Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • नांदेड/परभणी/हिंगोली- कृष्णूर येथील इंडिया मेगा कंपनीवर पोलिसांनी १८ जुलैला धाड घालून सार्वजनिक वितरण प्रणालीतील १० ट्रक धान्य पकडले. त्याला आता जवळपास ४४ दिवस होत आहेत. तथापि अद्यापही या प्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. दुसरीकडे कुंटूर पोलिस ठाण्यात वाहतूक ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी महसूल प्रशासनाने ठेकेदाराचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केली नाही. दरम्यान, परभणीतील २८ कोटी रुपयांच्या स्वस्त धान्य धान्य घोटाळा उघडकीस येऊन तब्बल दोन वर्षे...
  September 6, 07:04 AM
 • उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा कारागृहातील एका कैद्याने पत्र्याच्या आडूला टी शर्ट बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी (दि. ५) सकाळी ७.२५ वाजता घडला. याप्रकरणी आनंदनगर पोलिस ठाण्यात घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. योगेश ऊर्फ रुद्र शिवाजी शिंपले (१८, रा. कळंब) याच्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक (पोस्को) कायद्यानुसार कळंब पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन काेठडी सुनावण्यात अालेली अाहे....
  September 6, 06:42 AM
 • परभणी - शासनाच्या निकषाप्रमाणे मुल्यांकनास पात्र ठरलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना शंभरटक्के अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी बिनपगारी असलेल्या जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षक दिनी भीकमांगो आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्टेशनरोडवर या शिक्षकांनी भीक मागत आपली मागणी रेटून धरली. राज्य शासनाने कायम हा शब्द वगळून विना अनुदानित शाळांना स्वतंत्ररित्या अनुदान घोषीत करण्याचे आदेश 26 फेब्रुवारी 2014 रोजी काढले होते. परंतू अद्यापही विनाअनुदानीत शाळांना अनुदान जाहिर...
  September 5, 07:23 PM
 • कळंब- तालुक्यातील आढाळा येथील वृद्ध शेतकरी दांपत्याने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी (दि. ४) पहाटेच्या दरम्यान घडला. अशा प्रकारे शेतकरी दांपत्याने आत्महत्या करण्याची तालुक्यातील ही पहिलीच वेळ आहे. आढाळा गावात शिवाजी अंबादास वायसे (५५) कुटुंबीयांसह वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नी धोंडूबाई वायसे (५०), मुलगा बालाजी वायसे यांच्या नावे शेतजमीन आहे. सातत्याने होणारी नापिकी व कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आढाळा - बहुला रस्त्यालगतच्या शेतातील झाडाला...
  September 5, 08:57 AM
 • जामखेड शहर - हैदराबाद येथील साईभक्त मंगळवारी शिर्डीला जात असताना जामखेड-नगर रस्त्यावरील पोखरी (ता. आष्टी, जि. बीड) येथील वळणावर त्यांच्या इनोव्हाला अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर सातजण गंभीर जखमी झाले. निलावेणी श्रीरामडू नानचरला (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. गंभीर जखमी असलेल्या रमना रेड्डी यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सकाळी साडेसातच्या दरम्यान पोखरी येथील वळणावर इनोव्हाचा चालक हरिशंकर (हैदराबाद) याचा ताबा सुटून वाहनाने पाच फूट खोल...
  September 4, 10:11 PM
 • नांदेड- कृष्णूर अन्नधान्य घोटाळ्यात नांदेड जिल्हा महसूल प्रशासनाने सुरुवातीला पोलिसांच्या कारवाईवरच प्रश्नचिन्ह लावण्याचे काम केले. या उलट हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांनी रोखठोक भूमिका घेत हिंगोलीच्या आरोपीलाही याच गुन्ह्यात सहभागी करण्याचे पत्र तपास अधिकाऱ्याला दिले. कृष्णूर येथे १८ जुलै रोजी पोलिसांनी सार्वजनिक वितरण प्रणालीच्या धान्यातील १० ट्रक पकडले. या ट्रकमध्ये ३ ट्रक नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारीतील तर ७ ट्रक हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांच्या अख्त्यारीतील होते. ट्रक...
  September 4, 07:31 AM
 • उस्मानाबाद- पर्यावरणाचा ऱ्हास टाळण्यासाठी दिव्य मराठीने केलेल्या अावाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबादकरांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती अभियानात उत्स्फूर्त सहभाग घेतला. सोमवारी(दि.३) या अभियानांतर्गत शहरातील सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांना मातीच्या गणेश मूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. केवळ अर्ध्या तासांत ४०० विद्यार्थ्यांनी गणेशाच्या सुबक मूर्ती तयार करून पर्यावरण रक्षणाच्या दिशेने पाऊल टाकले. दिव्य मराठी, रोटरी क्लब आणि एकता फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम...
  September 4, 07:23 AM
 • परभणी - पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार विजय भांबळे व आमदार डॉ. मधूसुदन केंद्रे यांनी राष्ट्रवादी भवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकलस्वारी केली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकारीही या आंदोलनात सहभागी झाले होते. राष्ट्रवादी भवनापासून बारा वाजता शेकडो कार्यकर्ते...
  September 3, 05:31 PM
 • नांदेड- ओढ्याच्या पाण्यात बोलेरो पिकअप वाहून गेल्याची धकादायक घटना किनवट तालुक्यातील कोठारी पुलाजवळ घडली. चालकाने प्रसंगावधान राखल्याने तो थोडक्यात बचावला. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेली माहिती अशी की, कोठारी परिसर हा तेलंगणा राज्याच्या सीमेवर आहे. पावसामुळे ओढ्याला पूर आला होता. पुलावरुन पाणी वाहत होते. तरीही चालक गंगासिंह पडवळ याने पुलावरुन गाडी नेण्याचे धाडस केले. मात्र, पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे गाडी पुलाच्या मध्यभागी गेली असता वाहून गेली. चालकाने...
  September 3, 12:26 PM
 • बीड- दीड महिन्यापूर्वी बेपत्ता झालेल्या मुलीचा नेकनूर पोलिसांनी शोध लावत तिची सुटका केली. गुंगीचे औषध, इंजेक्शनद्वारे देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची तक्रार मुलीने पाेलिसांत दिली आहे. दरम्यान, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले. नेकनूर ठाण्याच्या हद्दीतील एका गावातून महिना ते दीड महिन्यापूर्वी एका मुलीला पळवून नेण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत नोंदही करण्यात आली होती. महिनाभरापासून पोलिस विविध ठिकाणी या मुलीचा शोध घेत होते. मुलगी गडचिरोलीमध्ये...
  September 3, 06:40 AM
 • गेवराई- गेवराई तालुक्यातील इरगावमध्ये शनिवारी मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने विष घेतले. उपचारादरम्यान रविवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. आप्पासाहेब सुंदरराव काटे असे तरुणाचे नाव आहे. आप्पासाहेब याने शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास मराठा आरक्षण मिळत नसल्यामुळे मी हे जग सोडून जात आहे. मी मेल्यावर तरी सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे अशी चिठ्ठी लिहून ठेवत विष घेतले. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ, भावजय, दोन मुले असा परिवार आहे. नातेवाइकांनी तरुणाचा मृतदेह गेवराई ठाण्यात...
  September 3, 06:14 AM
 • हिंगोली- कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे एकाच झाडाला विवाहित सख्या आत्या-भाचीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे. कळमनुरी तालुक्यातील महालिंगी तांडा येथे राहणाऱ्या सीमा बालाजी राठोड (२०) व निकिता राजू राठोड (१९) या दोघी सख्ख्या आत्या-भाची आहेत. त्या दोघी कपडे धुण्यासाठी गावाजवळील नाल्यावर गेल्या होत्या. परंतु खूप उशीर झाला तरी त्या परत आल्या नसल्याने घरच्यांसह ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. २ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास दोघी...
  September 3, 06:05 AM
 • बीड- २० हजारांत एक लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन, जमिनीतून सोने काढून देतो म्हणत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूंचा दरोडा प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी भांडाफोड केला. समनापूर (ता. बीड) मधून ५ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रयत्न करूनही पाऊस पडत नसल्याने ज्याच्या घरी ही पूजा करण्यात येत होती. त्यानेच नातेवाईकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राजाभाऊ अंबादास गोेरे (रा. समनापूर, ता. बीड) यांची काही दिवसांपूर्वी आळंदी येथे जाताना बाबासाहेब...
  September 1, 07:23 AM
 • बीड- नोटबंदीचा निर्णय फसला तर मला भर चौकात शिक्षा द्या, असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता नोटबंदी फसली आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहिजे, अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये केली. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. राज यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, असा टोमणाही त्यांनी मोदींना मारला. तसेच राज यांनी...
  August 31, 03:34 PM
 • घनसावंगी/वडीगोद्री- जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे म्हणून सालदार हा विहिरीकडे पाणी पिण्यासाठी गेला. परंतु, त्याच परिसरात जाळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून गवतात ओढून नेत गळा फाडला. दरम्यान, खूप वेळ होऊनही वखर उभे का आहे, हे पाहण्याकरिता शेतमालक विहिरीकडे गेला असता, नाल्याच्या गवतात रक्ताच्या थारोळ्यात सालदाराचा मृतदेह दिसून आल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे घडली. अरुण रमेश अहिरे (२२) असे मृताचे नाव आहे. नऊ महिन्यांपासून...
  August 31, 09:43 AM
 • पाटोदा (बीड) - राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे सावरगाव येथे उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी ३१ तारखेला त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्मारक उभारण्याचा शब्द भगवानबाबा भक्तांना दिला होता. सावरगाव येथे सकाळी 11 वाजता प्रीतम मुंडे या स्मारकाचे भूमिपूजन करणार आहे....
  August 30, 10:49 PM
 • परभणी - शासनाची परवानगी न घेता कामे केल्यावरून रिलायन्स जिओ कंपनीला जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी 26 कोटीं रुपयाचा दंड ठोठावला आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या संदर्भात विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नावरून प्रशासनाने ही कारवाई केली. परभणीत रिलायन्स जिओ कंपनीने शासनाची कोणतेही पूर्व परवानगी न घेता तसेच उत्खननापोटी रॉयल्टी न भरता कोट्यावधी रुपयांचे अवैध खोदकाम केले होते. जमिन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 48(7) व कलम 48(8) प्रमाणे ऑप्टीकल फायबर केबलसाठी...
  August 30, 07:32 PM
 • नांदेड- हदगाव तालुक्यातील उंचेगाव खुर्द या गावाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात पाय ठेवू देणार नाही, असा ठरावच ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. उंचेगाव खुर्द हे जेमतेम १८०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वात अगोदर पाऊल उचलले. दि. २३ रोजी ग्रामपंचायतीत खास सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी साहेेबराव शिंदे होते. या सभेत अनिल विठ्ठलराव...
  August 30, 06:14 AM
 • भोकरदन (जालना) - भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावर तीन दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. प्रभाकर खंडागळे (50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सिल्लोडमधील अनाड येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनूसार, मालखेडा पाटीजवळ सिल्लोडहून एक जडवाहन भरधाव वेगाने येत होते. या वाहनाला ओव्हरटेक करत वाहनामागील दुचाकीस्वार भरधान वेगात वाहनासमोर येत होता. हे लक्षात येताच...
  August 29, 09:21 PM
 • नांदेड- आपले सरकार पारदर्शी आहे, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीत कृष्णूरसारखा अन्नधान्य घोटाळा होणे हे त्यांच्या पारदर्शकतेचे लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत जुळले असण्याची शक्यता एकूण परिस्थितीवरून दिसून येते, असा आरोप जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) सदस्या व प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सुमती व्याहाळकर यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. सुमती व्याहाळकर म्हणाल्या,...
  August 29, 07:31 AM
 
जाहिरात

RECOMMENDED