Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • बीड- पाटेगाव येथील (ता.बीड) दिगंबर कदम (३२) यांनी बुधवारी घरात गळफास घेत आत्महत्या केली. त्यांच्या खिशातील चिठ्ठीत मराठा अारक्षणासाठी आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. कांबी (ता. गेवराई) येथील एकनाथ सुखदेव पैठणे (४५) यांनी बुधवारी सायंकाळी विष घेतले. गुरुवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
  August 10, 06:04 AM
 • कन्नड - मराठा आरक्षणासाठी कन्नड तालुक्यातील मुंदवाडी गावात रवींद्र साहेबराव जाधव (वय 25) या युवकाने गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. मात्र, शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेत त्याचा गळफास कापला व त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले. प्रत्यक्षदर्शी रामेश्वर घानवत यांनी दिलेल्या माहिती नुसार, रवींद्रला आजच्या मराठा आंदोलनात सहभागी व्हायचे होते. मात्र घरच्यांनी त्याला विरोध केला होता. खूप प्रयत्न करूनही...
  August 9, 06:56 PM
 • लातूर- मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या बंदला गुरूवारी लातूर जिल्ह्यात हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक सरकारी आणि खासगी गाड्यांची तोडफोड केली. लातूर शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख मार्गांवरील मुख्य चौकांमध्ये ठिय्या आंदोलन करतानाच आंदोलकांनी जुने टायर्स जाळले. मराठा क्रांती मोर्चाने शांततेत आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु गुरूवारी पहाटेपासूनच सुरू झालेल्या या आंदोलनावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. सकाळी सहा वाजल्यापासूनच आंदोलनाला सुरूवात झाली. लातूर - बार्शी...
  August 9, 06:16 PM
 • बीड- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सुरु झालेले आत्महत्यांचे सत्र कायम असून गत चोवीस तासांत दोन जणांनी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील पाटेगावमध्ये 32 वर्षीय तरुणाने तर गेवराई तालुक्यातील कांबीत 45 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केली. बीड तालुक्यातील पाटेगाव येथील दिगांबर माणिक कदम (वय-32) हा अल्पभूधारक शेतकरी असून बुधवारी आई- वडील व पत्नी शेतात होते. सायंकाळी घरात आडूला दोरीने गळफास घेऊन दिगंबरने आत्महत्या केली. रात्री कुटुंबीय शेतातून परतल्यावर त्यांना दिगंबरचा लटकलेला मृतदेह...
  August 9, 05:38 PM
 • लातूर- लातूर तालुक्यातील माटेफळ येथील एका शिक्षकाने बुधवारी कर्जाचा डोंगर आणि मराठा आरक्षण मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माटेफळ येथील रमेश ज्ञानोबा पाटील (५०) हे निवळी (ता. लातूर) येथील खासगी शाळेत शिक्षक होते. त्यांनी बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाइकांनी सांगितले की, त्यांच्याकडे एक चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये माझी मुलगी एमएस्सीला विद्यापीठातून दुसरी व लातूर जिल्ह्यातून पहिली आली आहे. पण आरक्षण नसल्यामुळे माझ्या तिन्ही मुलांना...
  August 9, 06:04 AM
 • जालना- बहिणीला तिचा पती त्रास देतो म्हणून मेव्हण्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना १८ जून रोजी गोकुळवाडी (ता. जाफराबाद) येथे घडली. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी बहीण-भावाने संगनमत करून मृतदेह विहिरीत टाकला. यानंतर जाफराबाद पोलिस ठाण्यात पतीचा कुणी तरी खून केल्याची तक्रारही देण्यात आली होती. यात पोलिसांनी सखोल तपास केला असता फिर्यादी व तिच्या भावाने हा खून केल्याची कबुली दिली. यात संशयित आरोपी पत्नी पूनमबाई उदयसिंह ब्रह्मनाथ (३५) हिच्यासह तिच्या अल्पवयीन भावाला पोलिसांनी...
  August 8, 12:51 PM
 • परळी वैजनाथ- मराठा आरक्षण व मेगा भरती स्थगिती या प्रमुख मुद्द्यावर परळी येथे गेल्या २१ दिवसांपासून सातत्याने सुरू झालेल्या मराठा क्रांती मूक मोर्चाच्या आंदोलनाला अखेर मंगळवारी अर्ध विराम मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या झालेल्या सुनावणीवेळी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिप्पणी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदर राखत परळीतील हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व मागण्या...
  August 8, 07:30 AM
 • हिंगोली- तीन महिन्यांपूर्वी हिंगोली येथील आजम कॉलनी भागातून अपहरण करण्यात आलेल्या सरफराज खान या सात वर्षीय मुलाचा शोध घेण्यासाठी भारतातील सर्व चाइल्ड लाईन संस्था, राज्यभरातील सर्व पोलिस ठाण्यांना माहिती देण्यात आली. पण त्याचा थांगपत्ता लागला नव्हता. अपहरण झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी तो शेजारच्या परभणी जिल्ह्यात सापडला. पण पोलिसांची यंत्रणा आणि बालगृहातील समन्वयाअभावी तब्बल तीन महिन्यांनंतर त्याची आईवडिलांशी भेट झाली. एवढे दिवस तो अनाथाचे जिणे जगला. मुंबई येथील बालगृहातून त्याला...
  August 8, 07:08 AM
 • वडीगाेद्री- तोंडाला काळा मास्क, कपाळावर पट्टीला जोडलेला टॉर्च आणि हातात धारदार शस्त्रे असलेल्या सात दरोडेखोरांनी मंगळवारी मध्यरात्री वडीगोद्री शिवारात धुमाकूळ घातला. यात दोन ठिकाणी दरोडा घालून जवळपास दोन लाखांचा ऐवज लुटून नेला. घटनेची माहिती मिळताच चारचाकी वाहनातून पळून जाणाऱ्या दरोडेखोरांचा पोलिसांनी पाठलाग केला. या वेळी पीएसआय वारे यांनी वाहन चालवतानाच दरोडेखोरांच्या दिशेने दोन वेळा गोळीबार केला. मात्र दोन्ही वेळा नेम चुकला. तिसऱ्यांदा गोळी झाडण्याचा प्रयत्न केला असता...
  August 8, 06:39 AM
 • परळी वैजनाथ- मराठा आरक्षण व मेगा भरती स्थगिती या प्रमुख मुद्द्यावर परळी येथे गेल्या 21 दिवसांपासून सुरू झालेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला अखेर आज ( दि. 7) अर्धविराम मिळाला आहे. उच्च न्यायालयामध्ये मराठा आरक्षणाच्या झालेल्या सुनावणीवेळी मराठा आरक्षण न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणे योग्य नाही, अशी टिपण्णी मुंबई उच्च न्यायालयाने केली आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदर राखत परळीतील हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे. मात्र 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व मागण्या मान्य नाही झाल्या तर 1...
  August 7, 08:10 PM
 • बीड- पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका साथ सबका विकास अशी घोषणा देत आहेत. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणतात, नोकऱ्याच नाही तर आरक्षणाचा फायदा काय ? त्यापुढे जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, नोव्हेंबरपर्यंत आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यावरून एवढेच स्पष्ट होतं की भाजप सरकारमध्ये नेमकं खरं कोण बोलतोय आणि खोटे कोण ? आता समाजबांधवांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे, अशी टीका करत इतरांचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण द्या, अशी मराठा समाजाची मागणी नाही....
  August 7, 07:43 AM
 • कळंब- पावसाअभावी पिकाचे नुकसान होत असल्याने बरमाचीवाडी(ता.कळंब) येथील एका तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेली चिठ्ठी सोशल मीडियावरून व्हायरल झाली असली तरी पोलिसांनी मात्र अशी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी घटनास्थळी मिळाली नसल्याचे सांगितले. त्यामुळे चिठ्ठीबाबत संभ्रम निर्माण झाला होता. महादेव बाराखोते (२३) याची गौर शिवार येथील गट नंबर ४३५ व बरमाचीवाडी येथील शिवारात गट नंबर १२१, १२२ अशा तिन्ही गटामध्ये एकूण ३, हेक्टर २० आर क्षेत्र होते. या पूर्ण...
  August 7, 07:37 AM
 • नांदेड- काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी पुन्हा राज्याच्या राजकारणात येण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे. नांदेड दक्षिण विधान सभा मतदार संघातून आपण निवडणूक लढवावी अशी लोकांची इच्छा आहे, त्याचा विचार केलाच पाहिजे असे सांगत त्यांनी मन की बात बोलून दाखवली. मात्र त्यांच्या दक्षिणास्त्राने या मतदारसंघातून उत्सुक असलेल्यांत खळबळ उडाली आहे. चव्हाणांना राजकारणाचा वारसा स्व. शंकरराव चव्हाणांकडून मिळाला असला तरी त्यांनी राज्याच्या राजकारणात...
  August 7, 07:27 AM
 • परभणी - शहरातील स्वातंत्र्यसैनिक कॉलनीत नववीच्या विद्यार्थ्याने आज (सोमवारी) दुपारी आपल्या राहत्या घरी छताला गळफास घेवून आत्महत्या केली. अर्जुन गणेशराव गिते (14) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. अर्जुन गीते हा शहरातील नामांकित शाळेत इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत होता. नुकत्याच झालेल्या एका परीक्षेत गणीत या विषयात कमी गुण मिळाल्यामुळे तो नाराज झाला होता. त्यामुळे आलेल्या नैराश्यातूनच त्याने सोमवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारा सुमारास राहत्या घरी गळफास घेतला. याप्रकरणी नवा मोंढा पोलिस...
  August 6, 07:29 PM
 • जालना- गुप्तधनाच्या लालसेने दोघा भावांनी सकून पाहून देवाचा कौल घेतला. त्यानंतर राहत्या घरातच जवळपास तीन तास खोदकाम केल्यानंतर चार फूट लांब, अडीच फूट रुंद आणि तीन फूट खोलीचे दोन खड्डे खोदले. मात्र खबऱ्याकडून माहिती मिळताच अवघ्या १५ मिनिटांत पोलिस तेथे पोहोचले आणि खोदकाम सुरू असतानाच खोदकामाचे साहित्य व जादूटोण्याच्या वस्तूंसह दोघांना अटक केली. शिवाजी देवराव अवघड (४२) व ज्ञानेश्वर देवराव अवघड (३९) अशी आरोपींची नावे अाहेत. शहरातील कपूर गल्ली भागात ही कारवाई करण्यात आली. जुना जालना...
  August 6, 09:10 AM
 • परभणी - जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे या तरुणाने शेतात स्वतःला पेटवून घेतले. हे करण्यापूर्वी त्याने फेसबूकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आज स्वतःचे बलिदान देत आहे. मला आज खूप आनंद होत आहे की, मी आपल्या समाजासाठी काही करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आजवर माला देशासाठी काही करता आले नाही, पण मी मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतःचे बलिदान देत असल्याचे...
  August 5, 06:57 PM
 • परभणी - शहरातील धार रोडवरील मदिनानगरात उसनवारीच्या पैशाच्या कारणावरून शनिवारी(दि.४) पहाटे साडेतीनच्या सुमारास एका महिलेचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल झाला असून आरोपी मात्र फरार आहेत. सुनीता लक्ष्मण धुमाळ(३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. धार रस्त्यावर कालव्यानजीक असलेल्या मदिनानगर पाटीजवळ वास्तव्यास असलेल्या सुनीता लक्ष्मण धुमाळ या महिलेकडे अजहर कुरेशी यांचे ६० हजार रुपये उसनवारीने दिलेले होते. या पैशाची मागणी तो सातत्याने सुनीताकडे करीत...
  August 5, 10:36 AM
 • नांदेड - शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान शहरातील साईबाबा मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. तिघेही शहरातील शिवनगरचे रहिवासी होते. नाईकनगरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थी शुभम संजय जगताप (१३),शिवनगर येथील गुरुनान विद्यालयाचा विद्यार्थी शुभम गणेश जाधव (१०) आणि दुर्गा कॉलनी येथील इंदिरा गांधी शाळेचा विद्यार्थी आनंद मारुती केंद्रे (१४) हे तीन जण दुपारी शाळा सुटल्यानंतर एक वाजेदरम्यान गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले. या तिघांनाही पोहता येत...
  August 5, 10:06 AM
 • येडशी- पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये १० जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पुणे-लातूर राज्य मार्गावर येडशीपासून दोन किमीवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाला. अपघातापूर्वी येडशीमध्ये ट्रॅव्हल्सचा चालक बदलला होता. त्यानंतर १० मिनिटांतच हा अपघात झाला. मुंबईहून लातूरकडे प्लास्टिक घेऊन निघालेला ट्रक इंधन...
  August 4, 07:19 AM
 • मंठा/तीर्थपुरी- जालना जिल्ह्यातील भायगव्हाण आणि लिंबेवडगाव येथील दोन जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. नामदेव चंद्रभान गरड (३०, भायगव्हाण ता. घनसावंगी), ज्ञानेश्वर देविदास खरात (१८, लिंबेवडगाव ता. मंठा) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. या दोन्ही तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पाळले जात आहेत....
  August 3, 08:14 AM
 
जाहिरात

RECOMMENDED