जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद: झालर क्षेत्राचा विकास आराखडा रद्द केल्याचे श्रेय झालर क्षेत्र बचाव संघर्ष समितीला असल्याचे समितीचे अध्यक्ष पंजाबराव वडजे यांनी सांगितले. ते समितीच्या कार्यालयात आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद मनपाच्या हद्दीतील २८ गावे झालर क्षेत्राच्या विकास आराखड्यातून राज्य सरकारने वगळली आहेत. या निर्णयाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न आमदार कल्याण काळे करत आहेत. समितीतील शेतकयांनी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यासमोर २२ जूनला धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र,...
  June 25, 02:21 AM
 • औरंगाबाद: वर्ष २००१ मध्ये महापालिकेने हाती घेतलेल्या १७६ कोटी रुपयांच्या शहर एकात्मिक रस्ते विकास योजनेचा खर्च सध्या ३१७ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला, असे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी सांगितले. योजनेसाठी विविध संस्थांकडून अपेक्षित निधी मिळत नसल्याचे राज्याच्या मुख्य सचिवांकडे झालेल्या बैठकीत महापालिकेतर्फे सांगण्यात आले. २००१ मध्ये योजना तयार करताना लोकप्रतिनिधी, मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाने निधी देण्याची तयारी दाखविली होती. त्यानुसारच उड्डाणपूल, भुयारी मार्ग, रस्ते...
  June 25, 02:20 AM
 • औरंगाबाद: शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पोलिस आयुक्त संजयकुमार यांनी आणखी २० पोलिसांची वाहतूक शाखेत नियुक्ती केली आहे. आता वाहतूक शाखेतील पोलिसांची संख्या दोनशेवर गेली आहे. तसेच ज्या पोलिस ठाण्यात कमी संख्याबळ असेल तेथेही कर्मचारी पुरविले जाणार आहेत. पोलिस आयुक्तांनी गुरुवारी वाहतूक शाखेतील सर्व पोलिस अधिका-यांची बैठक घेतली. यावेळी आलेल्या सूचनांच्या माध्यमातून त्यांनी वाहतूक शाखा सक्षम बनविण्यासाठी योजना आखल्या आहेत. ज्यांना शहर आणि वाहतुकीची चांगली माहिती आहे, अशा पोलिस...
  June 25, 02:16 AM
 • औरंगाबाद: वारसाहक्काने रॉकेल विक्रीचा परवानाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायमूर्ती दिलीप भोसले व एस. बी. देशमुख यांनी महाराष्ट्र रॉकेल वितरण कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांत निर्णय घेण्याचे आदेश राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागास दिले. पोहरी, ता. सोयगाव येथील शेख मुस्ताक हुसैन शेख भिकन यांना १९८२ मध्ये किरकोळ रॉकेल विक्रीचा परवाना मिळाला होता. त्यांचा २४ जानेवारी २००२ रोजी मृत्यू झाला. त्यांचे वारसदार शेख अशोक शेख मुश्ताक...
  June 25, 02:05 AM
 • औरंगाबाद: टपाल खात्यामार्फत गोदरेज कंपनीच्या छोटुकूलची ग्रामीण तसेच शहरी भागांमध्ये धडाक्यात विक्री होत आहे. औरंगाबाद विभागात सुमारे २०-२१ दिवसांत ७०० छोटुकूलची विक्री झाली. गोदरेज कंपनी व टपाल खात्यामध्ये झालेल्या करारानुसार कंपनीच्या छोटुकूलचा टपाल खात्यामार्फत प्रचार-प्रसार व विक्री होत आहे. टपाल खात्यातंर्गत येणाया औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, धुळे, नंदूरबार, जळगाव व नाशिक या बारा जिल्ह्यांच्या टपाल कार्यालयांमधून ही...
  June 25, 02:00 AM
 • औरंगाबाद: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या निकालात अनेक विद्यार्थ्यांनी उत्तम टक्केवारी घेत घवघवीत यश मिळविले. काही विद्यार्थ्यांना अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही; परंतु नापास झालेल्या विद्यार्थ्यांनाही करिअरच्या दृष्टीने अनेक संधी उपलब्ध आहेत. सध्या किमान कौशल्यावर आधारित अनेक अभ्यासक्रम चालविले जात आहेत. हा अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार मिळविणे सहज शक्य झाले आहे. दहावीनंतर पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जसे...
  June 25, 01:57 AM
 • औरंगाबाद: बाळाचे शिक्षण आईच्या गर्भातच सुरू होते, त्यातही २ ते ६ वर्ष दरम्यानचा काळ बालकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात. त्यामुळे दर्जेदार, विज्ञानवादी आणि वास्तववादी पूर्वप्राथमिक शिक्षण ही शिक्षण काळाची गरज आहे, असे प्रतिपादन अॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले.जिजाऊ ज्ञान मंदिर या इंग्रजी शाळेच्या उदघाटप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव बोचरे यांची उपस्थिती होती. खेडकर म्हणाले, स्पर्धेच्या युगात मुलांना पुढे ठेवण्यासाठी...
  June 25, 01:53 AM
 • औरंगाबाद: दैनिक दिव्य मराठी आणि एमजीएम संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत शुक्रवारी शास्त्रीनगर, गारखेडा परिसर, आंबेडकरनगर, विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. महिला व मुलांनी पुढाकार घेत या अभियानात उस्फू र्त सहभाग नोंदवला. साई पार्क एन-६ येथे सुनीता पवार, संगीता जाधव, डॉ. मंगला इंगळे, उत्तम चव्हाण यांनी वृक्षारोपण केले. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी भानुदास मते (७५०७७७७६८०) यांच्याशी संपर्क साधावा.
  June 25, 01:47 AM
 • औरंगाबाद: अखिल महाराष्ट्र सुतार, लोहार संघाच्या स्मरणिकेचे व संकेतस्थळाचे २६ जूनला लोकार्पण करण्यात येणार आहे. संघाचे अध्यक्ष सुदाम अण्णा खैरनार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अखिल महाराष्ट्र सुतार, लोहार संघाच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने तापडिया नाट्यमंदिरामध्ये एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात समाजातील सात मान्यवरांना गौरविण्यात येणार आहे. स्मरणिकेचे प्रकाशन व संकेतस्थळाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते होणार आहे....
  June 25, 01:44 AM
 • औरंगाबाद: थेट कारखान्यांतून रेडिमेड कपडे खरेदीनंतर बरीच वर्षे अवकळा सोसणा- या टेलरिंग व्यवसायाला कॉलेजकुमार, कुमारींच्या फॅशनेबल दुनियेत रममाण होण्याच्या ट्रेंडमुळे चांगले दिवस आले आहेत. फॅशनच्या झगमगाटाबरोबरच टेलर्सच्या व्यवसायाचा झगमगाट सुरू झाला आहे. कपड्यांच्या फॅशनचं विश्व बदलतंय. गेल्या काही वर्षांत रेडीमेड कपड्यांची मागणी वाढत होती. विशेषकरून कॉलेजकुमारींची पसंती चकचकीत रेडिमेड कपड्यांना होती. आता मात्र तो ट्रेंड हळूहळू बदलत चालला आहे. त्यामुळे टेलरिंग व्यवसायाला...
  June 25, 01:41 AM
 • औरंगाबाद: पुंडलिकनगर भागातील गजानन स्वरमंदिर दुकानावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल ११ लाख ९० हजार रुपयांच्या सीडी जप्त केल्या. शुक्रवारी रात्री उशिरा ही धाड टाकण्यात आली. याप्रकरणी तीन युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. युनायटेड कॉपीराईट संघटनेचे विभागीय अध्यक्ष कुणाल खरात यांनी पोलिस उपायुक्त सुनीता साळुंके यांच्याकडे या संदर्भात तक्रार केली होती. पोलिसांनी केलेल्या कारवाईत गजानन स्वरमंदिर या दुकानावर अवैध सीडीचा साठा सापडला आहे. यापूर्वी अशाच प्रकरणात किरण गोवर्धन पांडव, किशोर...
  June 25, 01:35 AM
 • औरंगाबाद: तंत्रनिकेतन पदविका अर्थात पॉलिटेक्निक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी आता ३५ टक्के गुणही पात्र धरले जाणार आहेत. बेस्ट आॅफ फाइव्हप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. अजित थेटे यांनी दिली. तंत्रनिकेतन पदविका अभ्यासक्रमासाठी शहरातील दोन केंद्रांवर २२ जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पूर्वी प्रवेशासाठी ५० टक्के गुण खुल्या गटासाठी आणि ४५ टक्के गुण राखीव गटासाठी होते. हा निकष आता ३५ टक्के...
  June 25, 01:31 AM
 • औरंगाबाद: गाळे सील करण्याची कारवाई कुणाच्याही दबावाखाली थांबविली जाणार नसून, या कारवाईसाठी लोकप्रतिनिधींचे चांगले सहकार्य मिळत असल्याचे महापालिकेचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी आज सांगितले. शुक्रवारी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना दे म्हणाले, कारवाईत सुटलेले गाळे सील केले जाणार आहेत. आजपर्यंतच्या कारवाईत ३७७ गाळे सील केले गेले आहेत. एकदा लावलेले सील कुणाच्याही दबावाखाली उघडले जाणार नाही. एकूण ६५८ पैकी किती गाळ्यांना सील लावण्यात आले याचा हिशेब मात्र जुळत नसल्याचे त्यांनी...
  June 25, 01:29 AM
 • औरंगाबाद: बांधकाम क्षेत्रात जागतिक पातळीवर ओळख असलेल्या हिरानंदानी उद्योगसमूहाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक निरंजन हिरानंदानी हे दिव्य मराठीच्या वतीने शनिवारी (२५ जून) आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना ते कानमंत्र देणार आहेत. हा कार्यक्रम हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे सायंकाळी ७ वाजता होईल. कॉन्फेडरेशन आॅफ रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स असोसिएशन्स आॅफ इंडिया (सीआरईडीएआय) या संघटनेच्या औरंगाबाद शाखेच्या सहकार्याने आणि शमित बिल्डकॉन व...
  June 25, 01:26 AM
 • औरंगाबाद: केंद्र सरकारने स्वयंपाकाचा गॅस ५० रुपयांनी महाग केल्याने संतापलेल्या लोकांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे. आधीच महागाईने जगणे कठीण केले. त्यात गॅस, डिझेल दरवाढीचा भडका उडवून सरकार आम्हाला आणखी किती दिवस छळणार, असा संतप्त सवाल करीत रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. गेल्या काही वर्षांत रॉकेल, डिझेल, गॅसच्या दरात सतत वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. महागाईच्या आगीत लोक होरपळत असताना केंद्र सरकारने आज रात्री आणखी तेल ओतले. यावर शहरातील लोकांनी...
  June 25, 01:21 AM
 • औरंगाबाद: रेंगटीपुरा रस्त्याकडून चंपा चौकाकडे जाणार्या मुख्य रस्त्यावर असलेल्या डीपीची संरक्षक भिंत पडली आहे. डीपीभोवती मोठय़ा प्रमाणावर कचराही साचला आहे.वेळेवर कचरा उचलला जात नाही. त्यामुळे दुर्गंधी पसरली असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.डीपीच्या संरक्षक भिंतीत पावसामुळे वीजप्रवाह उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
  June 24, 05:54 AM
 • औरंगाबाद: जगात भारतीय संयुक्त कुटुंब पद्धत सर्वर्शेष्ठ मानली जाते. मात्र, बदलत्या काळानुसार आता विभक्त कुटुंब पद्धत रुजू लागली आहे.त्यामुळे अनेक घरातील ज्येष्ठ नागरिक वृद्धार्शमात राहतात. काहीजण परिस्थितीमुळे तर काहीजण परिस्थिती चांगली असूनही स्वत:च्या र्मजीने वृद्धार्शमात राहणे पसंत करतात. वृद्धार्शमात राहणार्यांकडे समाजातील काही लोक वेगळय़ा दृष्टिकोनातून पाहत असतो. मात्र, वृद्धार्शम ही अपरिहार्यता आहे, असेच आज म्हणावे लागेल.ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या संध्यासमयी आधार...
  June 24, 05:52 AM
 • औरंगाबाद: गजबजलेल्या जुना मोंढा परिसरातील रेंगटीपुर्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले असून, वारंवार होणार्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.रेंगटीपुरा ते चंपा चौक रस्त्यावर जड वाहनांना बंदी असूनही पोलिस कारवाई करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जड वाहनांमुळे वाहतूक नेहमीच खोळंबते.रस्त्यावरील खड्डय़ांमुळेही छोटेमोठे अपघात रोजच घडतात. तसेच खड्डय़ांमुळे वाहने घसरून पडतात.चंपा चौकातील ड्रेनेजलाइनवरील लोखंडी ढापे वाहनांच्या ओझ्यामुळे...
  June 24, 05:49 AM
 • औरंगाबाद: अखेर दहावीच्या त्या १२ विद्यार्थ्यांना बोर्डाने पास असल्याचे जाहीर केल्याने त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले. सर्वांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.आपल्या मुलांना घेऊन पालक दैनिक दिव्य मराठीच्या कार्यालयात आले आणि त्यांनी डीबी स्टारचे आभार मानले. १७ जून रोजी दहावीचा निकाल लागला. या आॅनलाइन निकालात शहरातील जागृती शाळेतील १२ विद्यार्थ्यांना तांत्रिक विषयात शाळेनेच ग्रेड न दिल्याचे कारण सांगत बोर्डाने पास असूनही नापास ठरवले. त्यामुळे निकाल लागल्यापासून हे विद्यार्थी आणि...
  June 24, 04:56 AM
 • सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचा विचार करणे ही खरे तर कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी. मात्र औरंगाबाद महापालिका यास अपवाद ठरणार आहे. समांतरच्या प्रत्येक टप्प्यावर सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. यामुळे औरंगाबादचे पाणी महानगरापेक्षाही महागाचे ठरणार आहे. गेल्या ६ वर्षांपासून समांतरचे गुहाळ मनपामध्ये सुरू आहे. नगरसेवकांना पूर्णपणे अंधारात ठेऊन महानगरपालिका प्रशासनाने हा महागडा प्रकल्प मंजूर करवून घेतला. ७९२ कोटी रुपयांची ही योजना असली तरी २०...
  June 24, 04:51 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात