जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • नवी दिल्ली / मुंबई- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तूर्तास भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्ष पदावरच राहतील. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षाची निवड अंतर्गत चर्चेतून केली जाणार आहे असे भाजप नेते भूपेंद्र सिंह बघेल यांनी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यात महाराष्ट्र, झारखंड आणि हरियाणात विधानसभा निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला ऐतिहासिक यश मिळाले. तरी काही राज्यांमध्ये भाजपचा प्रभाव कमी असल्याचे दिसून आले आहे. त्या सर्वच राज्य आणि भागांपर्यंत भाजपला पोहोचवणार असे शहा यांनी...
  June 13, 05:59 PM
 • मुंबई - शिवसेना सत्तेत सहभागी झाल्यानंतर विधान परिषदेवर निवडून गेलेल्या आमदारांनाच मंत्रिपदासाठी झुकते माप देण्यात आले हाेते, त्यामुळे लाेकांमधून निवडून विधानसभेवर गेलेले पक्षाचे आमदार नाराज हाेते. आता मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे वाहू लागताच ही नाराजी पुन्हा एकदा उफाळून आली आहे. आताही दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना किंवा परिषदेवरील आमदारांचीच नावे संभाव्य मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून समाेर येऊ लागल्यामुळे विधानसभेतील आमदारांची नाराजी कशी दूर करावी, असा पेच पक्षप्रमुख उद्धव...
  June 13, 08:53 AM
 • मुंबई- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार अमोल कोल्हे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवास्थानी जाऊन भेट घेतली. सकाळी 11.30 वाजता अमोल कोल्हे कृष्णकुंजवर दाखल झाले. अमोल कोल्हे यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान कोल्हेंनी या भेटीमागचे कारण सांगितले आहे. अमोल कोल्हे म्हणाले, ही सदिच्छा भेट होती. राज ठाकरे यांच्या सभेचा चांगला इम्पॅक्ट झाला. त्यासाठीच राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी, त्यांची भेट...
  June 12, 04:27 PM
 • मुंबई - लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही काँग्रेस राज्यात विशेष करामत दाखवू शकली नाही. त्यांचा एकच खासदार निवडून आला, तोही शिवसेनेतून आयात केलेला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र काँग्रेसपेक्षा चांगले यश मिळवल्याने आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसपेक्षा जास्त आमदार निवडून आणून सत्ता गाठण्याचे उद्दिष्ट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठेवले आहे. यासाठी ते स्वतः निवडणुकीच्या तयारीवर लक्ष ठेवणार असून याची सुरुवात गुरुवारपासून केली जाणार आहे. सोमवारी पक्षाच्या २०...
  June 12, 09:54 AM
 • मुंबई - राज्य शिक्षण मंडळाअंतर्गत दहावीच्या विद्यार्थ्यांना यंदा शाळेचे अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने राज्यात यंदा निकालही घसरला आहे. आता या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने सीबीएसई व आयसीएसईच्या दहावी पास या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश द्यावा, अंतर्गत गुण गृहीत धरू नयेत, यासाठी राज्य सरकार केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाकडे आग्रह धरणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी...
  June 12, 09:52 AM
 • मुंबई - पीएनबी बँक घाेटाळ्यातील आराेपी नीरव माेदी याला ब्रिटनमधून भारतात आणण्याचे केंद्र सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. ते यशस्वी झाल्यास नीरवला मुंबईतील आर्थर राेड तुरुंगातील बराक क्रमांक १२ मध्ये ठेवले जाऊ शकते. गृह विभागाच्या अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, कारागृह प्रशासनाने नीरव माेदीसाठी या कारागृहात बराक तयार करून ठेवली आहे. केंद्र सरकारने कारागृह प्रशासनाने विचारलेल्या माहितीनंतर मागील आठवड्यातच प्रशासनाने नीरवला भारतात आणल्यास त्याला बराकीत...
  June 12, 09:39 AM
 • मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात लाेकसभा निवडणुकीपूर्वीच युतीबाबत जी चर्चा झाली त्यात राज्याचे मुख्यमंत्री पद दाेन्ही पक्षांना अडीच- अडीच वर्ष वाटून घेण्याचा निर्णय झाला आहे. त्यामुळे जे नेते या बैठकीला हजर नव्हते त्यांनी स्वार्थासाठी युतीत खोडा घालण्याचे काम करू नये, असा इशारा देणारे ट्विट युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांना उद्देशून केले आहे. दरम्यान, या ट्विटला उत्तर...
  June 12, 09:28 AM
 • मुंबई - गेले काही वर्षे होणार-होणार असा गाजावाजा होत असलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची चर्चा आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा जाेरात सुरू झाली आहे. १७ जूनपासून हे अधिवेशन सुरू हाेत आहे. तत्पूर्वी म्हणजे १४ जून राेजी विस्ताराचा मुहूर्त शाेधण्यात आला असून सहा नवे मंत्री शपथ घेतील, अशी चर्चाही राजकीय वर्तुळातून सुरू झाली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून मात्र याबाबत अधिकृत घाेषणा अद्याप तरी करण्यात आलेेली नाही. याबाबत आम्हाला काहीच ठाऊक नाही,...
  June 12, 09:23 AM
 • मुंबई- फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे. 14 जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याच्या अनेक दिवसांपासून चर्चा होत्या. पण आता यावर शिक्कामोर्तब झाला आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान आज झालेल्या बैठकीत विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील आणि रणजितसिंह मोहिते...
  June 11, 05:36 PM
 • मुंबई -आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न व बेरोजगारीचे मुद्देच प्रचारात मांडले. परंतु मोदींनी राष्ट्रवादाचा मुद्दा मांडल्याने देशावर संकट आले असून अगोदर त्याचा सामना करणे आवश्यक असल्याचे मत जनतेचे झाले. मोदी यात यशस्वी झाले. घरात घुसून मारू, असे त्यांनी म्हटले ते जनतेला आवडले. परंतु त्यांनी पाकिस्तानात घुसून नव्हे तर काश्मिरातच हल्ले केले, हे लोकांना ठाऊक नाही. त्यांनी एका धर्माची बाजू घेऊन दुसऱ्या धर्माबाबत आकस निर्माण केला. भविष्याच्या दृष्टीने चांगले नाही. पुढील वेळी आणखी नवीन विषय काढून...
  June 10, 10:33 AM
 • मुंबई -राज्यातील सर्व ४८ मतदारसंघांमध्ये एकूण झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येत असून २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा कमी आहे. उर्वरित २४ मतदारसंघांमध्ये मतदान करणाऱ्यांची संख्या, मोजण्यात आलेल्या मतांपेक्षा जास्त आहे. निवडणूक आयोगाने या तफावतीचे १५ दिवसांच्या आत स्पष्टीकरण द्यावे. पुराव्यासाठी सोबत वेबसाइटवरील निकालाचे स्क्रीन शॉट दिले आहेत. आयोगाने याचे स्पष्टीकरण न दिल्यास, वंचित बहुजन आघाडी...
  June 9, 10:47 AM
 • मुंबई -लोकसभा निवडणुकीत आपल्या उमेदवाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघडउघड काम केले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीला राष्ट्रवादीशी काडीमोड घ्या आणि वंचित बहुजन आघाडीला बरोबर घ्या, अशी आग्रही मागणी विदर्भातील काँग्रेसच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. परळ येथील टिळक भवनात प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शनिवारी विदर्भातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. तसेच लोकसभा निवडणुकीतील कामांचा लेखाजोखाही घेतला....
  June 9, 09:58 AM
 • मुंबई -राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्यावर गलिच्छ वस्ती पुनर्निर्माण योजनेत व्यावसायिकाला अधिकचा लाभ पोहोचवल्याचा अाराेप असून लोकायुक्तांनीही चाैकशी अहवालात तसा ठपका ठेवल्याचा आहे. असा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक आघाडीने शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानाजवळ आंदोलन करत मेहतांच्या राजीनाम्याची मागणी केली. गली गली में शोर है प्रकाश मेहता चोर है, मंत्री प्रकाश मेहता यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, भाजप सरकारचा निषेध असो,...
  June 9, 09:46 AM
 • मुंबई -लोकसभा निवडणुकीत आघाडी असतानाही अनेक मतदारसंघात राष्ट्रवादीचे नेते व कार्यकर्त्यांनी मदत न केल्यानेच काँग्रेसचा पराभव झाला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीशी आघाडी करण्याऐवजी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेतल्यास चांगले यश मिळू शकेल, अशी मागणी आढावा बैठकीत काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केल्याचे समजते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शुक्रवारपासून...
  June 8, 09:31 AM
 • मुंबई -हवामान खात्याने यंदा राज्यात सर्वसाधारण पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगल्या पावसाची शक्यता पाहता शेतकऱ्यांनी पेरण्या उशिरा कराव्यात, असा सल्लाही देण्यात आला असल्याने दुबार पेरणीचे संकट या वेळी उद्भवणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत खते, बी-बियाणे, बँकांचे कर्ज आणि सरकारच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा...
  June 8, 08:49 AM
 • मुंबई- महाराष्ट्रात दुष्काळाने शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. यातच यावर्षीही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांना पुढे काय करावे कळत नाहीये. याच पार्श्वभूमीवर आज राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक पार पडली. बैठकीला जिल्हाधिकारी कृषी अधिकारी, सर्व कृषी विद्यापीठाचे कुलगुरू आणि सर्व मंत्री उपस्थित होते. या बैठीकत मुख्यमंत्री म्हणाले, मागच्या वर्षी राज्यात 73 % पाऊस पडूनही उत्पादकता वाढली आहे. मराठवाड्यात 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडूनही वाढती उत्पादकता ही समाधानाची बाब आहे. 2009 ते 2014...
  June 7, 04:42 PM
 • मुंबई- मालेगाव बॉम्ब ब्लास्ट आरोपी आणि भोपाळच्या नवनिर्वाचीत भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आज(शुक्रवार)दुपारी मुंबईच्या विशेष एनआयए कोर्टात हजर झाल्या. यावेळी न्यायाधिशांनी त्यांना दोन प्रश्न विचारले. त्याचे उत्तर प्रज्ञा यांनी, मला माहित नाही असे दिले. प्रज्ञा यांना गुरुवारीच कोर्टात हजर राहण्याचे आदेश होते, पण प्रकृती खराब झाल्यामुळे त्या हजर राहू शकल्या नव्हत्या. न्यायाधिशांच्या प्रश्नावर प्रज्ञा यांचे उत्तर प्रज्ञा यांना विशेष एनआयए कोर्टाच्या न्यायाधिशांनी विचारले,...
  June 7, 03:28 PM
 • शहाण्याला शब्दाचा मार ही म्हण जवळपास कालबाह्य होत चालली आहे. मुंबईमध्ये कार्यरत आयएएस अधिकारी निधी चौधरी यांच्याबाबतीत घडलेल्या प्रकरणानंतर तर आता असे म्हणावेच लागेल. महात्मा गांधी यांच्याबद्दल निधी चौधरी यांनी केलेले विधान अतिशय बोलके व महत्त्वाचे होते. परंतु भाषिक ज्ञान कमी पडल्यामुळे त्याचा अर्थ समजणे राजकारण्यांना तरी शक्य झाले नाही. मग आज गांधीजींचे छायाचित्र नोटांवर तरी कशाला हवे. त्यांचे नाव देशातील सगळ्या शहरांमधील हमरस्त्यांना तरी कशाला द्यायला हवे. देश-विदेशात त्यांचे...
  June 7, 03:20 PM
 • मुंबई -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांबाबत पाठपुरावा केला. एसईबीसी आणि आर्थिक कमकुवत घटकांना दिलेल्या आरक्षणामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी वैद्यकीय शाखेच्या जागा वाढवून देण्यात याव्यात, अशी आग्रही मागणी त्यांनी केंद्रीय अाराेग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांचीही मुख्यमंत्र्यांनी भेट...
  June 7, 10:35 AM
 • किल्ले रायगड -छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या गगनभेदी घाेषणा, डौलाने फडकणारे भगवे झेंडे, ढाेल-ताशांचा गजर अशा भारावलेल्या वातावरणात गुुरुवारी छत्रपती शिवाजी महाराजांचा ३४६ वा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. या वेळी हजारो शिवप्रेमींनी केलेल्या शिवछत्रपतींच्या जयघोषाने दुर्गराज रायगड दुमदुमला. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड विकास प्राधिकरण समितीचे अध्यक्ष खासदार युवराज संभाजी राजे, बल्गेरियाचे राजदूत एलेनोरा दिमित्रोवा, ट्युनिशियाचे...
  June 7, 09:21 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात