जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • जालना- राज्यात शिवसेना-भाजप युती झाली असली तरी जालना जिल्ह्यात मात्र युतीबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचा आपला निर्धार पक्का असल्याचे जाहीरपणे सांगत भाजप प्रदेशाध्यक्ष खा. दानवे यांच्यापुढील आव्हान कायम ठेवले आहे. येत्या दोन दिवसांत उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचे मंत्री खोतकर यांनी मंगळवारी दिव्य मराठी शी बोलताना सांगितले. राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब...
  February 20, 11:49 AM
 • बीड- जलसंधारणामध्ये केलेल्या चांगल्या कामांसाठी महाराष्ट्र राज्याने राष्ट्रीय पुरस्कार-२०१८ मध्ये मानाचे स्थान मिळवले असून बीड जिल्ह्याने या यशामध्ये मोठा वाटा उचलत जलसाठ्यांचे पुनरुत्थानात देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. या पुरस्कारांचे वितरण २५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा, भूपृष्ठ वाहतूक, जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय पातळीवरील विविध पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली असून याची माहिती क्षेत्रीय निदेशक केंद्रीय भूमिजल...
  February 20, 08:02 AM
 • जालना- बरवार क्षत्रिय समाजात विधवा महिलांच्या पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. इतर समाज पुढारत असताना आपल्या समाजाने प्रथांना का कवटाळून ठेवावे? पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर पुरुषाला दुसऱ्या लग्नाची मुभा, मग विधवा महिलांवर अन्याय का, असे विचारमंथन बरवार समाजात झाले. त्याची परिणिती समाजाने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देण्यात झाली. जालन्यात रविवारी राज्यव्यापी बैठक व वधू-वर परिचय मेळाव्यात राज्य पंच कमिटीत हा निर्णय एकमताने मंजूर झाला. देशपातळीवरील बैठकीतही हा ठराव मंजूर केला जाईल....
  February 20, 07:42 AM
 • नांदेड- धर्माबाद तालुक्यातील मौजे चिकना येथे शेतात तंबाखूची पाने वाळवण्यासाठी खोदलेल्या भट्टीत पडल्याने पिता-पुत्राचा श्वास गुदमरून तसेच होरपळून मृत्यू झाला. वडील भट्टीत पडल्याने त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात मुलगाही भट्टीत पडल्याने दोघेही मृत्युमुखी पडले. ही घटना सोमवारी सकाळी घडली. या घटनेमुळे चिकना गावावर शोककळा पसरली आहे. शेख चांदपाशा ख्वाजामियाँ (वय ५५), शेख वंशोद्दीन अशी मृत पितापुत्राची नावे आहेत. याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील चिकना येथील शेतकरी शेख चांदपाशा...
  February 19, 06:53 AM
 • तुळजापूर- तुळजापूरजवळील घाटशीळ घाटात भरधाव मळीचा कंटेनर तुळजापूरकडे जाणाऱ्या अल्टो कारवर उलटला. या अपघातात कंटेनरखाली चिरडून कारमधील ७ जणांचा मृत्यू, तर चौघे जखमी झाले. सोमवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. मळीचा कंटेनर सोलापूरच्या दिशेने भरधाव निघाला होता. अल्टो कार घाटातून येत होती. एका वळणावर कंटेनर कारवर उलटला. यात कारमधील ११ जण कंटेनरखाली दबले गेले. यामध्ये कारमधील सात जण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात उस्मानाबाद येथे...
  February 19, 06:50 AM
 • लोहारा- पूर्वी अब की बार मोदी सरकार असे म्हणणारे लोकच आता अब की बार, बस कर यार असे म्हणत आहेत. जर सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशच न्याय मागण्यासाठी धाव घेत असतील तर सर्वसामान्य जनता कुणाकडे न्याय मागणार, असा प्रश्न विचारत लोकांना हाऊ इज द जोश असे विचारणाऱ्यांना जनता पुढील काळात त्यांचा रोष दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी केली. ते लोहारा (जि.उस्मानाबाद) येथे रविवारी (दि.१७) आयोजित जनसंघर्ष यात्रेत बोलत होते. चव्हाण पुढे म्हणाले की,...
  February 18, 08:54 AM
 • जालना- पुणे ते अकोला ट्रॅव्हल्स वेगात असताना काहीतरी जळाल्याचा वास येत होता. काही क्षणातच गिअर बॉक्सखालून धुरही निघू लागला. यामुळे जास्त वेळ न लावता उतारावर का होईना, तत्काळ गाडी उभी केली. नंतर घाई-गडबडीत दरवाजा उघडून प्रवाशांकडे गेलो. लवकर उठा, असा मोठमोठ्याने आवाज केला. झोपेत असलेल्यांना हलवून उठवले. चार मिनिट होत नाही तोच केबिनमध्ये आगीचे लोळ दिसू लागले. ही मागेही येणार यामुळे एका दरवाजातून सर्वच प्रवासी बाहेर काढणे शक्य नसल्याने लोखंडाने काचा फोडल्या, इमर्जन्सी खिडकीही उघडली. अवघ्या...
  February 18, 08:53 AM
 • परळी- दोन वर्षांपासून बंद असलेल्या परळीतील ऑइल मिलच्या स्टोअर रूममध्ये लागलेले मोहोळ झाडण्यासाठी जाळ पेटवताच अडगळीत पडलेल्या बंद रोहित्राचा अचानक स्फोट झाला. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की सुमारे ३ किलोमीटरपर्यंत आवाज ऐकू गेला. या प्रकारामुळे परळीत एकच खळबळ उडाली. दरम्यान, परळी शहरापासून जवळच असलेली ही ऑइल मिल पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली सुरू होत्या. स्टोअर रूमची सफाई करण्यासाठी तीन मजूर या खोलीत गेले होते....
  February 18, 08:53 AM
 • ईट- दुष्काळी परिस्थितीमुळे भूम तालुक्यात कमी पाण्यामुळे ज्वारी पिकास बगल देत शेतकऱ्यांनी काही प्रमाणात कांदा पिकाची लागवड केली. मात्र, भाव प्रचंड गडगडल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. भूम तालुक्यातील चिंचपूर येथील शेतकरी नवनाथ ढगे यांनी कांद्याची लागवड केली. यावर हजारो रुपये खर्चही केला. मात्र, १८७३ किलो कांदा बाजारात विक्री केल्यानंतर २४६१ रुपये आले. वाहतूक, वजन, हमाली पकडून केलेला खर्च २५४८ रुपये झाला. कांदा वाहतूक, वजन, हमाली यासाठीची कपात होऊन शेतकऱ्याकडेच...
  February 17, 08:37 AM
 • केज- वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलिसांशी हुज्जत घालून शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी दरडवाडी ( ता. केज ) येथील सात जणांना एक वर्ष प्रत्येक महिन्यातील पहिल्या व तिसऱ्या शनिवारी पोलिस ठाण्याची साफसफाई करण्याची शिक्षा अंबाजोगाईचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी सुनावली. शिवाय प्रत्येकी ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. केज पोलिस ठाण्याचे तत्कालीन फौजदार रमाकांत पांचाळ व त्यांचे सहकारी ७ एप्रिल २०११ रोजी दुपारी २.३० वाजता दरडवाडी येथील साहेबराव दराडे यांच्याकडे...
  February 17, 07:41 AM
 • बीड- बलात्कार केल्याची दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींंच्या नातेवाइकांनी पीडितेच्या वडिलांना मारहाण करून धमकावले. त्यामुळे त्यांनी विष घेत आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथे घडली. या प्रकरणी गुन्हा नोंद करून आरोपींच्या अटकेची मागणी करत नातेवाइकांनी शवविच्छेदन रोखले होते. बीड तालुक्यातील आहेर धानोरा येथे एका मुलीवर गावातीलच एका तरुणाने अत्याचार केला होता. या प्रकरणी १ फेब्रुवारी रोजी बीड ग्रामीण पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिसांनी...
  February 16, 09:13 AM
 • नांदेड- शिवसेनेच्या वतीने भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ पाकिस्तानचा झेंडा व पुतळा जाळून तीव्र निषेध करण्यात आला. शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन किसवे यांच्या मार्गदर्शनाखाली तरोडा नाका येथे हे आंदोलन करण्यात आले. या वेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. गुरुवारी पाकिस्तानी दहशतवादी संघटनेने भ्याड हल्ला करून भारतीय जवानांचे बळी घेतले. हा हल्ला संपूर्ण भारतीयांवरील हल्ला असून देशभरात या हल्ल्याचा तीव्र निषेध होत आहे. एक के बदले...
  February 16, 09:08 AM
 • वडीगोद्री/शहागड- आज नाराज दिसताय, काय झाले म्हटल्यानंतर काही नाही हातपाय दुखत आहेत, असे ते म्हणाले. जेवून घ्या, म्हटल्यानंतर थोडं थांब, असं म्हणून ते बेडरुममध्ये गेले. आतून दरवाजा बंद करून घेतला. परंतु, काही क्षणांतच गोळी झाडल्याचा आवाज आल्यामुळे मी धावत बेडरुमकडे गेले असता, दरवाजा लावलेला होता. बाहेर असलेले कॉन्स्टेबलही धावत आले आणि दरवाजा तोडला. ते बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. सपोनि अनिल परजणे यांच्या पत्नी अर्चना परजणे यांनी अश्रू आवरत सांगितले. परजणे यांनी गेल्या काही...
  February 16, 09:05 AM
 • नांदेड- लोकसभा निवडणुका जाहीर होण्यासाठी काही आठवडे शिल्लक असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-पीआरपी व मित्र पक्षांच्या आघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे. या आघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा नांदेडमध्ये २० फेब्रुवारी रोजी आयोजित होणार आहे. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, महाराष्ट्राचे प्रभारी व लोकसभेतील काँग्रेसचे नेते खा.मल्लिकार्जुन खरगे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोक चव्हाण, पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष आ.जोगेंद्र...
  February 16, 09:05 AM
 • नांदेड / लोणी खुर्द- जम्मू - काश्मीरमधील पुलवामा येथे भारतमातेच्या सुपुत्रांचे रक्त सांडवणाऱ्या जैश-ए-मोहंमद या अतिरेकी संघटनेचा सर्वच स्तरांतून निषेध होत आहे. भारतीय जवानांचे बळी घेणाऱ्या अतिरेक्यांच्या नांग्या ठेचल्याच पाहिजेत. अतिरेक्यांच्या पाठीशी असलेल्या शेजारी देशाला अद्दल घडवण्याची हीच वेळ आहे, अशी संतप्त भावना जनसामान्यांतूनही उमटत आहे. एवढेच काय तर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यातील लोणी खुर्द येथील नवरी-नवरदेवांनी शहीद ४४ जवानांना श्रद्धांजली...
  February 16, 08:39 AM
 • जालना- अंबड तालुक्यातील गोंदी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षकानेसहायक रिव्हॉल्व्हरने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदी येथील पोलिस वसाहतीत शुक्रवारी (ता.15) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अनिल परजणे असे या आत्महत्या केलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. कॅनलमध्ये पडलेले वाहन काढण्यासाठी पहाटे 4 वाजेपर्यत केली मदत.. अनिल परजणे यांनी शुक्रवारी पहाटे 4 वाजेर्यंत कॅनलमध्ये पडलेले...
  February 15, 03:22 PM
 • गेवराई- व्हॅलेंटाइन डेच्या पूर्व संध्येला गेवराईतील संजयनगर भागातून दहावीत शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना बुधवारी संध्याकाळी साडेसहा वाजता घडली. मुलींच्या शोधासाठी पालकांनी रात्र जागून काढत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला. पोलिस मुलींचा शोध घेत असतानाचा गुरुवारी गेवराई ठाण्याचा फोन खणखणला आणि बेपत्ता झालेल्या दोन्ही गेवराई बसस्थानकावर असल्याची माहिती अज्ञाताने दिली. पोलिसांनी बसस्थानकावर जाऊन मुलींना ताब्यात...
  February 15, 09:01 AM
 • परभणी- आईच्या खुनाचा बदला घेण्यासाठी पतीनेच स्वतःच्या पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना बुधवारी (दि.१३) घडली. वांगी रस्त्यावरील नूतननगरात घडलेल्या या थराराची पार्श्वभूमी समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पती फरार आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांगी रस्त्यावरील हडको परिसरातील नूतननगरात आनंद नाथा खंदारे (२५) हा पत्नी मयूरी खंदारे (२०) हिच्यासोबत वास्तव्यास आहे. १७ नोव्हेंबर २०१७ रोजी आनंदने मयूरीला फूस लावून पळवून नेऊन लग्न केले होते. लग्नाच्या...
  February 14, 12:35 PM
 • बीड- पोलिसांनी कारवाई करून जप्त केलेला गांजा बुधवारी पोलिस मुख्यालयाच्या परिसरात नष्ट करण्यात आला. दरम्यान, यामध्ये थेट १९९२ सालच्या कारवाईतील गांजाचा समावेश होता. परळी ग्रामीण व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या कारवाईचा यामध्ये समावेश आहे. सन १९९२ मध्ये परळी ग्रामीण पोलिसांनी एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून त्याच्याकडून १०० ग्रॅम गांजा जप्त केला होता, तर सन २००५ मध्ये एका गांजा विक्रेत्यावर कारवाई करून ६५० ग्रॅम गांजा जप्त केला होता. शिवाजीनगर पोलिसांनी २०१० मध्ये...
  February 14, 08:37 AM
 • घनसावंगी- राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसचा पाठलाग करत रस्त्यावर दगड आणि दुचाकी आडवी लावून अल्पवयीन युवतीस बसमधून खेचून पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र बसमधील प्रवासी आक्रमक झाल्याने तिघे रोडरोमिओ घटनास्थळावरून पसार झाले. ही घटना घनसावंगी ते अंबड मार्गावरील बोधलापुरीजवळ सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी बसचालक भगवान आव्हाड यांच्या फिर्यादीवरून तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबड, कुंभार पिंपळगावमार्गे बस घनसावंगीकडे जात असताना बसला...
  February 13, 08:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात