Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- अनधिकृत बांधकामाचे जप्त केलेले साहित्य जप्त परत देण्यासाठी आणि बांधकाम पुन्हा सुरू करण्यासाठी मागितलेल्या ७५ हजार रुपयांपैकी ५० हजारांची लाच कंत्राटी दुय्यम आवेक्षक सचिन श्रीरंग दुबे (३२) याच्यामार्फत स्वीकारताना महापालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख छबूलाल म्हातारजी अभंग (५५) यांना दुबेसह अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) महापालिकेतच सापळा रचून दुपारी सव्वातीन वाजता ही कारवाई केली. तक्रारदाराच्या मुलीने बीड बायपासच्या शहानगरमध्ये प्लॉट...
  September 8, 09:06 AM
 • औरंगाबाद- देशातील उत्कृष्ट पर्यटनस्थळांपैकी एक असलेल्या अजिंठा आणि वेरूळच्या लेणींचे संवर्धन चांगल्या पद्धतीने होत असले तरी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने ( एएसआय) येथील प्रवेश तिकिटात दुपटीहून अधिक वाढ केली असताना त्या तुलनेत सुविधांचा मात्र अभाव असल्याची तक्रार विदेशी पर्यटक करत आहेत. या ठिकाणी चांगले स्वच्छतागृह, आरामकक्ष, माहिती फलक, ऑडिओ गाइड, अपंगासाठी सेवा आणि विक्रेत्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळावी, अशी परदेशी पर्यटकांची अपेक्षा आहे. भारतातील प्राचीन...
  September 7, 09:36 AM
 • औरंगाबाद- रेल्वे स्टेशनवरून सिडको बसस्थानकाकडे जाण्यासाठी रिक्षात बसलेल्या वकिलाला रिक्षाचालकाने रेल्वे स्टेशन एमआयडीसीत निर्मनुष्य परिसरात नेऊन गळ्याला चाकू लावत लुटले. ५ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजता अॅड. काझी मोहसीन अहेमद मंजूर अहेमद (३५) यांच्यासोबत हा प्रकार घडला. काझी खंडपीठात वकील म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी त्यांना रात्री सिडको बसस्थानकावरून बसने गावी जायचे होते. बीडबायपास येथील पटेल लाॅन्सच्या मागे राहत असल्याने ते पायी रेल्वेस्थानक परिसरात आले. तेथून ते...
  September 7, 09:28 AM
 • औरंगाबाद- बीड बायपास रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून गुरुवारी सकाळी पावणे दहा वाजेच्या सुमारास सहारा सिटीमध्ये जाण्यासाठी बायपासवरून वळण घेत असलेल्या दुचाकीस्वार मजुरास देवळाई चौकाच्या दिशेने भरधाव जाणाऱ्या स्कॉर्पिओने उडवले. स्कॉर्पिओ एवढी वेगात होती की, तिने दुुचाकीस्वारास दूरवर फरपटत नेले. त्यामुळे मजुराचा जागीच मृत्यू झाला. फरपट नेल्यामुळे दुचाकीचे इंजिनही फुटले. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक गाडी सोडून फरार झाला. मुकुंदवाडीच्या शिवशाही नगरमधील भगवान गंगाधर शेळके (४४) चार...
  September 7, 09:06 AM
 • औरंगाबाद- कथाचोरीच्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावताच प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक रामगोपाल वर्मा गुरुवारी तीन वकिलांसह जिल्हा न्यायालयात हजर झाले. याप्रकरणी यांनी औरंगाबादचे कथालेखक मुश्ताक मोहसीन सिद्दिकी यांनी कोर्टात धाव घेतली आहे. आपली कथा चोरून वर्मा यांनी कॉपीराइट कायद्याचा भंग केल्याचा दावा त्यांनी केला अाहे. जिल्हा न्यायालयात हजर झाले. न्यायालयाने वॉरंट रद्द केल्यानंतर बाहेर पडताच सेल्फीसाठी चाहत्यांनी गराडा घातला. गर्दीतून वाट काढत कुणालाही न बोलता वर्मा...
  September 7, 08:47 AM
 • पैठण- पैठण तालुक्यातील गोपेवाडी शिवारात आनंदपूर येथे बिबट्याच्या हल्ल्यात भारत मुरलीधर ठाणगे (वय ५६) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ठाणगे हे गुरूवारी सायंकाळी उसाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. याच दरम्यान शेतवस्तीवर बिबट्या अाल्याची माहिती अन्य गावातील एका शेतकऱ्याने लाेकांना दिली. त्यामुळे सुमारे ५० लाेकांचा जमाव शेतवस्तीवर गेला. तिथे त्यांना भारत ठाणगे हे मृतावस्थेत आढळून आले. हा मृतदेह गावात नेण्यासाठी ग्रामस्थ वाहन अाणण्यासाठी जात असताना बिबट्याने पुन्हा येऊन मृतदेह अाेढत...
  September 7, 06:45 AM
 • फुलंब्री (औरंगाबाद) - बोरगाव अर्ज परिसरात कौटुंबिक वादातून एका ग्रामस्थाने आपल्या पत्नीला बेदम मारहाण करून तिला जीवे मारले. आळंद येथून जवळ असलेल्या नायगव्हाण (ता.फुलंब्री) येथील शेतवस्तीवर बुधवारी (5 सप्टेंबर) मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. कांताबाई दादाराव दाढे (30) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून आरोपी पती दादाराव दाढे याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायगव्हाण येथील शेतवस्तीवर राहणाऱ्या दादाराव आण्णा दाढे हा आपली पत्नी कांताबाई, दोन मुली आणि...
  September 6, 04:45 PM
 • औरंगाबाद- दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर गुरुवार, ६ सप्टेंबर रोजी औरंगाबादहून हैदराबादला जाणारे ट्रू-जेट कंपनीचे विमान उड्डाण घेणार आहे. कंपनीने २७ ऑगस्टपासून ऑपरेशनल रीझन हे कारण देत हे विमान बंद ठेवले होते. गुरुवारी संध्याकाळी ७:४५ वाजता विमान औरंगाबादेत येईल, तर ८:१० वाजता हैदराबादला उड्डाण परतीच्या प्रवासासाठी उड्डाण करेल. डीजीसीएकडून वर्षातून एकदा विमानांची तांत्रिक चाचणी घेतली जाते. यात विमान उड्डाण करण्यास योग्य आहे की नाही हे बघितले जाते. यंदा या चाचण्या लांबल्यामुळे तब्बल...
  September 6, 10:48 AM
 • औरंगाबाद- गुलमंडीवर आयोजित दहीहंडी महोत्सवात सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले ध्वनिप्रदूषणाबाबतचे नियम मोडणाऱ्या शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध सिटी चौक पोलिसांनी गुन्हे दाखल केले. शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जैस्वाल आणि भाजप शहराध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्या पुढाकाराने गुलमंडी येथे दरवर्षी दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या वर्षीही हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. मंगळवारी या दोन्ही महोत्सवांच्या आयोजनात ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची सर्रास पायमल्ली...
  September 6, 10:39 AM
 • औरंगाबाद- गल्लीत उभा राहून कायम शिव्या देतो, काहीही बडबडतो म्हणून सख्ख्या आईनेच तरुण मुलाचा खून केल्याचा प्रकार समोर आला आहे. पाच महिने तपास करून सिडको पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. राहुल दिलीप बनसोडे (२८, रा. आंबेडकरनगर) असे मृताचे नाव आहे. राहुलची आई कमलाबाई दिलीप बनसोडे, खिरणाबाई जगन्नाथ गायकवाड, सुनीता राजू साळवे आणि रिक्षाचालक इंद्रजित हिरामण निकाळजे या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. १८ एप्रिल रोजी साडेदहा वाजता जाधववाडी मोंढा येथे जुन्या पडक्या विहिरीत राहुलचा...
  September 6, 10:37 AM
 • औरंगाबाद- महापौर नंदकुमार घोडेले यांनी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या सांगण्यावरून २७ ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत समांतरला रिझर्व्ह फॉर जजमेंट केल्याचे समजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भडकले होते. खैरेंना नको असेल तर राहू द्या असे वक्तव्य त्यांनी केले होते. मंगळवारच्या सभेत हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आमदार अतुल सावे, मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शिवसेनेच्या महापौरांनी प्रस्ताव मंजूर...
  September 6, 09:59 AM
 • औरंगाबाद- लग्नाचे आमिष दाखवून उदय राजपूत (वय २५, रा.वैजापूर, जि.औरंगाबाद) याने सिडकोतील २२ वर्षीय तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार २०१४ ते ३१ ऑगस्ट २०१८ दरम्यान घडला असल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. आरोपी राजपूत याने पीडितेस वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यादरम्यान पीडितेस गर्भधारणा झाली असता, आरोपी राजपूत याने पीडितेस गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला होता. पीडितेने लग्नासाठी तगादा लावला असता राजपूतने तिला जातिवाचक...
  September 5, 10:31 AM
 • औरंगाबाद- शहरातील प्रत्येक मोठ्या प्रकल्पाच्या कोर्ट-कचेऱ्या झाल्या असून आता त्यात भूमिगत गटार योजनेचीही भर पडण्याची शक्यता आहे. खिल्लारी इन्फ्रास्ट्रक्चर या भूमिगतच्या ठेकेदार कंपनीने महापालिकेला वकिलामार्फत नोटीस बजावून हा करार संपुष्टात आणण्यास सांगितले आहे. थकबाकीची सर्व रक्कम १५ दिवसांत अदा करावी, तसे न झाल्यास पुढे कायदेशीर मार्गाने कंपनी जाईल, असे नोटिसीत म्हटले आहे. म्हणजेच पंधरा दिवसांनी ठेकेदार कंपनी न्यायालयात जाणार हे स्पष्ट केले आहे. दरम्यान, महापालिकेला नोटीस...
  September 5, 09:54 AM
 • औरंगाबाद- गावात एखादवेळी शेजाऱ्यांसोबत भांडण झाले तर मोठे बोलत नाहीत, मग आपणही बोलायचे नाही अशी भूमिका अनेकदा लहान मुले घेतात. मात्र गावातील शिक्षकांनी सुरू केलेल्या मूल्य वर्धन उपक्रमामुळे मुलांमध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता रुजली आहे. एवढेच नव्हे तर मुलांमधील या बदलांमुळे गावकरी देखील शिक्षकांना शाळेच्या विकासासाठी सहकार्य करत आहेत. हा कायापालट झाला आहे औरंगाबादपासून ३२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कचनेर केंद्रातील खोडेगावच्या जिल्हा परिषद शाळेत. आज खास शिक्षक...
  September 5, 08:00 AM
 • औरंगाबाद- जुलै २०१६ मध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने रद्द केलेल्या समांतर प्रकल्पाच्या कराराचे पुनरुज्जीवन करण्याचा ठराव मंगळवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केला. राज्य सरकारने समांतर प्रकल्पाचा वाढीव खर्च आणि जीएसटीचे मिळून २७९ कोटी रुपये देण्याचे हमीपत्र दिल्याशिवाय हा प्रस्ताव मंजूर करणार नाही, असे सांगून मागच्या सभेत महापौर नंदकुमार घोडेले यांनी हा ठराव रिझर्व्ह फॉर जजमेंट ठेवला होता. परंतु मंगळवारी राज्य सरकारने कोणतीही हमी दिली नसतानाही हा ठराव मंजूर...
  September 5, 05:54 AM
 • औरंगाबाद- घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार राज्याचे धोरण निश्चित न केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह काही राज्यांत धोरणनिश्चितीपर्यंत बांधकामास बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सोमवारपासून नवीन बांधकामांना परवानगी देणे बंद केले आहे. त्यामुळे शहरातील १५ लाख फुटांपर्यंतची नवीन बांधकामे प्रभावित होणार असून तब्बल दीड लाख रोजगारांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो. महानगरपाालिकेला अद्यापपर्यंत कोणतेही लेखी आदेश प्राप्त झालेले नाहीत. मात्र...
  September 4, 09:59 AM
 • औरंगाबाद- समांतर जलवाहिनी योजनेचे काम औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीमार्फतच पुन्हा सुरू करावे. त्यासाठी कंपनीला राज्य शासनामार्फत २८९ कोटी रुपये देऊन न्यायालयाबाहेर तोडगा काढावा, या प्रशासकीय प्रस्तावावर ४ सप्टेंबर रोजी होणारी मनपाची सर्वसाधारण सभा पुन्हा पुढे ढकलण्याच्या हालचाली सोमवारी दिवसभर सुरू होत्या. शासनाने २८९ कोटींचे हमीपत्र द्यावे, असे म्हणून महापौर नंदकुमार घोडेले यांनी २७ ऑगस्टला सभा तहकूब केली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खैरेंना नको असेल तर राहू...
  September 4, 09:50 AM
 • औरंगाबाद- स्मार्ट सिटी प्रकल्पातून शहरात सिटी बससेवा सुरू करण्यासाठी बस खरेदीची प्रक्रिया सुरू केली असून टाटा कंपनीला हे काम दिले. दोन दिवसांपूर्वी कंपनीने मनपाला १० कोटी ५२ लाख रुपयांची बँक गॅरंटी दिली आहे. यात करारानुसार ९ कोटी १० लाख रुपये एसबीआय बँकेची, तर १ कोटी ४२ लाख रुपयांची सेवा हमीची आयसीआयसी बँकेची गॅरंटी दिली. त्यानंतर मनपाकडून बस खरेदी करण्यासाठी कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुुरू केली. शहरात टप्प्याटप्प्याने १०० सिटी बस सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी आजवर तीन...
  September 4, 09:42 AM
 • औराळा, लासूर स्टेशन- कन्नड तालुक्यातील चापानेर येथील सहकारमहर्षी लोकनेते स्व. नारायणराव पवार यांचे भाऊ महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघ पुणे चे माजी संचालक कृषिभूषण वसंतराव बाजीराव पवार यांचे दीर्घ आजाराने (६२) औरंगाबाद येथील कमलनयन बजाज हॉस्पिटलमध्ये सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजता उपचारादरम्यान निधन झाले. कृषिभूषण वसंतराव पवार यांनी विविध पदे भूषवली ते १९९७ ला कन्नड सहकारी साखर कारखान्याचे संचालक झाले. २००५- २०१० मध्ये ते औरंगाबाद जिल्हा भू-विकास बँकेचे संचालक होते. २००५-२०१०...
  September 4, 06:25 AM
 • औरंगाबाद- राज्यात पावसाळ्यात जून ते ३ सप्टेंबर या ९४ दिवसांपैकी सरासरी ४८ दिवसांचा खंड पडल्याने खरीप संकटात आला आहे. जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये राज्यातील बहुतेक भागात १५ ते १७ दिवसांचे दीर्घ खंड पडल्याने पिकांच्या उत्पादनात २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. या तिन्ही महिन्यांत पावसाचे वितरण असमान राहिल्याने पिकांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे कृषितज्ज्ञांचे मत आहे. राज्यात १५ ते १८ ऑगस्ट अशी सर्वदूर हजेरी लावून पावसाने आजवर दडी मारली आहे. यामुळे राज्यातील १२ जिल्ह्यांत...
  September 4, 06:06 AM
 
जाहिरात

RECOMMENDED