जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • शिक्षण मंडळाने यंदा प्रथमच कॉपीमुक्ती अभियानाची कठोरपणे अंमलबजावणी केल्याने मेहनती विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असला तरी निकालाची टक्केवारी घसरली.विभागात यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच बाजी मारली असून, त्यांनी प्रथम र्शेणीत येण्याचा मानही पटकावला आहे. मुलांना द्वितीय र्शेणीवर समाधान मानावे लागले. उत्तीर्ण होण्याचे मुलींचे प्रमाण 60.79 तर मुलांचे प्रमाण 56.77 टक्के आहे. या परीक्षेस मराठवाडा विभागातील 1 लाख 44 हजार 960 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 84 हजार 808 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 60 हजार 152...
  June 18, 02:21 AM
 • औरंगाबाद. रामदास आठवले हे रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचे निमंत्रक होते. त्यांनी कुणालाही विश्वासात न घेता शिवसेनाप्रमुखांची भेट घेतली. आठवलेंच्या दुहेरी निष्ठेमुळे रिडालोसची वाताहत झाली. आठवले हे विश्वासघातकी आहेत, अशी टीका रिपाइं नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी आज पत्रपरिषदेत केली.
  June 18, 02:17 AM
 • औरंगाबाद: राज्यभरात मान्सूनचे दमदार आगमन झालेले असताना मराठवाड्यात मात्र त्याने दडी मारल्यामुळे या विभागात कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पुण्याच्या भारतीय उष्णदेशीय मोसम विज्ञान संस्थेच्या माध्यमातून कृत्रिम पावसाचा प्रयोग केला जाणार असून त्याची तयारी या संस्थेच्या काइपिक्स (क्लाऊड एरोसोल इंटरॅक्शन अॅण्ड प्रिसिपिटेशन एन्हान्समेंट एक्सपेरिमेंट) या प्रकल्पाद्वारे केली जात आहे. मराठवाड्याचे आठही जिल्हे आणि कर्नाटक तसेच आंध्रातील रायलसीमा, तेलंगणा...
  June 18, 12:56 AM
 • औरंगाबाद: माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा (दहावी ) निकाल शुक्रवारी दुपारी १ वाजता इंटरनेटवर जाहीर झाला. राज्यातील निकालाची एकूण टक्केवारी ७१.०४ असून यंदा अभ्यासक्रम सुलभ करूनही ४ लाख ७२ हजार ८४१ विद्यार्थी नापास झाले. उत्तीर्णांमध्ये मुलींची संख्या मुलांपेक्षा अधिक आहे. ८०.३९ टक्के उत्तीर्णांचे प्रमाण असलेल्या पुणे विभागाने राज्यात बाजी मारली असून अमरावती विभागाचा निकाल सर्वांत कमी ४३.३२ टक्के आहे.यंदा बारावीप्रमाणेच दहावी परीक्षेतही राज्यभर कॉपीमुक्ती मोहीम शिस्तबद्धपणे...
  June 18, 12:41 AM
 • औरंगाबाद: अपघात रोखले जावेत म्हणून अवजड वाहनांवर प्रतिबंध घालण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नियमांचे तंतोतंत पालन व्हावे, अशा आशयाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली आहे. वकील संजय भा. भोसले यांनी व्यक्तिश: ही याचिका सादर केली आहे. खंडपीठाचे न्यायमूर्ती दिलीप भोसले व न्यायमूर्ती एस. बी. देशमुख यांच्यासमोर 27 जूनला या याचिकेवर सुनावणी होणार आहे.अवजड वाहनांखाली चिरडून अनेक निष्पापांचा बळी गेला आहे. 13 जून रोजी सिडको बसस्थानक परिसरात किरण दराडे या मुलीचा...
  June 17, 06:34 AM
 • एकेकाळी शहराच्या सौंदर्यात भर घालणारे चौक आता बकाल झाले असून, दुभाजकांवरील फुलदाण्याही कोमेजल्या आहेत. त्यातील रोपटी केव्हाच जळून गेली आहेत. याकडे कुणाचेही लक्ष नाही.बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा विमानतळ आणि सिडको टी पॉईंट ते हसरुल नाका या प्रमुख रस्त्यांवरील दुभाजक पाहिले तर हे लक्षात येईल. बाबा पेट्रोलपंप ते चिकलठाणा हा शहरातील सर्वात मोठा महामार्ग. जालना रोड आणि छत्रपती शिवाजी महामार्ग या नावांनीही तो ओळखला जातो. शहरातील सर्वाधिक वर्दळ या रस्त्यावर असते. तथापि, या रस्त्यावरील...
  June 17, 05:23 AM
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थी आता खर्या अर्थाने उद्यमशीलतेचे धडे गिरवू लागले आहेत. विद्यापीठाच्या केमिकल टेक्नॉलॉजी विभागातील फूड टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांनी तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली फॅट फ्री समोसा तयार केला आहे. जोस्ना बडगुजर या विद्यार्थिनीने समोसा तर माधुरी कमानदार हिने शंकरपाळे बनवले आहेत.व्यावसायिक शिक्षण देण्याचा हा प्रयोग उद्यमशीलतेची मुळे रुजवण्यास सहायक ठरणार आहे. आपल्या विद्यापीठात एकूण 32 विभाग आहेत. त्यात के मिकल...
  June 17, 05:07 AM
 • कलेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार विविध उपक्रम राबवते. मात्र, सरकारी दप्तरदिरंगाईच्या फटक्यामुळे या योजनांचा बोर्या वाजतो.जिल्हा परिषदेने बचत गटांना हस्तकलेचे प्रशिक्षण देण्यासाठी ज्येष्ठ कलाकार राजेश सोहिंदा यांची नियुक्ती केली, पण दीड वर्ष उलटले तरी त्यांना मानधनाचे 78 हजार रुपये दिले नाहीत.ब्राइट केन वुड क्राफ्ट चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष राजेश सोहिंदा हे बांबूपासून विविध कलाकृती साकारणारे देशातील मोजक्याच कलाकारांपैकी एक. केनचा वापर करून ग्रिटिंग कार्ड, पेपर बॅग, फाइल फोल्डर...
  June 17, 05:01 AM
 • इंजिनिअरिंग आणि फार्मसी क्षेत्रात सध्या अमाप संधी आहेत. त्यामुळे प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी कल पाहून आपल्या आवडत्या शाखेत प्रवेश घ्यावा, असे मत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील सिव्हिल विभागाचे प्रमुख उमेश कहाळेकर यांनी व्यक्त केले.संत एकनाथ रंगमंदिरमध्ये तंत्रशिक्षण विभागाच्या सहसंचालक कार्यालयामार्फत मोफत मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी इंजिनिअरिंग आणि फार्मसी प्रवेश प्रक्रियेबाबत कहाळेकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी...
  June 17, 04:10 AM
 • मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाने या वर्षापासून केंद्रीय लोकसेवा आयोगाचे पूर्णवेळ स्पर्धा परीक्षा केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी मंडळाच्या कार्यालयातील पत्रकार परिषदेत हा निर्णय सरचिटणीस मधुकरअण्णा मुळे व सेवानिवृत्त सनदी अधिकारी कृष्णा भोगे यांनी जाहीर केला.मराठवाड्याच्या विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेविषयी न्यूनगंड आहे. तथापि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा इंग्रजी भाषेतच होतात. त्यामुळे विद्यार्थी या परीक्षेकडे पाठ फिरवतात. त्यामुळे...
  June 17, 04:03 AM
 • दिव्य मराठीतर्फे आयोजित अपघातमुक्त औरंगाबाद अभियानाला दुसर्या दिवशीही (16 जून) सिडको, कॅनॉट एन-5 मध्ये नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. पावसाने हजेरी लावली असतानाही नागरिकांनी लेखी सूचना नोंदविण्यासाठी गर्दी केली. नागरिकांची उपस्थिती लक्षात घेता अभियान एक व्यापक चळवळ बनत असल्याचे चित्र होते. पोलिसांच्या दंडुकेशाहीपेक्षा स्वयंशिस्त, वाहतुकीचे नियम पाळले तर अपघात टळतील, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.किरण दराडेच्या अपघाती मृत्यूनंतर शहरात असे अपघात पुन्हा घडू नये यासाठी दैनिक दिव्य...
  June 17, 04:01 AM
 • पुंडलिकनगर परिसरातील ऐश्वर्या बारची बुधवारी जागेसंदर्भातील वादातून जेसीबीने तोडफोड करण्यात आली. या जागेसंदर्भात अजहर नवाब मामू आणि सुरेश मंचोरियल यांच्यात मालकीचा वाद होता.हा वाद विकोपाला गेल्यामुळे मामुने सहकार्यांच्या मदतीने तोडफोड केली. यामुळे 17 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार मंचोरियल यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात दिली. अजहर मामू, मोहम्मद अखिल खान, गुड्डी बी आणि त्यांच्या सोबत स्कॉर्पिओमधून (एम.एच. 20 वाय. 7831) आलेल्या गुंडांनी हा सर्व प्रकार केला. या सर्वांनी रिव्हॉल्व्हरचा...
  June 17, 03:54 AM
 • कोरोमंडल कंपनीचे गोदावरी गोल्ड सेंद्रिय खत चालणार्या खताबरोबर लिंकिंग करून विक्री करण्यासाठी आले होते. याची बातमी दिव्य मराठीने प्रकाशित केली होती. जिल्हा कृषी विकास अधिकारी आणि त्यांच्या पथकाने गुरुवारी या खतास विक्री करण्यास बंदी घातली आहे.या खताला शेतकर्यांची मागणी नव्हती तसेच व्यापारीही घेण्यास तयार नव्हते. कोरोमंडल कंपनीने हे खत व्यापार्यांना हाताशी धरून विक्री करण्याचा प्रयत्न केला जात होता. या अगोदर करोडो रुपयांचे खते व बियाणे लिंकिंग करून विक्री केल्याचे उघड झाले...
  June 17, 03:46 AM
 • एका दीड वर्षे वयाच्या चिमुकलीला घरात खेळताना औषधाची एक गोळी सापडली आणि ती गोळी तिने तोंडात टाकली. थोड्या वेळाने तिला ढाळ-वांत्या सुरू झाल्या आणि या एका गोळीने तिचा घाटी रुग्णालयात अंत झाला. या दुर्दैवी बालिकेचे नाव गायत्री भानुदास गायकवाड असे आहे. पळसखेडा, ता. भोकरदन येथे मंगळवारी सकाळी गायत्री घरात खेळत होती. औषधीची गोळी गिळताच तिला चक्कर आली आणि तिने डोळे पांढरे केले. गायत्रीचे आई-वडील या घटनेने घाबरले आणि त्यांनी तातडीने भोकरदनच्या शासकीय रुग्णालयात तिला दाखल केले. तेथील डॉक्टरांनी...
  June 17, 03:39 AM
 • प्रवेशामध्ये असमतोल राहू नये यासाठी शाळा सुरू झाल्यानंतरच प्रवेश द्यावा, अशा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. मात्र, इंग्रजी शाळांनी अगोदरच प्रवेश प्रक्रिया अटोपल्या आहेत, तर महानगरपालिकांच्या शाळांनी मात्र आमच्याच शाळेत प्रवेश घ्यावा यासाठी विद्यार्थ्यांची शोभायात्रा काढली.यासंदर्भात शिक्षणाधिकार्यांना विचारले तर त्यांनी एकमेकांवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला. शाळा सुरू झाल्यानंतरच प्रवेश पंधरवडा असावा, यासाठी शिक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केले; पण शाळा प्रवेशाचा...
  June 17, 03:37 AM
 • हुक्का पार्लरमध्ये पकडण्यात आलेल्या तरुण-तरुणींच्या पालकांबरोबर पत्रव्यवहार करून त्यांच्या मुलांविषयी माहिती देण्यात येईल. या तरुणांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावर कारवाई टाळली जाणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी दिली.याप्रकरणी पार्लर मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध धूम्रपान कायद्यान्वये कारवाई केली जाणार आहे. हुक्का पार्लरमधून ताब्यात घेतलेल्या 68 तरुणांना ताकीद देऊन सोडून देण्यात येईल. ज्या पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पार्लर सुरू होते त्या...
  June 17, 03:32 AM
 • राज्यातील मुख्याधिकारी संवर्गातील 80 मुख्याधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून, यामध्ये महानगरपालिकेचे उपायुक्त संतोष खांडेकर आणि सहायक आयुक्त अलका इंगोले यांचाही समावेश आहे. मुख्याधिकार्यांच्या बदलीमुळे रिक्त राहणार्या पदाचा अतिरिक्त कार्यभार जवळपासच्या नगर परिषद मुख्याधिकार्याकडे किंवा महसूल अधिकार्याकडे सोपविणार असल्याचे अवर सचिव कैलास गायकवाड यांनी दिला आहे. खांडेकर यांची आता र्शीरामपूर आणि अलका इंगोले यांची वैजापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली आहे....
  June 17, 03:22 AM
 • औरंगाबाद जिल्हा पॉवरलिफ्टिंग संघटनेच्या वतीने आयोजित मराठवाडास्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा उद्या, शनिवारी सकाळी ११ वाजता बालाजी मंगल कार्यालयात होत आहे.स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी कुणाल कुमार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी जिल्हा संघटनेचे अध्यक्ष त्र्यंबक तुपे, सचिव जसप्रीतसिंग भाटिया, डॉ. पवन डोंगरे अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेत मराठवाड्यातून १४० खेळाडू सहभागी होतील.जिल्ह्याबाहेरील खेळाडूंची राहण्याची मोफत व्यवस्था बालाजी मंगल कार्यालयात संघटनेच्या...
  June 17, 02:55 AM
 • महात्मा गांधी मिशनच्या क्रीडा विभागातर्फे अंकुशराव कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तिस-या खुल्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात संदीप सौदरने कडुबा चोपडेला नमवत विजेतेपद पटकावले.स्पर्धेत १२० कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला. विजेत्या खेळाडूंना द्वारकाभाऊ पाथ्रीकर यांच्या हस्ते रोख बक्षिसे देण्यात आली. याप्रसंगी डॉ. हंसराज डोंगरे, एस. पी. तळेगावकर, डॉ. शेखर शिरसाठ, डॉ. उदय डोंगरे, दिनेश वंजारे, संग्राम देशमुख, प्रा. सदाशिव झवेरी आदींची उपस्थिती होती.पंच म्हणून बबू येळीकर,...
  June 17, 02:52 AM
 • बजाजनगर कामगार वसाहतीतील भाजीमंडईच्या गाळ्यांमध्ये मजुरांनी बेकायदेशीर वास्तव्य केले आहे. मजूर रात्री दारू पिऊन भांडण करीत असल्याने रहिवासी त्रस्त झाले आहेत. भाजीमंडईतील गाळ्यांतून त्यांना बाहेर काढून भाजीमंडई सुरू करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. वाळूज औद्योगिक विकास महामंडळातर्फे १५ वर्षांपूर्वी भाजीमंडईचे बांधकाम करण्यात आले. कामगारवर्गाच्या सोयीसाठी ४० ओटे व २० गाळे बांधून मंडई उभारण्यात आली. महामंडळाने मोठ्या व्यक्तींना गाळे दिले. जास्त भाडे पदरात पडावे...
  June 17, 02:41 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात