Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • खुलताबाद- तालुक्यातील गल्लेबोरगाव येथील एका पंचवीस वर्षीय अविवाहित तरुणाने मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव किशोर शिवाजी हारदे (२५) असे आहे. तरुणाने आत्महत्या केली नसून खून आहे आणि तो खून सरकारने केला. मराठा आरक्षण लवकर दिले असते तर मी आत्महत्या केली नसती असा मजकूर लिहून चिठ्ठीद्वारे सरकारला संदेश दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आत्महत्याचे सत्र अद्याप सुरूच असून...
  September 12, 07:42 AM
 • पुणे/औरंगाबाद - कॉसमॉस बँकेवरील ऑनलाइन दरोड्याप्रकरणी चतुःशंृगी पोलिसांनी भिवंडी आणि औरंगाबाद येथून दोघांना ताब्यात घेतले आहे. या दोघांनी बनावट डेबिट कार्डद्वारे कोल्हापूर येथील विविध एटीएममधून ८९ लाख ४७ हजार ५०० रुपये काढल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. न्यायालयाने दोघांना सात दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. फहिम मेहफूज शेख (२७, रा. नूरानी कॉम्प्लेक्स, भिवंडी), फहिम अझीम खान (३०, रा. सीमा हॉस्पिटलच्या मागे, औरंगाबाद) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी इतर पाच...
  September 12, 06:54 AM
 • औरंगाबाद- ऑगस्टच्या मध्यात राज्याला चिंब करून पाऊस गायब झाला आहे. सध्या नैऋत्य मान्सूनचा आस उत्तरेकडे असून अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागरातही मान्सूनला अनुकूूल हालचाली नाहीत. त्यामुळे परतीचा मान्सून लांबला आहे. राज्यात बहुतांश भागात १८ ऑगस्टनंतर दमदार पाऊस झालेला नाही. पावसात २४ दिवसांचा खंड पडल्याने खरिपातील पिके कोमजू लागली आहेत. राज्यातील १० जिल्ह्यांत पावसाची मोठी तूट पडली असून या जिल्ह्यांत दुष्काळसदृश स्थिती आहे. राज्यावर दुष्काळी ढगाचे मळभ दाटू लागले आहे. त्यातच...
  September 12, 06:18 AM
 • औरंगाबाद- घरगुती वादातून कडाक्याचे भांडण झाल्यानंतर थोरला भाऊ रेल्वेखाली जीव देण्यासाठी गेला. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या धाकट्या भावाला रेल्वेचा धक्का लागला. यात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास मुकुंदवाडी परिसरातील रेल्वे गेट क्र. ५६ जवळ घडली. जयेश मिलिंद बागुल (२५) आणि आकाश मिलिंद बागुल (२०, दोघे रा. राजनगर, मुकुंदनगर, मुकुंदवाडी) अशी दोघांची नावे आहेत. मुकुंदनगरातील जयेश आणि आकाश हे दोघेही आई-वडिलांसोबत राजनगरात राहतात. जयेश विवाहित आहे....
  September 11, 10:30 AM
 • औरंगाबाद- केवळ मराठवाडाच नव्हे, तर विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयातील सीटी स्कॅन यंत्रे ६५ लाखांच्या थकबाकीसाठी आठ दिवसांपासून बंद पडली आहेत. एवढी रक्कम घाटी प्रशासनाच्या तिजोरीत नसल्याने यंत्रे तातडीने सुरू होणे अशक्य आहे. दुसरीकडे आठपैकी सात व्हेंटिलेटर्स बंद पडले असून दोन महिन्यांपासून पोलिओ डोसचा एक थेंबही नाही. काविळीची लसही संपण्याच्या मार्गावर आहे. घाटीमध्ये ६४ स्लाइसचे एक आणि ६ स्लाइसचे एक सीटी स्कॅन अशी दोन यंत्रे आहेत. ६४...
  September 11, 10:21 AM
 • औरंगाबाद- ४ सप्टेंबरला मनपा सभेने समांतर जलवाहिनी पुनरुज्जीवित करण्यासाठी त्याच कंपनीसोबत करार करण्यासाठी प्रस्ताव मंजूर केला. तो सोमवारी (१० सप्टेंबर) राज्य शासनाकडे रवाना झाला आहे. तेथे आता कंपनीसोबत करावयाच्या कराराचा अंतिम मसुदा तयार केला जाईल. त्यानंतर तो मसुदा पुन्हा मान्यतेसाठी मनपाकडे येईल आणि त्यावर सहमती झाल्यानंतर ठेकेदार कंपनीशी नव्याने करार होईल. मगच समांतर प्रकल्पाचे काम सुरू होऊ शकेल. प्रशासनाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात प्रस्ताव सभेसमोर पाठवला होता. ४...
  September 11, 09:39 AM
 • अाैरंगाबाद- पेट्रोल-डिझेलची वाढती दरवाढ आणि महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसने पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. ऑगस्टमध्ये मराठा आरक्षणासाठी आंदोलने होत राहिल्याने सातत्याने बाजारपेठा बंद राहिल्या. त्यातच आता उत्सवांना सुरुवात झाल्याने व्यापाऱ्यांसह नागिरकांनीही बंदला फारसे प्राधान्य दिले नाही. विशेष म्हणजे काँग्रेस नेत्यांनीही बंद करण्यासाठी अधिक जोर दिला नाही. त्यामुळे आजच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. लातूर : पेट्रोलपंप बंद, आमदारांनी दिली फुले...
  September 11, 07:42 AM
 • औरंगाबाद- बॉलीवूडमधील दिग्गज चित्रपट निर्मात्यांनी माझ्या कथा चोरुन चित्रपट बनवल्याचा दावा करीत औरंगाबाद येथील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांनी सुभाष घई, आमिर खान, राकेश मेहरा, रॉनी स्क्रूवाला यांच्यावर फौजदारी खटला दाखल केला आहे. 7 सप्टेंबर रोजी बॉलीवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांना अजामीन पात्र वॉरंट रद्द करण्यासाठी औरंगाबाद जिल्हा कोर्टात हजर व्हावे लागले होते. या घटनेमुळे औरंगाबादमधील कथा लेखक मुश्ताक सिद्धीकी यांचे नाव बहुतांश लोकांना प्रथमच समजले. सिद्धीकी...
  September 10, 04:23 PM
 • औरंगाबाद- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाने जिल्ह्यातील पाच गावे आदर्श ग्राम करण्यासाठी दत्तक घेतली आहेत. गेवराई कुबेर, करोडी साजापूर, चोंदपूर, मावसाळा, चिंचोली बुद्रुक अशी या गावांची नावे आहेत. लोकसहभागातून या गावांत संपूर्ण सुविधा देऊन शाश्वत विकास करण्याचा संकल्प विद्यापीठाने केला आहे. विशेष म्हणजे, दिल्ली येथील आयआयटीनेही याच गावांची निवड केली असून त्यांनीही निधी देऊन हीच पाच गावे दत्तक घेतली आहेत. युनिव्हर्सिटी फॉर सोसायटी हे ब्रीद...
  September 10, 10:41 AM
 • औरंगाबाद- इंधन दरवाढीविरोधात पुकारलेल्या भारत बंदच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पदाधिकारी सोमवारी शहरातील १२ पेट्रोल पंपांवर निदर्शने करणार आहेत. सोमवारी सकाळी १०.३० ते १२.३० दरम्यान क्रांती चौक, राज, बाबा, हर्सूल यासह शहरातील प्रमुख पेट्रोल पंपांवर हे आंदोलन करण्यात येणार आहे. यात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेस शहराध्यक्ष नामदेव पवार यांनी केले आहे. महागाईविरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंद पुकारला आहे. सकाळी ९ ते ३ वाजेपर्यंत हा बंद असणार आहे. यात व्यापाऱ्यांनाही सहभाग...
  September 10, 10:38 AM
 • औरंगाबाद- शहराच्या काही भागात कचरा वर्गीकरणासह वॉर्डातच प्रक्रिया केली जाते. परंतु, अनेक वॉर्डांत मोठ्या प्रमाणात कचरा पडून आहे. रविवारी तो उचलण्यात आला नाही. गणेशोत्सव तीन दिवसांवर आला असताना शहराच्या विविध भागात एक हजार टन कचरा पडून आहे. तो दोन दिवसांत हटवण्याच्या सूचना महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिल्या आहेत. दरम्यान, पॅचवर्कची कामे दर्जेदार व्हावी, अशी तंबीही त्यांनी दिली असून दर्जा तपासूनच या कामांची बिले दिली जातील, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. दोन दिवसांपासून हर्सूल येथील...
  September 10, 09:53 AM
 • औरंगाबाद- शेंद्रा-बिडकीन डीएमआयसीत रशिया, जपान आणि चीन या तीन देशांनी गुंतवणूक केली आहे. रशिया उच्च दर्जाचा स्टील उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. जपान प्री-कास्ट आयर्न तयार करणार आहे तर चीन वैद्यकीय उपकरणांचा उत्पादन प्रकल्प सुरू करणार आहे. रविवारी (९ सप्टेंबर) सकाळी यावर अंतिम निर्णय झाला. तीन दिवसांपूर्वी (७ सप्टेंबर) डीएमआयसीच्या ऑरिक या शेंद्रा बिडकीन प्रकल्पाचे महाव्यवस्थापक गजानन पाटील शहरात आले होते. त्यांनी या तीन देशांनी गुंतवणूक केल्याचे सांगितले. मात्र याबाबतची बोलणी बाकी...
  September 10, 06:57 AM
 • औरंगाबाद- मराठवाड्यात पोळा सण हर्षोल्हासात साजरा केला जात असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात ऐन पोळ्याच्या दिवशी सहा जणांचा तर हिंगोली जिल्ह्यात एकाचा बैलांना अंघोळ घालताना बुडून मृत्यू झाला. यात दोघा सख्ख्या भावांचाही समवेश आहे. वैजापूर तालुक्यातील वीरगाव शिवारात रविवारी दुपारी ऋषिकेश रमेश रायते (१८) व अमोल रमेश रायते (१६ वर्षे, रा.वीरगाव) हे सख्खे भाऊ बैलांना अंघोळ घालण्यासाठी वीरगाव परिसरातील कापूसवाडगाव रोडवरील गायरान परिसरातील गाव तलावावर घेऊन गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास...
  September 10, 06:52 AM
 • औरंगाबाद - कावड यात्रा आणि दहीहंडीदरम्यान ध्वनिप्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवून डीजे वाजवणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचाही समावेश आहे. गणेशोत्सवात गुन्हे दाखल न करता डीजेला थोडे अॅडजस्ट करा, अशी विनंती खासदार चंद्रकांत खैरे यांनी गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त संत तुकाराम नाट्यगृहात आयोजित शांतता समितीच्या बैठकीत शनिवारी (९ सप्टेंबर) केली. त्यावर पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद म्हणाले, डीजेपेक्षा पारंपरिक वाद्यांचा...
  September 9, 12:48 PM
 • औरंगाबाद - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदचा आधार घेत ९ ऑगस्ट रोजी समाजकंटकांनी वाळूज एमआयडीसीतील ७० कंपन्यांत हैदोस घातला. यामुळे उद्योगजगतात तीव्र पडसाद उमटले होते. या घटनेला ९ सप्टेंबर रोजी महिना पूर्ण होत आहे. यानिमित्ताने दिव्य मराठीच्या चमूने तेथील स्थितीचा आढावा घेतला. महिनाभरात वाळूजमधील कारखाने पूर्वपदावर आले असून शिफ्टही नियमित सुरू झाल्या आहेत. दंगलीची चर्चा मात्र अजून कायम आहे. दरम्यान, संघटना आणि पोलिसांनी तोडफोड करणारे आंदोलक नसल्याचे स्पष्ट केले. मग तोडफोड...
  September 9, 11:31 AM
 • मुंबई- वाळूज परिसरातील मंदिराचे अतिक्रमण पाडण्यासाठी गेलेले तहसीलदार रमेश मुनलाेड व अतिक्रमणविराेधी पथकास धमकावल्याप्रकरणी शिवसेनेचे स्थानिक खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य सरकारने केली अाहे. विधी व न्याय विभागाकडून ही माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात अाली. सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशानुसार अाैरंगाबाद परिसरात बेकायदा उभारण्यात अालेल्या प्रार्थनास्थळांचे बांधकाम हटवण्याचे काम हाती घेण्यात अाले हाेते. २९ अाॅक्टाेबर २०१५ राेजी वाळूज...
  September 8, 09:27 AM
 • मुंबई- राज्य सरकारने ४३८.४४ कोटी रुपयांच्या म्हैसमाळ, वेरुळ- खुलताबाद आणि शूलिभंजन विकास आराखड्यास मान्यता दिली आहे. या आराखड्यातील कामे वेगाने पूर्ण होण्यासाठी पर्यटन विकास महामंडळाने ५० कोटी रुपयांचा तर वन विभागाने २ कोटी रुपयांचा निधी तत्काळ उपलब्ध करून द्यावा, असे आदेश अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. औरंगाबाद जिल्हा देश-विदेशातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र असून येथे येणाऱ्या पर्यटकांना दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा निधी दिला जाणार...
  September 8, 09:27 AM
 • औरंगाबाद- शहर आणि वाळूज एमआयडीसी येथे गेल्या काही महिन्यांत झालेल्या दंगलींचा उद्योग जगतावर प्रतिकूल परिणाम झाला आहे. या घटनांचा थेट स्वरूपात परिणाम सांगता येणार नाही. मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चा त्याची होते. असे प्रकार होऊ नयेत यासाठी स्थानिक पातळीवर विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र सेल तयार करण्यात येणार आहे. त्यात पोलिस, स्थानिक स्वराज संस्था, लोकप्रतिनिधी आणि उद्योजकांचा समावेश असेल. हा सेल सर्व व्यवस्थेचा सातत्याने आढावा घेत राहील, अशी माहिती डीएमआयसीचे...
  September 8, 09:18 AM
 • औरंगाबाद- अनधिकृत बांधकामाचे जप्त केलेले साहित्य जप्त परत देण्यासाठी आणि बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी मागितलेल्या ७५ हजार रुपयांपैकी ५० हजारांची लाच कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२) याच्यामार्फत स्वीकारताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) यांना दुबेसह अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) महापालिकेतच सापळा रचून दुपारी सव्वातीन वाजता ही कारवाई केली. तक्रारदाराच्या मुलीने बीड बायपासच्या शहानगरमध्ये प्लॉट...
  September 8, 09:06 AM
 • औरंगाबाद- देशातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेणींचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होत असले तरी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ( एएसआय) येथील प्रवेश तिकिटात दुपटीहून अधिक वाढ केली असताना त्या तुलनेत सुविधांचा मात्र अभाव असल्याची तक्रार विदेशी पर्यटक करत आहेत. या ठिकाणी चांगले स्वच्छतागृह, आरामकक्ष, माहिती फलक, ऑडिओ गाइड, अपंगासाठी सेवा आणि विक्रेत्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी, अशी परदेशी पर्यटकांची अपेक्षा आहे. भारतातील प्राचीन...
  September 7, 09:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED