Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • औरंगाबाद- घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याचे धोरण निश्चित न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह काही राज्यांत धोरणनिश्चितीपर्यंत बांधकामास बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारपासून नवीन बांधकामांना परवानगी देणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील १५ लाख फुटांपर्यंतची नवीन बांधकामे प्रभावित होणार असून तब्बल दीड लाख रोजगारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. महानगरपाालिकेला अद्यापपर्यंत कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र...
  September 4, 09:59 AM
 • औरंगाबाद- समांतर जलवाहिनी योजनेचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीमार्फतच पुन्हा सुरू करावे. त्यासाठी कंपनीला राज्य शासनामार्फत २८९ कोटी रुपये देऊन न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, या प्रशासकीय प्रस्तावावर ४ सप्टेंबर रोजी होणारी मनपाची सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे ढकलण्याच्या हालचाली सोमवारी दिवसभर सुरू होत्या. शासनाने २८९ कोटींचे हमीपत्र द्यावे, असे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांनी २७ ऑगस्टला सभा तहकूब केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खैरेंना नको असेल तर राहू...
  September 4, 09:50 AM
 • औरंगाबाद- स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात सिटी बससेवा सुरू करण्यासाठी बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून टाटा कंपनीला हे काम दिले. दोन दिवसांपूर्वी कंपनीने मनपाला १० कोटी ५२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली आहे. यात करारानुसार ९ कोटी १० लाख रुपये एसबीआय बँकेची, तर १ कोटी ४२ लाख रुपयांची सेवा हमीची आयसीआयसी बँकेची गॅरंटी दिली. त्यानंतर मनपाकडून बस खरेदी करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुुरू केली. शहरात टप्प्याटप्प्याने १०० सिटी बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आजवर तीन...
  September 4, 09:42 AM
 • नांदेड- कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्यात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने सुरुवातीला पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह लावण्याचे काम केले. या उलट हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी रोखठोक भूमिका घेत हिंगोलीच्या आरोपीलाही याच गुन्ह्यात सहभागी करण्याचे पत्र तपास अधिकाऱ्याला दिले. कृष्णूर येथे १८ जुलै रोजी पोलिसांनी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्यातील १० ट्रक पकडले. या ट्रकमध्ये ३ ट्रक नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारीतील तर ७ ट्रक हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारीतील होते. ट्रक...
  September 4, 07:31 AM
 • उस्मानाबाद- पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी दिव्य मराठीने केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबादकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सोमवारी(दि.३) या अभियानांतर्गत शहरातील सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांना मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. केवळ अर्ध्या तासांत ४०० विद्यार्थ्यांनी गणेशाच्या सुबक मूर्ती तयार करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल टाकले. दिव्य मराठी, रोटरी क्लब आणि एकता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम...
  September 4, 07:23 AM
 • औराळा, लासूर स्टेशन- कन्नड तालुक्यातील चापानेर येथील सहकारमहर्षी लोकनेते स्व. नारायणराव पवार यांचे भाऊ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे चे माजी संचालक कृषिभूषण वसंतराव बाजीराव पवार यांचे दीर्घ आजाराने (६२) औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता उपचारादरम्यान निधन झाले. कृषिभूषण वसंतराव पवार यांनी विविध पदे भूषवली ते १९९७ ला कन्नड सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. २००५- २०१० मध्ये ते औरंगाबाद जिल्हा भू-विकास बँकेचे संचालक होते. २००५-२०१०...
  September 4, 06:25 AM
 • औरंगाबाद- राज्यात पावसाळ्यात जून ते ३ सप्टेंबर या ९४ दिवसांपैकी सरासरी ४८ दिवसांचा खंड पडल्याने खरीप संकटात आला आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतेक भागात १५ ते १७ दिवसांचे दीर्घ खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. या तिन्ही महिन्यांत पावसाचे वितरण असमान राहिल्याने पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. राज्यात १५ ते १८ ऑगस्ट अशी सर्वदूर हजेरी लावून पावसाने आजवर दडी मारली आहे. यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत...
  September 4, 06:06 AM
 • औरंगाबाद- नशेखोरांना दोन वर्षांपासून गुंगीच्या आणि नशेच्या गोळ्या विक्री करणाऱ्या गुन्हेगाराला एटीसी सेलने पकडले. त्याच्याकडून तीन तलवारी देखील हस्तगत करण्यात आल्या आहेत. सय्यद नबी उर्फ सय्यद लाल (32, रा. भारतनगर, रांजणगाव शेणपुंजी) असे त्याचे नाव आहे. रांजणगाव शेणपुंजीतील सय्यद नबी हा गेल्या दोन वर्षांपासून रिक्षाचालक, मजूरांना नशेच्या आणि गुंगीच्या गोळ्यांची विक्री करत असल्याची माहिती एटीसी सेलचे प्रमुख उपनिरीक्षक योगेश धोंडे यांना मिळाली होती. त्यावरुन विशेष शाखेचे निरीक्षक...
  September 3, 08:29 PM
 • परभणी - पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे व आमदार डॉ. मधूसुदन केंद्रे यांनी राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकलस्वारी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी भवनापासून बारा वाजता शेकडो कार्यकर्ते...
  September 3, 05:31 PM
 • नांदेड- ओढ्याच्या पाण्यात बोलेरो पिकअप वाहून गेल्याची धकादायक घटना किनवट तालुक्यातील कोठारी पुलाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, कोठारी परिसर हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. पावसामुळे ओढ्याला पूर आला होता. पुलावरुन पाणी वाहत होते. तरीही चालक गंगासिंह पडवळ याने पुलावरुन गाडी नेण्याचे धाडस केले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गाडी पुलाच्या मध्यभागी गेली असता वाहून गेली. चालकाने...
  September 3, 12:26 PM
 • औरंगाबाद- सहकारी तत्त्वावरील बँका, कारखाने आणि शिक्षण संस्था नवीन नाहीत. मात्र, औरंगाबादेत आदर्श समूहाचे नाचनवेल आणि करमाड येथे सहकारी तत्त्वावरील रुग्णालय उभे राहत आहे. मराठवाड्यातील पहिल्या आणि राज्यातील तिसऱ्या ठरणाऱ्या या रुग्णालयाच्या संचालक मंडळात ग्रामस्थ आणि डॉक्टरांचा समावेश आहे. संचालक मंडळच उपचाराचे दर ठरवेल. यामुळे अत्याधुनिक उपचारही अत्यल्प दरात गावातच मिळतील. नाचनवेलचे ५० खाटांचे रुग्णालय ऑक्टोबरमध्ये तर करमाडचे १०० खाटांचे तीन महिन्यांत सुरू होईल. औरंगाबाद...
  September 3, 09:15 AM
 • औरंगाबाद- श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त शहरातील बहुतांश चौकांत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे सोमवारी दुपारनंतर मुख्य चौकांतील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. टीव्ही सेंटर, कॅनॉट प्लेस, बजरंग चौक, गुलमंडी, राजाबाजार, शहागंज, औरंगपुरा, निराला बाजार, पदमपुरा, कोकणवाडी, गजानन महाराज मंदिर चौक, पुंडलिकनगर चौक येथे संध्याकाळी दहीहंडी महोत्सव असल्याने येथील वाहतूक दुसऱ्या मार्गे वळवण्यात आली आहे. गुलमंडी आणि कोकणवाडी पंचवटी चौक ते कोकणवाडी, विट्स हॉटेल ते कोकणवाडी,...
  September 3, 09:06 AM
 • सगळी सोंगे करता येतात, पण पैशाचे सोंग नाही करता येत, असे म्हणतात. बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार अडतो तो त्यामुळेच. तो अडू नये म्हणून काही अधिकारी दहा-दहा पटीने कराचे दर वाढवण्याचा अघोरी मार्ग पत्करतात, तर काही अधिकारी दात्यांना प्रोत्साहित करून जनसहभाग वाढवण्याचा प्रयत्न करतात. औरंगाबाद महापालिकेचे अायुक्त निपुण विनायक हे दुसऱ्या वर्गातले अधिकारी अाहेत. शहरातील उद्योजकांच्या संघटनेला बरोबर घेऊन त्यांनी जनसहभाग वाढवायला सुरुवात केली आहे. मेयर फेलो ही अशीच एक योजना...
  September 3, 08:18 AM
 • औरंगाबाद- वृद्धांची शारीरिक, मानसिक व भावनिक काळजी घेण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या जेरिअॅट्रिक केअर या मोफत अभ्यासक्रमाची नवीन बॅच १० ऑक्टोबरपासून अाैरंगाबादेत सुरुवात होत आहे. मराठवाड्यातील पहिल्याच अशा या अभ्यासक्रमाची ही सातवी तुकडी असेल. रोजगाराची संधी देणाऱ्या या अभ्यासक्रमास अधिकाधिक गरजूंनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन ज्येष्ठ फिजिशियन डॉ. नरेंद्र वैद्य यांनी केले आहे. आनंददायी वृद्धापकाळ हे ध्येय बाळगून त्यासाठी काम करणारी आस्था फाउंडेशन संस्था, सावित्रीबाई...
  September 3, 07:33 AM
 • खुलताबाद- तालुक्यातील खिर्डी येथे एका शेत तळ्यात कुलस्वामिनी गणेश प्रतिष्ठान मंडळ औरंगाबादच्या वतीने पाण्यावर तरंगणारा गणपती तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. ४० बाय ७१ फुटी गणेशाची मूर्ती साकारली जात असून गणेश प्रतिष्ठान मंडळ अध्यक्ष विलास कोरडे व सचिव अलका कोरडे यांच्या संकल्पनेतून हा इको फ्रेंडली महागणेश तयार केला जात आहे. गणेश निर्मितीची तयारी १२ सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हा गणेश पुढील दीड वर्ष पाण्यावरच तरंगणार आहे. गेल्या ४० दिवसांपासून गणेश...
  September 3, 06:55 AM
 • बोरगाव अर्ज- श्रावणानिमित्त फुलंब्री तालुक्यातील लोहगड नांद्रा येथील स्वयंभू रामेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची रीघ लागत आहे. देवदर्शनासोबत भाविक पर्यटनाचाही आनंद लुटत आहेत. या पर्यटनात सर्वांचे आकर्षण ठरत आहेत ते पुरातन काळात डोंगरावर दगडात कोरलेले पाण्याचे नऊ हौद. यातील पाच हौदांतील पाणी हिरवे आहे. एक हौद करोडा तर तीन हौदांतील पाणी स्वच्छ व नितळ आहे. भाविक या हौदातील पाणी तीर्थ म्हणूनही प्राशन करतात. एका आख्यायिकेनुसार सीता वनवासात असताना तिने याच गडावर लव-कुशाला जन्म...
  September 3, 06:46 AM
 • बीड- दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा नेकनूर पोलिसांनी शोध लावत तिची सुटका केली. गुंगीचे औषध, इंजेक्शनद्वारे देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार मुलीने पाेलिसांत दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. नेकनूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून महिना ते दीड महिन्यापूर्वी एका मुलीला पळवून नेण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत नोंदही करण्यात आली होती. महिनाभरापासून पोलिस विविध ठिकाणी या मुलीचा शोध घेत होते. मुलगी गडचिरोलीमध्ये...
  September 3, 06:40 AM
 • गेवराई- गेवराई तालुक्यातील इरगावमध्ये शनिवारी मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने विष घेतले. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. आप्पासाहेब सुंदरराव काटे असे तरुणाचे नाव आहे. आप्पासाहेब याने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे मी हे जग सोडून जात आहे. मी मेल्यावर तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी चिठ्ठी लिहून ठेवत विष घेतले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले असा परिवार आहे. नातेवाइकांनी तरुणाचा मृतदेह गेवराई ठाण्यात...
  September 3, 06:14 AM
 • हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे एकाच झाडाला विवाहित सख्या आत्या-भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे राहणाऱ्या सीमा बालाजी राठोड (२०) व निकिता राजू राठोड (१९) या दोघी सख्ख्या आत्या-भाची आहेत. त्या दोघी कपडे धुण्यासाठी गावाजवळील नाल्यावर गेल्या होत्या. परंतु खूप उशीर झाला तरी त्या परत आल्या नसल्याने घरच्यांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास दोघी...
  September 3, 06:05 AM
 • औरंगाबाद - श्रावणानिमित्त शनिवारी काढण्यात आलेल्या विश्वविक्रमी कावड यात्रेची सांगता खडकेश्वर येथील महादेव मंदिरात जलाभिषेकाने करण्यात आली. हर्सूल येथील हरसिद्धी माता मंदिरापासून निघालेल्या ५०१ फुटांच्या कावड यात्रेत दीड हजारावर शिवभक्तांनी खांद्यावर कावड घेऊन पायी वाटचाल केली. या कावडीसोबत सुमारे दोन हजार कलश हरसिद्धी माता मंदिरातील कुंडातून जलाने भरलेले होते. या वेळी बम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता. श्रावणमासानिमित्त शिवसेना व हिंदू...
  September 2, 11:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED