जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद -दूध भुकटीच्या दरात वाढ झाल्यामुळे आता राज्य शासन दुधाचे अनुदान बंद करण्याच्या विचारात आहेत. आठवडाभरात याबाबतची अधिसूचना निघण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षभरापासून शेतकऱ्यांना प्रतिलिटर दुधामागे पाच रुपये अनुदान मिळायचे. अाता दूध अनुदान बंद केले तरी दूध उत्पादकांना मिळणाऱ्या दरामध्ये बदल होणार नाही. किमान २५ रुपये प्रतिलिटरप्रमाणेच खरेदीचा शासन आदेश देणार असल्याची माहिती दुग्धविकास विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. मागील वर्षी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी राज्यभर दरवाढीसाठी...
  June 8, 09:43 AM
 • वैजापूर -भीषण दुष्काळी परिस्थितीत जनावरांची आबाळ रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी ती संरक्षित चारा छावणीत ठेवली खरी. परंतु, खंडाळा येथील चारा छावणीत चारा पाणी, सावलीच्या निष्काळजीपणामुळे दोन दुभत्या गायी व तीन वासरे अशा पाच जनावरांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान,तालुका प्रशासनाच्या कचेरीत पशुवैद्यकीय विभागाने जनावरे मृत झाल्याचा पाठवलेला अहवाल पोहचला नसल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले. त्यामुळे हा अहवाल हरवला की दडपला अशी चर्चा आहे. खंडाळा येथे पैठण तालुक्यात बालानगर येथील संत...
  June 7, 08:57 AM
 • औरंगाबाद -नैऋत्य मोसमी वारे सध्या केरळच्या दक्षिणेला दाखल झाले अाहेत. मात्र मान्सून कमिंग सून सुरूच असून येत्या ८ जूनपर्यंत मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. यापूर्वी मान्सून ६ जूनपर्यंत केरळात येईल असे आयएमडीने म्हटले होते. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी बुधवारी श्रीलंका देशाचा निम्मा भाग व्यापत कामोरीन आणि मालदीव बेटांपर्यंत प्रगती केली. गुरुवारी मान्सून याच जागी होता. मात्र, दक्षिण भारतात हवेच्या मधल्या थरात पूर्व-पश्चिम हवेचे जोड...
  June 7, 08:52 AM
 • औरंगाबाद -२०२२ पर्यंत सर्वांना हक्काचे घर असे सरकारचे उद्दिष्ट असले तरी त्यात अडसर आणण्याचे काम योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणाच करत आहे. राज्यात इंदिरा आवास योजना आणि प्रधानमंत्री घरकुल योजना राबवणारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजेच डीआरडीएने या याेजनेसाठी आलेल्या निधीची मनमानी पद्धतीने उधळण केली आहे. विमान प्रवास, पाहणी दौरे, चहा-नाष्टा आणि जेवणावळीवर कोट्यवधी रूपयांचा खर्च झाला. तर कायद्यात तरतूद नसताना घरकूलचा निधी इतरत्र वळवण्यात आला. यामुळे योजना अर्धवटच राहिली....
  June 7, 08:44 AM
 • गंगापूर -अल्पवयीन मुलीचे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत बलात्कार करून ब्लॅकमेल करणाऱ्या आरोपीस गंगापूर पोलिसांनी अटक केली आहे. कानडगाव येथील आरोपी ज्ञानेश्वर शेषराव सोलट (२१) याने १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला १५ फेब्रुवारी २०१९ रोजी शाळेचे स्नेहसंमेलन संपल्यानंतर शाळेतील खोलीत बळजबरीने ओढून तिचा विनयभंग करून त्याचे मोबाइलवर फोटो काढले होते. त्यानंतर मुलीचे आईवडील ऊसतोडणीला गेले असता मार्च महिन्यामध्ये आरोपी ज्ञानेश्वर सोलाटने रात्री घरात प्रवेश करून फोटो व्हायरल...
  June 6, 09:53 AM
 • फुलंब्री -तालुक्यातील वारेगावात व शेतवस्तीवर चोरट्यांनी धुमाकूळ घालून एक लाख रुपयांच्या रोख रकमेसह पावणेतीन तोळ्यांचे दागिने मंगळवारी मध्यरात्रीनंतर पळवले. बुधवारी पहाटे ही घटना उघडकीस आली. चोरट्याला शोधण्यासाठी श्वान पथकालाही पाचारण केले होते. मात्र, घराच्या परिसरातील दोन किमी अंतरावर जाऊन श्वान घुटमळल्याने त्याला माग काढता आला नाही. याबाबत कडुबा कुशाबा मोरे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारेगावपासून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील...
  June 6, 09:41 AM
 • औरंगाबाद | दुष्काळामुळे गावखेड्यात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. पण टँकर कधी येईल याचा नेम नाही. आले तरी फारतर ड्रमभरच पाणी मिळते. हाताला काम नसल्याने पाणी विकत घेणे परवडत नाही. अशा गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी गावागावात जलदूत अवतरले आहेत. माणुसकीचा दुष्काळ टाळत त्यांनी स्वत:च्या मालकीच्या बोअर आणि विहिरीतील पाणी ग्रामस्थांना विनामूल्य उपलब्ध करून दिले आहे. काही गावात तर ही मंडळी सर्व कामे सोडून दिवसभर पाणी वाटप करताना दिसत आहेत. जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील देवगाव...
  June 5, 09:37 AM
 • आैरंगाबाद - राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा आॅनलाइन निकाल जाहीर झाला. यात विनायक मुकुंद गाेडबाेले (पीसीबी) हा खुल्या गटातून, तर नांदेड जिल्ह्यातील आदर्श मुकुंद अभंग (पीसीएम) हा राखीव गटातून १०० पर्सेंटाइल घेत राज्यात सर्वप्रथम आला. तर पीसीएममध्ये खुल्या गटातून अमन जितेंद्र पाटील व मुग्धा महेश पाेखरणकर यांनी ९९.९९ पर्सेंटाइल मिळवले. गीतांजली शहाजी वारंगुळे ही मुलगी...
  June 5, 09:09 AM
 • औरंगाबाद -कठोर कायदे आणि कडक निगराणी ठेवूनही शैक्षणिक संस्थांमध्ये होणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांच्या रॅगिंगच्या प्रकरणांत गेल्या ७ वर्षांत ३ पटींनी वाढ झाली अाहे. असे असले तरी ८४ टक्के प्रकरणांत विद्यार्थी तक्रारच दाखल करत नसल्याचे समाेर आले आहे. २०१२ पासून देशात रॅगिंगच्या ४६९४ तक्रारींची नोंद झाली असून २५८ तक्रारींसह महाराष्ट्र देशात पाचव्या स्थानावर आहे. मुंबईतल्या नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात शिकणाऱ्या जळगाव जिल्ह्यातल्या डॉ.पायल तडवी या विद्यार्थिनीने रॅगिंगला...
  June 4, 06:09 AM
 • औरंगाबाद -लाेकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही राज्यात भाजप-शिवसेनेची युती कायम राहणार असून हे दाेन्ही पक्ष समसमान म्हणजेच प्रत्येकी १३५ जागा लढवतील. तर रासप, शिवसंग्राम, रिपाइं आदी छाेट्या मित्रपक्षांना १८ जागा साेडण्यात येतील. महायुतीचा राज्यातील २८८ जागांच्या वाटपाचा असा फाॅर्म्युला असेल, अशी माहिती भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी औरंगाबादेत दिली.दुष्काळ निवारणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी महसूलमंत्री पाटील रविवारी औरंगाबादेत...
  June 3, 09:15 AM
 • फुलंब्री -तालुक्यातील पानेवाडी येथे विहिरीतून पाणी शेंदून काढत असताना विहिरीवर ठेवलेले लाकूड तुटल्याने सहा महिला त्यात पडून जखमी झाल्याची घटना शनिवारी घडली होती. ही घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून पानवाडीसाठी तत्काळ २४ हजार लिटर क्षमता असलेल्या टँकरच्या दोन खेपा सुरू करण्यात आल्या आहे. आज दुपारी पानेवाडीतील पाणीपुरवठाच्या (मिठा कुंआ) विहिरीत पाण्याचे टँकर खाली करताच गावातील महिलांनी व चिमुकल्यांची पाणी भरण्यासाठी गर्दी केली होती. फुलंब्री तालुक्यातील पानेवाडी...
  June 3, 09:05 AM
 • औरंगाबाद -रविवारच्या अमावस्येच्या पार्श्वभूमीवर चिकलठाणा परिसरात चौधरी कॉलनीत गुप्तधनासाठी नरबळी किंवा अन्य गैरप्रकार होत असल्याच्या संशयावरून रात्री १ च्या सुमारास तणाव निर्माण झाला. घरमालक व त्याच्या मुलाने उडवाउडवीची उत्तरे दिल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी घरमालकाच्या मुलास ताब्यात घेतले. या कुटुंबाचे वास्तव्य असलेल्या घरातील दोन खोल्यांत खोल मोठे खड्डे खोदलेले असून त्यात उभी शिडी आढळून आली. तसेच उदबत्तीचा सुगंधदेखील दरवळत होता. या परिसरात हे दोन खोल्यांचे पत्र्याचे घर आहे....
  June 3, 08:40 AM
 • औरंगाबाद -भीषण दुष्काळामुळे बीड-उस्मानाबाद जिल्ह्यांना सातत्याने टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी जायकवाडीतून पाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असून त्यासाठी ४०० कोटी रुपयांचा प्रस्ताव विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी तयार केला आहे. या प्रस्तावाला पुढच्या आठवड्यात मुंबईत मान्यता देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच, दुष्काळामुळे शेतकऱ्यांकडे पैसे नसल्यामुळे मुलींच्या शिक्षणावर त्याचा...
  June 3, 08:34 AM
 • औरंगाबाद -एसटीचे पहिले वाहक लक्ष्मण केवटेयांचा शनिवारी (१ जून) एसटीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुंबईत विशेष सत्कार होणार आहे. राज्यात राज्य परिवहन महामंडळाची बससेवा १ जून १९४८ रोजी सुरू झाली होती. किसन राऊत हे त्या गाडीचे चालक होते, तर केवटे हे वाहक होते. विशेष म्हणजे हे दोघेही नगरचे. केवटे यांनी वयाची नव्वदी पार केली आहे. पहिल्या फेरीच्या आठवणी ताज्या करत त्यांनी आमच्याशी मनमोकळा संवाद साधला. लाकडी होती पहिली बस पहिल्या एसटी बसची बॉडी आजच्यासारखी लोखंडी नव्हती. ती लाकडी होती....
  June 1, 09:49 AM
 • औरंगाबाद -मूळव्याधीची शस्त्रक्रिया करताना २३ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी मुकंुदवाडी भागात घडली. हेमा अनिल वाघमारे (२३, रा. इंदिरानगर, मुकुंदवाडी) असे तिचे नाव आहे. मुकुंदवाडी येथील सुखायू सुश्रुत आयुर्वेदिक मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या कुटुंबाने केला. रात्री उशिरा तिचे कुटुंब मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. हेमाच्या कुटुंबाने दिलेल्या...
  June 1, 09:36 AM
 • औरंगाबाद -देशात जून ते सप्टेंबर या काळात दीर्घकालीन सरासरीच्या ९६ टक्के अर्थात सरासरीइतका पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवली आहे. आयएमडीने शुक्रवारी या वर्षीचा आपला दुसरा दीर्घकालीन अंदाज जाहीर केला. त्यानुसार वायव्य भारतात ९४ टक्के, महाराष्ट्रासह मध्य भारतात ९७ टक्के, दक्षिण भारतात ९७, तर ईशान्य भारतात ९१ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात दीर्घकालीन सरासरीच्या ९५ टक्के, तर ऑगस्टमध्ये ९९ टक्के पाऊस होईल, असे आयएमडीने म्हटले आहे....
  June 1, 09:17 AM
 • जालना- मराठवाड्यातून रावसाहेब दानवे या एकमेव खासदाराला केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. मोदींच्या पहिल्या मंत्रिमंडळातही त्यांनी शपथ घेतली होती, पण प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी नंतर राज्यमंत्रिपदावर पाणी सोडले होते. रावसाहेब हे महत्त्वाकांक्षी व्यक्तिमत्त्व आहे. केवळ खासदार म्हणून राहणे आता त्यांना मानवणारे नाही. देशात भाजपला मिळालेल्या यशाचा वाटा अमित शहांकडे गेला तसा राज्यात तो रावसाहेबांच्याही पदरात टाकावाच लागतो. अमित शहा यांना डिसेंबर २०१९ पर्यंत मुदतवाढ मिळाली त्याच...
  May 31, 08:50 AM
 • फुलंब्री - सिल्लोड रस्त्यावरील भालगाव फाट्याच्या परिसरात भरधाव ट्रकने औरंगाबादकडे जाणाऱ्या एका काळीपिवळी वाहनास समोरासमोर धडक दिली. या अपघात काळीपिवळी वाहनातील एक महिला जागीच ठार झाली असून वाहनातील इतर नऊ जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता.३०) रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली. अनिता पुंजाराम सागर (३५, रा.डावरवाडी) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. या अपघाताची वडोदबाजार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, फुलंब्रीकडून सिल्लोडच्या दिशेने...
  May 31, 08:44 AM
 • औरंगाबाद -काम सुरू होण्यापूर्वी शंभर टक्के भूसंपादन झालेला आणि पैशांसह सर्व परवानग्या हातात असलेला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा देशातला पहिला मोठा प्रकल्प ठरला आहे. शिवाय, काम करणाऱ्या ठेकेदारांना त्यांनी लवकर काम पूर्ण केल्यास प्रोत्साहन रक्कम मिळणार आहे. त्यामुळे हा महामार्ग निर्धारित वेळेच्या आधी पूर्ण होईल, असा विश्वास महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक अनिकलकुमार गायकवाड यांनी इथे व्यक्त केला. औरंगाबाद-जालना भागातील कामाचा आढावा...
  May 30, 08:45 AM
 • औरंगाबाद -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सुरुवातीपासूनच अत्यंत सक्रिय राजकारणी आहेत. परंतु, पक्ष स्थापनेनंतर त्यांची संघटनेवर हवी तशी पकड राहिली नाही. लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान त्यांनी भाजप तसेच पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात जोरदार आगपाखड करून आपण सक्षम विरोधक असल्याचे दाखवून दिले. परंतु, त्यांची राजकारणातील दिशा भरकटली आहे, अशी टीका २०१४ मध्ये मनसेकडून लोकसभा लढवणारे आणि मराठीतील ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी केली आहे. बिग बॉस...
  May 29, 12:22 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात