जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • लातूर- मतदारयादी अद्ययावत करण्यासाठी निवडणूक आयोगाने आतापर्यंत अनेक प्रश्न विचारून मतदारांना भंडावून सोडले. वय, पत्ता आणि छायाचित्र घेण्यासाठी आयोगाचे कर्मचारी मतदारांच्या घरापर्यंत आले. आता हेच कर्मचारी मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक घेण्यासाठी पुन्हा मतदारांच्या दारी येणार आहेत. भारत निवडणुक आयोगाने १५ जून ते १५ आॅगस्ट दरम्यान ही नवी मोहीम हाती घेतली आहे. ही माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विकास नाईक यांनी दिली. बनावट मतदानाला आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाने मागील काही...
  June 11, 04:57 AM
 • नांदेड- रात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची घटना शुकवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. दरोडेखोरांपासून बचाव करण्यासाठी पोलिसांनाही हवेत गोळीबार करावा लागला. हा थरार शहराजवळच असलेल्या वाजेगाव शिवारात घडला. वाजेगाव परिसरात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास चोरी दरोड्याच्या उद्देशाने काही लोक संशयितरीत्या फिरत असल्याची माहिती ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पोलिसांना मिळाली. गस्तीवर असलेले पो.उप नि. वैजनाथ मुंढे आणि सहका-यांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिस...
  June 11, 12:26 AM
 • परभणी- शिक्षण विभागातील कर्मचा-यास मारहाण करून दीड महिन्यापासून फरारी असलेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ गुरुवारी (दि.९) रोजी रात्री नानलपेठ पोलिसांना शरण आला. औरंगाबाद खंडपीठाने त्याचा जामीन फेटाळला आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत घेण्यात आलेल्या शिक्षण सेवक भरतीअंतर्गत सेवेत सामावून घेण्यासाठी १५१ उमेदवारांनी जिल्हा परिषदेसमोर उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ याने पाठिंबा देत सहभाग नोंदविला होता....
  June 11, 12:22 AM
 • नांदेड- माहूर येथील कपिलेश्वर धर्मशाळेत गुरुवारी रात्री एका महिलेचा गळा आवळून खून करण्यात आला. खून केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे. कपिलेश्वर धर्मशाळेत दि. ९ रोजी सकाळी प्रमोद विठ्ठल जाधव हा सकाळी एका ४० वर्षीय महिलेसोबत आला. त्याने आपण देवीच्या दर्शनासाठी आलो असून, आपल्यासमवेत आई असल्याचे धर्मशाळा व्यवस्थापकाला सांगितले. धर्मशाळेच्या नोंदवहीत मु. पो. जालना एवढाच पत्ता नोंदविला. रात्री आरोपीने त्या महिलेचा दोरीने गळा आवळला. तिचे पायही दोरीने बांधले. सकाळी व्यवस्थापकाच्या निदर्शनास हा...
  June 11, 12:14 AM
 • जालना- येत्या काही महिन्यांत राज्यात सर्वात मोठी पोलिस भरती होणार आहे. यामध्ये १७ हजार बेरोजगारांना संधी मिळणार आहे. त्यामुळे या भरतीकडे राज्यातील युवक मोठ्या आशेने पाहत आहेत. दरम्यान, या भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे फेरबदल करण्याचे संकेत गृह विभागाने दिले आहेत. या बदलानुसार आता अर्जही आॅनलाइन करावे लागणार आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून गृहमंत्री आर. आर. पाटील लवकरच पोलिस भरती करण्यात येणार असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे पोलिस दलात सहभागी होऊ इच्छिणारे युवक तयारीला...
  June 11, 12:11 AM
 • हिंगोली- उभ्या ट्रकवर जीप आदळून झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झाल्याची घटना हिंगोली-वाशीम मार्गावर वडद पाटीनजीक शुक्रवारी पहाटे ३.४५ वाजता घडली. या अपघातात गंगाखेड पोलिस ठाण्याचे जमादार सुखासिंग ईश्वरसिंग बावरी (४०) आणि त्यांची पत्नी यांच्यासह अन्य एका जोडपे ठार झाले, तर अन्य ७ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. क्रुझर जीप (एमएच २२ एन ४०७४) मध्ये बावरी कुटुंबीय वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे लग्नासाठी निघाले होते. रस्त्यात एका पंक्चर झालेल्या उभ्या ट्रकवर...
  June 11, 12:04 AM
 • नांदेड- महापालिकेच्या स्थायी समिती व सर्वसाधारण सभेने शहर बससेवा महाराष्ट राज्य परिवहन मंडळाला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ७ महिन्यांमध्ये महामंडळाला तब्बल १ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती विभाग नियंत्रक आर. के. जाधव यांनी दिली. आॅक्टोबर २०१० मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शहर बससेवेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र, आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने राज्य परिवहन मंडळाला ही बससेवा चालविण्यास देण्यात आली. महामंडळाने ३० बसेस शहरासाठी सुरू...
  June 11, 12:00 AM
 • लातूर- शहरातील बिघडलेल्या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी डोके चालवले आहे. त्यांच्या सुपीक डोक्यातून अनेक उपाय निघाले असून त्यांनी ते कागदावर उतरवून प्रशासनाकडे दिले आहेत. मात्र, प्रशासनाने अद्याप तरी त्यावर निर्णय न घेतल्यामुळे शहरातील वाहतूक जैसे थे आहे. शहरात अवजड वाहनांना प्रतिबंध आहे. शहराच्या दोन्ही बाजूने असलेल्या वळणरस्त्यावरून (रिंगरोड) ही वाहने जातात. मात्र, बसस्थानक व मार्केट यार्ड मध्यवर्ती ठिकाणी असल्यामुळे वाहतुकीची नेहमी कोंडी होते. यावर उपाय म्हणून शिवाजी...
  June 10, 11:51 PM
 • बीड - नायगाव मयूरारण्यातून मोठ्या संख्येने शिरूर कासार तालुक्यात मोर स्थलांतरित झाले आहेत. यातील काहींना देवीरोग झाल्याने त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. यातील तीन मोरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिका-यांकडून देण्यात आली. सध्या जिल्ह्यातील नायगाव मयूरारण्यातील मोर अन्नपाण्यावाचून स्थलांतरित होत असल्याच्या बातमीला वन्यजीव संरक्षक कार्यालयातील अधिका-यांनीही दुजोरा दिला आहे. नायगाव मयूरारण्यातून शिरूर कासार, गोमळवाडा, कोळवाडी, पिंपळनेर, फुलसांगवी,...
  June 10, 11:42 PM
 • लातूर- चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेला जिवंत जाळणा-या पती, सासू, सासरा, दीर व जाऊ अशा पाच जणांना उदगीर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात विवाहितेने दिलेला मृत्युपूर्व जबाब ग्राह्य धरून न्यायालयाने गुरुवारी (दि. आठ) हा निकाल दिला. या प्रकरणाची सहायक सरकारी वकील एस. एन. कुलकर्णी यांनी दिलेली माहिती अशी, डोंगरकुनाळी (ता. जळकोट) येथील विवाहिता श्रीदेवी यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी दादाराव गव्हाणे याच्यासोबत झाला होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे....
  June 10, 11:34 PM
 • परभणी-यंदा शैक्षणिक साहित्याच्या किमतीत वाढ झाल्यामुळे पालकांच्या खिशाला झळ पोहोचणार आहे. वह्या, पुस्तके याबरोबरच वॉटरबॅगच्या किमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे गणित बिघडणार आहे. वह्यांची पाने कमी केली असून, किंमतही वाढविण्यात आल्याचा फंडा यंदा पथमच पाहावयास मिळत आहे. वह्या-पुस्तकांशिवाय पेन, कंपास तसेच इतर साहित्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. नामांकित कंपन्यांच्या साहित्यात पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. वॉटरबॅग, खोडरबर, पेन्सिल, कव्हर, पेन बॉक्स, पॅड, गाइड,...
  June 10, 11:21 PM
 • बीड - परळी शहरालगत असणा-या संगम शिवारातील नदी पात्रात नऊ मृत अर्भके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या सर्व घटनेमुळे स्त्री भ्रुणहत्येचा प्रकार उघडकीस आला आहे. परळी ग्रामीण पोलिसांत केवळ दोन मृत अर्भके सापडल्याची नोंद आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, परळी वैजनाथ येथील संगम परिसरात गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास बाळासाहेब गिते (रा. वाघबेट ता.परळी) यांना नदी पात्रात अर्भके मृतावस्थेत असल्याचे दिसून आले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात महिलेविरुध्द गुन्हा दाखल केला होता. मात्र आज...
  June 10, 05:23 PM
 • हिंगोली: वाशिम मार्गावर वडदपाटीजवळ उभ्या असलेल्या ट्रकवर क्रुझर जीप आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. आज (शुक्रवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. सुखसिंग बावरी, दीपाकौर बावरी, रणजीतासिंग टाक, मत्सकौर टाक यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. तर जखमींमध्य अनिताकौर टाक, सुमिताकौर टाक, रोहनसिंग बावरी, रितूकौर बावरी, जीवनसिंग राजकुमार शिंदे यांचा समावेश आहे. येथील शासकीय रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु आहेत.
  June 10, 02:34 PM
 • मुंबई । राज्य शासनाने आज सहा वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या. तब्बल सहा महिन्यानंतर राज्याच्या वित्त विभागाला आज पूर्णवेळ सचिव मिळाला असून नियोजन विभागाचे प्रधानसचिव सुधीर श्रीवास्तव यांची अर्थ खात्याचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून लातूरच्या जिल्हाधिकारीपदी बिपीन शर्मा यांची बदली करण्यात आली आहे.
  June 10, 03:45 AM
 • लातूर - येथील मार्केट यार्डातील अवधूत फर्टिलायझर्स कृषी केंद्रावर खते व बियाणे खरेदीसाठी गर्दी झाल्यामुळे गुरुवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास मोठा गोंधळ उडाला. या वेळी पोलिसांनी लाठीमार करून गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गर्दी जास्त असल्यामुळे आजची खत खरेदी बंद करण्यात आली. खते व बियाणे न मिळालेल्या शेतकयांना शुक्रवारी येण्यास सांगण्यात आले आहे.
  June 10, 03:38 AM
 • लातूर- लातूर पॅटर्नमुळे शिक्षण क्षेत्रात नाव कमावलेल्या लातूर जिल्ह्यात अंगणवाड्यांची अवस्था फार वाईट आहे. जिल्ह्यात २१६६ कार्यरत अंगणवाड्यांपैकी तब्बल ९५१ अंगणवाड्यांमध्ये बालकांसाठी शौचालयाची सुविधा नाही. अंगणावरून घराची शोभा सांगणा-या या बाबीमुळे मराठवाड्याच्या शिक्षण पंढरीतच शिक्षणाचा पाया किती कच्चा आहे, हे दिसते. सहा वर्षापर्यंतच्या बालकाला नियमितपणे शाळेची गोडी लागावी म्हणून सातशे लोकसंख्येसाठी एक अंगणवाडी या प्रमाणात अंगणवाड्यांची निर्मिती करण्यात येते. ग्रामीण...
  June 10, 12:26 AM
 • जालना- तहसील कार्यालयास वाहन नसल्यामुळे तहसीलदार मोटारसायकलवर येतात. केवळ २ नायब तहसीलदार. पुरेसे कर्मचारी नाहीत, अवैध व्यावसायिकांवर कारवाई नाही, त्यामुळे येथील तहसील कार्यालयात सध्या सर्व काही आलबेल असेच आहे. जालना तालुका व शहर मिळून सुमारे ४ लाख लोकसंख्येचा भार या तहसीलवर आहे. तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी असलेले देवेंद्र कटके हे सध्या त्रस्त झाले आहेत. नायब तहसीलदारांची ७ पदे मंजूर असताना केवळ २ अधिकारीच काम सांभाळत आहेत. अवैध धंदे सध्या जोरात सुरू आहेत. नायब तहसीलदारांची पदे...
  June 10, 12:21 AM
 • उस्मानाबाद- रेशन धान्याचे सामाजिक लेखापरीक्षण, तुळजाभवानी मंदिरात विविध सुधारणा करून विशेषत: काँग्रेस नेत्यांचा रोष ओढवून घेतलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या बदलीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांच्या बदलीनंतर या प्रयत्नांना वेग आला आहे. जिल्हाधिकारी गेडाम हे १७ जून ते १७ ऑगस्टपर्यंत प्रशिक्षणासाठी जाणार आहेत. या काळातच त्यांची बदली व्हावी, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. डॉ. गेडाम दोन वर्षांपूर्वी...
  June 10, 12:14 AM
 • परभणी- शहरातील संवेदनशील भागातील नागरिकांची सुरक्षा ज्या कोतवाली पोलिस ठाण्याच्या हातात आहे, त्याचा कारभारच धान्याच्या गोदामात चालतो. ठाण्याची इमारत मोडकळीस आली असून तेथील शस्त्रागार असुरक्षित बनले आहे. इमारत कधीही कोसळू शकते. या भीतीने हवालदार स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. एवढेच नव्हे तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे चिखलात ठाणे असल्याचे विदारक चित्र तयार झाले आहे. शहराच्या अतिसंवेदनशील भागाचे संरक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या कोतवाली पोलिस ठाण्याचा कारभार २०...
  June 9, 11:56 PM
 • बीड- पाच वर्षांपूर्वी अंबाजोगाईच्या बसस्थानकावर पाच वर्षांचे मतिमंद, मूकबधिर आणि अस्थिव्यंग बालक आढळून आले होते. प्रशासकीय अधिका-यांच्या पुढाकाराने त्याला आधार मिळाला. सुरुवातीला अंबाजोगाई व तेथून बीड येथे त्याच्यावर उपचार झाले. मात्र, येथे उपचाराची सोय नसल्याने औरंगाबादेतील एका बालगृहात दाखल करण्यात आले. काहीच दिवस चांगले गेले. मात्र, त्याच्या नशिबी पुन्हा अंधकार आला आणि दुर्दैवाने या बालगृहालाच टाळे लागल्याने या अनाथाच्या नशिबी पुन्हा अनाथ होत जिल्हा रुग्णालयात उपचार घेण्याची...
  June 9, 11:50 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात