जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • नांदेड -हिमायतनगर येथील पोलिस ठाण्यात रविवारी अंगावर रॉकेल टाकून जाळून घेतलेल्या सद्दामची मृत्यूशी सुरू असलेली झुंज गुरुवारी संपली. गुरुवारी दुपारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.दरम्यान, त्यास आत्महत्येस प्रवृत केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा काळे, पो.ना. संतोष राणे यांच्यावर तडकाफडकी सेवेतून बडतर्फी कार्यवाही करण्यात आली आहे. सद्दामने रविवारी सायंकाळी ६ वाजता हिमायतनगर पोलिस ठाण्यात अंगावर...
  July 19, 02:26 PM
 • नांदेड - जिल्ह्यातील भोकर तालुक्यात प्रेमीयुगुलाची हत्या केल्या प्रकरणी दोन भावांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जुलै 2017 मध्ये पीडित मुलीच्या सख्ख्या भावांनी तिचा आणि तिच्या प्रियकाराचा भररस्त्यात गळा चिरून हत्या केली होती. प्रियकरावर हल्ला झाल्यानंतर ती बचाव करण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच दुसऱ्या भावाने तिचा गळा चिरला होता. प्रियकाराचा तर जागीच मृत्यू झाला. आरोपींनी त्याला रस्त्याच्या बाजूला फेकले होते. परंतु, अजुनही जीव असलेली तरुणी रक्तरंजित अवस्थेत मदतीसाठी...
  July 19, 02:18 PM
 • नांदेड -भाेकर तालुक्यातील मौ.थेरबन येथील दुहेरी हत्याकांडात भाेकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने कठाेर शिक्षा सुनावली. प्रियकरासाेबत पळून गेलेली बहीण आणि तिच्या प्रियकराचा गळा चिरून खून करणाऱ्या दाेघा भावांपैकी एकाला फाशीची तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी गुरुवारी आरोपी दिगंबर बाबूराव दासरे याला फाशीची तर मोहन नागोराव दासरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खोट्या प्रतिष्ठेपायी या दोन भावांनी बहीण व तिच्या...
  July 19, 02:02 PM
 • बीड -इयत्ता तिसरीत शिक्षण घेत असल्यापासून पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम पित्याला आईने न्यायालयात दिलेल्या साक्षीमुळे १४ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात अाली. आष्टी तालुक्यातील या घटनेत गुरुवारी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश प्राची कुलकर्णी यांनी हा निकाल दिला. सहायक सरकारी वकील अॅड. राम बिरंगळ यांनी या प्रकरणी युक्तिवाद केला. पीडित मुलगी आई- वडील व भावासह राहत होती. ती तिसरीत असताना तिच्या वडिलांनी तिच्यावर अत्याचार केला. मुलीने आपबीती आपल्या आईला सांगितली....
  July 19, 10:49 AM
 • नांदेड -डॉक्टरला घरातील शौचालयात जाळून मारल्याच्या आरोपावरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी दत्ता व्यंकट कल्याणे (वय ३८) याला जन्मठेप व चार हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. या खटल्यात दत्ता कल्याणे याची पत्नी भूमिता कल्याणे हिची मात्र सबळ पुराव्यांअभावी सुटका केली. देगलूर तालुक्यातील सुगाव येथील मूळ रहिवासी असलेले डॉ. गणेश व्यंकटराव बामणे मुदखेड तालुक्यातील मुगट गावात इमारत बांधून त्या इमारतीमध्ये विवेक निसर्ग नावाचा दवाखाना चालवत हाेते. इमारतीमध्ये दत्ता व्यंकट...
  July 19, 07:35 AM
 • परभणी -स्थानिक स्वराज्य संस्थांवर मजबूत पकड असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचे मोठे ग्रहण लागलेले आहे. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत ही गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. चार विधानसभा मतदारसंघांसाठी इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. जिल्ह्यातील चार पैकी दोन विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. जिंतुरातून आ.विजय भांबळे तर गंगाखेडमधून डॉ.मधुसूदन केंद्रे हे विधानसभेवर आहेत. या शिवाय पाथरी मतदारसंघात मजबूत पकड असलेले जिल्हाध्यक्ष...
  July 19, 07:31 AM
 • गेवराई -लांबवलेल्या पावसामुळे गडद होत असलेले दुष्काळाचे संकट आणि त्यात जाणवणारी तीव्र पाणीटंचाई यामुळे नागरिकांचे जगणे असह्य झाले आहे. अशातच अज्ञात समाजकंटक चार गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीच्या पाण्यात विष कालवून ग्रामस्थांच्या जिवावर उठला. पाण्याचा रंग बदलल्याने वेळीच ही बाब लक्षात आल्याने हजाराे लाेकांचा जीव वाचला. ही घटना गेवराई तालुक्यातील भोजगावात उघडकीस अाली. अज्ञात व्यक्तीने कीटकनाशकाच्या दोन बाटल्या पाण्यात ओतल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी सहा वाजता...
  July 19, 07:24 AM
 • नांदेड -हिमायतनगर येथे रविवारी सायंकाळी ६ वाजता पोलिस ठाण्यातच शेख सद्दाम या तरुणाने जाळून घेतल्याच्या प्रकरणात हिमायतनगर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह सहा जणांवर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. दोन आरोपींना तातडीने अटक करण्यात आली असून अन्य चार आरोपींच्या अटकेसाठी पोलिस पथक रवाना झाले असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. शे. सद्दाम शे.अहेमद याने नांदेडला न्यायाधीश व पोलिसांसमोर दिलेल्या जबाबात सांगितले की, त्याची पत्नी व दोन मुले माहेरी...
  July 18, 08:08 AM
 • बीड -गर्भाशय शस्त्रक्रिया करण्यासाठी आता आराेग्य विभाग व डॉक्टर विशेषत: स्त्री रोग तज्ज्ञांच्या संघटनांनी मिळून तयार केलेले मार्गदर्शक तत्व लवकरच राज्यभरातील डॉक्टरांसाठी लागू होणार आहेत. यात शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्णांचे समुपदेशन व उपचार याबाबत माहिती दिली जाणार आहे. बीड जिल्ह्यातील गर्भाशय शस्त्रक्रिया प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्ती समितीच्या अध्यक्षा, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी याबाबत...
  July 18, 07:56 AM
 • गेवराई -भुईमुग, ऊस, कापूस अशी कोवळी पीकं रानडुकरे रातोरात उद्ध्वस्त करतात. या संकटावर मात करण्यासाठी राक्षसभुवन (ता.गेवराई) येथील शेतकऱ्याने तामिळनाडूतील शेतकऱ्याने वापरलेली कुंपण साड्यांची शक्कल वापरली. सहा हजार रुपये खर्च करून दीडशे साड्या विकत घेऊन त्यांचे कुंपण बनवले. त्यामुळे रानडुकरे इकडे फिरकतच नसल्याचा त्यांचा अनुभव आहे. राक्षसभुवन येथील शेतकरी अशोक शेळके यांचे पाच एकर क्षेत्र आहे. याठिकाणी तीन एकर ऊस व दोन एकर कपाशीची लागवड केली. गतवर्षीच्या दुष्काळातून कसेबसे सावरत...
  July 18, 07:51 AM
 • टेंभूर्णी- उस्मानाबादहून सजवलेल्या ट्रकमधून आलेल्या सोळा जणांनी पेट्रोल पंपाच्या भूमिगत टँकवरील झाकण काढून त्यात हातपंप टाकून डिझेल वाहनात भरण्यासह पेट्रोल पंपावर लुटमारीचा प्रयत्न केला. कुणीतरी येत असल्याचे पाहताच सोळापैकी चौदा जण ट्रकसह फरार झाले. तर दोघांना ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी ताब्यात घेतले. ही घटना टेंभुर्णी शहराला लागून असलेल्या आकाश पेट्रोल पंपावर रविवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली. उद्धव बाबूराव शिंदे (बावी, ता. वाशि,जि. उस्मानाबाद), नितीन बापूराव पवार...
  July 17, 09:51 AM
 • जालना/घनसावंगी -घनसावंगी शहरात शिक्षण घेण्यासाठी बसने प्रवास करत असलेल्या मुलींना रोजच टवाळखोर मुलांचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी बसमध्ये बसलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करत अश्लील इशारे करणाऱ्या तीन जणांविरुद्ध मुलींनीच घनसावंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. यावरून तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. प्रवीण धनंजय मोरे, गजानन लहू मोरे, दीपक मधुकर धानुरे अशी रोडरोमिओंची नावे आहेत. अंबड ते कुंभार पिंपळगाव या एसटी बसने नेहमीप्रमाणे मोहपुरी येथील एक अल्पवयीन...
  July 16, 08:34 AM
 • नांदेड -स्व. शंकरराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा थाटात प्रारंभ होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे काँग्रेस श्रेष्ठींनी पद काढून घेतले. लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवाच्या धर्तीवर प्रदेशाध्यक्षपदाचा खांदेपालट होणार हे उघड होते. तथापि हा खांदेपालट करताना काँग्रेस श्रेष्ठींनी योग्य वेळ निवडली नाही. स्व. शंकरराव चव्हाण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी प्रदीर्घ काळ काँग्रेस संघटनेत काम केले. राज्याचे दोनदा मुख्यमंत्रिपद, केंद्रात संरक्षण,...
  July 16, 08:28 AM
 • जालना -स्टेट बँक ऑफ इंडियाच्या परिसरात कुणीच नसल्याची संधी साधून एका चोरट्याने शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर भक्कम अशी तिजोरी फोडण्याचा त्याने तब्बल तासभर प्रयत्न केला. परंतु, तिजोरी फुटतच नसल्याने चोरटा निघून गेल्याने तिजोरीतील तब्बल ५६ लाख रुपये सुरक्षित राहिले. हा प्रकार गांधी चमन भागातील एसबीआय शाखेत रविवारी मध्यरात्री १ ते २ वाजेच्या सुमारास घडली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्याचा चेहरा स्पष्ट कैद झाला. दरम्यान, कदीम पोलिसांनी २० दिवसांपूर्वीच बँक अधिकाऱ्यांची बैठक...
  July 16, 08:23 AM
 • बीड -दुष्काळी स्थिती व त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने दुबार पेरणीचे संकट अशा स्थितीत शेतकऱ्यांचा धीर सुटत आहे. २४ तासांत बीड जिल्ह्यात चार शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. राजेवाडी (ता. माजलगाव) येथील गणेश गंगाधर घुबडे (२६) याने शनिवारी रात्री राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. त्यांना अवघी दीड एकर कोरडवाहू जमीन असून नापिकी व कर्जबाजारीपणाने ते आर्थिक विवंचनेत होते. आत्महत्येची दुसरी घटना मैंदा (ता. बीड) येथे घडली. केशव दादाराव मोमीन (५८) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. रविवारी दुपारी...
  July 15, 11:35 AM
 • हिमायतनगर - शहरातील शे. सद्दाम शे. अहेमद नामक २५ वर्षीय युवकाने पोलिस ठाण्यासमोरच अंगावर रॉकेल टाकून काडी लावून पेटवून घेतल्याची घटना १४ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. पती -पत्नीतील वादातून ही घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. शेख सद्दाम याने जाळून घेतले तेव्हा येथे कर्तव्यावर असलेले पोलिस कर्मचारी एस. एस. पवार, जाधव आदींनी पांघरायचे साहित्य त्याच्या अंगावर टाकून आग विझवत त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी पोलीस कर्मचारी...
  July 15, 08:24 AM
 • बीड -विद्यार्थिदशेत अजाणतेपणी घडलेला अपघात. केवळ नृत्यांगनेचा व भटक्या समाजातील मुलगा असल्याने यंत्रणेकडून स्वत:सह कुटुंबाचा झालेला छळ. या घटनेनंतर मुश्किलीने जगणे सावरले, शिक्षण घेतले. मात्र, बालपणीची जखम अजूनही भळभळते. या वेदनेलाच जगण्याची प्रेरणा बनवत कोल्हाटी, आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, भटक्या-विमुक्तांच्या पाल्यांसाठी मोहा (ता.जामखेड) येथे निवारा बालगृह उभारले. आज या ठिकाणी पालकांंकडून सांभाळ होऊ शकत नसलेल्या ६० चिमुकल्यांच्या जीवनाला दिशा दिली जात आहे. जामखेड येथील...
  July 15, 08:19 AM
 • परभणी -लग्नसोहळ्यात आहेर स्वरूपात मिळालेली २७ हजार रुपयांची रोख रक्कम नवदांम्पत्यासह दोघा व्याह्यांनी गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना सुपूर्द करीत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. त्यामुळे आयआयटी वाराणसी प्रवेशास पात्र ठरलेल्या सतीश जोजारे याच्या प्रवेशातील आर्थिक अडसर थोड्या प्रमाणात दूर होण्यास मदत होणार आहे. सतीश जोजारे या ऑटोरिक्षा चालकाच्या मुलाने कौटुंबिक बिकट स्थितीतही प्रचंड मेहनत, नियोजनपूर्व अभ्यास करीत जेईईपाठोपाठ मेन्स परीक्षेत उत्तुंग असे यश पटकावून...
  July 15, 08:07 AM
 • हिंगोली -तालुक्यातील भांडेगाव येथे शेत वाटणीच्या वादावरून एका शेतकऱ्याने मुलासह पत्नीवर कुऱ्हाड व विळ्याने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून दोन्ही गंभीर जखमींना नांदेड येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रामप्रसाद ऊर्फ बंडू महादेव गिरी आणि विजयमाला महादेव गिरी अशी जखमींची नावे आहेत. महादेव यांना दोन बायका असून त्यांना तीन अपत्ये आहेत. ते आपल्या दुसऱ्या पत्नीसमवेत मालगाव येथे वास्तव्यास आहेत. तर विजयमाला आणि रामप्रसाद हे...
  July 15, 08:01 AM
 • बीड -विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर येथील पंचायत समितीच्या लोकार्पणावरून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यात श्रेयवादाचा कलगीतुरा चांगलाच रंगला. परळी पंचायत समिती धनंजय मुंडे गटाच्या ताब्यात असून या इमारतीचे लोकार्पण करताना भाजपने या पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले नाही म्हणून सभापती, उपसभापतींसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आदल्याच दिवशी इमारतीचे उद्घाटन केले. शेवटी हे प्रकरण पोलिसांत गेले. जमावबंदीचा...
  July 15, 07:56 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात