जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद - स्वातंत्र्य सैनिकांचे बलिदान, कारावास व त्यांनी सहन केलेल्या अनन्वित अत्याचारातून मराठवाडा निजामांच्या जोखडातून मुक्त झाला. आपल्याला यापुढे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करावयाचे आहे. त्यासाठी शासनाने मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आखली आहे. या योजनेच्या माध्यमातून मराठवाड्यातील प्रत्येक गावागावांपर्यंत पाणी पोहचविणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे मुख्य शासकीय ध्वजारोहण सिद्धार्थ...
  0 mins ago
 • औरंगाबाद -विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने १४ उमेदवारांची दुसरी यादी साेमवारी जाहीर केली. सुमारे ५० मतदारसंघांत उमेदवार उभे करण्याचा या संघटनेचा मानस अाहे. तसेच भाजप अणि काँग्रेस या दाेन्ही पक्षांशी आघाडीबाबत बाेलणी सुरू आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डाॅ. शिवानंद भानुसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, जाे पक्ष आम्हाला सन्मानजनक जागा देईल त्यांच्याशी आम्ही आघाडी करू. सत्ता मिळत असल्यास काही तडजोडी करण्यासही आम्ही तयार आहाेत. संभाजी ब्रिगेडच्या वतीने यापूर्वी १५...
  10:44 AM
 • गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी ५५६ संस्थाने विलीन करून घेतली. हैदराबाद संस्थान मात्र यास दाद देत नव्हते. यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कारवाईचा मार्ग सुचवला. सरदार पटेल यांनी ऑपरेशन पोलो राबवून अवघ्या तीन दिवसांत १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन केले. या लढ्यातील एक शूर आणि दुर्लक्षित सेनानी म्हणजे माणिकचंद पहाडे. -मुक्तिसंग्रामातील पहिला सत्याग्रह १९३८ मध्ये माणिकचंद पहाडे यांच्या नेतृत्वाखाली झाला. याच्या तयारीसाठी सार्वजनिक सभा घेणे शक्य...
  08:55 AM
 • निझामाच्या जुलमी राजवटीतून तसेच गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी मराठवाड्याला मोठा संघर्ष करावा लागला. त्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्याकडे होते. त्यांचे ज्येष्ठ सहकारी रा .गो. ऊर्फ बाबासाहेब परांजपे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. ते गांधीवादी पण जहाल क्रांतिकारी होते. मराठवाड्यातील लोक त्यांना शेरए- हैदराबाद या नावाने संबोधत होते. त्यांना स्वत: निझाम घाबरायचा. त्याने बाबासाहेबांना पकडून समोर उभा करणाऱ्यासाठी ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. निझामाचे अधिकारी...
  08:48 AM
 • हैदराबाद मुक्तिसंग्राम म्हणजे धगधगते अग्निकुंडच. निझामाच्या जुलमी राजवटीतून हैदराबाद मुक्त करण्यासाठी अनेक शूरवीरांनी उभे आयुष्य या अग्निकुंडात झोकून दिले. अत्यंंत संघर्षपूर्ण अशा या संग्रामानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोेजी मुक्तीची पहाट उगवली. मात्र, मुक्तिसंग्रामात जिवाचे रान करणारे अनेक नायक प्रसिद्धीच्या पडद्याआड राहिले. त्यापैकीच एक त्यागी, तपस्वी व्यक्तिमत्त्व म्हणजे आनंद कृष्ण वाघमारे म्हणजेच आ. कृ. वाघमारे. पत्रकारासोबत झुंजार स्वातंत्र्यसैनिक आणि सामाजिक कार्यकर्ते...
  08:41 AM
 • मराठवाडा -निझामाच्या जुलमी सत्तेविरोधात लढताना मराठवाड्यातील अनेकांना हौतात्म्य आले. १७ सप्टेंबर १९४८ ला निझामी राजवटीचा अस्त झाला. ७१ वर्षांपूर्वी लढल्या गेलेल्या या लढ्याला आज ७१ वर्षे पूर्ण होत आहेत. मराठवाड्याच्या मातीतील या लढ्याबद्दल तरुण पिढी मात्र अनभिज्ञ आहे. दिव्य मराठीने औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यांमधील ५०० विद्यार्थ्यांचा सर्व्हे केला. यात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. ६८%विद्यार्थ्यांना या लढ्याविषयी माहितीच नाही तर केवळ १७ % विद्यार्थ्यांना...
  08:08 AM
 • सिल्लोड - डेंग्यूसदृश आजाराने तिघींचा मृत्यू झाल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील वडाळा येथे घडली. डेंग्यूची लागण झालेल्या महिलांवर घाटीत उपचार सुरू असताना एका महिलेचा शनिवारी सकाळी, तर दुसऱ्या महिलेचा रात्री आठ वाजेच्या सुमारास, तिसऱ्या मुलीचा रविवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. रुख्मणबाई शेळके (२२), कडुबाई मानकर (६५), साक्षी शेळके (१४) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिलांची नावे अाहेत. वडाळा गावात डेंग्यूसदृश तापाची लागण झाल्याने अनेक रुग्ण सहा ते सात दिवसांपूर्वी तापाने...
  September 16, 10:50 AM
 • पैठण । जायकवाडी धरणाचा पाणीसाठा रविवारी दोन वर्षांनंतर शंभर टक्के झाला. १५ आॅगस्टला बंधाऱ्यांत पाणी सोडल्यानंतर रविवारी धरणाच्या चार गेटमधून दोन हजार क्युसेक वेगाने संध्याकाळी साडेसहा वाजता गोदावरी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. यानंतर होणारी आवक पाहून विसर्ग कमी-अधिक करण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे व अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली. जायकवाडी धरणातून सध्याचा विसर्ग : क्र.10,17,18,27 या गेटमधून सध्या पाचशे क्युसेक, तर पैठण जलविद्युत केंद्रामधून...
  September 16, 07:57 AM
 • जालना : पत्नीच्या भावाच्या काडीमोड झालेल्या पत्नीसोबत प्रेमसंबंध जुळवून पहिली पत्नी असताना तिच्याशी लग्न केले. नंतर तिला घर भाड्याने देऊन दुसरीकडे ठेवले. कौटुंबिक कारणातून त्याच पत्नीचा सीसीटीव्ही फुटेजच्या वायरने गळा आवळून खून केल्याचा पोलिसांचा संशय आहे. यानंतर भिंतीला लागून असलेल्या पाळण्यातील दोन वर्षांच्या मुलीचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न झाल्याची दुर्दैवी घटना जालना शहरातील अंबड रोडवरील यशोदीपनगरमध्ये गुरुवारी ९ ते सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मृत...
  September 14, 04:43 PM
 • औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन युतीत प्रवेशाची अनेकांना घाई लागली आहे. पण शुक्रवारी एक अजब दृश्य औरंगाबादेत पाहण्यास मिळाले. अामदारकीचा राजीनामा देण्यासाठी आलेल्या भास्कर जाधव यांच्यापेक्षा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेंना त्यांचा राजीनामा स्वीकारण्याची घाई दिसून अाली. कारण केवळ दहा मिनिटांचा उशीर नको म्हणून बागडेंनी चक्क चारचाकीतून उतरून दुचाकीवर प्रवास केला. पण नंतर हा प्रवास राजीनामा...
  September 14, 09:00 AM
 • जालना : परवानगी न घेताच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याप्रकरणी आमदार नारायण कुचे यांच्यासह ४४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास पाचोड नाका परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी गुन्हा दाखल असलेल्या सर्वांना अटक केली. सायंकाळी उशिरा जिल्हा व सत्र न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. अंबड शहरातील पाचोड नाका परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. गेल्या सहा महिन्यांपासून येथे चौथरा...
  September 14, 08:19 AM
 • पैठण : मराठवाडा अद्यापही दुष्काळाच्या छायेत असताना जायकवाडी धरणात आवक सुरू असल्याने धरणाचा पाणीसाठा शुक्रवारी ९७.४५ टक्क्यांवर आला असून वरील धरणांतून १८४६९ क्युसेक वेगाने आवक सुरू आहे. गाेदाकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून काेणत्याही क्षणी खालील धरणांत पाणी साेडण्याची शक्यता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी वर्तवली आहे. नाशिकच्या ओव्हरफ्लोच्या पाण्यावर जायकवाडी धरणाचा साठा ९७.४५ टक्क्यांवर आला आहे. या पाण्याने मात्र मराठवाड्याला...
  September 14, 08:10 AM
 • लातूर : शहर व जिल्ह्याच्या अनेक भागांत पावसाअभावी सध्या भीषण पाणीटंचाई आहे. इतकी की गणपती बाप्पांच्या मूर्ती विसर्जनाचीही अडचण होती. यावर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी लातूरकरांना या मूर्ती महापालिका, मूर्तिकार, स्वयंसेवी संस्थांना दान करण्याचे आवाहन केले. याला नागरिक व गणेश मंडळांनीही प्रचंड प्रतिसाद दिला आणि पाहता पाहता २८ हजार मूर्ती महापालिकेकडे जमा झाल्या. मूर्तिकारांनाच केले या मूर्ती घेऊन जाण्याचे जाहीर आवाहन अनेकांनी घरीच ठेवल्या... शहरासाठी अत्यल्प पाणी उपलब्ध आहे....
  September 14, 07:22 AM
 • औरंगाबाद - जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील विभागातील एका कर्मचाऱ्याचा खुर्चीचा मोह चांगलाच चर्चेचा विषय ठरला होता. खुर्ची चोरीला जाऊ नये. अथवा कुणी नेऊ नये. यासाठी या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने आपल्या खुर्चीला साखळ-दंडाने टेबलाला बांधून ठेवले होते. नेत्यांपेक्षाही कर्मचाऱ्यांमध्ये कशी खुर्चीची चढाओढ आहे. असे मिनी मंत्रालय म्हणजे जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या प्रकाराचे वृत्त माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. यावर वरिष्ठांच्या दबावामुळे अखेर शुक्रवारी त्या कर्मचाऱ्याने आपल्या...
  September 13, 08:17 PM
 • औरंगाबाद - आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. पक्षातील अनेक नेते पक्ष सोडून जात आहेत. अशातच कोकणातील मातब्बर नेते व गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आज दुपारी मातोश्रीवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले. भास्कर जाधव यांनी औरंगाबादेत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. बागडेंनी जाधव यांचा राजीनामा तत्काळ...
  September 13, 02:23 PM
 • औरंगाबाद -अतिविपुलतेच्या खोऱ्यातील योजनेच्या पाणीवापराकरिता तुटीच्या किंवा अतितुटीच्या खोऱ्यातील पाण्याचे स्रोत निवडू नयेत, या राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाच्या आधारे गोदावरी पाटबंधारे महामंडळाने गंगापूर व वैजापूर तालुक्यांसाठी वरदान ठरणाऱ्या मुकणे व भावली धरणातील पाणी इतरत्र वळवू नये, असा प्रस्ताव तयार केला अाहे. हा प्रस्ताव दोन दिवसांत जलसंपदा विभागाला पाठवण्यात येईल. यामुळे नाशिक मनपासह ९ पाणीपुरवठा योजनांसाठी प्रस्तुत धरणांतून आरक्षित केलेले १९० दलघमी पाणी...
  September 12, 08:55 AM
 • दत्ता सांगळे | औरंगाबाद नातेवाईकच राष्ट्रवादी सोडून चालले, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार थेट पत्रकारांवरच भडकले होते. याची राज्यात मोठी चर्चा झाली होती. मात्र, नेमक्या अशाच एका प्रश्नावर औपचारिक गप्पा मारताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मात्र अतिशय संयमाने परंतु परखडपणे प्रतिक्रिया दिली. त्या यत्किंचितही भडकल्या नाहीत. एवढे खरे की त्यांनी थेट संबंधितांचा नामोल्लेख टाळला. त्या म्हणाल्या, त्याच्या जागी मी असते तर त्याच क्षणी...
  September 12, 08:24 AM
 • औरंगाबाद - नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगने (राष्ट्रीय मुक्त विद्यालय) दहावी, बारावीच्या परिक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यावर्षी ही परीक्षा तीन ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर यादरम्यान घेण्यात येईल; तर परेदशातून भारतात परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तीन ते 31 ऑक्टोबर 2019 दरम्यान परीक्षा होतील. परीक्षा झाल्यानंतर दीड महिन्यात निकाल जाहीर करण्यात येतो. यासाठी nios.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी अर्ज करता येणार आहे. नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग म्हणजे काय आहे ? मानव संसाधन...
  September 11, 10:14 PM
 • औरंगाबाद - जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांना खुर्ची ही जीवा पेक्षा अधिक प्रिय असते. परंतु येथील शिक्षण विभागातील एका कर्मचाऱ्याचा खुर्चीचा मोह पाहून भले भले चकीत होतात. खुर्ची चोरीला जावू नये. अथवा कुणी नेवू नये. यासाठी या वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने चक्क आपल्या खुर्चीला साखळ दंडाने टेबलाला बांधून ठेवली आहे. चोरीच्या भितीने त्यास भले मोठे कुलूपही लावले आहे. जिल्हा परिषदेतील वेगवेगळ्या विभागात कधी काय काय होईल सांगता येता येत नाही. आजवर नेते मंडळी आपली खुर्ची वाचवण्यासाठी अथवा खुर्ची...
  September 11, 09:57 PM
 • औरंगाबाद : बलशाली महाराष्ट्रासाठी मतदानाची प्रतिज्ञा या दिव्य मराठीच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमात कला कट्टा येथे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मतदानाची शपथ घेण्यात आली. या वेळी भाजपचे प्रवक्ते शिरीष बोराळकर, भारतीय योग संस्थानचे डॉ. उत्तम काळवणे, इरा स्कूलचे संचालक डॉ. सतीश गोरे यांच्यासह राधाकृष्ण कॉमेडी क्लब, लायनेस क्लब ऑफ औरंगाबाद मेनच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. दिव्य मराठीची प्रतिज्ञा भारत माझा देश आहे. माझ्यासारख्या...
  September 11, 10:43 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात