Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • बीड -तीन वर्षांपूर्वी घरच्यांचा विरोध डावलून प्रेमविवाह केल्यानंतर एक दिवस किरकोळ वादातून पतीने पेटवून घेतले. त्याचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याचा जबर धक्का बसलेल्या पत्नीने जिथे पतीने अखेरचा श्वास घेतला तिथेच मीसुद्धा अखेरचा श्वास घेणार म्हणत शुक्रवारी मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात येऊन अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. उपचारादरम्यान शनिवारी सकाळी तिचा मृत्यू झाला अन् ज्या जळीत कक्षात पतीने प्राण सोडला होता तिथेच पत्नीनेही शेवटचा श्वास घेतला अन् एका...
  November 4, 08:08 AM
 • ईट- दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजुरांच्या हाताला काम नाही. पोटभर भरण्यासाठी शेतकऱ्यांबरोबरच त्यांच्या मुलांना आता हातात कोयता घ्यावा लागत आहे. भूम तालुक्यातील ईटसह परिसरात ऊस तोडणी सुरू असून, मुलांचे शैक्षणिक भवितव्य अंध:कारमय झाले आहे. ज्या वयात मुलांच्या हातात वही-पेन हातात हवा, त्या वयात काेयता हातात आला. साखर शाळाही बंद या दुष्काळी स्थितीमुळे मोठ्या प्रमाणात बाहेरच्या गावातील ऊसतोड कामगार तोडणी करताना दिसून येत आहेत. मात्र बाहेरून आलेल्या ऊसतोड कामगारांची लहान व...
  November 4, 08:03 AM
 • जालना-रेल्वेत प्रवाशी झोपल्यानंतर एकाने स्वच्छतागृहाजवळ थांबून येणाऱ्या-जाणाऱ्यांवर नजर ठेवायची. नंतर दोन जणांनी झोपेतील प्रवाशांचे मोबाइलसह इतर मौल्यवान वस्तू पळवणारे तीन जण, व्हॉट्सअॅप ग्रुपवरून जुने मोबाइल विक्री करणाऱ्यांचीही टोळीही पोलिसांच्या हाती लागली. परंतु, चोरलेले मोबाइल सायबर युनिटमध्ये ट्रेस केल्यानंतर लोकेशन मिळत नाही. तज्ज्ञ मोबाइल शॉपी चालकांच्या मदतीने बनावट सॉफ्टवेअर वापरून या मोबाइलचे आयएमईआय क्रमांकच बदलले असल्याची माहिती पुढे आली. आयएमईआय क्रमांकच...
  November 4, 07:55 AM
 • जालना- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला. या वेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात जात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. यात एका जिल्हा परिषद सदस्यांसह तालुकाध्यक्ष असे तिघे जण किरकोळ जखमी झाले अाहेत. शनिवारी दुपारी ११.५५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टरद्वारे पोलिस मैदानावर आगमन झाले. तेथून मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालयाच्या...
  November 4, 07:42 AM
 • औरंगाबाद -एक देश, एक कर अशा घोषणा देत सुरू झालेेल्या जीएसटी म्हणजेच गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच जीएसटीतील अडचणी दीड वर्षानंतरही कायम आहेत. गेल्या ५-६ महिन्यांपासून रिटर्न फाइल करण्याची तारीख जवळ येताच वेबसाइट हँग होत आहे. आता तर १.५ लाख करदाते रिटर्न फाइल करत असल्याने वाट बघण्याची सूचना देणारा संदेश झळकतोय. तज्ज्ञांच्या मते देशभरातील करदात्यांसाठी एनआयसीचे अवघे ४ सर्व्हर आणि त्यावरच सरकारच्या अन्य खात्यांचा डाटा असल्याने ही समस्या उद््भवत आहे. वारंवार तक्रारी करूनही समस्या कायम...
  November 3, 09:14 AM
 • बीड - माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. गेवराई तालुक्यातील जातेगावमध्ये ही घटना घडली होती. माजलगाव तालुक्यातील जामगा तांड्यावरील गोविंद राठोड यांची मुलगी कविताचा गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील भरत पवार याच्याशी सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सहाच महिन्यांत तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला. माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी...
  November 3, 09:10 AM
 • परभणी - सैन्यभरतीसाठी गेल्या काही दिवसांपासून पहाटेच्या वेळी धावण्याचा सराव करणाऱ्या तीन तरुणांना भरधाव कारने शुक्रवारी(दि.दोन) पहाटे चारच्या सुमारास उडवले. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला. त्याच्यावर पूर्णा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या तरुणांसोबतच सराव करीत असलेला चौथा तरुण लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजूला गेल्याने या अपघातातून तो बचावला. ही घटना पूर्णा ते झीरोफाटा या मार्गावरील माटेगावजवळ घडली. संतोष उत्तम साबळे, गोविंद उर्फ...
  November 3, 09:08 AM
 • नांदेड - शहरातील तांडा बारचे मालक सुरेश राठोड यांच्यावर गुरुवारच्या मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. दुचाकीवरील तीन हल्लेखोरांनी सुमारे अडीच किमीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. खराब रस्त्यामुळे राठोड यांच्या स्कूटीची गती कमी होताच तिघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. परंतु खराब रस्त्यामुळे त्याचा नेम चुकला आणि गोळी मांडीत घुसल्याने राठोड बालंबाल बचावले. गोळी झाडून हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली अाहे. सुरेश राठोड यांचा...
  November 3, 09:01 AM
 • औरंगाबाद/नाशिक -सुप्रीम कोर्टाच्या दणक्यानंतर गुरुवारी नाशिक-नगरमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या कार्यवाहीला सुरुवात झाली होती. मात्र, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अचानक फेरनियोजन केल्यामुळे गंगापूर धरणातून विसर्ग थांबवण्यात आला होता. तो शुक्रवारीही सुरू होऊ शकला नाही. नाशकातील शेतकऱ्यांनी विरोध केल्यामुळे गुरुवारनंतर शुक्रवारी गंगापूर आणि पालखेड धरण समूहातून जायकवाडीसाठी पाणी सुटू शकले नाही. या आंदोलनात अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंंतर तूर्त या दोन्ही धरणांतून पाणी न...
  November 3, 07:45 AM
 • परभणी- सैन्य भरतीसाठी धावण्याचा सराव करणार्या तिघांना एका भरधाव जीपने चिरडले. दोघांचा जागेवर मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास पूर्णा ते झिरोफाटा या मार्गावर माटेगावजवळ ही घटना घडली. लघुशंकेसाठी रस्त्याच्या बाजुला गेलेला एका तरुण थोडक्यात बचावला. एका तरुणाची प्रकृती गंभीर असून त्याला नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. पुढील स्लाइड्स क्लिम करून पाहा.. संबंधित फोटो..
  November 2, 07:25 PM
 • औरंगाबाद- रफाल विमानाची नेमकी किंमत किती, असा प्रश्न संसदेत विचारण्यात आल्यानंतर संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी 670 कोटी रुपये असे लेखी उत्तर दिले. मग मोदी तेच विमान 1670 कोटींच्या दराने खरेदी करतात. हे कसे काय होऊ शकते. हा किक बॅकचा प्रकार आहे. म्हणजे पैसे परत आपल्याच खिशात आणण्यात आल्याचे दिसते, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. चौकशी झाली तर सगळेच तुरुंगात जातील, असेही ते म्हणाले. गुरुवारी सकाळी त्यांनी दिव्य मराठीच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी...
  November 2, 03:37 PM
 • औरंगाबाद - वयाच्या बाराव्या वर्षी गुन्हेगारी जगतात पाऊल ठेवत ३४ वर्षांपर्यंतच १०० पेक्षा अधिक जणांवर गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुन्हेगारास पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. मेहताब अली शौकत अली (३०, रा. इस्लामपुरा, मालेगाव, जि. नाशिक) असे त्याचे नाव असून त्याला दोन राज्यांतून हद्दपार करण्यात आले आहे. ३१ मे रोजी जयभीमनगरात दुचाकी बाजूला घेण्यावरुन झालेल्या वादात त्याने तीन गोळ्या झाडल्या होत्या. अटकपूर्व जामिनासंदर्भात चर्चा करण्यासाठी वकिलाकडे जात असताना बुधवारी पोलिसांनी...
  November 2, 10:47 AM
 • औरंगाबाद - नगरसेवक सय्यद मतीनला सभेत येऊ द्यावे, या मागणीसाठी गुरुवारी एमआयएमसह काँग्रेसच्या नगरसेवकांनी सभेत गोंधळ घातला. त्यामुळे महापौर नंदकुमार घोडेले यांनी १७ जणांना एक दिवसासाठी निलंबित केले. इतक्या संख्येने नगरसेवक निलंबित झाल्याची मनपाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. १७ ऑगस्टच्या सभेत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली देण्यास मतीनने विरोध केला होता. तेव्हा मतीनचे प्रत्येक सभेसाठी सदस्यत्व रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला होता. त्यानुसार आजही...
  November 2, 10:45 AM
 • औरंगाबाद -मराठवाड्याच्या हक्काचे पाणी राेखण्यासाठी सुप्रीम काेर्टापर्यंत लढा देणाऱ्या नाशिक- नगरकरांना अखेर काेर्टाच्याच अादेशानुसार गुरुवारी जायकवाडीसाठी पाणी साेडावे लागले. नाशिकच्या गाेदावरी-दारणा समूहातूनही पाणी सुटले. मात्र गंगापूर धरणातून हाेणारा विसर्ग अचानक थांबवण्यात अाला. विशेष म्हणजे १५ अाॅक्टोबरच्या आढावा बैठकीच्या वेळी गंगापूर धरणात पाण्याची तूट नव्हती. तरीही दुष्काळाचे निमित्त करून नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी २६ आॅक्टोबरला पाण्याची तूट असल्याचे दाखवले. त्या...
  November 2, 09:20 AM
 • केज - नदीला खेकडे धरू, असा बहाणा करून एका चार वर्षांच्या बालिकेस शेतात नेऊन एका २८ वर्षीय नराधम तरुणाने बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यातील दहिफळ (वडमाउली) येथे बुधवारी (दि. ३१ ऑक्टोबर) सायंकाळी सहा वाजता उघडकीस आली. पीडित मुलीच्या आई - वडिलांनी तरुणास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. केज पोलिसात आरोपीविरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. दहिफळ (वडमाउली) येथील एक कुटुंब बाहेरगावी कामाला जाण्यासाठी बुधवारी दुपारी धान्य पोत्यात भरून तयारी करत होते. दुपारी चार वाजेच्या सुमारास पीडित...
  November 2, 09:10 AM
 • पैठण - जायकवाडी धरणात समन्यायी पद्धतीने गुरुवारी पाच धरणांतून पाणी सोडण्यात आले असून हे पाणी शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जायकवाडीत दाखल होईल, अशी माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. यात दारणा धरण ते जायकवाडीदरम्यानचे अंतर सुमारे २०० किलोमीटरचे असून मुळाचे अंतर १०१ किमी आहे. दरम्यानचे २६ बंधारे पार करत हे पाणी जायकवाडी धरणात नाशिक व नगर जिल्ह्यातून सोडले आहे. नाशिक ते जायकवाडीदरम्यान लहान-मोठे १४ बंधारे असून नगरमार्गे १२ बंधारे पार करत पाणी जायकवाडीत २२ तासांत येणार असल्याची...
  November 2, 09:02 AM
 • अंबाजोगाई- काळापैसा आणून प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रूपये जमा करणार हेही आश्वासन लोकांना कळून चुकले आहे. त्यामुळे लबाड व भुलथापा देणारे हे सरकार आहे, अशी अंबाजोगाईतील संघर्षयात्रेत टीका करणाऱ्या काँग्रेसच्या राज्यातील बड्या नेत्यांनी संध्याकाळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्याच्या घरी पाहुणचार घेतला. दिवसभर भाजपवर तोंडसुख घेणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन पाहुणचार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. केंद्रात व राज्यात भाजप सरकारने दिलेल्या...
  November 1, 08:43 PM
 • परळी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने देशातील प्रत्येकाच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करण्याच्या दिलेल्या फसव्या घोषणेची खिल्ली उडवत राष्ट्रवादीने बॅलन्स चेक करो आंदोलन केले.यावेळी उपस्थितांना गाजराचा हलवा वाटप करुन शासनाच्या फसवेगिरीचा निषेधही नोंदविण्यात आला. राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकातील इंडीया बॅंक शाखेसमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी जागर-गोंधळ करून सरकारचा निषेध करण्यात आला. बँकेत जाऊन प्रतीकात्मक पासबुक एन्ट्री करून बॅलन्स चेक केले.यावेळी राष्ट्रवादी...
  November 1, 05:13 PM
 • DELETE
  November 1, 05:01 PM
 • अंबाजोगाई- दही विक्रेत्या महिलेवर पाळत ठेवून उसाच्या शेतातून जाताना साडीच्या पदराने तिचा गळा दाबत डोक्यात लाकडाने मारून तिचा खून केल्याची घटना परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथे ७ जानेवारी २०१५ रोजी सकाळी आठ वाजता घडली होती. या खून प्रकरणात अंबाजोगाई येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश अनिल सुब्रमण्यम यांनी रेणापूर येथील रहिवासी असलेला वेटर शंकर विठ्ठल खारे याला दोषी ठरवत जन्मठेप व १० हजारांचा दंड तर कलम ३९२ अन्वये तीन वर्षांची शिक्षा व ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या...
  November 1, 10:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED