जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Nanded

Nanded News

 • नांदेड- पैनगंगा नदीपात्रात १५ दिवस बेमुदत आंदोलन केल्यानंतर मंजूर करण्यात आलेले २ दलघमी पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानुसार यवतमाळचे पाणी गांजेगाव बंधाऱ्यापर्यंत पोहोचले, परंतु नांदेड जिल्ह्याचे मंजूर ७ दलघमी पाणी अद्याप बोरीच्या पुलापर्यंतही आले नसल्याने शेतकरी वर्गात प्रशासनाच्या धिम्या कारभाराबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तत्काळ पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडून दिलासा द्यावा, अन्यथा नाइलाजास्तव शेतकऱ्यांना पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसण्याची वेळ येईल,...
  December 15, 07:24 AM
 • नांदेड- उत्तर प्रदेशात प्रयागराज येथे मनकामेश्वर मंदिराजवळील सरस्वती घाटावर नाव उलटून मराठवाड्यातील ६ जणांचा मृत्यू झाला. अहमदपूर, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांतील व्यक्तींचा मृतांत समावेश आहे. चौघे जण जखमी झाले. दोघे जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. नायगाव तालुक्यातील (जि. नांदेड) कोलंबी येथील लोकांसह त्यांचे नातेवाईक मिळून १४ जण अस्थिविसर्जनासाठी प्रयागराजला गेले होते. सोमवारी सायंकाळी सहा ते साडेसातच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. कोलंबी येथील माजी पंचायत समिती सदस्य रमेश बैस...
  December 12, 11:25 AM
 • नांदेड - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील घोटाळा प्रकरणात संचालकांना दिलेली क्लीन चिट रद्दबातल करून त्यांच्याकडून कर्जवसुली करावी, अशी मागणी बँक बचाव समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार डाॅ. डी.आर. देशमुख यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, सहकार मंत्री सुभाष देशमुख व अवर सचिव यांना कायदेशीर नोटीस जारी केल्या आहेत. सहकार खाते असताना चंद्रकांतदादा पाटील यांनी बँकेतील घोटाळा प्रकरणात सर्व संचालकांना क्लीन चिट दिली. त्याविरोधात ही नोटीस बजावण्यात आली आहे....
  December 12, 08:29 AM
 • नांदेड- लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला जोरदार धक्का देत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. एकूण १७ सदस्यांच्या नगर परिषदेत भाजपचे १३ तर काँग्रेसला अवघ्या ४ जागा मिळाल्या. मावळत्या नगर परिषदेत काँग्रेसकडे सर्वच्या सर्व १७ जागा होत्या. नगराध्यपदाच्या थेट निवडणुकीतही भाजपचे गजानन सूर्यवंशी साडेतीन हजाराहून अधिक मताधिक्याने विजयी झाले. त्यांना ९ हजार ६०५ मते मिळाली तर काँग्रेसचे व्यंकटेश संगेवार यांना ५ हजार ९०९ मते मिळाली. लोहा नगर परिषदेवर गेली पाच वर्षे काँग्रेसची सत्ता...
  December 11, 07:57 AM
 • नांदेड - हदगाव शहरातील एका भोंदू डॉक्टरकडे दारू सोडवण्यासाठी आणलेल्या दोन सख्ख्या भावांना दारू सोडवण्याच्या औषधामुळे आपला जीव गमवावा लागला. ही घटना गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली. तथापि, रात्री उशिरा या घटनेचा खुलासा झाला. या प्रकरणी हदगाव पोलिसांनी दारू सोडवण्याचे औषध देणारा डॉक्टर रवींद्र पोधाडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संजय ज्ञानदेव मुंडे (४०) व विजय ज्ञानदेव मुंडे (३५) रा. तळेगाव ता. परळी जि. बीड या सख्ख्या भावंडांना दारूचे व्यसन होते. हे भाऊ हदगाव येथील डॉ....
  December 7, 10:41 AM
 • नांदेड - माळाकोळी भुजंग गोरखनाथ मस्के या ब्रेन डेड रुग्णाचे अवयवदान करण्यासाठी बुधवारी येथे ग्रीन काॅरिडाॅर करण्यात आला. शहरात ग्रीन काॅरिडाॅर करण्याची ही चौथी वेळ होती. मंदिर उभारणीच्या कामावर मजूर असलेल्या भुजंगचे हृदय घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळ हे जवळपास ५ किलोमीटरचे अंतर अवघ्या ४ मिनिटे १२ सेकंदात पार केले. भुजंगच्या अवयवदानामुळे ४ जणांना जीवदान मिळाले तर दोघांचे अंधत्व निवारण झाले. माळाकोळी हे गाव जिल्ह्यात मंदिर बांधकाम करणाऱ्या...
  December 6, 09:13 AM
 • नांदेड - विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवर वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या प्रवाहातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी सिंचनाखाली येऊन परिसर सुजलाम्् सुफलाम्् व्हावा या उद्देशासाठी पूर्वीच्या आराखड्यात अनेक तरतुदी करून नव्याने प्रस्तावित करण्यात आलेल्या सहस्रकुंड जलविद्युत (बहुउद्देशीय) प्रकल्प आराखड्याला जलसंपदा विभागाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागून उमरखेड, हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना व टंचाईने होरपळणाऱ्या गावच्या नळयोजनेला याचा मोठा...
  December 5, 10:59 AM
 • औरंगाबाद- शुभेच्छा संदेश अन् अवखळ चेष्टामस्करीपुरत्याच सीमित राहिलेल्या सोशल मीडियाचा उपयोग निर्भेळ आनंद मिळवण्यासह ज्ञानवृद्धीसाठीही होेऊ शकतो. ही कविकल्पना नव्हे बरं, हा आहे उस्मानानाबादच्या मराठमोळ्या तरुणाने सातासमुद्रापार दुबईत राहताना सुरू केलेला अनोखा प्रयोग. यातून सुरू झालेल्या, विविधांगी विषयांवरील सकारात्मक ऊर्जा पुरवणाऱ्या २८३ ग्रुपचे जगभरात ४ हजार सदस्य आहेत. स्वदेश, स्वभाषा आणि आप्तापासून शेकडो मैल दूर राहूनही मराठी अस्मिता जपण्याचा हा उपक्रम त्यामुळे निराळा...
  November 12, 11:12 AM
 • नांदेड- हल्ली संकेतस्थळावरून लग्नाच्या गाठी बांधल्या जात आहेत. मात्र या संकेतस्थळावरूनही फसवणूक होऊ शकते हे देगलूर येथील एका महिलेच्या अनुभवावरून उघडकीला आले. एका संकेतस्थळावरून एका महिलेस लग्नाचे आमिष दाखवत पाच लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून एका नायजेरियन तरुणाला देगलूर पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला ७ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मूळ नायजेरियाचा रहिवासी असलेला आणि सध्या दिल्ली येथील महावीर एन्क्लेव्ह येथे राहणाऱ्या थियोफिलस मारो याचे एका मॅट्रिमोनियल...
  November 8, 07:25 AM
 • नांदेड - शहरातील तांडा बारचे मालक सुरेश राठोड यांच्यावर गुरुवारच्या मध्यरात्री अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. दुचाकीवरील तीन हल्लेखोरांनी सुमारे अडीच किमीपर्यंत त्यांचा पाठलाग केला. खराब रस्त्यामुळे राठोड यांच्या स्कूटीची गती कमी होताच तिघांपैकी एकाने त्यांच्यावर गोळी झाडली. परंतु खराब रस्त्यामुळे त्याचा नेम चुकला आणि गोळी मांडीत घुसल्याने राठोड बालंबाल बचावले. गोळी झाडून हल्लेखोर पसार झाले. पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना अटक केली अाहे. सुरेश राठोड यांचा...
  November 3, 09:01 AM
 • नांदेड -तेलंगणातील म्हैसा येथे प्रचाराला जाण्यासाठी राहुल गांधी नांदेड विमानतळावर आले होते. या वेळी राहुल गांधी यांच्यासाठी अशोक चव्हाणांनी जेवण्याची चोख व्यवस्था केली. व्हेज, नॉनव्हेज असे स्वादिष्ट भोजन त्यांच्यासाठी मागवण्यात आले. परंतु राहुल गांधी यांनी अभी मैं डाएटिंग पे हूँ असे म्हणत अल्प आहार घेतला. प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे राहुल गांधींच्या स्वागतासाठी संपूर्ण परिवारासह हजर होते. त्यामुळे राजकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्या आहेत. राहुल गांधी यांचा शनिवारचा...
  October 21, 09:41 AM
 • नांदेड - नारी शक्तीच्या दसरा सणाच्या दिवशीच गोंडेमहागाव दुर्गानगर तालुका किनवट येथील अक्षय वसंत राठोड व अश्विनी बाबू राठोड या तरुण, तरुणीचे मृतदेह गावालगतच्या शेतातील लिंबाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत १८ अॉक्टोबर रोजी सकाळी आढळून आल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी इस्लापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनवट तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेलगत असलेल्या गोंडेमहागाव दुर्गानगर येथील अक्षय वसंत राठोड हा तरुण पेंटिंगचे काम...
  October 19, 10:17 AM
 • नांदेड -कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्याचा तपास सीआयडीकडे सोपवून या प्रकरणातील आरोपींना जामिनाचा मार्ग सुकर केला गेला, अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत. तथापि, कायदेतज्ज्ञांनी मात्र ही चर्चा खोडून काढली आहे. आरोपींना अटक केल्यानंतर जर दिलेल्या कालमर्यादेत तपास यंत्रणा दोषारोप पत्र दाखल करू शकली नाही तर आरोपींना डिफॉल्ट बेल दिली जाऊ शकते. पण आरोपींना अटकच नसल्याने या प्रकरणात न्यायालय डिफॉल्ट बेल देऊ शकणार नाही, असे कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केले. कृष्णूर येथील १८ जुलैला पडलेल्या...
  October 13, 09:14 AM
 • नांदेड - कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्यात सहायक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी इंडिया मेगा कंपनीच्या केलेल्या सखोल तपासाने कंपनीला कर्जपुरवठा करणाऱ्या दोन बँकांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या दोन्ही बँकांनी मिळून जवळपास दोनशे कोटींचा कर्ज पुरवठा इंडिया मेगा कंपनीला केला आहे. अन्नधान्य घोटाळ्यातून पुढे येणाऱ्या बाबीवरून आता बँकिंग क्षेत्रही हादरून गेले आहे. बँकेचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ पाहणीसाठी कंपनीला भेट देण्याची शक्यता आहे. कृष्णूर घोटाळ्यात पोलिसांनी 18 जुलैला इंडिया मेगा कंपनीत...
  October 2, 07:45 AM
 • नाशिक/नांदेड- नायगावजवळ नांदेड-हैदराबाद मार्गावर नायगावजवळ झालेल्या अपघातात 3 जण ठार झाले आहेत. या अपघातात 6 जण जखमी झाले आहेत. हे सर्वजण आंध्र प्रदेशच्या कुर्नूलचे आहेत. नायगावजवळ दुभाजकाला इनोव्हा आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात एका 7 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला आहे. आरूषी रणजितकुमार (वय 7), अनुराधा रणजितकुमार (वय 31) आणि चालक बोईजार्ज क्लिंटन (वय 22) असे या मृतांचे नाव आहे. अपघातातील सर्वजण आंध्रप्रदेशातील कर्नूल येथील रहिवाशी आहेत. अपघात झाल्याचे कळताच गावकऱ्यांनी तात्काळ...
  August 18, 01:55 PM
 • नांदेड -हैदराबाद येथे घरफोडी करून २० लाखांच्या रोख रकमेसह सोन्या, चांदीचे दागिने घेऊन इंदूरला पळून जाणाऱ्या तीन आरोपींना नांदेड पोलिसांनी सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पकडले. हे सर्व आरोपी राजस्थानमधील टोकू जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय ऐनपुरे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. तेलंगणातील हैदराबाद शहराच्या पश्चिम विभागात असलेल्या शाहिनाथगंज येथे चिंडोने ससी, रणवीर ससी, राकेश मीना (तिघेही वय ३५, रा. पोलेदा, ता. देवळी, जि. टोकू, राजस्थान) यानी समीर बक्षे या...
  February 15, 03:00 AM
 • नांदेड -महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेस सुरुवात झाली आहे. यंदा नोटबंदीचा परिणाम जाणवत असला तरी माळेगावला येणाऱ्या रसिक प्रेक्षकांचा उत्साह काही कमी झालेला नाही. दरम्यानच्या काळात बंद पडलेला दस के तीन यंदा सुरू झाला असून त्याने तीस चे तीन ही नवी लोकप्रियता मिळवली आहे. तीस रुपयांत तीन मराठमोळ्या लावण्यांची मेजवानी रसिकांना मिळत असल्यामुळे तीसचे तीन गर्दी खेचत आहे. माळेगाव यात्रेस २७ डिसेंबरपासून विधिवत सुरुवात झाली आहे. सुरुवातीपासूनच दररोज यात्रेदरम्यान...
  December 30, 03:00 AM
 • नांदेड । माळेगाव येथील खंडोबा यात्रेत पशुसंवर्धन विभागाच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पशू प्रदर्शनात भाग घेण्यासाठी पशुपालकांच्या जनावरांची नोंदणी सकाळी ८ ते ११ अशी राहील. याची पशुपालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी केले आहे. २७ डिसेंबर रोजी पशुसंवर्धनविषयक प्रदर्शन स्टॉलचे उद्घाटन, २८ रोजी भव्य पशू प्रदर्शन, ३० डिसेंबर रोजी बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या पशू प्रदर्शनात भाग...
  December 23, 03:12 AM
 • नांदेड / औरंगाबाद : नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीत राज्यभर सत्ताधारी भाजपने विजयाची घोडदौड केली असतानाच नांदेड जिल्ह्यात मात्र काँग्रेसने आपले वर्चस्व अबाधित राखत ही घोडदौड रोखली. जिल्ह्यातील ९ पैकी ६ नगरपालिकांवर काँग्रेसचा झेंडा फडकून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आपला गड राखण्यात यश मिळवले. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एकाच जागेवर समाधान मानावे लागले. एका नगरपालिकेवर अपक्ष नगराध्यक्ष निवडून आला. औरंगाबाद जिल्ह्यातील ४ पैकी काँग्रेसचे...
  December 20, 03:44 AM
 • नांदेड- सर्वसामान्य माणसाच्या जीवनात चांगले दिवस यावेत याकरिता केंद्रातील व राज्यातील भाजपचे सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्टपणे काम करीत असून भ्रष्टाचारमुक्त देश निर्माण करण्यासाठी नोटाबंदीचा धाडसी निर्णय मोदी यांनी घेतल्यामुळे देशात मोठी अर्थक्रांती झाल्याचे उद्गार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काढले. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या भाजप उमेदवारांच्या व नगराध्यक्षपदाचे उमेदवार लक्ष्मीबाई कागणे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत...
  December 12, 03:00 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात