जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • बीड- येथील चंपावती विद्यालयात शिक्षण घेणारी १३ वर्षीय मुलगी नववी वर्गात अनुत्तीर्ण झाली. काही दिवसांनंतर अनुत्तीर्ण झाल्याच्या मनस्तापाने मंगळवारी (दि. सात) राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. निकिता चंद्रविलास अळसुळे (रा. बार्शी नाका, बीड) असे त्या मुलीचे नाव आहे. परीक्षेचा निकाल दि. १ मे रोजी लागला. त्यात ती नापास झाल्याचे समजले, तरीही आई-वडिलांनी नापास झाल्यामुळे खचून जाऊ नकोस म्हणून तिला दिलासा दिला. मात्र, हताश झालेल्या निकिताने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरी ओढणीने...
  June 8, 03:45 AM
 • बीड- येथील चंपावती विद्यालयात शिक्षण घेणारी १३ वर्षीय मुलगी नववी वर्गात अनुत्तीर्ण झाली. काही दिवसांनंतर अनुत्तीर्ण झाल्याच्या मनस्तापाने मंगळवारी (दि. सात) राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. निकिता चंद्रविलास अळसुळे (रा. बार्शी नाका, बीड) असे त्या मुलीचे नाव आहे. परीक्षेचा निकाल दि. १ मे रोजी लागला. त्यात ती नापास झाल्याचे समजले, तरीही आई-वडिलांनी नापास झाल्यामुळे खचून जाऊ नकोस म्हणून तिला दिलासा दिला. मात्र, हताश झालेल्या निकिताने मंगळवारी दुपारी आपल्या राहत्या घरी ओढणीने...
  June 8, 01:52 AM
 • जालना- सध्या होणा-या पाणीपुरवठ्यातील २५ टक्के पाणी दूषित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.मे महिन्यात जिल्ह्यातील ४ नगरपालिका व ८ तालुक्यांतील मोठ्या गावांतील पाण्याचे नमुने तपासले. १ हजार १२१ पैकी २८७ नमुने दूषित आढळले. हे प्रमाण २५.६० टक्के एवढे होते. या दूषित पाण्यासंदर्भात प्रयोगशाळेने आपला अहवाल जिल्हा आरोग्य अधिका-यांना सादर केला आहे. ज्या गावांमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा केला जातो तेथील पाण्याचे नमुने आरोग्य विभागामार्फत तपासले...
  June 8, 01:47 AM
 • नांदेड- रामदेव बाबा यांच्यावर सरकारने केलेल्या कारवाईने जनसामान्यांत वाईट संदेश गेला आहे. ही कारवाई भारताच्या प्रतिष्ठेला शोभणारी नाही, अशी प्रतिक्रिया देऊन माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी सरकारला घरचाच आहेर दिला आहे. रामदेव बाबा प्रकरणाबद्दल सूर्यकांता पाटील म्हणाल्या, की रामदेव बाबांनी चूक केली. योगासनासाठी परवानगी घेऊन उपोषण सुरू केले. पण सरकारचे ४ ते ५ मंत्री दिवसा त्यांच्याशी वाटाघाटी करतात आणि रात्री दीडच्या सुमारास या पद्धतीने कारवाई केली जाते, असे कोणते...
  June 8, 12:59 AM
 • लातूर- शहरातील औसा रोडवरील मुलींच्या शासकीय वसतिगृहासमोर टाटा सुमोच्या धडकेने नामदेव सुमठाणे (७२ ) हा शेतकरी गंभीर जखमी झाला. सुमठाणे आंबे व डाळिंब विकून झोपले असता, टाटा सुमो (एम एच २६, व्ही ९८०० )च्या चालकाने त्यांच्या अंगावर गाडी घातली. याच वेळी बाजूला भारत गॅसच्या सिलिंडरची (एम एच २४- ७५१८ ) गाडी होती. त्याचा चालकही गंभीर जखमी झाला. सुमोला आग कुणी लावली हे मात्र समजू शकले नाही.
  June 8, 12:43 AM
 • बीड- बीडच्या बाजार पेठेमध्ये शेतकयांकडून मल्लिका बीटी, बीटी-२, कनक-७३५१ या वाणांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मंगळवारी (दि. ७) जुना मोंढा भागातील दोन दुकानांमध्ये पोलिसांसह दंगल नियंत्रक पथकांच्या जवानांच्या बंदोबस्तामध्ये मल्लिका बीटी बियाणांची विक्री करण्यात आली. ८३० मल्लिका सिंगल बीटी एक बॅगेची किंमत ८३० रुपये, तर २७० मल्लिका डबल बीटी एक बॅगेची किंमत ९३० रुपये होती. पो. उपअधीक्षक संभाजी कदम यांनी याठिकाणी भेट दिली. देगलूर : १२ केंद्रांना सीलनांदेड- कृषी केंद्रावर खते व बियाणे मिळत...
  June 8, 12:10 AM
 • परभणी- पुणे व अहमदनगरच्या पोलिसांना हवा असलेल्या दरोडेखोराच्या घरावर परभणी पोलिसांनी छापा मारला. या कारवाईत दोन रिव्हॉल्व्हर व चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. मात्र दरोडेखोर संजूसिंग जुन्नी पसार झाला. शहरातील उड्डाणपुलाखालील वस्तीत राहणारा कुख्यात दरोडेखोर संजूसिंग जुन्नी परभणीत आला होता. संजू घरी येताच त्याच्या पत्नीने कोतवाली पोलिसांनी माहिती दिली. त्याच्या घरातून 2 रिव्हॉल्व्हर व 4 जिवंत काडतुसे जप्त करण्यात पोलिसांना यश आले.
  June 7, 08:02 AM
 • हिंगोली- जागतिक बँकेच्या अर्थसाह्यातून राज्यात राबविण्यात आलेल्या जलस्वराज्य प्रकल्पामध्ये आर्थिक घोटाळे झाले आहेत. ४९ गावांमधील पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या अध्यक्ष व सचिवांकडे रक्कम थकली असून, त्या वसुलीसाठी हिंगोलीतील जलस्वराज्य प्रकल्पाने अध्यक्ष व सचिवांच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ५ वर्षांपासून जलस्वराज्य प्रकल्पाचे काम सुरू आहे. पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था व्हावी, या उद्देशाने या प्रकल्पात १३८ गावांची निवड करण्यात आली. त्यांना...
  June 7, 04:38 AM
 • बीड- शहरातील बॅँक आॅफ इंडियाची शाखा चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (ता. पाच) रात्री घडली. या प्रकरणी शाखा व्यवस्थापक यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. शहरातील जालना रोडवर बॅँक आॅफ इंडियाची शाखा आहे. शनिवारी दैनंदिनीचे काम आटोपून सर्व कर्मचारी बॅँकेस कुलूप लावून घरी गेले. सोमवारी (ता. सहा) सकाळी बॅँकेच्या वेळेत रोखपाल आले असता त्यांना बॅँकेचे शटर, दरवाजाचे कुलूप तुटल्याचे दिसून आले. याची माहिती त्यांनी शाखा व्यवस्थापक सचिन शिंदे...
  June 7, 04:28 AM
 • बीड - वर्षानुवर्षे अनधिकृतपणे पाणी वापरणाया ६,५०० नळजोडण्या अधिकृत करून नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने वर्षभराचा ९९ लाख रुपये दंड वसूल केला आहे. पालिकेच्या कारवाईमुळे अनधिकृतपणे पाणी वापरणायांचे धाबे दणाणले आहे. शहरात एकूण १२ हजार ३५१ अधिकृत नळजोडण्या होत्या. वर्षभरात शहराच्या विविध भागांत पाणी वेळेवर न येणे, कमी दाबाने येणे, लवकर पाणी जाणे अशा अडचणी नागरिकांनी पालिकेत मांडल्या होत्या. त्यामुळे नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी अनधिकृत नळजोडण्यांचा सर्व्हे करण्याच्या...
  June 7, 04:24 AM
 • परभणी - मराठवाडा कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे १०० टक्के पदवीधारक गेल्या आठ वर्षांत नोकरी व रोजगारक्षम ठरले आहेत. भारतातील मोठ्या शहरांबरोबर बँकॉकसारख्या देशात या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचा झेंडा फडकवला आहे. कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाने २००३ ते २००९ या कालावधीतील महाविद्यालयाच्या पदवीधारकांचा अहवाल भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या संचालिका डॉ. मंगला रॉय यांना नुकताच सादर केला. या महाविद्यालयाचे १०० टक्के...
  June 7, 04:19 AM
 • उस्मानाबाद: जिल्ह्यात दोन दिवसांपासून होत असलेल्या मान्सूनपूर्व पावसाने बळीराजा शेतीच्या कामात गुंतला आहे. खत, बियाणे टंचाईचा मागील दोन वर्षांचा अनुभव पाहता यंदा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येक कृषी सेवा केंद्रावर एका शासकीय कर्मचा-याची नेमणूक केली आहे. केंदावरील नियुक्त कर्मचारी विक्रीची स्वतंत्र नोंद घेऊन शिल्लक साठ्याची माहिती प्रशासनाला नियमित देईल. यामुळे जादा दराने खत विक्री थांबू शकेल. कडधान्याचे क्षेत्रवाढीसाठी कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील कडधान्य...
  June 6, 03:31 AM
 • उस्मानाबाद: जिल्ह्यातील ५ साखर कारखान्यांसह ४ नगरपालिकांनी तब्बल ७ कोटी १६ लाख २७ हजार रुपयांची पाणीपट्टी थकविली आहे. मराठवाड्यातील सर्वांत जुन्या तेरणा साखर कारखान्याकडे सर्वाधिक ३ कोटी ९७ लाख ७१३ रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभागाने वसुली मोहीम हाती घेतली असून, थकबाकीपोटी विभागाने उस्मानाबाद पालिकेचा पाणीपुरवठा ख्ांडित केल्यानंतर अन्य पालिका आणि कारखानदारांनी धास्ती घेतली आहे. पाटबंधारे विभागाचे जिल्ह्यात ५ उपविभाग असून, या विभागाची मार्चअखेर कारखाने, नगरपालिका व...
  June 6, 03:26 AM
 • बीड: एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी खाकी लालपरीच्या मदतीला धावली आहे. अवैध वाहतुकीलाही लगाम लावण्यासाठी तिने मनापासून प्रयत्न केले आहेत. अवैध प्रवासी वाहतूक बंद करण्याचे आदेश पोलिस अधीक्षकांनी दिल्याने एका वर्षाच्या काळामध्ये नेहमीच्या उत्पन्नाचा आकडा ओलांडून राज्य परिवहन महामंडळाच्या बीड विभागाने १५ कोटी नऊ लाख ६४ हजारांचे उत्पन्न मिळवले आहे. नव्या ८८ बस: गतवर्षी विभागास ४२१ बसगाड्या होत्या. पोलिस कारवाईमुळे नव्याने ८८ बस वाढल्या. पुन्हा नवीन १५ बसगाड्या आल्या आहेत. अशा एकूण ४५९...
  June 6, 03:24 AM
 • हिंगोली: शिवसेनेचे उपनेते डॉ. अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत हिंगोलीतील बसस्टॅण्डजवळील शिवसेना कार्यालयासमोर शनिवारी शिवशक्ती-भीमशक्ती मेळावा झाला. या मेळाव्यापासून आंबेडकरी जनतेने चार हात दूरच राहणे पसंत केल्याचे चित्र होते.मेळाव्यात शिवसेनेचे खासदार सुभाष वानखेडे, माजी सहकार मंत्री डॉ. जयप्रकाश मुंदडा, माजी आमदार गजानन घुगे, तानाजी मुटकुळे, बाबाराव बांगर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर, युवा मोर्चाचे रामरतन शिंदे यांच्यासह वसंत मुळे, मराठवाडा सचिव दिवाकर माने आणि...
  June 6, 03:16 AM
 • लातूर: शहराला नगरपालिका पाणीपुरवठा करेल, त्याचा सगळा खर्चही पालिका करेल आणि यंत्रणेच्या देखभाल-दुरुस्तीसाठी प्रतिहजार लिटरमागे कंपनीला तीन रुपये देण्यात येतील, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. याला विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेतला असून कंपनीशी झालेला करार रद्द केल्यानंतरच पुढचा निर्णय घेऊ, असा त्यांचा पवित्रा आहे. दरम्यान, उद्भवलेल्या राड्यात एका नगरसेवकाला निलंबित करण्यात आले. पाणीपुरवठा योजनेच्या खासगीकरणात कंपनीला फायदा करून दिला जात असल्याच्या विरोधी...
  June 6, 03:15 AM
 • परभणी: परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वारसदारांचे लाँचिंग करण्याचा प्रयत्न सर्वच पक्षाच्या नेत्यांनी चालवला आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या भाऊगर्दीनंतर चांगल्या उमेदवारांना आपल्या पॅनेलमध्ये आणण्यासाठी नेत्यांनी कंबर कसली असली, तरी राजकीय पक्षांचे समीकरण जुळताना दिसत नाही. काँग्रेस व शिवसेनेमध्ये हाडवैर असताना केवळ राजकीय स्वार्थासाठी हे दोन्ही पक्ष मागील निवडणुकीत एकत्र आले आणि सत्ता मिळवली होती. या दोन्ही पक्षांना शह देण्यासाठी...
  June 6, 03:13 AM
 • बीड: अपंगांना कार्यालयात येण्या-जाण्यासाठी रॅँप असणे गरजेचे आहे. मात्र अनेक कार्यालयांत रॅँपची सुविधा नाही आणि ज्या ठिकाणी रॅँप आहेत त्या ठिकाणी अडथळ्यांमुळे अपंगांना ते वापरता येत नाहीत. अपंग आपल्या हाताने पायया चढतात व खाली उतरताना दिसतात. हा प्रकार अधिकारी, कर्मचारी सर्व बघतात पण त्यांना कीवही येत नाही, अशी परिस्थिती आहे. अपंगांसाठी लाखो रुपये खर्च करून शासनाने प्रत्येक कार्यालयात स्वच्छतागृह बांधलेले आहेत. परंतु त्या स्वच्छतागृहांना हमखास कुलूप लावलेले असते म्हणून तेही...
  June 6, 03:04 AM
 • नांदेड: २००८ मध्ये शहरात साज-या झालेल्या गुरू गंथसाहिब त्रिशताब्दी सोहळ्याच्या कार्यक्रमाने शहराचा चेहरामोहरा बदलला. नवे रस्ते झाले, जुने रस्ते दुपदरी-चारपदरी झाले, पण शहरातील वाहतूक मात्र सुधारली नाही. आजही शहराच्या विविध भागांत ट्रॅफिक जामची डोकेदुखी कायम आहे. ३८ रस्ते या कार्यक्रमाच्या निमित्ताने तयार झाले. शिवाजीनगरचा उड्डाणपूल आणि हिंगोली गेटला चारपदरी नवा उड्डाणपूल बांधण्यात आला. रिजनल वर्कशॉप ते हबीब टॉकीज हा रस्ता नव्याने चारपदरी करण्यात आला. रस्त्यांच्या मूलभूत सुविधांत...
  June 6, 01:26 AM
 • परभणी: शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करणा-या वाहनांसाठी राज्य शासनाने नियमावली तयार केली आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून या धोरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिका-यांना देण्यात आले आहे. तीनचाकी रिक्षांसह इतर वाहनांतून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक आता यापुढे बंद होणार आहे. या आदेशामुळे शहरातील २५० रिक्षाचालकांवर बेरोजगारीची वेळ येणार आहे. यावर तोडगा काढण्यासाठी परभणीच्या बी. रघुनाथ हॉलमध्ये पालक संघटना, मुख्याध्यापक व वाहतूक संघटनेच्या...
  June 6, 01:22 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात