Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • परभणी - जिल्ह्यातील सेलु तालुक्यातील डीग्रस वाडीत राहणाऱ्या अंनत लेवडे या तरुणाने शेतात स्वतःला पेटवून घेतले. हे करण्यापूर्वी त्याने फेसबूकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने एक पोस्ट टाकली होती. त्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मी आज स्वतःचे बलिदान देत आहे. मला आज खूप आनंद होत आहे की, मी आपल्या समाजासाठी काही करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. आजवर माला देशासाठी काही करता आले नाही, पण मी मागास मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी स्वतःचे बलिदान देत असल्याचे...
  August 5, 06:57 PM
 • परभणी - शहरातील धार रोडवरील मदिनानगरात उसनवारीच्या पैशाच्या कारणावरून शनिवारी(दि.४) पहाटे साडेतीनच्या सुमारास एका महिलेचा निर्घृण खून झाला. याप्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात खुनाचा दाखल झाला असून आरोपी मात्र फरार आहेत. सुनीता लक्ष्मण धुमाळ(३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. धार रस्त्यावर कालव्यानजीक असलेल्या मदिनानगर पाटीजवळ वास्तव्यास असलेल्या सुनीता लक्ष्मण धुमाळ या महिलेकडे अजहर कुरेशी यांचे ६० हजार रुपये उसनवारीने दिलेले होते. या पैशाची मागणी तो सातत्याने सुनीताकडे करीत...
  August 5, 10:36 AM
 • नांदेड - शनिवारी दुपारी एक ते दोन वाजेदरम्यान शहरातील साईबाबा मंदिराजवळ गोदावरी नदीच्या पात्रात बुडून तीन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला. तिघेही शहरातील शिवनगरचे रहिवासी होते. नाईकनगरातील महात्मा फुले शाळेतील विद्यार्थी शुभम संजय जगताप (१३),शिवनगर येथील गुरुनान विद्यालयाचा विद्यार्थी शुभम गणेश जाधव (१०) आणि दुर्गा कॉलनी येथील इंदिरा गांधी शाळेचा विद्यार्थी आनंद मारुती केंद्रे (१४) हे तीन जण दुपारी शाळा सुटल्यानंतर एक वाजेदरम्यान गोदावरी नदीवर पोहण्यासाठी गेले. या तिघांनाही पोहता येत...
  August 5, 10:06 AM
 • येडशी- पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसने रस्त्यालगत थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात २२ प्रवासी जखमी झाले. यामध्ये १० जण अत्यवस्थ असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पुणे-लातूर राज्य मार्गावर येडशीपासून दोन किमीवर शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाला. अपघातापूर्वी येडशीमध्ये ट्रॅव्हल्सचा चालक बदलला होता. त्यानंतर १० मिनिटांतच हा अपघात झाला. मुंबईहून लातूरकडे प्लास्टिक घेऊन निघालेला ट्रक इंधन...
  August 4, 07:19 AM
 • मंठा/तीर्थपुरी- जालना जिल्ह्यातील भायगव्हाण आणि लिंबेवडगाव येथील दोन जणांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी घडली. नामदेव चंद्रभान गरड (३०, भायगव्हाण ता. घनसावंगी), ज्ञानेश्वर देविदास खरात (१८, लिंबेवडगाव ता. मंठा) अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. या दोन्ही तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर राज्यभरात मूक मोर्चे, ठोक मोर्चे आणि बंद पाळले जात आहेत....
  August 3, 08:14 AM
 • उस्मानाबाद- घरात कोणी नसताना मध्यरात्रीच्या सुमारास १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ यांनी जन्मठेप व १ लाख ६ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी मार्च २०१८ मध्ये घडलेल्या या घटनेप्रकरणी तातडीने दोषारोपपत्र दाखल केल्याने घटनेनंतर अवघ्या चार महिन्यांत निकाल लागल्याने न्यायव्यवस्था व पोलिसांचे कौतुक होत आहे. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता सचिन सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार तुळजापूर येथील...
  August 3, 08:11 AM
 • कळंब- मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे आपल्या भावाला आणि स्वत:ला नोकरी मिळणार नाही. मग शिकून तरी काय उपयोग? या नैराश्यातून विष घेतलेल्या देवळाली येथील तृष्णा तानाजी माने या तरुणीचे उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी निधन झाले. २९ जुलै रोजी तिने तणनाशक प्राशन केले होते. देवळाली येथे तृष्णावर अंत्यसंस्कार करण्यात अाले. तिच्या कुटुंबीयांना ५० लाखांची अार्थिक मदत करावी, तिच्या भावाला शासकीय नोकरी द्यावी, या मागणीचे निवेदन मराठा समाजातर्फे तहसीलदार अशाेक नांदलगावकर यांना देण्यात अाले....
  August 3, 07:15 AM
 • परळी- मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय तसेच मेगा नोकरभरती थांबवण्यासाठी राज्य सरकारला ७ ऑगस्टची डेडलाईन मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या बैठकीत देण्यात आली आहे. रस्त्यावर सुरू असलेली आंदोलने थांबवून आता ९ ऑगस्टपासून राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मराठा समाजाला आरक्षण द्या अन्यथा मेगा नोकर भरती रद्द करा, या मागणीसाठी परळी येथील तहसील कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने १९ जुलैपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या १६ दिवशी...
  August 3, 06:48 AM
 • बीड- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केज तालुक्यातील विडा येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेला काही तास उलटत नाहीत तोच बीड शहरातील माजी नगरसेवक तथा शिवसंग्रामचे कार्यकर्ते दत्ता जाधव यांनी आपण मराठा आरक्षणासाठी जीव देत असल्याची फेसबुक पोस्ट केली. यानंतर पोलिस अधिकारी व गायकवाड यांच्या मित्रांनी रात्री अकरा वाजता त्यांचा शोध घेतला. त्यांची समजूत काढली. पोलिसांनीही प्रतिबंधात्मक कारवाई करून रात्रभर त्यांना शहर ठाण्याच्या पोलिस कोठडीत ठेवले होते. शहरातील पेठ बीड...
  August 2, 10:09 AM
 • जालना- दुचाकी चोरल्यानंतर त्या दुचाकीवर पोलिस असे नाव टाकून पुन्हा दुसरी दुचाकी चोरण्यास सज्ज राहणाऱ्या एका चोरट्यास पोलिसांनी गजाआड केली. दुचाकीवर पोलिस असे नाव कोरल्याने त्याच्याकडे कोणीही संशयाने पाहत नव्हते. याचाच फायदा घेऊन या चोरट्याने दुचाकी चोरण्याचा सपाटा लावला होता. या चोरट्याच्या ताब्यातून ४ लाखांच्या नऊ नऊ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. विनोदसिंग सतलाल राणा (देहेडकरवाडी, जालना) असे चोरट्याचे नाव आहे. त्याच्याकडून अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी...
  August 2, 06:34 AM
 • तुळजापूर- माजी नगरसेवक नारायणराजे गवळी (४५) यांनी राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.३०) सकाळी ११.३० च्या सुमारास उघडकीस आली आहे. सायंकाळी उशिरा शोकाकुल वातावरणात गवळी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान गवळी यांच्या अकाली निधनाने शहरावर शोककळा पसरली. दररोज सकाळी लवकर उठणारे नारायणराजे गवळी सोमवारी सकाळी खूप उशिरापर्यंत उठलेच नाहीत. दार वाजवूनही प्रतिसाद नसल्याने तसेच ते फोनही उचलत नसल्याने त्यांच्या पत्नी भारती गवळी यांनी...
  July 31, 07:49 AM
 • परभणी- मुख्य रस्त्यावर शेकडोंचा जमाव धावून येत असताना या जमावाला रोखण्यासाठी निघालेल्या पोलिसांच्या जीप चालकाच्या हातावर काठी मारल्याने रस्त्याखाली गेलेली जीप थेट गाळात रुतली. जमावाची आक्रमकता व त्यांच्या जवळ असलेले पेट्रोल, रॉकेल आदी साहित्यामुळे अशाही जखमी स्थितीत फसलेली जीप रिव्हर्समध्ये काढण्याचा आटोकाट केलेला प्रयत्न यशस्वी ठरला अन्यथा कर्मचाऱ्यांसह जीप जाळून टाकली असती, अशी आपबीती जीपचालक जनार्दन चाटे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. परभणी-जिंतूर रस्त्यावर टाकळी...
  July 30, 07:04 AM
 • मुंबई- सरकारला सर्व मागण्या माहिती अाहेत. त्यामुळे अाता अाम्ही चर्चेस येणार नाही, सरकारनेच तातडीने निर्णय घ्यावा, अशी अाक्रमक भूमिका एकीकडे सकल मराठा समाज संघटनेने घेतलेली असताना रविवारी खासदार नारायण राणे, अामदार नितेश राणे यांच्या पुढाकारातून मराठा अांदाेलनातील एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. या शिष्टमंडळातील अाठ सदस्यांची नावे ना सरकारने जाहीर केली ना राणेंनी. सुरक्षेच्या कारणास्तव ती गाेपनीय ठेवली जात असल्याचेही सांगण्यात अाले. मात्र...
  July 30, 06:17 AM
 • औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी बारा दिवसांपासून परळी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने ठिय्या आंदोलन सुरू असून रविवारी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी परळीत दुपारी येऊन आंदोलनस्थळी भेट दिली. मुख्यमंत्र्यांकडून मागण्यांसंदर्भात आलेल्या संदेश पत्राचे आंदोलकांत वाचन करून ते आंदोलकांना सुर्पूद केले. दोन वेळा चर्चा करूनही हे आंदोलन मागे घेण्यासाठी शासनाच्या वतीने त्यांनी विनंती केली, परंतु तोडगा निघाला नाही. मागण्या मान्य होईपर्यंत परळीतून...
  July 30, 06:09 AM
 • परभणी - मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू झालेल्या आंदोलनादरम्यान गुरुवारी(दि.२९) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या चक्का जाम आंदोलनाला शनिवारी(दि.२९) हिंसक वळण लागले. परभणी-जिंतूर रस्त्यावर टाकळी कुंभकर्ण फाट्यावर अनियंत्रित झालेल्या जमावाने पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यात १३ पोलिस कर्मचारी जखमी झाले. जमाव नियंत्रणाबाहेर असल्याचे पाहून पोलिसांनी हवेत गोळीबाराच्या अनेक फैरी झाडल्या. तर परभणी...
  July 29, 07:55 AM
 • वैजापूर - कार चालकाला जिवे मारण्याची धमकी देऊन कारसह मोबाइल संच सिनेस्टाइलने पळवण्याचा थरारक प्रकार नागपूर - मुंबई हायवे रस्त्यावरील करंजगाव शिवारात शुक्रवारी घडली. दरम्यान याच रस्त्यावर यापूर्वी वाहन चालकांना धमकावून वाहने चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. खाचखळग्याच्या दुरवस्थेच्या फेऱ्यात सापडलेल्या रस्त्यावरून धावती वाहने पळवण्याच्या प्रकारामुळे वाहनधारकांत भीतीची दहशत निर्माण झाली आहे. तालुक्यातील करंजगाव शिवारात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास नागपूर...
  July 29, 07:48 AM
 • नांदेड -मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने भावनिक पत्र लिहून एका व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) येथील वारकरी सांप्रदायिक प्रल्हादराव कल्याणकर गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पत्र लिहून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपळगाव (महादेव) येथील...
  July 28, 11:21 AM
 • परभणी- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी वाडीदमई(ता.परभणी) येथील एका तरूणाने शुक्रवारी (दि.27) सकाळी आठच्या सुमारास विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. रामेश्वर मुरलीधर गायकवाड(वय17) असे या तरूणाचे नाव आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मागील आठ दिवसांपासून जिल्हाभरात तीव्र आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात तरूण व युवकांची संख्या लक्षणीय आहे. तालुक्यातील वाडीदमई येथील रामेश्वर गायकवाड हा देखील या आंदोलनात सहभागी झालेला असून त्याने समाजाला आरक्षण देण्यात यावे, या...
  July 27, 07:41 PM
 • हिंगोली - कळमनुरी तालुक्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आंदोलकांनी रस्त्यावर टायर जाळून सरकारचा निषेध केला.दातीपाटीवर संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिला. यावेळी रास्तारोको आंदोलनादरम्यान आंदोलकांना संबोधित करण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादीचे आमदार रामराव वडकुते यांना संतप्त जमावाने धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला. जमाव भडकल्यामुळे अखेर आमदार वडकुते यांनी आंदोलनस्थळावरून काढता पाय घेतला. तर दुसरीकडे साळवा पाटीवरही बाभळीचे झाड हिंगोली-नांदेड महामार्गावर आडवे पाडून आंदोलकांनी...
  July 27, 05:23 PM
 • शिर्डी - श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज (गुरूवारी) उत्साही वातावरणात सुरुवात झाली. श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई व फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधुन घेतले. आज उत्सवाच्या प्रथम दिवशी सकाळी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्यांची पत्नी सौ.नलिनी हावरे यांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. पहाटे ५.०० वाजता श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची...
  July 27, 02:29 PM
 
जाहिरात

RECOMMENDED