जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Aurangabad

Aurangabad News

 • औरंगाबाद - ऐतिहासिक वारसा, पर्यटन नगरी आणि औद्योगिक क्षेत्रासाठी ख्याती असलेल्या औरंगाबाद शहराची गेल्या ३० वर्षांमध्ये झपाट्याने वाढ झाली. मराठवाड्यासह लगतच्या विदर्भ, खान्देशातील लोकही या ठिकाणी येऊन स्थायिक झाले. शहराची दिवसागणिक प्रगती होण्याऐवजी दर्जेदार शिक्षण, रस्ते, पाणी, रोजगार यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी आजही झगडावे लागत आहे. याला राजकीय, प्रशासकीय यंत्रेणसोबतच विकासाबद्दल अनास्था असलेला सामान्य नागरिकही तितकाच जबाबदार अाहे, असा सूर दिव्य मराठीने आयोजित केलेल्या...
  January 25, 10:39 AM
 • जालना- जायकवाडी-जालना जल योजनेची पाइपलाइन फोडून अनेक ठिकाणी पाणीचोरी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे जलवाहिनी फोडून विहिरीत, शेततळ्यांमध्ये हे पाणी साठवले जात होते. पैठण तालुक्यात अनेक ठिकाणी सर्रासपणे हा प्रकार सुरू होता. जालना पालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात पाचोड ते पैठण परिसरात केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला असून १४ पाणीचोरांविरुद्ध पाचोड पोलिसांकडे तक्रार देण्यात आली आहे. जालना शहरात सध्या १२ ते १५ दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो आहे. शहराला...
  January 25, 08:08 AM
 • औरंगाबाद-दिव्य मराठीने स्टिंग करून उस्मानपुरा भागात अनधिकृतपणे सुरू असलेल्या सोनोग्राफी सेंटरचा पर्दाफाश करून मोठे रॅकेट उजेडात आणल्यानंतर पोलिस यंत्रणा वेगाने कामाला लागली आहे. लिंगनिदान करणारा डॉ. सूरज राणा याने महापालिका अधिकाऱ्यांना या रॅकेटमधील अनेक बड्या डॉक्टरांची नावेही सांगितली. त्याचे लाइव्ह रेकॉर्डिंगही मनपाकडे आहे. तथापि, महापालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवताना एफआयआरमध्ये ही नावे का सांगितली नाही, असा प्रश्न राज्य महिला आयोगाच्या...
  January 25, 07:21 AM
 • औरंगाबाद- रात्री महामार्गावर मदत मागितलेल्या तीन महिलांना घरापर्यंत सोडण्यासाठी टेम्पोमध्ये बसवणे एका चालकाला चांगलेच महागात पडले. महिलांनी वाद घालून छेडछाड व इतर गंभीर आरोप करण्यास सुरुवात केली. घाबरलेला चालक मदतीसाठी थोड्या अंतरावर जाताच महिलांनी दुसरीकडे अडीच लाख रुपयांचा टेम्पो लांबवलादेखील होता. चालकाने पाच दिवसांनंतर याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. शिवाजी अप्पासाहेब डिगोळे (२९, रा. भालगाव ) हे १६ जानेवारी रोजी बारा...
  January 24, 02:49 PM
 • औरंगाबाद- दिव्य मराठीने मंगळवारी स्टिंग ऑपरेशनद्वारे गर्भलिंगनिदान करणारे मोठे रॅकेट उजेडात आणल्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. या प्रकरणातील आरोपी डॉ. सूरज राणा याच्यासह इतर चार आरोपींना बुधवारी न्यायालयाने ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मनपाच्या आरोग्य अधिकाऱ्यांसमक्ष दिलेल्या जबाबात डॉ. राणा याने शहरातील अनेक स्त्रीरोगतज्ज्ञांची नावे घेतली होती. पोलिस यंत्रणा या डॉक्टरांच्या मागावर असल्याचे पोलिस सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. दिव्य मराठी टीम...
  January 24, 02:33 PM
 • औरंगाबाद / मुंबई - सीबीआयने व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबाद कार्यालयांवर धाडी टाकल्या आहेत. ICICI च्या माजी सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या कार्यालयासह आणखी एका ठिकाणी देखील चौकशी करण्यात आली. तपास संस्थेने व्हिडिओकॉन ग्रुपचे न्यूपॉवर रिन्यूएबल्ससह झालेले व्यवहार संबंधित एफआयआर दाखल केला आहे. न्यूपावर दीपक कोचर यांची कंपनी आहे. काय आहे प्रकरण? व्हिडिओ कॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांना ICICI बँकेने एप्रिल 2012 मध्ये 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. समूहाने या कर्जातील 86% अर्थात 2810...
  January 24, 12:14 PM
 • delete
  January 24, 11:04 AM
 • औरंगाबाद- शहरातील उस्मानपुरा परिसरात अनधिकृतपणे सोनोग्राफी सेंटर सुरू करून १५ हजार रुपयांत गर्भलिंग निदान चाचणी करणारा डॉ. सूरज राणा याने यापूर्वीही औरंगाबादजवळील रांजणगाव परिसरात हॉस्पिटल सुरू असताना अनेक कारनामे केले आहेत. २०१४ मध्ये एका महिलेला जिवाचा धोका असल्याचे सांगून त्याने तिचा गर्भपात केला होता. मात्र, त्यानंतर महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने त्याच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर हे हॉस्पिटल बंद पडले. मात्र, नंतर त्याने औरंगाबाद शहरात...
  January 24, 10:53 AM
 • औरंगाबाद-परराज्यातून शिर्डीला साई संस्थानात दर्शनासाठी आल्यानंतर औरंगाबादसह राज्यातील इतर शहरांत जाऊन बडी घरे फोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या टोळीचा म्होरक्या माजी सैनिक असल्याची बाब समोर आली आहे. पत्नीच्या आत्महत्येस जबाबदार धरून शिक्षा लागलेल्या सैनिकाला लष्करातून बडतर्फ करण्यात आले आणि त्यानंतर गावातील एका बड्या असामीने जमीन हडप केल्यानंतर त्याचा खून केला व नंतर घरफोड्या करणाऱ्यांची आंतरराज्य टोळी स्थापन केली. या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी बुधवारी अटक केली....
  January 24, 10:41 AM
 • वाळूज- बजाजनगर इंद्रप्रस्थ कॉलनी येथील प्रमोद यादव चोरमारे (३३, चालक) यांच्या राहत्या घरासमोरून १९ जानेवारी रोजी पहाटे अज्ञात चोरट्याने लाखो रुपयांच्या विदेशी दारूचे बॉक्स असणारा ट्रक मालासह लंपास केल्याची घटना पहाटे साडेसहा वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, या प्रकरणी २० जानेवारी रोजी वाळूज एमआयडीसी पोलिसांत चोरमारे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या तपासात असणाऱ्या पोलिसांना खबऱ्यामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, चोरीची दारू विक्री...
  January 24, 10:34 AM
 • औरंगाबाद- हर्सूल जेलमधील कच्चा कैदी योगेश राठोडला मरणासन्न अवस्थेत पाहणाऱ्या पोलिस गार्ड्सना जबाबासाठी पाठवा, असे पत्र हर्सूल पोलिस ठाण्याने पोलिस मुख्यालयाला पाठवले आहे. दिव्य मराठीने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेऊन त्यांनी ही कार्यवाही केली आहे. दरम्यान, कारागृह प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या चौकशीमध्ये आतापर्यंत ५० कैदी आणि तेथील कर्मचाऱ्यांचे जवाब जेलच्या चौकशी समितीने नोंदवले आहेत. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या योगेश राठोडचा शनिवार, १९...
  January 24, 10:29 AM
 • औरंगाबाद- बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानाचा परवाना निलंबित केल्याबाबत खंडपीठात दाखल याचिकेच्या अनुषंगाने न्या. सुनील देशमुख यांनी मंत्री बापट यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला आहे. दुकानाचा परवाना निलंबित करणारा जिल्हा पुरवठा अधिकारी यांचा आदेश तसेच तो आदेश कायम करणारा उपायुक्त आणि राज्य मंत्र्यांचा आदेश नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रद्द केला होता. याचिकेची पुढील सुनावणी चार आठवड्यानंतर होणार आहे. दुकानदार आसाराम नागरे यांच्याविरुद्ध गावातील नागरीकांनी...
  January 24, 08:53 AM
 • औरंगाबाद - स्त्री भ्रूणहत्या हा अमानुष उद्योग झाला आहे. अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने तो अजूनही सुरूच आहे. त्याला डॉक्टरच नाही, तर समाजही जबाबदार आहे. कायदा किंवा जागृती करून हा उद्योग थांबणार नाही. त्यासाठी लग्नापूर्वी संबंधित जोडपे, आई-वडील, सासू-सासरे यांची कार्यशाळा घ्यायला हवी. पीसीपीएनडीटीऐवजी मोक्का लावायला पाहिजे, असे निष्कर्ष औरंगाबाद येथील सरस्वती भुवन कला, वाणिज्य महाविद्यालयातील प्रा. संदीप चाैधरी यांनी आपल्या निष्कर्षांत काढले आहेत. सांगली जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब...
  January 24, 08:34 AM
 • मुंबई/औरंगाबाद- इसिसच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून मुंब्रा आणि औरंगाबाद येथून ताब्यात घेण्यात आलेले युवक राज्यात मोठा घातपात घडवून आणण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती एटीएसच्या तपासातून समोर आली आहे. या आरोपींकडून घातक रसायनांचा साठा जप्त करण्यात आला असून ही रसायने खाद्यपदार्थात मिसळून एखाद्या कार्यक्रमात नरसंहार घडवण्याच्या तयारीत ते असल्याची माहिती एटीएसच्या तपासातून निष्पन्न झाल्याचे समजते. या आरोपींमध्ये एक अल्पवयीन आहे. दरम्यान, एटीएस ने ताब्यात घेतलेल्या आठ...
  January 24, 08:15 AM
 • औरंगाबाद-दिव्य मराठीच्या सापळ्यात हा गुन्हेगार सापडला. पण, स्टिंग ऑपरेशन फत्ते झाल्याचा आनंद आम्हाला झाला नाही. उलटपक्षी दुःखच झाले. शंका खोटी ठरावी, अशी आमची इच्छा होती. मात्र, हा डॉक्टर सापळ्यात सापडला आणि माणूस असल्याचीच लाज वाटली. असे मत दिव्य मराठीचे संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले. हेही वाचा-दिव्य मराठीच्या सापळ्याने औरंगाबादमधील स्त्री भ्रूणहत्या करणारे रॅकेट उद्ध्वस्त;60 दिवस पाळत, 60 मिनिटांत पर्दाफाश रवींद्रनाथ टागोर म्हणाले होते, जन्माला येणारं प्रत्येक बाळ म्हणजे...
  January 23, 12:22 PM
 • औरंगाबाद शहरातील एक बीएचएमएस डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून आमच्या संशयाच्या भोवऱ्यात होता. एका फ्लॅटमध्ये तो काही तरी अवैध व्यवसाय करतो, अशी माहिती हाती आली होती. गर्भवती महिलांना तो स्वतःच्या कारमध्ये बसवून घेऊन येतो आणि नंतर पुन्हा सोडतो, हे आमच्या टीमच्या लक्षात आले. या गर्भवती महिला गर्भलिंग निदान करण्यासाठी त्याच्याकडे येत असाव्यात, अशी शंका येऊ लागली होती. अखेर दिव्य मराठीची शंका खरी ठरली. मग, महापालिकेच्या यंत्रणेच्या मदतीने तिथे छापा टाकला गेला. आमचे बातमीदार दिलीप पाईकराव,...
  January 23, 12:01 PM
 • रामनगर/भोकरदन - जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अपघातांत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. जालना तालुक्यातील रामनगर रोडवरील राममूर्ती फाट्याजवळ भरधाव आलेल्या कारने धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घडली. विश्वनाथ बाबू चव्हाण (३८, पाथ्रुड तांडा) असे मृताचे नाव आहे. दुसऱ्या घटनेत भोकरदन तालुक्यातील बाभूळगाव फाट्यावर पुलाचे काम सुरू असलेल्या पाइपला धडकल्याने एकजण ठार झाला. विष्णू भानुदास डहाळे (२३, बरंजळा लोखंडे) असे मृताचे नाव...
  January 23, 10:49 AM
 • औरंगाबाद - शासनाच्या फसव्या घोषणेमुळे शेतकऱ्यांची फसगत झाली आहे, कर्ज माफ झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या तातडीने द्या, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने शहरातील बँक अधिकाऱ्यांकडे केली. शिवसेनेने अचानक केलेल्या या झाडाझडतीमुळे अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. औरंगाबाद जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, याची शहानिशा करण्यासाठी शिवसेनेने बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडियासह अन्य बँकांत चौकशी केली. हे आंदोलन शिवसेना नेते, खासदार चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख अंबादास...
  January 23, 10:42 AM
 • औरंगाबाद - ऐंशीच्या दशकात औरंगाबादमध्ये आपले अस्तित्व आहे की नाही, असे नेहमी वाटायचे. शहरात मराठी माणूस राहतोय की नाही, असा प्रश्न पडायचा. मग सरळ मुंबई गाठली. औरंगाबादेत शिवसेना आणण्याची बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली. त्यांनी परवानगी दिली. लगेच १९८४ मध्ये शहरात शिवसेनेची पहिली शाखा सुरू झाली. १९८६ च्या दंगलीनंतर शिवसेनेचा झंझावात मराठवाडाभर पसरला. घराघरात शिवसैनिक तयार झाले. शिवसेनाप्रमुखांनी सर्वसामान्य माणसाला काँग्रेसच्या दिग्गजांशी लढण्याचे बळ दिले. मुंबई आणि ठाण्यानंतर...
  January 23, 10:25 AM
 • औरंगाबाद - शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) सोमवारी रात्री १ वाजता छावणीतून प्रसूतीसाठी आलेल्या महिलेला वेळेत स्ट्रेचर न मिळाल्याने जिन्यातच तिची प्रसूती हाेऊन बाळ फरशीवर पडल्याने ते दगावल्याची हृदयद्रावक घटना घडली. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन झाली आहे. सोनाली खटमोडे यांना रात्री एक वाजता प्रसूती कळा सुरू झाल्या. छावणीतून आई आणि पतीसह त्या घाटीत आल्या, तेव्हा ही घटना घडली. दररोज ९० ते १०० प्रसूती : घाटीत दररोज ९० ते १०० महिलांची प्रसूती होते. यातील किमान १२ ते २० महिलांची प्रसूती...
  January 23, 10:19 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात