Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • पावसाव्व्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याचे पाणी शुद्ध राहावे यासाठी ग्रामीण भागात उपाययोजना केलेल्या दिसून येत नाहीत. ७०४ पैकी २८९ गावांतील पाणी दूषित असल्याचा अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याला प्राप्त झाला आहे. आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यांतील गावांचा अहवाल तयार करण्यात येतो. गावांतील पाण्याचे सर्वेक्षण केल्यानंतर दूषित पाणी असल्यास रेड कार्ड, शुद्ध पाणी असल्यास ग्रीन कार्ड दिले जाते. दर महिन्यास या प्रकारचे सर्वेक्षण करण्यात येते. दूषित पाणी कसे ठरविले जाते दूषित पाणी...
  June 15, 02:30 AM
 • आई-वडिलांचे शिक्षण जेमतेम... वडील व्यवसायाने टेलर... घरात दोन लहान भावंडं... अशा प्रतिकूल परिस्थितीत परभणीच्या इंद्रजित भारत जाधव या विद्यार्थ्याने एमएचसीईटी परीक्षेत अभियांत्रिकी शाखेसाठी १९४ गुण मिळविले. या यशानंतर त्याचे मनोगत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने जिद्द, चिकाटी असेल तर कशाला सोडायचे गाव, अशा शब्दांत आपल्या श्रमाचे सार्थक तर केलेच शिवाय गुणवत्ता असेल तर दुसया गावाला जाण्याची गरज नसल्याचा इतर विद्यार्थ्यांना सल्लाही दिला. दहावी उत्तीर्ण होताच जिल्ह्यातील बहुतांश...
  June 15, 02:26 AM
 • वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रवेशपूर्व (एमएचटीसीईटी) परीक्षेत लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयाचा करण कालानी (रा. परभणी) वैद्यकीय शाखेतून १९५ गुण घेऊन विभागातून पहिला, तर जालन्याच्या जेईएस महाविद्यालयाचा प्रीतेश आनंद लाहोटी याने अभियांत्रिकी शाखेसाठी १९७ गुण मिळवत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला. वैद्यकीय गटामध्ये पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये लातूरचे ३० विद्यार्थी आहेत. मराठवाड्यातून या परीक्षेसाठी ३३ हजार ४४९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी ४ हजार ९०२...
  June 15, 02:22 AM
 • नांदेड: नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या घोटाळ्यामुळे बँक डबघाईला आली. रिझर्व्ह बँकेने कलम ३५ नुसार कारवाई करून आर्थिक निर्बंध लादले. बँकेचे व्यवहार २००५ पासून ठप्प आहेत. बँकेच्या दोषी ४० संचालकांना प्राधिकृत अधिकारी अमृत सोपानराव गंभीरे यांनी क्लीन चिट दिली आहे. विशेष म्हणजे निवृत्तीला २ दिवस शिल्लक असताना गंभीरे यांनी हा निर्णय दिला आहे. विभागीय सहनिबंधकांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यासाठी चौकशीची कार्यवाही सुरू केली होती. त्यांनी...
  June 13, 06:08 AM
 • बीड: अंबाजोगाई बसस्थानकापासून बीडमार्गे औरंगाबादपर्यंत पोहोचलेल्या आणि तेथे स्थिरावत नाही, तोच दुष्टचक्रात अडकून पुन्हा बीडला आलेल्या अनाथ शाहरूखची देखभाल आता मुंबईच्या बालगृहात होणार आहे. अनाथच नव्हे तर मतिमंद आणि मूकबधिर असलेल्या शाहरूखची फरफट आता थांबली आहे. दैनिक दिव्य मराठीत वृत्त प्रसिद्ध होताच बालकल्याण समितीच्या अधिका-यांनी दखल घेत त्याला मुंबईच्या बालगृहात स्थान मिळवून दिले. सुमारे वर्षभरापूर्वी अंबाजोगाई येथील बसस्थानकात पाच वर्षे वयोगटातील बालक पोलिसांना आढळून...
  June 13, 01:10 AM
 • हिंगोली: हिंगोली जिल्ह्यासाठी युजीसी व खासगी व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या साहाय्याने सुरू होणाया मॉडेल कॉलेजचे उद्घाटन १३ रोजी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते होत आहे. क्रीडा संकुलाच्या इमारतीत हे कॉलेज तात्पुरत्या स्वरूपात सुरू होत आहे. कार्यक्रमास स्वारातीचे कुलगुरू डॉ. सर्जेराव निमसे, पालकमंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री सावंत, खा. वानखेडे आदींची उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती समन्वयक प्रा. मार्डीकर यांनी दिली. हिंगोलीसह राज्यात ७ ठिकाणी मॉडेल कॉलेज होणार...
  June 13, 01:04 AM
 • लातूर: गतवर्षीच्या तुलनेत लातूरच्या बाजारपेठेत यंदा गुळाची आवक सरासरी ५० हजार क्विंटलने वाढली असून, गुळाला गुजरातमधून चांगली मागणी असल्यामुळे शेतक-यांना भावही चांगला मिळत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेपैकी अशी लातूरच्या गूळ मार्केटची ओळख आहे. यंदा गुळाच्या दरात प्रतिक्विंटल दीड ते दोन हजार रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हंगामात मिळणारा दर १५०० ते १८०० च्या दरम्यान होता. तो यंदा २३०० ते २६०० पर्यंत गेला आहे, अशी माहिती बाजार समितीचे सचिव समृत जाधव यांनी दिली. येथे निलंगा,...
  June 13, 12:58 AM
 • लातूर: शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशीच विद्यार्थ्यांची शाळेत शंभर टक्के हजेरी लावण्याचा प्रयत्न शिक्षण विभाग करणार आहे. यासाठी विभागाने घरभेटी पदयात्रा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात सर्व शिक्षक, पदाधिकारी व अधिकारी शाळा सुरू होण्याच्या आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणार आहेत. लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद व नांदेड जिल्ह्यांचे नियोजन येथे करण्यात आले. शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेडे यांच्या उपस्थितीत मुख्याध्यापकांच्या बैठकीत त्याची रूपरेषा ठरविण्यात आली....
  June 13, 12:53 AM
 • हिंगोली: रोजगार हमी योजना व कृ षी विभागाच्या सहकार्याने या वर्षी जिल्ह्यात ९५६ हेक्टरवर फळबागा फुलवण्यात येणार असून, सर्वाधिक आंब्यांची झाडे लावण्यात येणार आहेत. ही माहिती जिल्हा कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे यांनी दिली. हिंगोली-१८१ हेक्टर, कळमनुरी-३०१, वसमत-१९५, औंढा नागनाथ-११२, तर सेनगाव तालुक्यातील १६७ हेक्टरवर ही फळबाग लागवड होणार आहे. आंबा, मोसंबी, संत्रा, चिकू, आवळा, पेरू, कागदी लिंबू, चिंच, अंजीर, डाळिंब, सीताफळ या फळांची रोपटे लावली जाणार आहेत.
  June 13, 12:51 AM
 • बीड: सुमारे 30 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बीड येथील बायोगॅस प्रकल्प केवळ पाइपलाइनच्या कामामुळे रखडला आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वीच या प्रकल्पाचे काम झाले असून केवळ उदासीनतेमुळे हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही. यामुळे या प्रकल्पाच्या बांधकामालाही आता तडे जाऊ लागले आहेत. वेळीच याची दखल न घेतल्यास 30 लाखांची हवा फूस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कचयापासून पर्यावरणाला धोका आहे. शहरात जमा होणारा कचरा कोठे टाकावा ही नेहमीची समस्या. त्यापासून येणारी दुर्गंधी वेगळीच. यावर उपाय...
  June 13, 12:49 AM
 • बीड: खतांसाठी मारामार सुरू असतानाच बनावट बियाणांमधूनही शेतक-यांची फसवणूक होऊ लागली आहे. यातच रविवारी (ता.१२) शहरात महिकोचे कनक वाणाचे बनावट बारा डबे जप्त करण्यात आले आहेत. बीड शहरामध्ये कनकच्या बनावट बियाणांची विक्री सुरू असल्याची तक्रार युवा मंचच्या कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार कृषी विभागाच्या अधिका-यांनी छापा मारून हे वाण जप्त केले आहे. पांगरी रोडवर एका स्कॉर्पिओ वाहनातून एकजण महिकोचे कनक बियाणांचे डबे शेतक-यांना विक्री करत असताना संदीप क्षीरसागर युवा मंचच्या सामाजिक...
  June 13, 12:48 AM
 • जालना: विधानसभा सदस्य बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील ५ अधिकारी व २५ आमदार सदस्य असलेली पंचायत राज समिती १४ ते १६ जूनदरम्यान जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. राधाकृष्णन यांनी सुटीच्या दिवशीही अधिकायांची बैठक घेऊन समितीची बडदास्त ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच जिल्हा परिषद इमारतीची रंगरंगोटी व स्वच्छता मोहीमही हाती घेण्यात आली आहे. यापूर्वी पंचायत राज समिती ही २००४-०५ मध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव मित्तल यांच्या...
  June 13, 12:45 AM
 • जालना: शाळा सुरू होण्यास चार दिवस राहिले असताना जिल्ह्यास अद्याप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वाटप करण्यासाठी येणारी सर्व पुस्तके प्राप्त झाली नाहीत. जिल्ह्यातील एकूण १६२७ शाळांसाठी २० लाख ५५ हजार पाठ्यपुस्तकांची गरज असताना आतापर्यंत १८ लाख ४२ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यात प्राप्त न झालेल्या पुस्तकांमध्ये चौथी विज्ञान (उर्दू माध्यम), गणित (उर्दू माध्यम), इतिहास (हिंदी), पाचवीचे गणित, सातवी भूगोल, दुसरीचे मराठी इत्यादींचा समावेश आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत उर्वरित...
  June 13, 12:42 AM
 • नांदेड: सुमारे ५ लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या नांदेड शहरातील विविध भागांत आजही जवळपास ६० हजार नागरिक दररोज उघड्यावर प्रातर्विधी करतात, असे महापालिकेनेच लेखी स्वरूपात मान्य केल्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पाणंदमुक्तीचा दावा फोल ठरला आहे. एकीकडे महापालिका शहर स्वच्छ, सुंदर व आकर्षक करण्याचे मनसुबे कागदोपत्री रंगवत आहे. त्यासाठी मोठा निधी प्राप्त होतो. मात्र, हा निधी त्यावर खर्च न करता अन्यत्र खर्च केला जातो, त्यामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. असे असले तरी महापालिका नागरिकांना...
  June 13, 12:40 AM
 • जालना: शाळा सुरू होण्यास चार दिवस राहिले असताना जिल्ह्यास अद्याप सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत वाटप करण्यासाठी येणारी सर्व पुस्तके प्राप्त झाली नाहीत. जिल्ह्यातील एकूण १६२७ शाळांसाठी २० लाख ५५ हजार पाठ्यपुस्तकांची गरज असताना आतापर्यंत १८ लाख ४२ हजार पाठ्यपुस्तके प्राप्त झाली आहेत. जिल्ह्यात प्राप्त न झालेल्या पुस्तकांमध्ये चौथी विज्ञान (उर्दू माध्यम), गणित (उर्दू माध्यम), इतिहास (हिंदी), पाचवीचे गणित, सातवी भूगोल, दुसरीचे मराठी इत्यादींचा समावेश आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसांत उर्वरित...
  June 13, 12:37 AM
 • लातूर- उसनवारीतील पैशाच्या देवाणघेवाणीतून गुट्टेवाडी (ता. अहमदपूर) येथे शुक्रवारी दि. १० रोजी रात्री झालेल्या भांडणात एका तरुणाचा खून झाला. याप्रकरणी किनगाव पोलिसांनी औरंगाबाद एमआयडीसी ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस जमादार विश्वास गुट्टे यांच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गुट्टेवाडी येथील रहिवासी व सध्या औरंगाबाद येथे पोलिस जमादार असलेले विश्वास गुट्टेवार यांनी त्यांच्या भावकीतील प्रसाद भीमराव गुट्टे (३२) याला हातउसने पैसे दिले होते. विश्वास गुट्टे यांचा मुलगा संजय याचा...
  June 12, 04:52 AM
 • बीड- दंतेवाडा जिल्ह्यातील भोजी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले केंद्रीय राखीव पोलिस दलातील जवान गोरख आश्रुबा इंगोले (४५) हे शनिवारी (दि.११) नक्षली हल्ल्यात ठार झाले. कारी (ता. किल्लोधारूर) येथील शेतकरी आश्रुबा इंगोले यांचा मुलगा गोरख हे १९८८ मध्ये केंद्रीय राखीव पोलिस दलात भरती झाले. त्यांच्या निवृत्तीला केवळ सहा महिन्यांचा कालावधी बाकी होता. दंतेवाडा जिल्ह्यात भोजी पोलिस ठाण्यात ते कार्यरत होते. शनिवारी (दि. ११) जम्मू तसेच हरियाणा राज्यांतील दोन जवानांसह गोरख इंगोले जंगलात गस्त...
  June 12, 04:48 AM
 • जालना- कृषी विक्रेत्यांनी निर्माण केलेली कृत्रिम खतटंचाई पाहता कृषी विभागाच्या पथकाने उशीरा का होईना खतविक्रेत्यांवर धाडी टाकण्याचे धाडस केले. शनिवारी रात्री शहरातील दोन गोदामावर धाड टाकून तब्बल एक कोटीच्या खताचा अवैध साठा जप्त केला. जालना जिल्ह्यातील विविध एजन्सीला शुक्रवारी कोरोमंडल इंटरनॅशनल लि.काकीनाडा या कंपनीने खताचा पुरवठा केला होता. कंपनीकडून आलेले खत राहूल जैन यांनी काही एजन्सींना वाटप केले. आणि नंतर काही खत उड्डाणपुलाजवळ असलेल्या गोदामात पाठवून दिला. खताचा अवैध साठा...
  June 12, 04:45 AM
 • बीड- शहरालगत बार्शी रोडवर बिंदुसरा धरणालगत सुमारे सोळा हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणारा युवा शांतीवन हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. तब्बल एक कोटींहून अधिक रुपये खर्ची होऊनही गेल्या दहा वर्षांपासून तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बीड-सोलापूर रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बिंदुसरा तलावाच्या वनक्षेत्रावर युवा शांतीवन पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळाचे एकूण क्षेत्र १६ हेक्टर आहे. युवा शांतीवन विकसित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर,...
  June 12, 03:10 AM
 • बीड- शहरालगत बार्शी रोडवर बिंदुसरा धरणालगत सुमारे सोळा हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणारा युवा शांतीवन हा प्रकल्प गेल्या दहा वर्षांपासून रेंगाळत पडला आहे. तब्बल एक कोटींहून अधिक रुपये खर्ची होऊनही गेल्या दहा वर्षांपासून तो उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. बीड-सोलापूर रस्त्यावर बारा किलोमीटर अंतरावर बिंदुसरा तलावाच्या वनक्षेत्रावर युवा शांतीवन पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळाचे एकूण क्षेत्र १६ हेक्टर आहे. युवा शांतीवन विकसित करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयदत्त क्षीरसागर,...
  June 12, 03:08 AM
 
जाहिरात

RECOMMENDED