केले. यानंतर महिलांच्या अंगावरील दागिने ओरबाडून २० हजार रुपयांचा मुद्देमाल नेल्याच्या या घटनेमुळे अजूनच भीती निर्माण झाली. दरम्यान, १९ ऑक्टोबर...
  November 6, 07:19 AM
 • उस्मानाबाद- बेसुमार व अनियंत्रित उपशामुळे भूगर्भातील पाणीपातळीतही झपाट्याने घट होत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षीच्या अॉक्टोबरमध्ये ४.१४ मीटरने पाणीपातळीत घट झाली आहे. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटा असून आता भूगर्भातील पाण्याचाही वापर काटकसरीने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. उसासाठी होणाऱ्या बेसुमार उपशावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला कठोर पावले उचलण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. पावसाने यावर्षी हुलकावणी दिल्यामुळे खरिप पिंकांचा मागेच पाचोळा झाला....
  November 5, 11:32 AM
 • वाळूज- वाळूज येथील गरवारे कंपनीजवळून रविवारी सकाळी ७ वाजता चहा पिण्यासाठी पायी जाणारे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हरीश संजय वाघ (रा. त्रिमूर्ती चौक, जवाहर काॅलनी) यांचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाला. कार काही अंतर पुढे जाऊन आयशर ट्रकवर आदळल्याने कारमधील महिला गंभीर जखमी झाली. हरीश हे आयशर ट्रकने (एमएच २० डीई ०३३७) फळे घेऊन पुण्याला जात होते. रविवारी सकाळी वाळूज येथील मेहुणा विजय अहिरे यास भेटण्यासाठी ते थांबले. ट्रक गरवारे कंपनीजवळ रस्त्याच्या बाजूला उभा करून दोघे चहाच्या टपरीकडे पायी...
  November 5, 10:26 AM
 • औरंगाबाद- नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात पगार आणि बोनस एकत्रित जमा झाले. शनिवारी, रविवारी पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्वच बँकांच्या एटीएम आणि सीडीएमवर ताण आल्याने ७० टक्के मशीन बंद पडले. यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. शहरात नोकरी करणाऱ्या ग्रामीण भागातील तरुणांना आपल्या पालकांना सीडीएमद्वारे पैसे पाठवता आले नाही. यंदा पगार आणि बोनस देताना संस्था आणि बँकांवर ताण आला. त्यामुळे अनेक कंपन्यांचे पगार २ व ३ नोव्हेंबर राेजी झाले. त्यामुळे शहरातील सुमारे...
  November 5, 10:04 AM
 • औरंगाबाद- जगाच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक इतिहासात श्रीरामकृष्ण परमहंस हे अद्वितीय धर्म समन्वयक म्हणून विख्यात आहेत. त्यांनी संपूर्ण जीवन मानवमात्रांच्या शांततेसाठी आणि कल्याणासाठी वेचले. त्यांचे प्रमुख शिष्य स्वामी विवेकानंद यांनी गुरूंचा अमर संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. श्रीरामकृष्णांचे हे मंदिर फक्त औरंगाबाद शहरासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात असलेल्या विद्यमान मंदिरांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण आणि भूषणावह असेल. वेरूळचे श्री घृष्णेश्वर...
  November 5, 08:57 AM
 • बीड-बीड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांच्यासह ९ नगरसेवकांना नगर विकास राज्यमंत्री डॉ.रंजित पाटील यांनी १८ मे रोजी कचरा फेक प्रकरणी अपात्र केले होते. या प्रकरणी उच्च न्यायालयाने नगर विकास राज्यमंत्र्यांचा तो आदेश रद्द ठरवला आहे. दरम्यान यामुळे काकू नाना विकास आघाडीला दिलासा मिळाला असून नगराध्यक्ष गटाला मोठा बसला आहे.. बीड नगर परिषदेत नगराध्यक्षांच्या दालनात कचरा फेक प्रकरणी नगर विकास राज्यमंत्री यांनी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, गटनेते फारुख पटेल, नगरसेवक अमर...
  November 5, 07:52 AM
 • केज -एक दिवसाच्या नवजात बाळाला टाकून मातेने पलायन केल्याचा प्रकार केज तालुक्यातील जोला शिवारात रविवारी सकाळी उघडकीस आला. पोलिसांनी माहिती मिळताच बाळाला ताब्यात घेत बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. केज - बीड रस्त्यावरील आंबळाचा बरड येथून जोला गावाकडे जाणाऱ्या रस्त्याने एक अॅपेरिक्षा चालक हा रविवारी सकाळी आठ वाजला चालला होता. या परिसरात असलेल्या तंत्र निकेतन महाविद्यालयाच्या पाठीमागून जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला खड्ड्यात जिवंत नवजात पुरुष जातीचे बाळ निदर्शनास आल्याने...
  November 5, 07:44 AM
 • जालना-राज्यात १५१ तालुक्यांत दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात पिण्याच्या पाण्यासोबतच जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देणे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. पशुसंवर्धन विभागाच्या अहवालानुसार टंचाईग्रस्त भागात दररोज जवळपास २ लाख मेट्रिक टन चारा उपलब्ध करून द्यावा लागेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणात चारा छावण्या सुरू कराव्या लागणार आहेत. मात्र चारा छावणीत होणारे गैरप्रकार लक्षात घेता छावणीऐवजी थेट दावणीला चारा उपलब्ध करून देण्याच्या पर्यायावर सरकार विचार करीत आहे. असे झाले तर...
  November 5, 07:39 AM
 • औरंगाबाद-काका अाणि भावाचा कुस्तीमधील दबदबा रूपालीच्या मनावर चांगलाच बिंबला अाणि तिने यात करिअर करण्याचा ध्यास घेतला. वडिलांनीही तिच्या याच अात्मविश्वासाला मदतीचे पाठबळ दिले. यासाठी शेताच्या बांधावरच कुस्तीसाठी खास मातीचा अाखाडा तयार केला. याच ठिकाणी मातीत तिने कुस्तीचे तंत्रशुद्धपणे कुस्तीचे धडे गिरवले. यातून तिच्या प्रतिभेला चालना मिळाली. यासाठी घेतलेल्या मेहनतीचा प्रत्ययही १९ वर्षीय रूपाली वर्देने अखिल भारतीय अांतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेत आणून दिला. तिने ५३ किलाे वजन...
  November 5, 07:26 AM
 • पाणीदार माणसं नावाने नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका पुस्तकाच्या प्रस्तावनेत पाणीविषयक कार्यकर्ते पोपटराव पवार यांनी मुलांना शाळेत साक्षर करण्याबरोबरच जलसाक्षरही केले पाहिजे, असे म्हटले आहे. त्यांच्या दृष्टीने जलसाक्षर याचा अर्थ अधिक व्यापक आहे. किती पाणी उपलब्ध आहे हे पाहून ते कोणी, केव्हा, कसे आणि कशासाठी वापरायचे याची समज असणे म्हणजे जलसाक्षरता, असे ते लिहितात. पोपटराव पवार यांची ही प्रस्तावना आठवण्याचे कारण अर्थातच, मराठवाड्याला पाणी देण्यावरून गोदावरी खोऱ्यातील वरच्या...
  November 5, 06:39 AM
 • नाशिक- माझ्या शेतातील अांबे खाल्यास मुलगाच जन्माला येताे, असे वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्याविराेधात नाशिक महापालिकेने दाखल केलेल्या फाैजदारी दाव्यात शुक्रवारी (दि.२) भिडे गुरूजी हजर न झाल्याने त्यांना ३० नाेव्हेंबर रोजी हजर राहण्याचे अादेश न्यायालयाने दिले अाहेत. या दाव्यात प्रथमच भिडे गुरुजी यांच्या वतीने अॅड. अविनाश भिडे हे हजर झाले अाहेत. नाशकात झालेल्या एका जाहीर कार्यक्रमात भिडे गुरुजी यांनीमाझ्या शेतातील...
  November 4, 11:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED