जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • वडवणी - उपळी येथील विवाह आटाेपून पाथरी तालुक्यातील रेणाखळी तांड्यावर दुचाकीवरून परतत असताना बीड-परळी राज्यमार्गावरील कुप्पा फाट्यानजीक ब्रम्हनाथ तांड्याजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली. यात चिरडून पतीसह मायलेकीचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता झालेल्या या भीषण अपघातात या कुटुंबातील एक सहा वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला. वडवणी तालुक्यातील उपळी येथील विवाह समारंभासाठी पाथरी तालुक्यातुन रेणाखळी तांड्यावरील राठोड दांपत्य व दोन मुले असे कुटुंबीय मंगळवारी आले...
  May 22, 08:50 AM
 • अंबाजोगाई -बलात्काराची तक्रार देण्याची धमकी देऊन सातत्याने पैसे मागणाऱ्या अंबाजोगाई तालुक्यातील नांदगाव तांडा येथील महिलेचा खून करून दोघा जणांनी तिचा मृतदेह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिराढोण येथे पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. कविता चव्हाण (२२, रा. नांदगाव तांडा, ता. अंबाजोगाई) असे त्या महिलेचे नाव आहे. गावातील मोहन राठोड याला ती सारखे पैसे मागत असे. पैसे न दिल्यास बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी तिने मोहनला दिली. धमक्यांमुळे संतापलेल्या मोहनने पांडुरंग रावसाहेब पवार (रा....
  May 21, 09:27 AM
 • परभणी -अवयवदानाच्या क्षेत्रात आलेल्या एका कटू अनुभवाने मन सुन्न झाले होते. काही वर्षांपूर्वी दोन्ही किडनी निकामी झालेल्या एका रुग्णाला मुंबईत ऑपरेशनसाठी घेऊन गेलो होतो. त्याच्या दोन्ही किडन्या बदलणे गरजेचे होते. परंतु सहा महिने प्रतीक्षा केल्यानंतरदेखील किडनी न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. तेव्हाच अवयवदानाच्या क्षेत्रात काम करायचे ठरवले. या कार्याची सुरुवात स्वतःपासूनच करायची म्हणून मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प सोडला आहे. परभणीचे कार्यकर्ते शिवलिंग बोधणे यांनी व्यक्त...
  May 21, 09:08 AM
 • परभणी -येलदरी ते जिंतूर रस्त्यावर शेवडी शिवारात भरधाव टेम्पोवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे ताे झाडावर जाऊन धडकला. त्यात चालकाचा जागीच मृत्यू झाला तर चार जण गंभीर जखमी झाले. सोमवारी(दि.२०) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात घडला. येलदरीहून लाकडाने भरलेला टेम्पो (एम.एच.०४-सीजी-०५२८) सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास जिंतूरकडे येत होता. शेवडी शिवारात उतारावर चालकाने टेम्पो वेगाने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र या प्रयत्नात त्याचा गाडीवरील ताबा सुटला व टेम्पो झाडावर धडकला. या अपघातात टेम्पो चालक...
  May 21, 09:04 AM
 • माजलगाव -आखातातील ओमानमध्ये नोकरीनिमित्त स्थायिक असलेल्या मुलास भेटण्यासाठी गेलेले माजलगाव येथील खैरुल्ला खान व त्यांचे कुटुंबीय त्या देशात शनिवारी झालेल्या ढगफुटीत बेपत्ता झाले आहे. ओमान सरकार हेलिकॉप्टरद्वारे त्यांचा शोध घेत आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. माजलगावात खान कुटुंबीयांना त्यांच्या मुलाच्या मित्राने फोन करून माहिती दिली. खैरुल्ला खान हे राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष आहेत. माजलगाव येथील बुखारी शाळेतील माजी शिक्षक खैरुल्ला...
  May 20, 08:59 AM
 • बीड -औरंगाबाद - सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर चौसाळा येथील बाह्यवळण रस्त्यावर दुचाकीला भरधाव जीपने धडक दिली. यात दुचाकीवरील दोन तरुण ठार झाले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सतीश सारंगधर मोरे (३१, रा. चांदणी, ता. बीड) व धनंजय शिवाजी कोल्हे (२३, रा. चांदेगाव, ता. बीड) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघे बीडहून चौसाळ्याकडे दुचाकीवरून (एमएच २३ आर ६४०) जात होते, तर जीप(एमएच २३ एडी ४४६२) चौसाळ्याहून बीडकडे जात होती. बाह्यवळण रस्त्यावरील महात्मा बसवेश्वर चौकालगत जीपने दुचाकीला समोरासमोर जोराची धडक...
  May 19, 10:29 AM
 • माजलगाव -येथील बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरच मध्यभागी आडवी लावलेली दुचाकी बाजूला न काढता उलट बस चालक व वाहकालाच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालकाने शिवीगाळ करून मारहाण केली. येथील बसस्थानकात शनिवारी सकाळी आठ वाजता ही घटना घडली. बस वाहक व चालकास मारहाण केल्याचे समजताच स्थानकातील अन्य चालक वाहकांनी संतापाच्या भरात दीड तास बसेस थांबून आंदोलन केले. मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत बस जागेवरून हलवण्यात येणार नाही, असा पवित्रा घेतला. शेवटी आगारप्रमुख व पोलिस...
  May 19, 10:19 AM
 • उस्मानाबाद -उस्मानाबाद शहरासह ढोकी, तेर, कसबे तडवळे व येडशी या ४ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या २०.४४५ दलघमी पाणीसाठा क्षमता असलेला तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प कोरडा पडला. २०१७ मध्ये प्रकल्प ओव्हरफ्लो झाला होता. २६ डिसेंबर २०१७ रोजी या प्रकल्पात राज्यस्तरीय नौकानयन स्पर्धाही झाली होती. गेल्या वर्षी (२०१८) तेरणा धरण क्षेत्रात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरणात नव्याने पाणीसाठ्यात वाढ झाली नाही. २०१७ मधील धरणाच्या पाणीसाठ्यावरच उस्मानाबादची तहान भागली.आता शहरासह परिसरातील...
  May 19, 10:13 AM
 • बीड -पाण्याने भरलेला ड्रम आणताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात ड्रम अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू झाला. पती गंभीर जखमी आहे. ही घटना तालुक्यातील गुंजाळा येथे शनिवारी सकाळी ६ वाजता घडली. मीनाक्षी अनुरथ घुगे (२८) असे मृत महिलेचे नाव आहे. गावात पाणी नसल्याने मीनाक्षी व अनुरथ घुगे हे दांपत्य शनिवारी सकाळी दुचाकीवरून शेतात पाणी आणण्यासाठी गेले. बोअरमधून पाणी भरून ते दुचाकीवरून ड्रम घेऊन येत होते. वाटेत दुचाकी घसरली. यात ड्रम अंगावर पडून मीनाक्षी गंभीर जखमी झाल्या. तसेच पती अनुरथ यांनाही मार...
  May 19, 09:00 AM
 • बीड- खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्यातला लोकप्रतिनिधी सर्वानांच ठाऊक आहे, पण आता त्यांच्यातला डॉक्टरही बीडकरांना पाहायला मिळाला. प्रीतम मुंडे रस्त्याने जात असताना त्यांना एक अपघातग्रस्त महिला दिसली. यानंतर गाडी थांबवून मुंडे महिलेकडे धावत गेल्या आणि महिलेला पाणी दिले. यानंतर जखमी महिलेची विचारपूस करत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. यापूर्वीही ऑक्टोबर 2016 मध्ये त्यांनी अशीच एका रुग्णाला मदत केली होती. लिंबोटा येथील श्रमदान आटोपून सिरसाळामार्गे सरफराजपूरकडे...
  May 18, 05:06 PM
 • जालना -अंबड तालुक्यातील लोणार भायगावला दररोज ७२ हजार लिटर टँकरचे पाणी मंजूर करण्यात आलेले आहे. प्रत्यक्षात गावाला एक दिवसाअाड केवळ २४ हजार लिटर पाणी मिळते आहे. टँकर आल्यानंतर पाच फूट व्यासाच्या विहिरीवर एकाच वेळी दीडशे-दोनशे ग्रामस्थांची तोबा गर्दी होते आहे. त्यामुळे कठड्यावर उभे राहण्यासाठीही जागा राहत नाही. यातून अनेक वेळा वादविवादाचे प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र लोणार भायगावच्या या समस्येकडे प्रशासनाने अद्यापही लक्ष दिलेले नाही. लोणार भायगाव हे जवळपास पाच हजार लोकसंख्येचे...
  May 18, 09:46 AM
 • जालना -औरंगाबादच्या वाळूज येथील एका शैक्षणिक संस्थेत शिक्षकाची नोकरी देतो म्हणून १८ लाख रुपये घेऊन बनावट नियुक्तिपत्र देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल झाला. गणेश पालवे, सुनील पालवे, गोरक्षनाथ आसाराम बळी, श्रीराम गंगाराम डोईफोडे, पंजाबराव सपकाळ, अण्णा आंधळे (सर्व औरंगाबाद) अशी आरोपींचीनावे आहेत. नऊ ते दहा महिन्यापूर्वी गणेश रामकिसन वाघ (जालना) यांना शिक्षकाची नोकरी देतो म्हणून औरंगाबादेतील सहा जणांनी १८ लाख रुपये घेऊन वाळूज येथील एका शैक्षणिक...
  May 18, 09:40 AM
 • जालना -जाफराबाद तालुक्यात मागील वर्षी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी ३५ गावांमध्ये तुफान आल्यागत जलसंधारणाची कामे झाली. यात अग्रस्थानी राहिलेल्या पासोडी गावाला दहा लाखांचे बक्षीस मिळाले, तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवलेल्या पासोडी, आढा व खासगावाला अनुक्रमे पाच, पाच व तीन लाखांची पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीतून नुकतीच मिळाली आहे. दरम्यान, श्रमदानातून झालेल्या कामांमुळे शिवार पाणीदार झाले असून खरीप, रब्बीसह उन्हाळी पिकेही शेतकरी घेत आहेत. पाणी फाउंडेशन व...
  May 18, 09:33 AM
 • जालना/बदनापूर -दारू पिण्यासाठी पैसे न देणे, जावयासमोर मुलाने लाथ मारल्याचा राग, घर विकू देईना हा राग मनात कायम सलत होता. घरात नेहमीच खटके उडून वाद होत राहायचे, या दररोजच्या समस्येला कायमचे मिटवण्यासाठी मुलाचा खून करण्यासाठी बाप दिवसभर विचारात होता. दरम्यान, रात्रीच्या वेळी मुलगा दारू पिऊन झोपला असल्याचे लक्षात येताच शेजारच्या घरी झोपण्यासाठी गेलेल्या बापाने सकाळी ४ वाजता घरी येऊन झोपेत असलेल्या मुलाच्या गळ्यावर गजाने वार करून खून केल्याची घटना बदनापूर तालुक्यातील रामखेडा येथे...
  May 17, 09:01 AM
 • जालना -जलयुक्त शिवार अभियानांतर्गत वर्ष २०१५-१६ मध्ये उत्कृष्ट कामे केल्याबद्दल पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते २६ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पाच गावांना रोख रकमेसह मानचिन्ह देऊन जलमित्र पुरस्काराने गौरवले. मात्र, या गावांनासुद्धा दुष्काळाचा फटका बसला असून येथेही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दरम्यान, जलयुक्तच्या कामांमुळे सिंचन सुविधा वाढून शेतकऱ्यांनी फळबागा लावल्या. बागायती क्षेत्र वाढले. मात्र, आता दुष्काळात पिण्यासाठीच पाणी नाही तर या बागा...
  May 17, 08:29 AM
 • delete
  May 16, 04:28 PM
 • लातूर -लोकसभा निवडणुकीदरम्यान सुरू असलेल्या आदर्श आचारसंहितेच्या काळात उदगीर शहर व उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यातील चार पोलिसांनी एका व्यापाऱ्याकडून दीड लाखाची लूट केली होती, तर याप्रकरणी पोलिस अधीक्षकांनी बडतर्फ केलेल्या तसेच आतापर्यंत जेलमध्येच असलेल्या त्या चार बडतर्फ पोलिसांची उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मंगळवारी जामिनावर मुक्तता केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता सुरू असताना १ एप्रिल रोजी उदगीर येथील सोन्याचे व्यापारी बालाजी चन्नावार हे...
  May 16, 10:50 AM
 • बीड -राज्याच्या हक्काचे पाणी शासनाने गुजरातला देऊ नये आणि मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातील पाण्यासाठी होरपळणाऱ्या लोकांपर्यंत हक्काच्या पाण्याचा विषय पाेहाेचण्यासाठी पाणीयात्रा हे जनआंदोलन सुरू केले असल्याची माहिती आमदार जलदूत नितीन भोसले यांनी बीडमध्ये पत्रकार परिषदेत बुधवारी दिली. शासन प्रत्येक वर्षी दुष्काळी भागाचे दौरे करून हजारो कोटींचे पॅकेज जाहीर करत आहे. यापेक्षा नाशिक जिल्ह्यातील नार -पार- दमणगंगा खोऱ्यातील पश्चिमवाहिनी असलेल्या नद्यांचे पाणी मराठवाडा व उत्तर...
  May 16, 10:46 AM
 • उस्मानाबाद - गेल्या दशकभरात दर २ ते ३ वर्षांनी दुष्काळाच्या दाहकतेशी सामना करणारा जिल्हा म्हणून उस्मानाबादची ओळख. पाणी, चारा टंचाईने हा जिल्हा यंदाही होरपळून निघत आहे. गुरांसाठी चारा, पाण्याची सोय कशी करायची हा यक्षप्रश्न ग्रामस्थांसमोर आहे. पाण्यासाठी मैलाेन्मैल पायपीट, पोटाला चिमटा देत टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागत आहेत. दुष्काळाच्या धगीत विविध व्यवसायही होरपळत आहेत. खवा आणि पेढ्यासाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या येथील कुंथलगिरीचा (सरमकुंडी) खवा व्यवसायही या दुष्काळाच्या...
  May 16, 10:22 AM
 • लातूर -लातूर जिल्ह्यातील अहमदपूर आणि उदगीरमध्ये संशयास्पदरीत्या वास्तव्य करून राहणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील चार तरुणांना एटीएसने ताब्यात घेतले आहे. ते कोण आहेत, लातूर जिल्ह्यात कशासाठी आले होते, त्यांनी कोठे वास्तव्य केले, काय काम केले याचा तपास पोलिस आणि एटीएसकडून केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे जम्मू-काश्मीरचे असलेले तीन तरुण अहमदपूरमध्ये संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती लातूर पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. तेव्हापासून पोलिसांचे एक पथक...
  May 16, 09:12 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात