जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Marathwada >> Other Marathwada

Other Marathwada News

 • केज/नांदूरघाट-चिवडा आणि करंज्या खाल्ल्याने मळमळ, उलट्या व जुलाबचा त्रास होऊ लागल्याने योगेश्वरी वसतिगृहातील २१ विद्यार्थ्यांना प्रथम नांदूरघाट येथील ग्रामीण रुग्णालयात व नंतर बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार बुधवारी रात्री ११ वाजता घडला. पिट्टी घाट येथील तांबडे वस्तीवरील योगेश्वरी वसतिगृहात जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांची १७० मुले असून वसतिगृह चालकाच्या शाळेतच शिक्षण घेतात. वसतिगृहातील काही मुलांना त्यांच्या आईवडिलांनी चिवडा आणि करंज्या सोबत दिल्या...
  July 5, 07:41 AM
 • नांदेड - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात भूमी,जल, वन, प्राणी, ऊर्जा इत्यादी नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन पर्यटन केंद्र उभारले जात आहे. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या पुढाकारातून जोमाने कामही सुरू आहे. मराठवाडा नेहमी दुष्काळाने होरपळत आहे. या दुष्काळी भागात गाव पातळीवर जल व्यवस्थापन, वनाचे आच्छादन केल्याशिवाय शाश्वत विकास शक्य नाही. हे करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकाेनातून विद्यापीठ परिसरामध्ये मृद व जलसंधारण कामांचे उद्घाटन दि.१४ मे रोजी अनुराधा पौडवाल,...
  July 5, 07:34 AM
 • पिंपळगाव रेणुकाई /शेलूद - भोकरदन तालुक्यातील धामना या धरणाच्या सांडव्याला मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे धरण फुटण्याची भीतीही व्यक्त होत आहे. या धरणात सध्या ९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. सांडवा फुटल्यास किमान ८ दलघमी पाणी सांडव्यातून बाहेर जाण्याची शक्यता आहे. २००३ मध्येही या सांडव्याला गळती लागली होती. मात्र, दुरुस्ती झाली नसल्याने यंदाचा धोका अधिक वाढला आहे. परिणामी सात गावांतील ३३ हजार ६३२ ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून भोकरदन तालुक्यात सुरू असलेल्या...
  July 4, 09:33 AM
 • नांदेड - शेतात ट्रॅक्टरद्वारे मशागतीची काम करत असताना लोंबकळत असलेली विजेची तार अचानक ट्रॅक्टरवर पडल्याने ट्रॅक्टर चालक शेतकरी तारेला चिकटला. त्याचा जीव वाचवण्यासाठी गेलेला दुसरा भाऊही तारेला चिकटला. या घटनेत दाेघेही सख्खे भाऊ असलेले तरुण शेतकरी जागीच मृत्युमुखी पडले. ही घटना नांदेड तालुक्यातील भांडेगाव बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी ८ वाजेदरम्यान घडली. पाटील कुटुंबातील तीन भावांपैकी दोन भाऊ शेतात राबतात. रमेश सदाशिव पाटील (३०) व मंगेश सदाशिव पाटील (२७) हे दोघे भाऊ नेहमीप्रमाणे सकाळी...
  July 3, 09:03 AM
 • नांदेड -काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सध्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी भोकर विधानसभा मतदारसंघात दौरे वाढवत कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात व्यग्र झाले. भोकर हा चव्हाण कुटुंबीयांचा पारंपरिक मतदारसंघ आहे. स्व. शंकरराव चव्हाण यांनी याच मतदारसंघातून विधानसभेवर प्रतिनिधित्व केले. राज्याचे ते दोनदा मुख्यमंत्री झाले. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र अशोक चव्हाणांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले....
  July 2, 09:53 AM
 • कळंब -दुष्काळामुळे बैलजोडी विकली. मात्र आता पेरणीसाठी पैसे नसल्यामुळे चक्क मंगरूळ येथील शेतकरी कुटुंबाने स्वत: नांगराला जुंपून घेत सोयाबीन पेरणी चालू केली आहे. मुलीचे लग्न करण्यासाठी या कुटुंबाला बैलजोडी विकावी लागली. आता पेरणीसाठी या कुटुंबाला बैलासारखे राबावे लागत आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांची काय आवस्था झाली आहे, याचे ही विदारक चित्र यावरून स्पष्ट होते. मागील चार-पाच वर्षांपासून अल्प पावसामुळे शेतकरी हैराण आहे. पाऊस नसल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी करपून गेली आहेत....
  July 2, 09:47 AM
 • बीड -विवाहित शिक्षिकेस नवऱ्याला घटस्फोट देऊन आपल्याशी लग्न करण्याचा आग्रह केल्यानंतर शिक्षिकेने नकार दिला. यानंतर तिचे बनावट फेसबुक अकाउंट उघडून त्यावर बदनामीकारक मजकूर पोस्ट करुन पुन्हा शिक्षिकेच्या वडिलांना, भावाला फोनवरून धमक्या दिल्याप्रकरणी तरुणाविरोधात माजलगाव शहर ठाण्यात विनयभंग व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पीडित शिक्षिका शहरातील एका इंग्रजी शाळेत कार्यरत असताना त्याच शाळेत वर्षभरापूर्वी विशाल मारोती दवणे(रा. पूर्णा, ता. परभणी) हा क्रीडा...
  July 2, 09:45 AM
 • बीड -पाचवीच्या इंग्रजीच्या पुस्तकातील अाॅलीवर फाईंडस् अ हाेम या धड्याची कॉपी करत एका विद्यार्थ्याने चक्क वास्तव जीवनात तो धडाच उतरवण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांंचे धाबे दणाणले आहेत. शाळेत खूप खोड्या करत असल्याने शिक्षकांनी पालकांना बोलावण्यास सांगितल्याने त्यातून बचावासाठी मुलाने हा बनाव केला होता. ब्रिटीश कादंबरी लेखक चार्ल्स बिकेन्स यांच्या कादंबरीतून एक उतारा घेत हा धडा पाचवीच्या इंग्रजी विषयाच्या पुस्तकात घेण्यात आला आहे. अशा प्रकारचा धडा मुलांना...
  July 2, 08:17 AM
 • श्रीक्षेत्र राजूर-देवदर्शनासाठी अालेल्या नववधूने चारचाकीत बसून पोबारा केल्याची घटना रविवारी दुपारी २.३० वाजता भोकरदन तालुक्यातील श्रीक्षेत्र राजूर येथे घडली. महादेवी बसवेश्वर स्वामी (शिवाजीनगर, नांदेड) असे या नववधूचे नाव असून ती चारचाकीत निघून गेल्याची तक्रार पती सुधीर रेणुकादास जोशी (३५, आडगाव खुर्द, जि. औरंगाबाद) यांनी राजूर पोलिस चौकीत दिली. यावरून पोलिसांनी जाधव नामक व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. सुधीर जोशी हे २६ जून रोजी महादेवीसोबत विवाहबंधनात अडकले. दरम्यान,...
  July 1, 09:05 AM
 • जालना -जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा घसरला असून इंग्रजी तसेच खासगी शाळेतच मुलांना पालक प्रवेशित करत असल्याचे चित्र आहे. मात्र, याला एकूण मंठा तालुकाच अपवाद ठरला आहे. या तालुक्यातील श्रीरामतांडा या सरकारी शाळेत तर प्रवेश फुल्ल असा बोर्ड लावण्याची वेळ आली असून मागील तीन वर्षांपासून पालक प्रवेशाच्या वेटिंगवर आहेत. या शाळेसह इतर तीन शाळांची स्थिती अशी झाल्याने या शाळांनी जिल्हा परिषदेचे नाव उंचावले आहे. आजही श्रीरामतांडा शाळेतील वेटिंग लिस्ट ही १५० वर आहे. या शाळेपाठाेपाठ १५ शाळांतही...
  July 1, 09:01 AM
 • परळी -सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या हातचलाखी करून सराफा दुकानातून २३ हजार रुपयांची सोनसाखळी लंपास करणाऱ्या दोन महिलांना परळी शहर पोलिसांनी औरंगाबाद शहरातून अटक केली. सय्यद शबाना बेगम उर्फ शब्बो इम्रान (३४, रा. नंदनवन कॉलनी, औरंगाबाद) व मुन्नी उर्फ परवीन शेख अब्दुल रहिम (३७, रा. संजयनगर, औरंगाबाद) अशी या महिलांची नावे आहेत. परळी शहरातील सोन्या चांदीचे व्यापारी बालाजी टाक यांच्या दुकानातून ८ जून रोजी सोने खरेदीच्या निमित्ताने आलेल्या दोन बुरखाधारी महिलांनी हातचलाखी करून २३ हजार...
  June 29, 10:11 AM
 • तुळजापूर -येथील तुळजाभवानी देवीचे दागिने गहाळ असल्याबाबत दाखल तक्रारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी गृह राज्यमंत्र्यांनी याची सीआयडीमार्फत चौकशी केली जाईल, असे सांगितले असतानाच सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सोमवारी व मंगळवारी असे दोन दिवस तुळजापुरात ठाण मांडून मॅरेथॉन बैठका घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी सीआयडीच्या औरंगाबाद येथील वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. तुळजाभवानी मंदिर देवस्थानचा...
  June 29, 09:23 AM
 • परभणी -मध्यवस्तीतील गोलघुमट जवळील रोशन खान मोहल्ला या परिसरातून स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवारी(दि.२८) शुक्रवारी पहाटे एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा १८ लाख रुपयांचा साठा जप्त केला. तसेच दोघांना अटक केली. गेल्या काही दिवसांपासून प्रतिबंधित अन्न साठ्याविरुद्ध जिल्हा पोलिस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर मोहीम सुरू केली. या मोहिमेने बेकायदेशीरपणे गुटखा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांत मोठी खळबळ उडाली. काहींनी या मोहिमेतून सुटका व्हावी...
  June 29, 07:39 AM
 • गेवराई -बहिणीसाेबत घरात एकटी झाेपलेल्या अल्पवयीन मुलीवर रात्री घरात घुसलेल्या पाच पैकी तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना गेवराई तालुक्यातील नागझरी येथे गुरुवारी (२० जून ) घडली. हा प्रकार तब्बल सहा दिवसानंतर उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पाच जणांवर गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहेत.आरोपींनी केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात पीडित मुलीची बहीणही जखमी झाली असून तिच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गेवराई...
  June 27, 08:57 AM
 • बीड -पतीसोबत अनैतिक संबंध असलेल्या महिलेच्याचारवर्षीय मुलाचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा प्रकार बुधवारी समोर आला. कर्परा नदीपात्रात मुलाचा मृतदेह आढळून आला. या घटनेने खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले आहे. सिद्धार्थ विष्णू देवगुडे (४) असे खून झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. अनिता विष्णू देवगुडे यांना तीन मुले असून मोठा मुलगा आठवीत, मधला सहावीत तर छोटा सिद्धार्थ चार वर्षांचा होता. त्यांचे नातेवाइक असलेला श्रीराम शिंदे (रा. शाहूनगर) याच्यासोबत अनैतिक संबंध...
  June 27, 08:48 AM
 • परळी -येथील रेल्वेस्थानकात परळी -अकोला पॅसेंजर पोहाेचल्यांनतर इंजिनच्या कॅब कंपार्टमेंटमध्ये घुसून रेल्वे दामटण्याचा प्रयत्न करणारा माथेफिरू मिरा भाईंदर येथील रहिवासी असल्याचे समाेर आले असून हुसेननिहाज अजगर अली चौधरी असे त्याचे नाव आहे. ताे दातांचा डाॅक्टर आहे. रेल्वे पाेलिस आणि रेल्वे सुरक्षा बलाने गुन्हा दाखल करण्यात केलेल्या टाेलवाटाेलवीमुळे त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.सुशिक्षित असलेल्या डॉक्टरने अशा प्रकारचे गंभीर कृत्य केलेच कसे, तो परळीत कशासाठी आला होता असे...
  June 27, 08:41 AM
 • वाटूर -महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणजेच पंढरपुरातील विठ्ठल. आषाढी एकादशी जवळ येताच पंढरपूरच्या वारीची लगबग सुरू होते. जय हरी, विठ्ठल विठ्ठल, माउली माउलीचा जयघोष करत वारकरी मंडळी पंढरपूरकडे रवाना होतात. याच धर्तीवर जालना तालुक्यातील वाटूर येथे आर्ट ऑफ लिव्हिंग स्थापित श्री श्री ज्ञान मंदिर आश्रमात विठ्ठलाची मूर्ती स्थापन केला जात आहे. औरंगाबाद येथून लोखंडी अँगलचा सापळा करून त्यातून ग्लास फायबरपासून ५१ फूट उंची, तर ७ फूट रुंदीची ही मूर्ती बसवून वाटूरला प्रती पंढरपूर बनवण्यासाठी...
  June 27, 08:35 AM
 • परळी -अदिलाबाद-परळी-अकोला पॅसेंजर गाडी परळी रेल्वेस्थानकात मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता पोहोचली. गाडीचे इंजिन बदलून ती १.१५ वाजता अकोल्याकडे जाण्यासाठी ट्रॅकवर उभी असताना दुपारी एकच्या सुमारास मोटरमन बदलल्याची संधी साधून एका ४० माथेफिरूने उपस्थितांचा डोळा चुकवून रेल्वे इंजिनमधील क्रू कंपार्टमेंट (ड्रायव्हर कॅब) प्रवेश करत मोटरमनच्या खुर्चीवर जावून बसला. या वेळी रेल्वे इंजीन सुरूच होते. रेल्वेला गती देण्यासाठीचे हॅन्डलही त्याने हाती धरून रेल्वे चालवण्याचा प्रयत्न केला. मात्र...
  June 26, 09:17 AM
 • बीड - राजकीय दृष्ट्या महत्वाच्या असलेल्या बीड विधानसभा मतदारसंघात मान्सूनसाेबतच निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. मागील वेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढून विजयी होणारे जयदत्त क्षीरसागर या निवडणुकीच्या ताेंडावरच शिवसेनेत गेले आहेत. तर त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार आहेत. बीडची जागा युतीत शिवसेनेला सुटली असून या जागेवर आता मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा हक्क आहे. दुसरीकडे महायुतीमधील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी...
  June 26, 09:15 AM
 • जालना - भरधाव टँकरने चिरडल्याने आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. जालना शहरातील मोतीबागेसमोर मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. नितीन संतोष राठोड आणि लक्ष्मण तुकाराम आढे अशी या अपघातातील मृतांची नावे असून ते अंबड तालुक्यातील गोंदी येथील आहेत. टँकरचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गोंदी येथून जवळच असलेल्या पाचपिंपळ तांडा येथील लक्ष्मण तुकाराम आढे (६०) हे आपला नातू नितीन संतोष राठोड (१४,) याचा शाळेतील दाखला घेण्यासाठी तपोवन तांडा येथे गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास...
  June 26, 08:58 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात