Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद- बहुचर्चित समांतर जलवाहिनीचा प्रकल्प विशेष सर्वसाधारण सभेत महापौरांनी रिझर्व्ह फॉर जजमेंट ठेवल्यानंतर शिवसेना- भाजप युतीत या मुद्द्यावरून राजकीय कवित्व सुुरूच असून भाजप आमदार अतुल सावे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाला प्रकार त्यांच्या कानी घातला. तेव्हा समांतरसाठी लागेल तेवढा निधी देण्याचे आश्वासन मी दिले. मी पैसे देणारच आहे. परंतु खासदार चंद्रकांत खैरेंना जर तसे नको असेल तर राहू द्या, अशा शब्दांत प्रस्ताव दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली....
  August 30, 08:07 AM
 • पाचोड- स्वस्त धान्य दुकानातला अकरा क्विंटल रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांनी बुधवारी पाठलाग करून तांदळासह टेम्पो जप्त केला. विहामांडवा पोलिसांनी विहामांडवा - केकतजळगाव रस्त्यावर बुधवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कारवाई केली. याप्रकरणी गुन्हा दाखल केला. विहामांडव्याचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश एकसिंगे यांना एका खबऱ्यामार्फत स्वस्त धान्य दुकानातला तांदूळ काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस...
  August 30, 06:23 AM
 • औरंगाबाद- नैऋत्य मान्सूनचा आस (ट्रफ) उत्तर भारताकडे सरकल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा विश्रांती घेण्याची शक्यता आहे. राज्यात १५ ऑगस्टपासून सक्रिय असलेल्या मान्सूनच्या हालचाली आता मंदावल्या आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) अंदाजानुसार येत्या ५ ते ७ दिवसांत महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मान्सून सध्या देशाच्या उत्तर भागात सक्रिय आहे. मान्सूनचा आस सध्या पंजाबच्या भटिंडापासून ते बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे....
  August 30, 05:50 AM
 • आैरंगाबाद- सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यावर मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या आैरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल असून खंडपीठाने यापूर्वीच्या आदेशात प्रकरणात खडसेेंना प्रतिवादी करण्याचे आदेश देत राज्य शासन व मुक्ताईनगर (जि. जळगाव) पोलिस ठाण्याच्या निरीक्षकांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते. याचिकेच्या सुनावणीत दमानिया यांच्यावर दाखल गुन्हा...
  August 29, 11:22 AM
 • औरंगाबाद- वादग्रस्त समांतर जलवाहिनीच्या वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेला समझोत्याच्या प्रस्ताव सोमवारी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत महापौरांनी रिझर्व्ह फॉर जजमेंट ठेवल्यामुळे महापालिकेचे माजी आयुक्त आणि ज्येष्ठ सनदी अधिकारी कृष्णा भोगे उद्विग्न झाले आहेत. आता नागरिकांनी गप्प बसून चालणार नाही. त्यांनी बघ्याची भूमिका घेतली तर ही मंडळी आणखी सोकावतील. त्यामुळे शहरातील मान्यवरांनी एकत्र येऊन या स्थानिक स्वराज्य संस्थेवर...
  August 29, 10:24 AM
 • औरंगाबाद - डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात सीबीआयने अटक केलेल्या सचिन अणदुरेच्या तीन साथीदारांनी नियमित जामिनासाठी मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यू.पी. देवर्षी यांच्यासमोर अर्ज दाखल केला असता त्यांनी जामीन नाकारला. सीबीआय, एटीएसने सचिन अणदुरेच्या सांगण्यावरून शुभम सूर्यकांत सुरळे, अजिंक्य शशिकांत सुरळे आणि रोहित रेगे या तिघांना २२ ऑगस्ट रोजी अटक करून त्यांच्या ताब्यातून सात बोअरचे पिस्टल, तलवार जप्त केले होते. त्यांच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला...
  August 29, 10:17 AM
 • औरंगाबाद- पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून कुख्यात गँगस्टर इम्रान मेहदीला सोडवून नेण्याचा कट सोमवारी उघडकीस आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून बुधवारी होणारी म्हात्रे व इतर खून प्रकरणातील सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तशा सूचना न्यायालयाने पोलिसांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या मध्य प्रदेशातील टोळीला मंगळवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांच्यासमोर हजर केले असता ११ जणांना ५ दिवसांची कोठडी सुनावली....
  August 29, 09:30 AM
 • औरंगाबाद- अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. खटला सुरू असताना पीडित मुलीने बाळास जन्म दिला. तेव्हा बाळ, माता व सात आरोपींची डीएनए चाचणी करण्यात आली. चाचणीत सातपैकी एकाचे गुणसूत्र जुळले. त्यावरून मुख्य आरोपी व अन्य एकाला प्रत्येकी दहा वर्षे सक्तमजुरी, प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. शिंदे यांनी मंगळवारी सुनावली. फुलंब्री तालुक्यातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेख लतीफ शेख सादीक (२०), शेख अमीन शेख...
  August 29, 09:24 AM
 • वैजापूर- गोदावरी नदीपात्रात सोमवारी बाबतरा (ता. वैजापूर) येथील बुडालेल्या दोन शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृतदेहाचा शोध घेताना पथकाला मंगळवारी यश आले. सोमवारपासून गोदावरी नदीत बेपत्ता विद्यार्थ्यांचा पोलिस, अग्निशमन दलाचे पथक व महसूल विभागाकडून शाेध सुरू होता. यात शोध पथकाने मंगळवारी सकाळपासून सुरू झालेल्या शाेध मोहिमेत नाऊर शिवारात सकाळच्या सुमारास एक मृतदेह आढळला. त्यानंतर दुपारी तीन वाजेच्या दरम्यान दुसरा मृतदेह पुरणगाव शिवारात सापडला. मृत अवस्थेत आढळून आलेले तुषार गांगड (१४)...
  August 29, 07:13 AM
 • परभणी- तालुक्यातील पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर इंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाईसुंदरी म्हणून रूजू झाली आहे. सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील शिवाजी महाविद्यालयात पूर्ण झाले. बालपणापासूनच काजल आज्ञाधारक, अभ्यासू, चिकीत्सक व धाडसी स्वभावाची असल्याचे तिचे वडील भगवानसिंग सांगतात. वाचनाची आणि भाषणाचीही तिला आवड आहे. सातवीत असताना सावित्रीबाई फुलेंवर केलेल्या...
  August 28, 01:03 PM
 • औरंगाबाद- समांतर जलवाहिनी योजनेचा ठेका मिळवलेल्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीशी न्यायालयाबाहेर समझोता करण्यासाठीच्या प्रस्तावावर सोमवारी (२७ ऑगस्ट) मनपाची सभा झाली. हा प्रस्ताव मंजूर करा, कंपनीने मागितलेले २८९ कोटी रुपये शासन देईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी २३ ऑगस्ट रोजी महापौर नंदकुमार घोडेले यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या चर्चेत स्पष्ट सांगितले होते. तेव्हा महापौरांनी तशी तयारीही दाखवली होती. मात्र, सोमवारच्या सभेत वेगळेच घडले. शिवसेनेने शासनाकडून...
  August 28, 10:05 AM
 • वैजापूर- तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या बाबतरा येथील दोन शालेय विद्यार्थ्याचा गोदावरी नदी पात्रातील पाण्यात बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली.पाण्यात बुडालेल्या विद्यार्थ्याचा शोध सकाळ पासून पोलिस, अग्निशमन दलाचे पथक व महसुल विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.दरम्यान सांयकाळ पर्यंत पाण्यात बेपत्ता झालेल्या दोघांचा ठावठिकाणा लागला नव्हता. तुषार सतीश गांगड (१४) व विवेक कालीचरण कुमावत (१५, रा.बाबतरा) असे मृत शाळकरी विद्यार्थ्याची नावे आहेत. गाव...
  August 28, 07:12 AM
 • औरंगाबाद- कुख्यात गँगस्टर इम्रान मेहदी याला अाैरंगाबादच्या तुरुंगातून जिल्हा न्यायालयात नेण्यापूर्वीच पाेलिसांच्या ताब्यातून पळवून नेण्याचा कट रचणाऱ्या मध्य प्रदेशातील ७ तर स्थानिक ४ गुंडांना पाेलिसांनी साेमवारी शिताफीने अटक केली. मध्य प्रदेशातील गुंडांच्या टाेळीतील सर्वच जण शार्प शूटर शरफू टाेळीतील असल्याचे पाेलिसांनी सांगितले. नफीस खान मकसूद खान (४०), नकीब खान रियाज मोहंमद (५५), फरीद खान मन्सूर खान (३५), शब्बीर खान समद खान (३२), फैजुल्ला गनी खान (३७), शाकीर खान कुर्बान खान (४०) अशी या...
  August 28, 06:52 AM
 • जालना- अटकेत असलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याने जालन्यातील भाजपचा माजी नगरसेवक व सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी असलेला खुशालसिंग राणा ठाकूर याच्या फार्महाऊसवर बॉम्बनिर्मिती व पिस्तूल चालवल्याचे प्रशिक्षण घेतल्याची कबुली दिली होती. त्याला सोबत घेऊन एटीएसच्या पथकाने ठाकूरच्या जालना परिसरातील दोन फार्महाऊसवर छापा मारत कसून तपासणी केली होती. दरम्यान, नांदेडला गेलेला ठाकूरचा भाचा सोमवारी परतला. एसटीसने त्याच्यासह खुशालसिंह राणा ठाकूरला चौकशीसाठी औरंगाबादला...
  August 28, 06:10 AM
 • औरंगाबाद- मोक्का आणि खुनाच्या आरोपात हर्सूल तुरुंगात असलेला गँगस्टर इम्रान मेहदी याची सोमवारी २ प्रकरणांत सुनावणी होती. इम्रानला हर्सूल कारागृहातून कोर्टात नेताना पोलिसांच्या ताफ्यावर गोळीबार करून सोडवून नेण्याचा कट त्याच्या साथीदारांनी मध्य प्रदेशमधील टोळीच्या मदतीने रचला होता. त्याचा सुगावा लागताच गुन्हे शाखेच्या पथकाने सकाळी १०.३० वाजता टोळीचा गरवारे मैदान ते नारेगाव रस्त्यावर पाठलाग केला. क्रांतिगुरू लहुजी साळवे चौकात सापळा रचून टोळीला ताब्यात घेतले. तेथे टोळीचा...
  August 28, 06:09 AM
 • औरंगाबाद- राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सलीम कुरेशी यांच्या हत्येप्रकरणी औरंगाबाद जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला. कुख्यात इमरान मेहंदी याच्यासह आठ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच आरोपींना 5 लाख रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. 5 मार्च 2012 रोजी सलीम कुरेशी यांचे अपहरण करुन निर्घृणहत्या करण्यात आली होती. मारेक-यांनी कुरेशींना जिवंत गाडले सलीम कुरेशी यांच्या गळ्यावर चाकूने वार करून त्यांना हालहाल करून जिवंत गाडले, असा जबाब मारेकर्यांनी...
  August 27, 04:42 PM
 • औरंगाबाद- कर्जमाफीनंतरही मराठवाड्यात गेल्या आठ महिन्यांत ५७४ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. अनेक बँका पीक कर्ज द्यायला तयार नाहीत. ऑगस्ट संपत आला तरी ३० टक्केच कर्जवाटप झाले आहे. बीड जिल्ह्यात सर्वात कमी कर्जवाटप झाले असून तेथे सर्वाधिक ११५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या दोन महिन्यांत १४१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यात या वर्षी सरासरी ४६० मिमी इतका पाऊस झाला असून हे प्रमाण सरासरीच्या ९१ टक्के आहे. मात्र, पावसाने तब्बल ३२ दिवसांचा...
  August 27, 09:47 AM
 • औरंगाबाद- बहुचर्चित समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या वादावर न्यायालयाबाहेर तोडगा काढण्यासाठी औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने दिलेल्या समझोत्याच्या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी तब्बल चार वेळा तहकूब झालेली मनपाची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी होत आहे. चर्चेनंतर या सभेत निर्णय होणारच हे जवळपास निश्चित असते तरी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी मनपा प्रशासनाच्या वतीने तयार केलेल्या प्रस्तावात फारसे बदल होण्याची चिन्हे नाहीत. फक्त ११५ कोटींच्या वाढीव कामांचे नंतर बघू, असे आयुक्तांनी...
  August 27, 09:40 AM
 • औरंगाबाद- नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी जालन्यातून अटक करण्यात आलेला माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसने औरंगाबादजवळ दोन ठिकाणी छापे टाकले. बॉम्ब-शस्त्रे दडवल्याच्या संशयावरून रविवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. या कारवाईत नेमके काय सापडले हे मात्र कळू शकले नाही. एटीएसने रविवारी दौलताबाद परिसर व जालन्यातील राजूर मार्गावरील दोन ठिकाणी छापे टाकले. नालासोपारा येथे शस्त्रसाठा सापडल्यानंतर पांगारकर याचासुद्धा...
  August 27, 09:25 AM
 • औरंगाबाद- अभियांत्रिकी महाविद्यालयातच विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रम चालवण्यासाठी इन्क्युबेशन सेंटर्स उभारण्याची घोषणा राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी केली होती. मात्र औरंगाबादच्या एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाने वर्षभरापूर्वीच राज्यातील पहिले इन्क्युबेशन सेंटर सुरू केले. येथे कमवा, शिका योजनेतील विद्यार्थी प्लास्टिक, पॉलिमरची विविध उत्पादने तयार करतात. वर्षभरात त्यांनी २५ हजार प्लास्टिकची टोपली विकली आहेत. बीड बायपासवर एमआयटी ही संस्था गेल्या ४०...
  August 27, 09:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED