Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • लातूर-सीबीआय ही देशाची सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. या संस्थेची प्रतिष्ठा टिकली तरच देशातील लोकांचा सरकारवर विश्वास राहील. मात्र सीबीआयच्या प्रमुखांचा रात्रीतून पदभार काढून घेणे, तेथे पात्रता नसलेल्या अधिकाऱ्याला बसवणे, फायलींसाठी धाडी टाकायला लावणे हा चुकीचा पायंडा पाडला जात आहे. या प्रकारांमुळे सीबीआयची रया गेली असून याला केंद्रातील मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. लातूर येथे काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी ते आले असता...
  October 27, 07:50 AM
 • हिंगोली- बिल भरण्यापोटी ग्राहकांनी दिलेला धनादेश न वाटल्यास वीज वितरण कंपनीने संबंधित ग्राहकांना ५९० रुपये दंड लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीला आपला धनादेश केवळ वेळ मारून नेण्यासाठी देणाऱ्या ग्राहकांना चांगलाच दणका बसणार आहे. वीज वितरण कंपनीकडून ऑनलाइन बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ग्राहकांनी ऑनलाइन वीज भरणा केल्यास ग्राहकांना प्रत्येक देयकावर ०.२५ टक्के एवढी सूट दिली जात आहे. ग्राहकांना वीज वितरणकंपनीने त्यांच्या काउंटरवर आणि बँकेत...
  October 27, 07:49 AM
 • बीड - आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर बीडमध्ये गटप्रमुखांच्या मेळाव्यासाठी मंगळवारी आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्यातील सर्वच जागांवर भगवा फडकला पाहिजे असे आवाहन केले. तथापि, मेळाव्याच्या व्यासपीठावर माजी जिल्हा प्रमुखांना डावलल्याने शिवसेनेत बीडमध्ये पुन्हा एकदा गटबाजी उफाळून आली आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला असलेल्या बीडमध्ये ठाकरे यांनी विधानसभेच्या सहाही जागा विजयी झाल्या पाहिजेत. त्यासाठी गाव तिथे शाखा स्थापन...
  October 26, 12:03 PM
 • जालना -स्कूटीचालकास लिफ्ट मागून लघवी करण्याच्या बहाण्याने स्कूटी थांबवून कोयत्याने पाठीवर, हातावर वार करून स्कूटी पळवून नेणाऱ्यास बदनापूर पोलिसांनी अवघ्या तीन तासांत ताब्यात घेतले आहे. रामेश्वर पांडुरंग भोसले (काजळा, ता. बदनापूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६० हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सायगाव येथील पोस्टमन संजय माणिकराव जाधव हे स्कूटीवरून गावाकडे जात होते. दरम्यान, रस्त्यावर उभ्या असलेल्या रामेश्वर भोसले याने हात दिला असता, जाधव यांनी लिफ्ट दिली....
  October 26, 11:52 AM
 • नांदेड-जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाही. यावर्षी आतापर्यंत कर्जबाजारीपणा आणि नापिकीला कंटाळून 78 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाले. जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सन 2000पासून सुरू झाले. परंतु त्या वेळी अशा घटनांची संख्या नगण्य असल्याने त्याकडे फारसे कोणी लक्ष दिले नाही. पण हळूहळू हे प्रमाण वाढत गेले आणि आता या...
  October 26, 08:26 AM
 • लातूर- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी समुद्रात भराव टाकून शिवस्मारकाचे काम सुरू करण्याचा इव्हेंट घेण्यात आला होता. मधल्या काळात शांत बसल्यानंतर आता येऊ घातलेल्या निवडणुकीत मतांवर डोळा ठेवून शिवस्मारकाच्या पायाभरणीचा फार्स करण्यात आला, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेसाठी लातुरात आल्यानंतर त्यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह केंद्र व राज्य...
  October 26, 08:10 AM
 • उस्मानाबाद - गेल्या दोन दिवसांत जिल्ह्यातील विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यात हवामानात बदल दिसून आला. मंगळवारी सायंकाळी व त्यानंतर बुधवारी सायंकाळी उस्मानाबादमध्ये जोरदार पाऊस झाला. गुरुवारी (दि. 25) सकाळपासून शहरात मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर काही वेळ रिमझिम सुरू होती, तर तुळजापूर तालुक्यातही बुधवारी सायंकाळी पाऊस झाला. दोन दिवसांच्या या पावसाने शेतीवर काहीही फरक पडणार नसला तरी पावसाच्या आकडेवारीत दोन मिलिमीटरने भर पडली आहे. दरम्यान, उस्मानाबादेत गुरुवारी...
  October 26, 08:03 AM
 • बीड/लातूर- यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर शरसंधान करत अयोध्येत राममंदिर तुम्ही बांधताय की आम्ही बांधू, असा सज्जड सवाल मोदी सरकारला केला होता. मात्र त्याच्या पाचच दिवसांत उद्धव यांनी आपली भूमिका चक्क बदलली. मंगळवारी बीड व लातुरातील शिवसेनेच्या गटप्रमुख, बुथप्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळाव्यात बोलताना राम मंदिरासाठी कायदा अस्तित्वात आणा अशी मागणी त्यांनी मोदी सरकारकडे केली. आपण येत्या 25 नोव्हेंबरला अयोध्येला जात असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी या...
  October 24, 07:57 AM
 • बीड- जिल्ह्यात गोपीनाथ मुंडेंमुळे बाळासाहेब ठाकरेंनी विधानसभेच्या सहापैकी पाच जागा भाजपला सोडल्या होत्या. मात्र आता शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांनी बीडवर भगवा फडकवून सर्वच जागा निवडून द्याव्यात. खोटी आश्वासने देऊन आणि हजारो कोटींच्या जाहिराती करून भाजप सरकार सर्वसामान्यांशी जुमलेबाजी करत आहे. शिवसैनिकांनी, बूथ प्रमुखांनी घराघरात जाऊन भाजप सरकारचे अपयश नागरिकांच्या लक्षात आणून द्यावे व भाजपच्या जाहिरातबाजीचा खरा चेहरा समोर आणवा, असा कानमंत्र शिवसेना...
  October 23, 08:51 PM
 • परभणी- जावयाला घरगुती कार्यक्रमास का बोलावले या कारणावरून भावाने आपल्या दोन मुलांच्या मदतीने सख्ख्या भावाचा कु-हाडीचे वार करीत खून केला. यात भांडणे सोडविण्यास आलेल्या भावाच्या पत्नी व मुलीसही जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले.सोनपेठ तालुक्यातील कान्हेगाव येथील डोंबाडी तांडा वसाहतीवर सोमवारी (दि.22) रात्री हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघा जणांना पोलिसांनी अटक केली आहे. डोबाडीतांडा वसाहतीत नागनाथ सखाराम भोसले यांनी सोमवारी सायंकाळी त्यांचा जावाई धीरज पवार यास घरगुती कार्यक्रमानिमित्त...
  October 23, 08:14 PM
 • बदनापूर - घरगुती भांडणातून धारदार शस्त्राने गळ्यावर, पोटावर, अंगावर वार करून पत्नीचा घरात खून केला. नंतर रात्री दीड वाजेच्या सुमारास घरापासून ५०० मीटर अंतरावरील रेल्वे रुळांवर जाऊन पॅसेंजर गाडीसमोर उडी मारुन पतीने आत्महत्या केली. ही घटना बदनापूर येथे रविवारी रात्री घडली. भाऊसाहेब भोसले (४६), कुशीवर्ता भोसले (३५) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. भाऊसाहेब भोसले व पत्नी कुशीवर्ता हे ४६ वर्षांपासून दुधना नदीच्या काठावर घर बांधून राहत होते. त्यांना मुलगा नितीन व मुलगी निकिता आहे. निकिता सासरी...
  October 23, 09:39 AM
 • बीड- राष्ट्रसंत भगवानबाबा यांची 25 फूट उंच मूर्ती आणि स्मारकाचे गुरुवारी दसर्याच्या मुहुर्तावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. पंकजा मुंडे यांनी भगवानबाबांच्या जन्मगावी अर्थात सावरगाव घाट येथे यंदा प्रथमच दसरा मेळावा घेतला. भगवानबाबांनीनगर जिल्ह्यातून बीड जिल्ह्यात सीमोल्लंघन केल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.भगवानभक्ती गड या नावाने हे स्मारक भविष्यात ओळखले जाईल, भाविकांनी दर्शन येथून शक्ती घेऊन जायची आहे, असेही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे...
  October 18, 07:33 PM
 • नांदेड - दारूच्या नशेत बापाने आपल्या स्वतःच्या दीडवर्षीय चिमुकल्या मुलीला भिंतीवर आदळून ठार केल्याची हृदयद्रावक घटना हिमायतनगर तालुक्यातील वाघी गावात घडली आहे. वाघी येथील प्रभाकर इंगळे याने १६ ऑक्टोबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास दारूच्या नशेत आपली दीड वर्षाची वर्षीय मुलगी अनू उर्फ अंजली हिला भिंतीवर आपटले. यात मुलगी गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी हिमायतनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. परंतु कुठलाच प्रतिसाद मिळत नसल्याने तिला नांदेड येथील शासकीय रुग्णालयात...
  October 18, 11:01 AM
 • लातूर -लातूरमधील विशालनगर वस्तीत मंगळवारी दुपारी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या अपूर्वा यादव हिचा घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने खून झाला होता. पोलिसांनी तपास चक्रे फिरवून या खून प्रकरणात शेजारी राहणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आपल्या मित्राच्या आत्महत्येला अपूर्वाच जबाबदार असल्याच्या भावनेतून त्याने तिचा खून केला, असा दावा पोलिसांनी केला आहे. अमर व्यंकट शिंदे असे अटकेतील आरोपी तरुणाचे नाव आहे. पोलिस आणि इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत अपूर्वा यादव, सार्थक बाळासाहेब जाधव...
  October 18, 08:35 AM
 • बीड/ जामखेड - संत भगवानबाबांच्या जन्मगावी सावरगाव घाट (ता. पाटाेदा) येथे गुरुवारी सकाळी ११ वाजता ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यापूर्वी संत भगवानबाबांच्या भव्य २५ फूट उंच पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे. सावरगावात गतवर्षीपासून भगवानबाबांच्या प्रेरणेतूनच पंकजा मुंडे यांनी दसरा मेळावा सुरू केला. गेल्या वर्षी त्यांनी बाबांचे जागतिक दर्जाचे शिल्प उभारण्याची घाेषणा केली हाेती, ती या वर्षी पूर्णत्वास अाली. या निमित्ताने सावरगावचे ग्रामस्थ...
  October 18, 08:19 AM
 • बीड- जेव्हापासून समाजकारण व राजकारण कळायला लागले तेव्हापासून नेतृत्त्वाला साथ दिली. त्यांच्या प्रत्येक भुमिकेचे व निर्णयाचे स्वागत करुन त्यांना साथ दिली. निस्वार्थ भावनेने संघटनेत काम केले. सर्वसामान्यांपर्यंत नेतृत्त्व व संघटनेचे विचार पेरले. परंतु जिथं फुलं वेचली तिथं गोवर्या वेचायच्या नाहीत. आजपासून आपला व त्यांचा संबंध संपला, असे प्रतिपादन राजेंद्र मस्के यांनी केले. शिवसंग्रामच्या युवक प्रदेशाध्यक्षपदावरुन राजेंद्र मस्के यांना पायउतार करण्यात आले होते. तब्बल...
  October 15, 07:10 PM
 • परभणी - शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालयातील जवळपास 135 कर्मचार्यांची जमीन तलाठ्याच्या संगनमताने हडप केल्याप्रकरणी सोमवारी सकाळी 11 वाजता डीएसएमचे संस्थापक व माजी खासदार अॅड. गणेशराव दुधगावकर यांना अटक झाली आहे. असे आहे प्रकरण डीएसएम संस्थेतील 135 कर्मचाऱ्यांनी स्वत:च्या कष्टाच्या कमाईने घरे बांधण्यासाठी जी जमीन खरेदी केली होती, ती अॅड. दुधगावकर यांनी तलाठी व इतरांना हाताशी धरून हडप केल्याची केस नानलपेठ पोलिसांत दाखल आहे. याच केसमध्ये शुक्रवारी पोलिसांनी तलाठ्याला अटक केली होती. आता...
  October 15, 03:45 PM
 • परभणी - एका विवाहित तरुणाला वारंवार शारीरिक सुखाची मागणी करून महिलेने त्रस्त करून सोडले होते. यासाठी तिने त्याला बदनामीची धमकीही दिली होती, या त्रासाला कंटाळून अखेर युवकाने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने सविस्तर लिहून ठेवले आहे. असे आहे प्रकरण... माझ्यासोबत संबंध ठेव, नाहीतर तुझी बदनामी करीन, अशी धमकी महिलेकडून वारंवार मिळाल्याने एका तरुणानं गळफास घेत आत्महत्या केली. सचिन मिटकरी असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेने शहर परिसरात एकच खळबळ उडाली...
  October 15, 02:32 PM
 • जालना - चोरट्यांनी एक लाख रुपये लुटल्याचा बहाणा करत पोलिसांत तक्रार देणारा फिर्यादीच तपासात आरोपी निघाल्याचे अवघ्या २४ तासांत निष्पन्न झाले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून चंदनझिरा पोलिसांकडे मुद्देमालही काढून दिला. करण किसन खैरे (२२, मस्तगड, जुना जालना) असे या आरोपीचे नाव आहे. करण खैरे हा नवीन एमआयडीसीत विजय स्क्रॅप कंपनीत मागील सहा महिन्यांपासून ऑफिस बॉय म्हणून काम करत होता. दरम्यान, शुक्रवारी कंपनी मालक अनुप अग्रवाल यांनी त्याला एमआयडीसीतील रवी चौधरी यांच्याकडून एक लाख...
  October 14, 09:28 AM
 • परभणी - राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा वतीने एकात्मिक पूरक वाचन योजनेंतर्गत शाळेला पुरवण्यात आलेल्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकात महापुरुषाबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याप्रकरणी लेखिका, प्रकाशक व महाराष्ट्र विद्या प्राधिकरण विभागातील अधिकारी यांच्यावर संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेच्या तक्रारीवरून शुक्रवारी रात्री जिंतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लेखिका शुभा साठे यांनी या पुस्तकातील पान क्रमांक १८ वर महापुरुषाबद्दल कोणतेही ऐतिहासिक पुरावे न देता...
  October 14, 08:09 AM
 
जाहिरात

RECOMMENDED