जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • हिंगोली: पूर्वीचा मराठवाडा (डोंगरकडा, ता. कळमनुरी) आणि आताचा भाऊराव पाटील सहकारी साखर कारखाना-२ मधील कामगार व कर्मचा-यांची देयके गेल्या ६ वर्षांपासून वाटप झाली नाहीत. मराठवाडा सहकारी साखर कारखाना २००४ मध्ये अवसायनात निघाला आणि नंतर बंद पडला. यामुळे कारखान्यातील ७२८ कामगार व कर्मचायांचा रोजगार हिरावला गेला. या कामगारांपैकी १३० जणांचा मृत्यू झाला आहे. हयात असलेले ५९० कामगार-कर्मचारी आणि मयतांचे नातेवाइक हक्काच्या रकमेसाठी सरकारविरोधात लढा देत आहेत. २००६ मध्ये मराठवाडा कारखाना माजी...
  July 18, 12:53 AM
 • लातूर: जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ येथे चोरट्यांनी रविवारी पहाटे नागिमे ज्वेलर्सवर दरोडा टाकून तिजोरीसह २० किलो चांदी व २५ तोळे सोने असा १३ लाख ७५ हजारांचा ऐवज लंपास केला. यासंदर्भात ज्वेलर्सचे मालक अरुण नागिमे यांनी शिरूर अनंतपाळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यात शटर उचकटून चोरी झाल्याचे म्हटले आहे.
  July 18, 12:39 AM
 • बीड: बीडमधून २०५ पोती गहू बार्शी नाका परिसरातून काळ्या बाजारात घेऊन जाणारा ट्रक जप्त करण्यात आला. पेठ बीड पोलिसांनी शनिवारी (दि. १६) रात्री ही कारवाई केली असून ट्रकचालकासह क्लीनरला अटक करण्यात आली आहे. गेवराईहून बार्शी नाकामार्गे ट्रक (एमएच १६-क्यू ६१३०) २०५ पोती गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती पेठ बीड पोलिसांना समजली. पोलिस निरीक्षक वाल्मीक आवाळे यांच्या पथकाने बार्शी नाका परिसरात शनिवारी सापळा रचून या ट्रकला पकडले. शेख शफिक शेख कारभारी (वय २७), कैलास राधाकिसन माने (२४,...
  July 18, 12:34 AM
 • बीड - स्त्रीभ्रृण हत्या टाळणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे, असे समजून प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.बीड जिल्ह्यातील परळी येथे मागील महिन्याभरता अनेक स्त्री अर्भक नदीपात्रात, नाल्यात आढळले होते. या पार्श्वभूमिवर परळी येथील वैद्यनाथ मंदिर परिसरात एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यत त्या बोलत होत्या. प्रा.गायकवाड म्हणाल्या की, बीड जिल्ह्यातील स्त्रीचा घटता...
  July 17, 11:04 AM
 • नांदेड- वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने कुटुंब कल्याण कार्यक्रम हाती घेतला. सरकारने कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी प्रोत्साहन देणा-या प्रमोटरला (प्रेरक) १५० रुपये तर शस्त्रक्रिया करणा-या डॉक्टरांना ७५ रुपये मानधन निश्चित केले आहे. सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रात शल्य चिकित्सक उपलब्ध नसल्याने खाजगी डॉक्टरांची मदत घेतली जाते; पण शस्त्रक्रियांसाठी डॉक्टरांना अत्यल्प मानधन दिले जाते. यावरून कुटुंब कल्याणाचा कार्यक्रम राबविण्यात सरकारची अनास्थाच दिसून येते.
  July 17, 07:19 AM
 • हिंगोली- अपघातात ठार झालेल्या शेतकच्या वारसांना आणि जखमी झालेल्या शेतक-यांना मिळणा-या शेतकरी अपघात विमा योजनेची प्रकरण मंजूर होत नसल्याचे गेल्या तीन वर्षांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. इतर अपघात विम्यांच्या तुलनेत या योजनेचा विचार केल्यास शेतकरी अपघात विम्यांच्या मंजुरीचे प्रमाण खूपच कमी असून विमा योजनांची शेतक-यांना माहिती देण्यात येत नसल्याने स्पष्ट झाले. या प्रकाराला कृषी विभागालाच जबाबदार मानले जात आहे. राज्य सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली ही योजना २००९ पासून महसूल...
  July 17, 07:15 AM
 • उस्मानाबाद: शिक्षक, अधिकारी व कर्मचा-यांनी गणवेश वापरावा, असा निर्णय झालेला असताना त्याची सुरुवात अगोदर कोणी करायची या वादात या सर्वांनी मिळून त्याला ठेंगा दाखविला. विरोध करायचा नाही आणि अंमलबजावणीही करायची नाही, असे धोरण अवलंबून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी गणवेश वापराला ठेंगा दाखविला आहे. शिक्षक गणवेश वापरणार नसतील तर ते आम्ही का वापरावे या आविर्भावात अधिकारी- कर्मचा-यांनीही हात वर केले आहेत. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षकांनी गणवेश...
  July 17, 04:58 AM
 • हिंगोली: सुवर्णजयंती राजस्व अभियानाअंतर्गत शुक्रवारी औंढा नागनाथ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये समाधान योजनेचे शिबिर झाले. उद्घाटन उपविभागीय दंडाधिकारी दीपाली मोतियाळे यांच्या हस्ते झाले. या वेळी तहसीलदार अभिमन्यू बोधवड, नायब तहसीलदार सारंग चव्हाण, राजेश लांडगे, अनिल पाटील, शैलेश वाईकर आदीउपस्थित होते. या वेळी मोतियाळे यांनी उत्पन्न, रहिवासी, नॉन क्रिमिलेअर आदी प्रमाणपत्रे एक खिडकीतून वाटप करण्याच्या सूचना तहसीलदार बोधवड यांना दिल्या.
  July 17, 04:52 AM
 • बीड: रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेले नाते सर्वश्रेष्ठ समजले जाते. यातही जवळचे कोणी नसेल तर शेजारधर्म म्हणून जोपासलेले नातेही तेवढ्याच तत्परतेने जपण्याचे काम येथील एक पाचवर्षीय बालक करत आहे. शहरातील शाहूनगर भागात भाड्याच्या घरात राहणारे माधव बिराजदार व त्यांचा शेजारी प्रभाकर शिंदे जन्मत: अंध. प्रभाकरचा मोठा भाऊ प्रभाकरची देखभाल करतो; परंतु मोठा भाऊ कामावर गेल्यानंतर प्रभाकर एकटाच राहतो. त्या वेळी माधव बिराजदार यांचा सहावर्षीय मुलगा राम हा प्रभाकरला प्रत्येक कामात मदत करतो. राम लहान...
  July 17, 04:50 AM
 • बीड: जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार अमरसिंह पंडित यांची तर जिल्हा परिषद सदस्य दशरथ वनवे यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. शनिवारी (ता.१६) उपविभागीय अधिकारी गणेश नि-हाळी यांच्या उपस्थितीत बँकेची विशेष सभा झाली. सभेला २४ पैकी भाजपचे केवळ १४ सदस्य उपस्थित राहिले. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यातही पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर आणि महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांच्या गटाचे बँकेत दहा सदस्य आहेत, विरोधकांतून एकही सदस्य उपस्थित नव्हता.
  July 17, 04:47 AM
 • हिंगोली : कळमनुरी येथील बहिर्जी स्मारक प्राथमिक विद्यालयात भिंत अंगावर कोसळून जखमी झालेली विद्यार्थिनी तेजस्विनी योगेश जाधव (वय ८) ही अत्यवस्थ असल्याचे समजताच तरुणांनी शनिवारी मुख्याध्यापकांना घेराव घातला.तिच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भिंत पडून रोहन मेने, शिवम देशमुख, रितेश काकडे व गजानन साळवे हे विद्यार्थीही जखमी झाले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. तेजस्विनी अत्यवस्थ असल्याचे समजताच, कळमनुरीतील २० ते २५ तरुणांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब...
  July 17, 04:46 AM
 • नांदेड : राजकारणात स्व. शंकरराव चव्हाण आणि साहित्य, संस्कृती क्षेत्रात स्व. नरहर कुरुंदकर हे दोन नांदेडचे आयडॉल आहेत. त्यांच्यामुळे नांदेड शहर ओळखले जाते. पण कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर मात्र त्यांच्या स्मारकाची शासनाने अवहेलना सुरू केली आहे. दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी या स्मारकासाठी शासनाने निधी दिला नाही. शहरातील सायन्स कॉलेज परिसरात नरहर कुरुंदकर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला. त्यात वाचनालय, सेमिनार हॉल, स्टडी रूम आणि दोन निवासी खोल्या...
  July 17, 04:45 AM
 • नांदेड: जिल्ह्यात एक हजार हेक्टरवर सोयाबीनचे बियाणे उगवले नाही. या संदर्भात सोयाबीनच्या १ हजार २६२ तर कपाशीच्या ५२ तक्रारी शेतक-यांनी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे केल्या आहेत. हदगाव तालुक्यातून सर्वाधिक ८०० तक्रारी आल्या आहेत. ८० टक्के तक्रारी महाबीजच्या सोयाबीन जे.एस.३३५ वाणाच्या आहेत. शिवाय त्यात नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन, यशोदा, पारस, ब्रह्मा सीड्स आदी कंपन्यांच्या बियाणांचा समावेश आहे. कपाशीच्या हदगाव तालुक्यात-५०, धर्माबाद-१, किनवट-१ अशा ५२ तक्रारी आल्या. तालुकानिहाय तक्रारी...
  July 17, 04:44 AM
 • लातूर: नाना गावातल्या कार्यक्रमाला येतात; मात्र घरी का येत नाहीत... हा प्रश्न गेल्या सात वर्षांपासून मुकेशला पडत होता. अखेर त्याने याविषयी थेट वडिलांना जाब विचारण्याचे धैर्य दाखवले. आपले नाना (दिगंबर रामराव दाताळ, वय ८५) हे वृद्धाश्रमात राहतात, हे त्याच्या लक्षात आले. घरची सुबत्ता असताना आजोबा आश्रमात राहतात, या गोष्टीचे नातू मुकेशला वैषम्य वाटत असे. त्यामुळे त्याने एकेदिवशी गावातील ज्येष्ठ मंडळींना सोबत घेऊन वडिलांसोबत चर्चा केली. झाले गेले विसरून जा, आता नानाला घरी आणूया, असा त्याने...
  July 17, 04:39 AM
 • लातूर: पावसामुळे साचलेल्या डबक्यात खेळण्यास गेलेल्या एका बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना उदगीर तालुक्यातील हाळी येथे शुक्रवारी घडली. रफिक शेख (०६) असे मृत बालकाचे नाव आहे. त्याच्यासोबतचा मकसूद शेखही याच डबक्यात बुडाला होता. तो अत्यवस्थ असून त्याला लातूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
  July 16, 04:45 AM
 • लातूर: झपाट्याने विकसित होणा-या लातूर शहरामध्ये ध्वनिप्रदूषणाने जगणे अवघड झाले आहे. पर्यावरण विभागाने शहरातील ध्वनिप्रदूषणाची तीव्रता मोजली असता ती सामान्य सरासरीच्या पाचपट अधिक असल्याचे आढळून आले आहे. शहरात एकही सायलेन्स झोन नाही. त्यामुळे कर्णकर्कश आवाज करणारी वाहने व लाऊडस्पीकर्सचा त्रास शाळा, महाविद्यालये, दवाखाने, शासकीय कार्यालयांना होत आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनेही वाढली. मात्र, पायाभूत सुविधा अजूनही प्राथमिक अवस्थेतच आहेत. लातूर-बार्शी हा शहरातील मुख्य...
  July 16, 12:08 AM
 • लातूर: उदगीर तालुक्यातील आवलकोंडाजवळील पूल वाहून गेल्यामुळे तीन गावे अद्यापही संपर्कहीन आहेत. कोथळी, मांजरी आणि चोंडी या गावांचा गुरुवारी संपर्क तुटला होता. जिल्ह्यात आजपर्यंत २३९ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात २६५ मि.मी. पाऊस झाला आहे. तो सरासरीच्या ११०.४९ टक्के आहे. विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वीपर्यंत ही सरासरी ९० ते ९५ मि.मी. इतकी होती. नदीकाठच्या गावांना इशारा येत्या ४८ तासांत आणखी पाऊस पडण्याचा इशारा मिळाल्यामुळे नदीकाठच्या गावांतील लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात...
  July 15, 11:59 PM
 • जालना: जिल्ह्यात आजपर्यंत सरासरी १५० मि.मी. पाऊस झाला आहे. भोकरदन तालुक्यातील धावडा परिसराला अतिवृष्टीचा फटका बसला आहे. धावडा, वालसावंगी, पद्मावती या गावांना लेंडी आणि धामणा नदी काठावर असलेल्या शेतांमधील पिके पुरात वाहून गेली आहेत, तर अनेक ठिकाणी नदीकाठची जमीनही वाहून गेली आहे. या तीन गावांतील जवळपास ४०० शेतकयांना पुराचा फटका बसला आहे. महसूल आणि कृषी विभाग या नुकसानीची पाहणी करीत आहेत. मात्र नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम अद्यापही सुरू झालेले नाही. कृषी विभागाच्या मदतीने आम्ही संयुक्त...
  July 15, 11:57 PM
 • जालना: शहरात तब्बल २५ हजार अनधिकृत नळ कनेक्शन्स आहेत. त्यामुळे पालिकेचे वर्षाला दोन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. विशेष म्हणजे अधिकृत नळजोडणी घेणा-यांना याचा फटका बसत आहे. अनधिकृत नळजोडणीची ही आकडेवारी नगरपालिकेने केलेल्या पाहणीमध्ये उघडकीस आली आहे. जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, नियमित पाणीपुरवठा करण्यात सर्वात मोठा अडथळा ठरत आहे तो अनधिकृत नळ जोडणीचा. जालना शहराला घाणेवाडी आणि शहागड तलावातून पाणीपुरवठा केला जातो. या...
  July 15, 11:55 PM
 • उस्मानाबाद: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांच्या बाबतीत काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा जनता दलातर्फे (धर्मनरिपेक्ष) निषेध करण्यात आला आहे. राहुल यांचा उदो उदो करणे म्हणजे स्वत:च्या गळ्याला फास लावून घेण्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया जनता दलाचे प्रवक्ते अॅड. रेवण भोसले यांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात अॅड. भोसले यांनी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. देशात दहशतवादी हल्ले होतच राहणार, अमेरिकेतही असे हल्ले होतच राहतात, असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले आहे. १९८४ मध्ये...
  July 15, 11:52 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात