Home >> Maharashtra >> Marathwada

Marathwada News

 • औरंगाबाद -धोरणात्मक निर्णयाचे अशासकीय प्रस्ताव ऐनवेळी मंजूर झाल्याचे दाखवून महापौर भगवान घडमोडे यांनी खळबळ उडवून दिली. त्यांचे ऐनवेळच्या प्रस्तावांवर चर्चा शहरभर सुरू असताना आपल्या कारकीर्दीतील समारोपाच्या सभेतही घडमोेडेंना राहावले नाही. येथेही त्यांनी ऐनवेळचे काही प्रस्ताव मंजूर केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, त्यातील एक प्रस्ताव शासकीय म्हणजेच प्रशासनाकडून आलेला आहे. शेवटच्या सभेत घडमोडेंनी नेमक्या किती प्रस्तावाची शाळा केली हे लवकरच समोर येईल. त्यांच्याशी संपर्क...
  29 mins ago
 • आैरंगाबाद -दक्षिणमध्य रेल्वेच्या नांदेड विभागात पॅसेंजरमधून प्रवास करणारे ६० टक्के प्रवासी फुकटे आहेत, तर एक्स्प्रेसमध्ये फुकट्यांचे प्रमाण २० टक्के आहे. अशा फुकट्यांना जरब बसवण्यासाठी विशेष भरारी पथक नेमले असून या पथकाने एकाच दिवसात ४०० फुकट्यांकडून लाख ८७ हजार रुपये दंड वसूल केला आहे, अशी माहिती नांदेडचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. अखिलेश सिन्हा यांनी दिली. दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने मंगळवारी शहरातील रेल्वेस्थानकावर कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे अदालत आणि वैद्यकीय तपासणी शिबिर...
  33 mins ago
 • औरंगाबाद -घाटीतील शवविच्छेदनगृहात मृतदेह धुण्यासाठी पाणी नसल्याने तो ताब्यात घेण्यासाठी नातेवाइकांना मंगळवारी सकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत ताटकळत बसावे लागले. सोमवारी (१६ ऑक्टोबर) सायंकाळी सिडको बसस्थानकाजवळ झालेल्या अपघातातील मृत बालाजी ढवारे (४२, रा. पिसादेवी रोड) यांचा मृतदेह या ठिकाणी होता. शेवटी नातेवाइकांनीच पाण्याचे टँकर मागवल्यानंतर मृतदेह स्वच्छ करून ताब्यात देण्यात आला. शवविच्छेदनगृहात सोमवारी रात्री पाणी संपले. याची माहिती कर्मचाऱ्यांनी अधीक्षक कार्यालयाला दिली...
  38 mins ago
 • औरंगाबाद -गेल्या नऊ महिन्यांपासून पती, मुलांना सोडून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या अभियंता महिलेवर हर्सूल कारागृहाचा पोलिस उपनिरीक्षक किरण संतोष पवार (४०, रा. धुळे) याने गोळी झाडली. मुली आणि परिवाराने समुपदेशन केल्यानंतर त्या महिलेने घरी जाण्याचा हट्ट करताच संतापलेल्या पवारने हे पाऊल उचलले. सुदैवाने नेम चुकल्याने तिचे प्राण वाचले. महिलेच्या फिर्यादीवरून पवारवर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी सकाळी पवारने गोळीबार झाला. या प्रकारानंतर घाबरलेली...
  39 mins ago
 • औरंगाबाद -ऐन दिवाळीत वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारलेल्या संपात औरंगाबाद विभागातील २६०० पैकी १९०० कर्मचारी सहभागी झाले असून ५०० पैकी केवळ तीन बस मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, बऱ्हाणपूर आणि सोलापूरसाठी रवाना होऊ शकल्या. सिडको बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही. उर्वरित ४९७ बस जागेवरच उभ्या होत्या. यामुळे २३ हजारांवर प्रवाशांचे हाल झाले. त्यांना खासगी वाहनातून मनमानी भाडे देऊन प्रवास करावा लागला. तसेच महामंडळाला ६० लाखांच्या...
  49 mins ago
 • प्रतिनिधी- अभिजात शास्त्रीय संगीताला नव्या पिढीने अक्षरश: डोक्यावर घेतले याचे श्रेय ज्या कलावंताला जाते असे प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांनी मंगळवारी औरंगाबादकरांना दिवाळीची स्वरभेट दिली. यानंतर दिव्य मराठी कार्यालयात झालेल्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी त्यांच्या संगीत आराधनेच्या प्रारंभापासून आजपर्यंतच्या विविधांगी पैलूंवर भाष्य केले. या वेळी दर्दी रसिकांच्या जिवाला चटका देणारी, पण नव्या प्रयोगांना अन् कलावंतांना दिशा देणारी बाब त्यांनी सांगितली. गेल्या काही...
  50 mins ago
 • औरंगाबाद - सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेतन दिले जावे या प्रमुख मागणीसह एसटी कर्मचाऱ्यांनी रात्री बाराच्या ठोक्याला एसटी कर्मचारी संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे एसटीचा खास ग्राहक असलेल्या लाखो प्रवाशांचे हाल तर झालेच शिवाय मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत साडेतीन हजार बसेसची चाके रुतल्याने एसटी महामंडळाला एकट्या मराठवाड्यात सुमारे ३ कोटी ६० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एसटी कर्मचाऱ्यांना पदनिहाय वेतनश्रेणी देऊन सातव्या वेतन...
  50 mins ago
 • चाळीसगाव- चाळीसगाव तालुक्यातील बाेढरे येथील एका १७ वर्षीय मुलाची प्रकृती साेमवारी रात्री १२.३० वाजता बिघडली. त्याला चाळीसगाव येथे उपचारासाठी नेताना त्यांच्या टेम्पाेसह दुचाकीवरील दोघांना अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडले. यात एकाच कुटुंबातील ६ जणांसह टेम्पाेचालक ठार झाला. चाळीसगाव ते अाैरंगाबाद रस्त्यावरील रांजणगाव फाट्याजवळ मध्यरात्री १ वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. नामदेव नरसिंग चव्हाण (४२), शीला नामदेव चव्हाण (३५), राजेंद्र गलसिंग चव्हाण (४२), पंडित बाबू जाधव, चालक (५५), मिथुन...
  58 mins ago
 • उस्मानाबाद- ग्रामपंचायतीच्या कारभाऱ्यांचा मंगळवारी (दि.१७) फैसला झाला. अपेक्षेनुसार भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्राबल्य वाढल्याचे दिसून आले. तुलनेने शिवसेनेची पीछेहाट झाली असून, उमरगा, लोहारा, तुळजापूरसह वाशी तालुक्यात काँग्रेसने आपले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामपंचायती मिळविल्या. भाजपने २० ग्रामपंचायतीमध्ये कमळ फुलवले आहे. मात्र, पक्षाने ३२ ग्रामपंचायतीवर सरपंच...
  03:00 AM
 • बीड- जमिनीसाठी येळंबघाट येथील एका सेवानिवृत्त शिक्षकासह त्याची पत्नी व भावाचे बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार करून त्यांच्या जमिनीवर दावा सांगणाऱ्या बहिणीवर नेकनूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला अाहे. येळंबघाट येथील जिल्हा परिषद शिक्षक सूर्यभान गणपती जोगदंड हे २००० मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यांची वानगाव येथे ९ एकर तर भाऊ मधुकर जोगदंड यांची पाच एकर जमीन आहे. सूर्यभान व त्यांच्या पत्नी सत्यभामा व बंधू मधुकर हे तिघे सध्या हयातआहेत. पारुबाई सखाराम पवार (रा. पालवन, ता. बीड) या...
  03:00 AM
 • औरंगाबाद/ मुंबई- राज्यभरातील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. ऐन दिववाळीत प्रवाशांना वेठीस ठेवू नका, सायंकाळी पाच वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, असे सरकारचे आवाहन संपकरी एसटी कर्मचार्यांनी धुडकावून लावले आहे. काय म्हणाले परिवहन मंत्री... एसटी कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असून त्यामागे काँग्रेसचा हात असल्याचा गंभीर आरोपही राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केला आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे पैसाच नाही, त्यामुळे पुढील 25 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करु शकत नाही,...
  October 17, 07:10 PM
 • औरंगाबाद-सिडको बसस्टँड चौकात एसटीने सिग्नलवर उभ्या तीन रिक्षा, एक कार आणि एका दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू तर जण जखमी झाले. बालाजी गणपती ढवारे (४२, सनी सेंटर) संजय म्हसजी जाधव (४०, बेगमपुरा) अशी मृतांची नावे आहेत. बसचालक म्हणाला, ब्रेक लागला नाही : बसचालक सज्जन इंदल नायमाने म्हणाला, मी स्टँडमधून गाडी बाहेर काढली तेव्हा ती पहिल्याच गिअरमध्ये होती. मी ब्रेक लावण्याचा प्रयत्न करूनही तो लागत नव्हता. बस थेट समोर असलेल्या रिक्षांना धडकली.धडकेनंतर एक रिक्षा उलटून बसच्या खाली...
  October 17, 08:43 AM
 • औरंगाबाद- सर्वांना अंधारात ठेवून मोठ्या वाटाघाटीचे ऐनवेळीचे प्रस्ताव महापौर भगवान घडमोडे यांनी २० जुलैच्या सभेत मंजूर केले. शिवाय गैरव्यवहारामुळे निलंबित झालेल्या चार बड्या अधिकाऱ्यांना कामावर घेतले. त्यावर मनपा सभेत चर्चेची तयारी शिवसेनेचे सदस्य करत असताना १९ ऑगस्टच्या सभेत एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी वंदेमातरम म्हणणार नाही, असे म्हटल्याने गोंधळ उडाला. ऐनवेळच्या प्रस्तावावर चर्चा झालीच नाही. त्यानंतर गेला आठवड्यात पुन्हा घडमोडेंनी मंजूर केलेले काही ऐनवेळचे प्रस्ताव समोर...
  October 17, 08:21 AM
 • औरंगाबाद -सर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकची पद्धत अवैध ठरवल्यामुळे मुस्लिम समाजातील एक गट संतप्त झाला असताना घटस्फोट आणि बहुपत्नीत्वाच्या बाबतीत मुस्लिमांपेक्षा हिंदू नागरिक पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशातील एकूण घटस्फोटित महिलांमध्ये ६८ टक्के हिंदू, तर २३.३ टक्के मुस्लिम आहेत. देशात सर्वाधिक घटस्फोटित महिला महाराष्ट्रात आहेत, तर तब्बल ७९ टक्के मुस्लिम लोकसंख्या असणाऱ्या मालेगावात अवघे ०.१ टक्के नागरिक बहुपत्नी असणारे आहेत. ट्रिपल तलाकला सर्वोच्च न्यायालयाने अवैध...
  October 17, 07:49 AM
 • औरंगाबाद -दिवाळीच्या सणानिमित्त कॉर्पाेरेट जगतात खास मागणी असणाऱ्या ड्रायफ्रूट्स बॉक्सची बाजारपेठ शहरात विस्तारली असून यात २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. ड्रायफ्रूटच्या बॉक्समधील वेगवेगळ्या पदार्थांना वेगवेगळे जीएसटी लागल्यामुळे सुरुवातीला व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र, लगेचच तो दूर झाल्यामुळे ड्रायफ्रूटच्या बाजारात गर्दी वाढली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी २०० रुपयांपासून २००० रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध असून गतवर्षीच्या तुलनेत यंदा दरात १०...
  October 17, 07:46 AM
 • औरंगाबाद -मराठवाड्यात पावसाळा संपत आल्यानंतर १४ ऑक्टोबर अखेर ६२ टक्के पाणीसाठा झाला आहे. यामध्ये मोठ्या धरणांत सर्वाधिक ६५ टक्के पाणीसाठा झाला आहे. मात्र अजूनही मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी धरणात १३ टक्के ऊर्ध्व पैनगंगा १४ आणि मानार प्रकल्पात २२ टक्केच पाणीसाठा आहे. मराठवाड्यात गेल्या महिन्याभरापासून झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मराठवाड्यातल्या ८६४ प्रकल्पात ५०२६ दलघमी इतका पाणीसाठा आहे. हे प्रमाण ६२.७० टक्के इतके आहे. आठवडाभरात ३५ दलघमीने...
  October 17, 07:45 AM
 • औरंगाबाद-जोरदार पावसामुळे गौताळ्यातील जंगलाने हिरवी शाल पांघरली असून ४० पेक्षा जास्त धबधबे ओसांडून वाहत आहेत. या जंगलाचे सर्वात मोठे आकर्षण असणारी सिताखोरी वनश्री अाणि झऱ्यांनी समृध्द झाली आहे. या जंगलात १४ बिबटे वास्तव्यास असून सप्टेंबर महिन्यात या जंगलात प्रथमच अधिकाऱ्यांनी अस्वल पहिल्याने या जंगलास पूर्णत्व प्राप्त झाल्याचे वनअधिकारी सांगतात. हिरवाई, खळखळणारे धबधबे, अस्वल पाहण्याच्या उत्सुकतेने पर्यटकांत दहा पटींनी वाढ झाली आहे. २१०० चौकिमीपर्यंत पसरलेले हे जंगल...
  October 17, 07:43 AM
 • लातूर- महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाच्या सोमवारी लातूरमध्ये झालेल्या राज्य अधिवेशनाच्या कार्यक्रमात पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि आमदार अमित देशमुखांनी एकमेकांवर टोलेबाजी केली. ते एका व्यासपीठावर येतील असे नियोजन होते. मात्र आमदार अमित देशमुखांनी एकत्र येण्याचे टाळले. पालकमंत्री निघून गेल्यावर ते कार्यक्रमस्थळी आले. एकमेकांच्या अनुपस्थितीत त्यांनी परस्परांवर शेरेबाजी केली. ग्रंथालय संघ अधिवेशनाच्या उद््घाटन कार्यक्रमाला स्थानिक आमदार अमित देशमुखांसह स्थानिक...
  October 17, 03:00 AM
 • मुंबई- राज्य सरकारने घोषित केलेल्या ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीला अखेर मुहूर्त मिळाला आहे. एेन दिवाळीत बुधवारपासून ( दि. १८) शेतकऱ्यांचा सातबारा काेरा हाेणार असून पहिला टप्प्यात राज्यभरातील तब्बल १० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार अाहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्याचा शुभारंभ हाेणार अाहे. कर्जमाफीच्या मुद्द्यावर धारेवर धरणाऱ्या, लबाडाचं अावताण म्हणून भाजप सरकारची हेटाळणी करणाऱ्या विराेधकांना चाेख प्रत्युत्तर देण्यासाठी...
  October 17, 01:50 AM
 • मुंबई - मनसेचे ६ नगरसेवक फोडून शिवसेनेने नीच राजकारण केले. त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी मनातील खदखद रविवारी व्यक्त केली. शिवसेनेला अनेकदा मी अप्रत्यक्षपणे मदत केली. मात्र यापुढे शिवसेनेला टाळी देण्याचा विषयच नाही. आता फक्त गालावर टाळी दिली जाईल, असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मनसेचे नगरसेवक आपल्या संमतीनेच गेले, या शिवसेनेच्या प्रचाराचाही त्यांनी समाचार घेतला. शिवसेनेत प्रवेशासाठी प्रत्येक नगरसेवकाला ५ कोटी रुपये दिले गेले. हे ३० कोटी कुठून आले,...
  October 16, 06:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED