Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • बीड- २० हजारांत एक लाख रुपयांपेक्षा अधिक पैशांचा पाऊस पाडून देतो, गुप्तधन, जमिनीतून सोने काढून देतो म्हणत अघोरी पूजा करणाऱ्या भोंदूंचा दरोडा प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी भांडाफोड केला. समनापूर (ता. बीड) मधून ५ जणांना ताब्यात घेतले. दरम्यान, प्रयत्न करूनही पाऊस पडत नसल्याने ज्याच्या घरी ही पूजा करण्यात येत होती. त्यानेच नातेवाईकांमार्फत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. राजाभाऊ अंबादास गोेरे (रा. समनापूर, ता. बीड) यांची काही दिवसांपूर्वी आळंदी येथे जाताना बाबासाहेब...
  September 1, 07:23 AM
 • बीड- नोटबंदीचा निर्णय फसला तर मला भर चौकात शिक्षा द्या, असे वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. आता नोटबंदी फसली आहे. त्यामुळे लोकांनी मोदींना पत्र लिहून चौकात बोलावले पाहिजे, अशी खोचक टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी बीडमध्ये केली. राज ठाकरे मराठवाड्याच्या दौर्यावर आहेत. राज यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी नेपाळमध्ये गेले आहेत, कारण तिकडे थापा आहेत, असा टोमणाही त्यांनी मोदींना मारला. तसेच राज यांनी...
  August 31, 03:34 PM
 • घनसावंगी/वडीगोद्री- जेवण झाल्यानंतर पाणी प्यावे म्हणून सालदार हा विहिरीकडे पाणी पिण्यासाठी गेला. परंतु, त्याच परिसरात जाळीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून गवतात ओढून नेत गळा फाडला. दरम्यान, खूप वेळ होऊनही वखर उभे का आहे, हे पाहण्याकरिता शेतमालक विहिरीकडे गेला असता, नाल्याच्या गवतात रक्ताच्या थारोळ्यात सालदाराचा मृतदेह दिसून आल्याची घटना गुरुवारी सकाळी १०.४५ वाजेच्या सुमारास घनसावंगी तालुक्यातील राजेगाव येथे घडली. अरुण रमेश अहिरे (२२) असे मृताचे नाव आहे. नऊ महिन्यांपासून...
  August 31, 09:43 AM
 • पाटोदा (बीड) - राष्ट्रसंत भगवानबाबा यांचे भव्य स्मारक त्यांच्या जन्मभूमीत म्हणजे सावरगाव येथे उभारण्यात येणार आहे. शुक्रवारी ३१ तारखेला त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या हस्ते या स्मारकाच्या कामाचा शुभारंभ करण्यात येणार आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्मारक उभारण्याचा शब्द भगवानबाबा भक्तांना दिला होता. सावरगाव येथे सकाळी 11 वाजता प्रीतम मुंडे या स्मारकाचे भूमिपूजन करणार आहे....
  August 30, 10:49 PM
 • परभणी - शासनाची परवानगी न घेता कामे केल्यावरून रिलायन्स जिओ कंपनीला जिल्हाधिकारी पी. शिव शंकर यांनी 26 कोटीं रुपयाचा दंड ठोठावला आहे. आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी या संदर्भात विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेल्या तारांकीत प्रश्नावरून प्रशासनाने ही कारवाई केली. परभणीत रिलायन्स जिओ कंपनीने शासनाची कोणतेही पूर्व परवानगी न घेता तसेच उत्खननापोटी रॉयल्टी न भरता कोट्यावधी रुपयांचे अवैध खोदकाम केले होते. जमिन महसुल अधिनियम 1966 च्या कलम 48(7) व कलम 48(8) प्रमाणे ऑप्टीकल फायबर केबलसाठी...
  August 30, 07:32 PM
 • नांदेड- हदगाव तालुक्यातील उंचेगाव खुर्द या गावाने मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत एकाही राजकीय पक्षाच्या नेत्याला गावात पाय ठेवू देणार नाही, असा ठरावच ग्रामपंचायतीत मंजूर करण्यात आला. उंचेगाव खुर्द हे जेमतेम १८०० लोकवस्तीचे गाव आहे. या गावाने मराठा आरक्षणाच्या बाबतीत सर्वात अगोदर पाऊल उचलले. दि. २३ रोजी ग्रामपंचायतीत खास सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी साहेेबराव शिंदे होते. या सभेत अनिल विठ्ठलराव...
  August 30, 06:14 AM
 • भोकरदन (जालना) - भोकरदन-सिल्लोड मुख्य रस्त्यावर तीन दुचाकी एकमेकांना धडकून झालेल्या विचित्र अपघातात एक ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. प्रभाकर खंडागळे (50) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ते सिल्लोडमधील अनाड येथील रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनूसार, मालखेडा पाटीजवळ सिल्लोडहून एक जडवाहन भरधाव वेगाने येत होते. या वाहनाला ओव्हरटेक करत वाहनामागील दुचाकीस्वार भरधान वेगात वाहनासमोर येत होता. हे लक्षात येताच...
  August 29, 09:21 PM
 • नांदेड- आपले सरकार पारदर्शी आहे, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या राजवटीत कृष्णूरसारखा अन्नधान्य घोटाळा होणे हे त्यांच्या पारदर्शकतेचे लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आहे. या घोटाळ्याचे तार मंत्रालयापर्यंत जुळले असण्याची शक्यता एकूण परिस्थितीवरून दिसून येते, असा आरोप जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीच्या (दिशा) सदस्या व प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सुमती व्याहाळकर यांनी केला. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारही केली. सुमती व्याहाळकर म्हणाल्या,...
  August 29, 07:31 AM
 • जालना- इयत्ता दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी फेसबुकवर माझा मित्र मृत झाला, त्याच्या दहावा, तेराव्यास या, असे आवाहन करत एकमेकांनी ती पोस्ट १९ व २२ ऑगस्ट या कालावधीत शेअर करत टिंगल-टवाळी केली. यात अनेकांनी लाइक व मजेशीर कॉमेंटही केल्या. दरम्यान, सोमवारी सायंकाळी ४ वाजेपासून यातील एक जण गायब होता. मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्याचा मुक्तेश्वर तलावाजवळील खदानीतील पाण्यात मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. आदित्य पार्श्वनाथ सदावर्ते (१६, मंमादेवीनगर, जुना जालना) असे मृताचे नाव आहे....
  August 29, 07:22 AM
 • औरंगाबाद- उस्मानाबादचा वेगवान गाेलंदाज राजवर्धन सुहास हंगरगेकरची मंगळवारी १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट संघात निवड झाली. लखनऊत १२ ते १८ सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या चाैरंगी मालिकेमध्ये भारत ब संघाकडून खेळण्याची संधी त्याला मिळेल. राजवर्धन सध्या पुण्यातील एस.पी. महाविद्यालयात ११ वीत शिकत आहे. नुकत्याच झालेल्या १६ वर्षांखालील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत त्याने तीन वेळा ५ बळी टिपण्याची कामगिरी करत लक्ष वेधले.
  August 29, 06:15 AM
 • परभणी - खड्डेमय रस्त्यांवर रस्ता शोधण्याची वेळ आल्याने संप्तत झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या निषेधार्थ मंगळवारी(दि.28) सकाळी आंदोलन केले. यांदरम्यान कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये बेशरमाच्या झाडांची लागवड केली तसेच रस्त्यांवर यज्ञ करत महापालिकेला सद्बुद्धी यावी यासाठी साकडे घातले. आमदार डॉ. राहूल पाटील यांच्या नेतृत्वात महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर हे आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी रस्त्याच्या प्रश्नावरून आयुक्त रमेश पवार यांना धारेवर धरले...
  August 28, 06:18 PM
 • परभणी- तालुक्यातील पेडगाव गावातील प्लंबर भगवानसिंग गौतम यांची कन्या काजल ही नुकतीच एअर इंडिया कंपनीच्या विमानसेवेत हवाईसुंदरी म्हणून रूजू झाली आहे. सामान्य कुटुंबातील काजल हिचे शालेय शिक्षण पेडगावातीलच जिल्हा परिषद शाळेत झाले तर महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील शिवाजी महाविद्यालयात पूर्ण झाले. बालपणापासूनच काजल आज्ञाधारक, अभ्यासू, चिकीत्सक व धाडसी स्वभावाची असल्याचे तिचे वडील भगवानसिंग सांगतात. वाचनाची आणि भाषणाचीही तिला आवड आहे. सातवीत असताना सावित्रीबाई फुलेंवर केलेल्या...
  August 28, 01:03 PM
 • परभणी- राखी पौर्णिमेचा सण साजरा करून सुटीवर आलेल्या जवानाचा हिंगोली जिल्ह्यात कन्हेरगावजवळील अंधारवाडी शिवारात रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रवीण शिवाजी गायकवाड(२३) असे या जवानाचे नाव असून सोमवारी सायंकाळी त्यांचे पार्थिव पिंपळदरी (ता.गंगाखेड) या मूळ गावी आणण्यात आले. पिंपळदरी येथील प्रवीण गायकवाड हे २३ मार्च २०१५ रोजी भारतीय सैन्यदलात दाखल झाले होते. ते सध्या रांची (झारखंड) येथे कर्तव्यावर कार्यरत होते. महिनाभराची सुटी घेऊन ते पिंपळदरीत...
  August 28, 07:56 AM
 • परभणी- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने सोमवारी (दि. २७) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल जागर आंदोलन करण्यात आले. ढोल व बँड वाजवून तसेच काठी व घोंगडी घेऊन समाजातील नागरिक पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला. धनगर समाजाला निवडणुकीपूर्वी एसटी आरक्षण देण्याचे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. तत्पूर्वीच्या सरकारनेदेखील केवळ आश्वासनेच दिली. प्रत्यक्षात या आरक्षणाची अंमलबजावणी झालीच नाही. त्यामुळे...
  August 28, 07:50 AM
 • परभणी- जिंतूर शहरातील उस्मानपुरा भागातील हजरत अबुबकर सिद्दिकी प्राथमिक उर्दू शाळेची भिंत सोमवारी(दि.२७) दुपारी दीडच्या सुमारास शाळा सुरू असतानाच कोसळल्यामुळे इयत्ता चौथी मधील सात विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने जीवितहानी टळली. उस्मानपुरा भागातील धोबी गल्लीत मागील आठ वर्षांपासून अबुबकर सिद्दिकी उर्दू प्राथमिक विद्यालय चालते. इयत्ता पहिली ते सातवीच्या या शाळेत ३४० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळा सुरुवातीपासून पडक्या व जीर्ण झालेल्या इमारतीमध्ये चालते. एकाच...
  August 28, 07:42 AM
 • जालना- चोवीस तास १२ पोलिस कर्मचाऱ्यांचा पहारा, इतर ५४ कैदी बाजूलाच झाेपलेले, ट्यूबचाही प्रकाश या सर्वांच्या नजरा चुकवून झोपण्याच्या बाजूलाच आडोसा असलेल्या उघड्या शौचालयावरील एक्झॉस्ट पंख्याला शाल बांधून खालचा भाग गळ्याला आवळत न्यायालयीन कोठडीतील कैद्याने आत्महत्या केल्याची घटना जालना येथील कारागृहात सोमवारी पहाटे घडली. रमेश गणेश हिवाळे (२०, हातवन, ता.जालना) असे मृताचे नाव आहे. मात्र, मृताच्या आईने हा खून असल्याचा आरोप करत कारागृहाबाहेरच आक्रोश केल्याने तरुण कैद्याची ही आत्महत्या...
  August 28, 07:04 AM
 • परभणी - जिंतूर शहरातील हजरत अबुबकर सिध्दीकी प्राथमिक या उर्दु शाळेची भिंत सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शाळा सुरू असतानाच कोसळली. यामध्ये शाळेतील चौथ्या वर्गातील सात विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या. सुदैवाने जिवीत हानी टळली. उस्मानपुरा भागातील इयत्ता पहिली ते सातवीच्या या शाळेत 340 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मागील 8 वर्षांपासून धोबी गल्लीतील एका पडक्या व जीर्ण झालेल्या इमारतीत ही शाळा भरते. एका बाजूने भिंत असून दुस-या बाजुने पत्रे लावून ही शाळा चालविली जात आहे. सोमवारीही नेहमी...
  August 27, 07:01 PM
 • केज- नवरा, नवरी हळद लावून लग्नासाठी सज्ज झाली होती. लग्नमंडप सजला होता. वऱ्हाडी मंडळी लग्न लावण्यासाठी लग्नमंडपात दाखल झाली होती. मंगलाष्टके सुरू होणार आणि वधू, वरांच्या अंगावर लग्नाच्या अक्षता पडणार, तोच हे लग्न थांबवा, असे शब्द ऐकून वधू-वरांच्या आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. वऱ्हाडी मंडळीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. अल्पवयीन वधू-वरांचे लग्न करणे हे कायद्याने गुन्हा आहे. अल्पवयीन दांपत्याला पुढे येणाऱ्या समस्या व त्याचे दुष्परिणाम याचे समुपदेशन करून ग्रामसेवक व पोलिस...
  August 27, 06:11 AM
 • बीड - ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या शुभ कल्याण मल्टिस्टेट बँकेच्या प्रकरणात बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी रात्री पुण्यातून बँकेचे अध्यक्ष दिलीप आपेट यांना अटक केली. पहाटेच त्यांना पोलिसांनी बीडमध्ये आणले. शनिवारी दुपारी पावणे चार वाजता त्यांना बीडच्या विशेष न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दोन दिवसांपूर्वीच बँकेच्या कळंब शाखेच्या मुख्य लिपिकाला पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आपेट...
  August 26, 08:47 AM
 • केज- सातवीच्या मुलीचा सतत पाठलाग करून तिची छेड काढणाऱ्या तरुणाला मुलीच्या आईने जाब विचारताच त्याने आईच्या हातावर विळा मारून तिला जखमी केल्याची घटना केज तालुक्यातील तांबवा येथे शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी केज पोलिसांत तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. तांबवा येथील एक मुलगी शहरातील एका शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेते. ती रोज बसने शाळेला ये-जा करते. गणेश संतोष ओव्हाळ हा तरुण नेहमी तिचा पाठलाग करून छेड काढीत असे. शुक्रवारी सकाळी 11 वाजता शाळेला येण्यासाठी तांबवा येथील बस थांब्यावर...
  August 25, 05:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED