Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- महाराष्ट्राचे आराद्य दैवत गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी भक्तीमय वातावरणार निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आले. यावेळी एक बोट पलटली. सुदैवाने बोट पलटल्याने बुडालेल्या व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेचे पीआरओ तानाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट पलटल्याने पाच जण पाण्यात...
  12:44 PM
 • मुंबई - दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी गणपती बाप्पाने भक्तांचा निरोप घेतला. अत्यंत भावपूर्ण मनाने लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. मुंबईतील मानाचा गणपती समजला जाणारा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. त्या पाठोपाठ लालबागच्या राजाचेही विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळी साडे आठच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. खोल समुद्रात लालबाच्या राजाचे विसर्जन झाले. विशेष म्हणजे...
  12:03 PM
 • नवी दिल्ली- शेअर बाजार शुक्रवारी अक्षरश: हादरला. सकाळी बाजार सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सेन्सेक्सने ३६८ अंकांची घेतलेली उसळी दुपारनंतर टिकू शकली नाही. पाहता पाहता शेअर्स गडगडू लागले आणि अवघ्या १० मिनिटांत सेन्सेक्स १,१२७ अंकांनी ढासळला. दिवसभराच्या व्यवहारातील ही घसरण १,४९५ अंकांची नोंदली गेली. दिवसअखेर बाजार सावरला आणि सेन्सेक्स केवळ २७९.६२ अंकांनी घसरून ३६,८४१.६० अंकांवर बंद झाला. दुपारनंतर सेन्सेक्समध्ये ८४८ अंकांची सुधारणा झाली. निफ्टी ९१.२५ अंकांनी घसरून ११,१४३.१० अंकांवर बंद...
  07:40 AM
 • मुंबई - पुणे आणि अहमदनगरसह राज्यात विविध ठिकाणी गणेश विसर्जनासाठी डीजे आणि डॉल्बीची मागणी होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी त्यास स्पष्ट विरोध केला. श्रीगणेशाला डॉल्बी किंवा डीजेची गरज नाही असे त्यांनी म्हटले आहे. राज्यात विविध ठिकाणी गणेश मंडळांनी डीजेच्या मागणीसाठी विसर्जनावर बहिष्कार घातला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही प्रतिक्रिया अतिशय महत्वाची मानली जात आहे. डीजे डॉल्बीची गरज फक्त आपल्यालाच असते. आपल्या उत्साहासाठी असते असेही ते पुढे म्हणाले आहेत....
  07:37 AM
 • मुंबई- 70 वर्षे जुन्या RK स्टूडिओमध्ये नेहमीप्रमाणे यंदाही गणपतीची स्थापना करण्यात आली. 10 दिवसांच्या गणेशोत्सवानंतर आज (रविवारी) अनंत चतुर्दशीच्या दिवशी येथील गणपतीचेही विसर्जन करण्यात आले. मात्र यंदाचे विसर्जन RK स्टूडिओचे अखेरचे गणपती विजर्सन असणार आहे. कारण कपूर फॅमिलीने या स्टूडिओचीच विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे. अखेरच्या या विसर्जन मिरवणुकीत रणबीर कपूर, ऋषि कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर सहभागी झाले होते. रणबीला पाहताच फॅन ओरडले, संजू...मुन्नाभाई विसर्जन...
  07:37 AM
 • मुंबई - पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आवाहन करत आपल्या लाडक्या बाप्पाला लाखो भक्त आज (रविवारी) निरोप देत आहेत. गेल्या ११ दिवसांपासून मनोभावे सेवा केल्यानंतर आज सकाळपासूनच राज्यभरात नाचत-गाजत बाप्पाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. डॉल्बी, डिजेच्या बंदीमुळे गणेश भक्तांचा उत्साह कुठेही कमी झालेला पाहायला मिळाला नाही. ढोल, ताशा तसेच बँजोच्या तालावर मुलं, तरूण-तरूणी तसेच महिला व ज्येष्ठही थिरकताना दिसले. पुढील स्लाइडवर पाहा, राज्यभरातील विसर्जन मिरवणुकीचे फोटो....
  September 23, 05:17 PM
 • औरंगाबाद - छत्तीसगड आणि नजीकच्या भागातील कमी दाबाचा पट्टा शनिवारी पुढे सरकला असून तो आता नैऋत्य मध्य प्रदेश व नजीकच्या भागात आला आहे. परिणामी २३ आणि २४ सप्टेंबर या काळात उत्तर मध्य महाराष्ट्र व उत्तर कोकणात मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यात काही जागी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. शनिवारी विदर्भात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. आयएमडीनुसार, शुक्रवारी छत्तीसगड व परिसरातील कमी दाबाचे क्षेत्र नैऋत्य मध्य प्रदेश व परिसरात सरकल्याने मध्य प्रदेश, महाराष्ट्र,...
  September 23, 07:37 AM
 • मुंबई- लढाऊ राफेल विमान खरेदी हा देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा असून फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांनीही यावर शिक्कामोर्तब केले आहे. संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेची फसवणूक केली असून पंतप्रधानांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच या घोटाळ्याची संसदेच्या संयुक्त समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांनी केली. या घोटाळ्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीने 27...
  September 22, 08:19 PM
 • मुंबई- मुंबई क्राइम ब्रँचच्या अधिकार्यांनी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे झालेल्या बॅंक दरोड्यातील प्रमुख आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका खबर्याने दिलेल्या माहितीच्या आधारे क्राइम ब्रँचने ठाण्यातून आरोपील अटक केली. आरोपी नातेवाइकाला भेटण्यासाठी मुंबई आला होता. असा टाकला होता बँकेवर दरोडा.. सुल्तानपूरमधील लंभुआ येथील बडोदा ग्रामीण बॅंकेवर 11 सप्टेंबरला 5 अज्ञात दरोडेखोरांनी दरोडा टाकला होता. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी बॅंकेच्या कॅशियरसह 15 अधिकार्यांना वेठीस धरले...
  September 22, 05:32 PM
 • अमरावती- अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर खोचक टीका केली आहे. दानवेंच्या मतदार संघाची अवस्था बिहारपेक्षाही वाईट आहे. अवैधदारु विक्रीपासून ते वाळूची तस्करी जालन्यातून होते. दानवेंच्या आर्शीवादानेच हे उद्योग जालन्यात सुरु आहेत, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला आहे. लोकसभा जालन्यातूनच लढणार.. आमदार बच्चू कडू यांनी जालन्यातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. दानवे यांचा पराभव करुनच परत येऊ, असाही निर्धार बच्चू कडू यांनी यावेळी बोलून...
  September 22, 04:26 PM
 • मुंबई- 1993 मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी खुर्शीद आलम याची नेपाळमध्ये गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सुनसारी जिल्ह्यातील हरिनगर भागात अज्ञात दुचाकीस्वारांनी खुर्शीदवर गोळी झाडल्याची माहिती भारतीय सुरक्षा एजन्सीने दिली आहे. खुर्शीदची हत्या करणारे मारेकरी भारतात पळून आल्याचा संशय पोलिसांना आहे. अशी झाली खुर्शीदची हत्या... खुर्शीद आलम हा नेपाळमध्ये स्थायिक झाला होता. शुक्रवारी तो घरी जात होता, तेव्हा मारेकरी दुचाकीवर आले आणि त्यांनी खुर्शीदवर जवळून गोळी झाली....
  September 22, 03:47 PM
 • मुंबई- अल्पवयीन मुलींचा विनयभंग आणि बलात्कार करणारा सीरियल रेपिस्ट आता वसई, विरारमध्ये दाखल झाला आहे. नालासोपाऱ्यात चार दिवसात नराधमाने चार मुलींना आपली शिकार बनवले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनीच आता हातात काठ्या घेऊन जागता पहारा देण्यास सुरूवात केली आहे. नराधम अल्पवयीन मुलींना निर्जन स्थळी नेऊन त्यांच्यावर बलात्कार करतो. त्याच्याविरोधात नवी मुंबई, ठाणे, पालघर येथे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील तलिंज पोलिस...
  September 22, 02:13 PM
 • मुंबई- मुंबईतील वडाळा येथे क्षुल्लक कारणावरून एका तरूणाने वृद्ध व्यक्तीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. फुलचंद यादव असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून शाकीरअली शेख असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी वडाळा टीटी पोलिसांनी शाकीरअली सरमुल्ला शेख याला अटक केली आहे. मिळालेली माहिती अशी की, वडाळा संगमनगर येथे राहणारे फुलचंद यादव शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास शौचाला गेले होते. ते नैसर्गिक विधी आटोपत असताना शौचालयात रांगेत उभे असलेल्या आरोपी शकीर अलीने दरवाजा जोराने...
  September 22, 12:59 PM
 • मुंबई- रामायण, महाभारताची देशाला गरज नाही. मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचेच घटक असून मला जेवढा अधिकार आहे तेवढाच अधिकार त्यांना आहे. ते देशाचे हिस्सेदार आहेत, हे कुणीही सांगण्याची आवश्यकता नाही. ते जन्मत:च या देशाचे नागरिक आणि हिस्सेदार आहेत, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुस्लिमांबाबत वक्तव्य करणाऱ्या सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला. भारिपचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी पक्ष धर्मनिरपेक्ष नसल्याच्या टीकेलाही पवारांनी प्रत्त्युत्तर...
  September 22, 11:21 AM
 • मुंबई- ध्वनी प्रदूषणामुळे डीजे व डॉल्बीच्या वापरावर राज्य सरकारची बंदी उठवण्यास मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी नकार दिला. गणपती विसर्जन व नवरात्रोत्सवात डीजे-डॉल्बीचा दणदणाट नसेल. प्रोफेशनल ऑडिओ अँड लायटिंग संघटनेच्या (पाला) याचिकेवर सरकारने मत मांडले की, पालाने ध्वनी प्रदूषण कायद्याच्या अधीन राहून डीजेचा वापर करण्याची लेखी हमी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ही सिस्टिम ध्वनी प्रदूषणाचा स्रोत असून उत्सवादरम्यान त्यांच्या वापराला परवानगी देणे योग्य नाही. ध्वनी प्रदूषणाबाबत ७५%...
  September 22, 07:55 AM
 • मुंबई- राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांच्या विद्यावेतनात २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला अाहे. कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशिक व अमरावती येथे ही प्रशिक्षण केंद्रे अाहेत. विद्यावेतन वाढीची घाेषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात केली हाेती, त्याची अाता पूर्तता झाली अाहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच ही वाढ मिळेल. राज्यातील होतकरू, बुद्धिवान विद्यार्थ्यांना अायएएस व...
  September 22, 07:26 AM
 • नागपूर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर तसेच राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात पोलिसांनी हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. या कारवाईल दलाल महिलेसह आणि एका तिच्या साथीदारला पोलिसांनी अटक केली आहे. दोन विदेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी महिलांकडून 2 लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. त्यात 2 अमेरिकन डॉलरचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नागपूरातील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची...
  September 21, 03:20 PM
 • मुंबई -हायकोर्टाने डीजे चालकांना दिलासा देण्यास नकार देत डीजे बंदीवरी स्थगितीसाठी दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळून लावली आहे. ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यामुळे डीजे चालवण्यास परवानगी देणार नसल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे डॉल्बी आणि डीजेवर असलेली बंदी कायम राहणार आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी चार आठवड्यांनंतर होणार आहे. हायकोर्टाने पाला संघटनेच्या वतीने करण्यात आलेली याचिका दाखल करून घेतली. या याचिकेमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी डीजे बंदीला तात्पुरती स्थगिती देण्याची...
  September 21, 02:20 PM
 • मुंबई - जेट एअरवेजच्या विमानात केबीन क्रू हवेचा दाब नियंत्रण करणारे स्विच सुरू करण्यास विसरल्याने प्रवाशांना नाक-कानातून रक्तस्रावाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर विमान पुन्हा मुंबईकडे वळवले आणि विमानतळावर प्रवाशांवर उपचार करण्यात आले. तर पाच प्रवाशांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या पाचपैकी एका प्रवाशाने 30 लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे. एअरलाईनने योग्य प्रकारे काळजी घेतली नसल्याचा आरोप या प्रवाशाने केले असल्याची माहिती, सुत्रांनी दिली आहे....
  September 21, 12:28 PM
 • मुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एमआयएमला सोबत घेऊन लढवण्यात येतील, या भूमिकेवर अापण ठाम अाहाेत. या पक्षाशी आघाडी कायम ठेवण्याबराेबरच जर काँग्रेसला आमची भूमिका मान्य असेल तर त्यांच्याशीही अाघाडी करण्याची अामची तयारी अाहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेससाेबत कदापिही जाणार नाही, असे स्पष्टीकरण भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी काँग्रेस, मुस्लिम आणि आरक्षणाबाबत केलेले घूमजाव म्हणजे आपण बदललो आहोत हे...
  September 21, 07:20 AM
 
जाहिरात

RECOMMENDED