जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- 1200 फूट जागेवरून झालेल्या वादातून एका महिलेला विवस्र करून बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, ही गेल्या महिन्यातील घटना असून, आता या घटनेचा व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पीडित महिला सिल्लोड ग्रामीण पोलिसांकडे होमगार्ड पदावर काम करते. तिच्या आईच्या नावावर असलेल्या जागेवर तिच्या चुलत्यांचा डोळा आहे. त्यामुळे पीडित महिला आणि तिच्या वयोवृद्ध आईला तिथून पिटाळून लावण्यासाठी आरोपी धनंजय वाघ, मुरलीधर वाघ, बाबुराव...
  February 22, 03:55 PM
 • औरंगाबाद - महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली आहे. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी...
  February 22, 11:51 AM
 • परभणी - नांदेडला व्यापारानिमित्त मोटारसायकलवर जात असलेल्या गंगाखेडच्या एका व्यापाऱ्यास गुरुवारी(दि.२१) भर दिवसा चोरट्यांनी मारहाण करून दोन लाख रुपयांची रोख रक्कम लांबवली. डोळ्यात व तोंडात मिरचीची पावडर टाकून चोरट्यांनी हा प्रकार केला. व्यापारी नीलेश फरकंडकर व्यापारानिमित्त नांदेड येथे मोटारसायकलने एकटेच जात होते. परभणी व नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर त्यांच्यावर पाळत ठेवून असणाऱ्या चोरट्यांनी त्यांना दुपारच्या सुमारास अडवले. डोळ्यात व तोंडात मिरचीची पावडर टाकून जबर मारहाण केली....
  February 22, 10:46 AM
 • आैरंगाबाद - भारतीय दंड विधान कायद्याचे कलम ३२८ चा आधार घेत गुटखा साठवणूक व वाहतूक करणारे सुटका करून घेत होते. मुंबई उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांनी संबंधित कायदा गुटखा विक्री करणारासह त्याची साठवणूक करणारा व वाहतूक करणारा दोषी राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. यासंबंधी आैरंगाबाद खंडपीठात दाखल अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून, अशा स्वरूपाचा दिलासा मागणारे अनेक अर्ज मागे घेण्यात आले आहे. अन्न व सुरक्षा कायदा २००६ कलम ३ चा आधार...
  February 22, 08:45 AM
 • फुलंब्री - औरंगाबाद-मलकापूर या चालत्या बसमध्ये फुलंब्री तालुक्यातील पाल फाट्याजवळ अचानक महिलेला ह्दयविकाराचा झटका येऊन त्यातच महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान बसचे वाहक व चालक यांनी मृत्यू झालेल्या महिलेला व नातेवाईकांना रुग्णालयात सोडण्याऐवजी फुलंब्रीतील ग्रामीण रुग्णालयासमोर भर रस्त्यावरच उतरवून पळ काढल्याची घटना आज गुरुवार दि.21 रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत बसचालक व वाहकाने बस रुग्णालयात नेण्याऐवजी मृत महिलेसह नातेवाईकांना रस्त्यावर उतरवून पळ काढल्याने माणुसकी...
  February 21, 06:15 PM
 • औरंगाबाद- दोन दिवसांवर परीक्षा आलेली असताना बारावीच्या दोन विद्यार्थ्यांवर लूटमारीसाठी प्राणघातक हल्ला झाला. मंगळवारी रात्री सिडको एन-४ परिसरात साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. शहरातील व्यापाऱ्यांवर हल्ला होऊन लूटमारीच्या घटना ताज्या असतानाच विद्यार्थ्यांवर हल्ले सुरू झाल्याने शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. केतन पठाडे आणि भूषण चंद्रकांत जोशी (दोघे रा. जयभवानीनगर) हे बारावीचे विद्यार्थी आहेत. येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला प्रारंभ होत आहे. केतन व भूषण यांनी...
  February 20, 07:48 AM
 • पैठण- जायकवाडी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या केवळ ९ टक्के पाणीसाठा जायकवाडी धरणात शिल्लक राहिला आहे. हे पाणी मराठवाड्याला उन्हाळ्याच्या चार महिने पुरण्याची शक्यता नसून सध्या डाव्या कालव्यातून रब्बीचे दुसरे आवर्तन सुरू असल्याने तो साठा या महिनाभरात ७ टक्क्यांवर येईल. वीस दिवसांनी मात्र मृत साठ्यातूनच पाणी उपसा करावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता आर.बी.काळे यांनी सांगितले. धरणावर औरंगाबाद, जालन्यासह ४ हजार उद्योग, नगर जिल्ह्यातील अनेक भागाला पाणी पुरवठा होतो....
  February 19, 06:14 AM
 • औरंगाबाद-शासनाकडून लिंगनिदानाविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. त्याचप्रमाणे बेटी बचाओ जनजागृती मोहीम राबवली जात आहे, परंतु सकारात्मक परिणाम अजूनही पुरेसा दिसत नाही. देशातील ११ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात मुलांचा जन्मदर २००७ च्या तुलनेत २०१६ मध्ये घटला आहे. महाराष्ट्रात मुलींचा जन्मदर वाढला आहे. जनगणना आयुक्तांच्या (सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टिम) नुकत्याच जाहीर झालेल्या वार्षिक अहवालात ही माहिती दिली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा व उत्तराखंडमध्ये मुलींच्या...
  February 16, 10:40 AM
 • सात तास मृतदेह रुग्णालयात, नातेवाईकांचा संताप वायरमनवर गुन्हा दाखल करा, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार अजिंठा- मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाकडे आलेल्या एका तरुणाचा विद्युत वाहिनी अंगावर पडून मृत्यू झाला.मादणी (ता.सिल्लोड) येथे शुक्रवारी (ता.15) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिलिंद मुकुंदा सुरडकर (वय-32) असे मृत तरूणाचे नाव आहे. मिलिंद हा औरंगाबाद येथील हॉटेल भोजमध्ये कार्यरत होता. मुलगी खुशी हिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद हा घरी आला होता. त्याने मोठा...
  February 15, 07:45 PM
 • जालना- अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षकानेसहायक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदी येथील पोलिस वसाहतीत शुक्रवारी (ता.15) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल परजणे असे या आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. कॅनलमध्ये पडलेले वाहन काढण्यासाठी पहाटे 4 वाजेपर्यत केली मदत.. अनिल परजणे यांनी शुक्रवारी पहाटे 4 वाजेर्यंत कॅनलमध्ये पडलेले...
  February 15, 03:22 PM
 • औरंगाबाद- सोळाव्या लोकसभेचे शेवटचे अधिवेशन बुधवारी संपले. लोकसभेत ५ वर्षांतील खासदारांची सक्रियता व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आकडेवारी पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्च वेब पोर्टलने नुकतीच जारी केली आहे. या रिपोर्ट कार्डनुसार सोळाव्या लोकसभेत पाच वर्षांत प्रश्न विचारणाऱ्या देशभरातील टॉप-१० खासदारांपैकी एकट्या महाराष्ट्राचे ८ खासदार आहेत. देशातील ९३ टक्के खासदारांनी १.४२ लाखांपेक्षा जास्त प्रश्न विचारले. सर्वाधिक प्रश्न शेतकरी आत्महत्यांवर विचारण्यात आले. राष्ट्रवादी :...
  February 15, 08:38 AM
 • औरंगाबाद- चारचाकी वाहनाला चालक मिळत नसल्याने प्रवास खोळंबल्याचे कित्येकदा ऐकले आहे, परंतु वैमानिकाअभावी विमान चक्क तीन तास धावपट्टीवर उभे केल्याचा अनुभव दिल्ली-औरंगाबाद-मुंबई या एअर इंडियातील प्रवाशांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) घेतला. तासभर वाट पाहूनही उड्डाण होत नसल्याचे लक्षात आल्यावर काही जणांनी संतप्त स्वरात आरडाओरड केल्यावर आंतरराष्ट्रीय विमानाचा वैमानिक तैनात करण्यात आला आणि विमान औरंगाबादच्या दिशेने उडाले. ते रात्री ११.१० वाजता येथे पोहोचले. दीड तासाच्या प्रवासासाठी तीन...
  February 15, 08:24 AM
 • औरंगाबाद- येत्या मंगळवारी म्हणजे १९ फेब्रुवारीला मिलिंद आणि मनाली यांच्या लग्नाला २७ वर्षे पूर्ण होतील. पण आजही २७ वर्षांपूर्वीच्या त्यांच्या प्रेमकथेच्या आठवणी निघाल्या की ते दोघेही तेवढेच रोमँटिक आणि भावुकही होतात. कारणही तसेच आहे. ही प्रेमकहाणी काही साधी, सरळ आणि फक्त रोमँटिक नाही. आंतरधर्मीय लग्न असल्यामुळे तथाकथित धर्मरक्षकांचा विरोध, धमक्या आणि दहशतीच्या सावटात दोघांनीही दाखवलेल्या जिगरबाज हिमतीची ती कहाणी आहे. किंबहुना, या प्रेमी युगलातच नव्हे, तर नंतर दोन परस्परभिन्न...
  February 14, 09:42 AM
 • नागपूर- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, नरेंद्र मोदी, राहुल गांधी यांच्यासह इतर राजकीय नेत्यांवर चित्रपट काढण्याची मालिकाच सुरू झालेली असताना त्यात आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही नावाचा समावेश झाला आहे. गडकरी यांच्या व्यक्तिगत आणि राजकारणातील सार्वजनिक जीवनावर आधारित चरित्रपट लवकरच येत असून हा चरित्रपट केवळ यूट्यूबवर उपलब्ध राहणार आहे. नयनराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली गडकरी या नावानेच नागपूरचे अनुराग भुसारी यांनी या चरित्रपटाची निर्मिती केली आहे. एक तासाच्या या...
  February 14, 09:08 AM
 • करमाड- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जाणारा समृद्धी महामार्ग भूमिपूजनाच्या प्रतीक्षेत असून रस्त्यासाठी काम करणारी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. या रस्त्याचे काम वेळेच्या आत पूर्ण व्हावे म्हणून चौदा विभागांत विभागले गेले असून या ठिकाणच्या राष्ट्रीय स्तरावरील गुत्तेदारांनी माती, खडी आणि सिमेंट कामासाठी नवे कोरे हायवा तसेच अन्य अत्याधुनिक वाहने आणून उभी केलेली आहेत. वाट फक्त काम शुभारंभाचा नारळ फुटण्याची आहे. विदर्भ-मराठवाडा हा मागास भाग देशाची...
  February 14, 08:36 AM
 • delete
  February 13, 10:13 AM
 • औरंगाबाद- शासनाच्या ईएसआयसी हॉस्पिटलशी बनावट करार करून कामगारांवर वर्षभर सशुल्क उपचार करत ७२ लाख रुपयांवर डल्ला मारणाऱ्या डॉ. सूरज राणाची बनवेगिरी दिव्य मराठीने समोर आणल्यानंतर शासनाने त्याची सर्वच बिले थांबवली. या प्राप्त बिलांमध्ये सुमारे २५ लाख रुपयांची बिले ही गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसह उपचारांचीही आहेत. या संपूर्ण बिलांची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश मुंबई ईएसआयसी आयुक्तांनी औरंगाबादच्या वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत. ही माहिती प्राप्त होताच यांची संपूर्ण...
  February 13, 10:06 AM
 • फुलंब्री- तालुक्यातील वाकोद येथील खासगी जमिनीतून ३०० ब्रास वाळूचे अवैधरीत्या उत्खनन करून रात्री-अपरात्री वाहतूक करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर तहसील प्रशासनाच्या वतीने घटनास्थळी जाऊन पंचनामा करून वाळूची अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्याला जमीन मालकास तब्बल ७६ लाख २० हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आली होती. परंतु जमीन मालकाने तहसीलच्या नोटीसला केराची टोपली दाखवली. त्यामुळे तहसील प्रशासनाने थेट शेतकऱ्याच्या जमिनीवरच दंड भरला नाही म्हणून त्याच्या सातबारा...
  February 12, 08:08 AM
 • खामगाव- फुलंब्री तालुक्यातील वडोदबाजार ठाणे हद्दीतील एका छोट्याशा गावातील अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. मुलीची घाटी रुग्णालयात प्रसूती झाल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. गंभीर बाब म्हणजे सदरील मुलीची प्रसूती होऊन दोन महिने उलटूनही या प्रकाराची एमएलसी पोलिसांना मिळाली नव्हती. परंतु घाटीतील महिला व बालकल्याण समितीच्या सदस्यांनी या प्रकरणात लक्ष घालून कारवाई केल्याने प्रकरण उजेडात आले. नितीन अशोक ऊर्फ पुंजाराम म्हस्के ( २१ , रा. शहागड ता. अंबड) असे अटकेतील...
  February 12, 08:05 AM
 • औरंगाबाद- भूगर्भातील पाण्याच्या अपरिमित उपशामुळे केवळ भूजल पातळी खालावत नाही, तर खोल गेलेले पाणी युरेनियमने प्रदूषित झाले आहे. त्यास रासायनिक खतांचा भडिमार हे पण एक कारण समोर आले आहे. आरोग्यास घातक असणाऱ्या या पाण्याचे नमुने तपासण्यासाठी केंद्र शासनाने भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मदतीने १६ राज्यांतल्या ७९ जिल्ह्यांतील १ लाख २० हजार पाण्याचे नमुने तपासण्यास सुरुवात केली आहे. यात मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी या ४ जिल्ह्यांचा समावेश आहे. भूजलाचा वापर करणारा भारत...
  February 12, 07:54 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात