जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई -चूलमुक्त धूरमुक्त महाराष्ट्र या घोषणेअंतर्गत राज्यातील बिगरगॅस जोडणीधारकांना राज्य शासनाकडून गॅस जोडण्या वितरित करण्यासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व विस्तारित प्रधानमंत्री उज्ज्वला योजना-२ अंतर्गत लाभ न मिळू शकलेल्या नागरिकांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. चालू आर्थिक वर्षात या योजनेसाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये या योजनेची...
  July 24, 08:50 AM
 • मुंबई - मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मराठा क्रांती ठोक मोर्चा राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मोर्चाच्या नेत्यांनी केली आहे. राज्यातील सर्व २८८ जागा लढवणार असल्याची घाेषणा माेर्चाचे नेते आबासाहेब पाटील, रमेश केरे -पाटील, सुनील नागणे यांनी पत्रकार परिषदेत केली. १९ जून २०१८ रोजी तुळजापुरातून मराठा क्रांती ठोक मोर्चाला प्रारंभ झाला होता. त्यानंतर राज्यभरात अनेक मोर्चे निघाले. मोर्चांना यापूर्वी कोणतीही पक्षीय भूमिका नव्हती. मात्र समाजाचे प्रश्न सुटत...
  July 24, 08:47 AM
 • मुंबई - राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत आणि महानगरपालिकेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१९ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या निर्णयाचा लाभ मुंबई महापालिका वगळता राज्यातील सर्व महानगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींमधील नियमित अधिकारी-कर्मचारी व निवृत्तिवेतनधारकांना होणार आहे. लाभार्थी अधिकारी-कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ ते ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतची सातव्या वेतन आयोगाची थकबाकी ५ वार्षिक समान हप्त्यांत...
  July 24, 08:39 AM
 • रायगड -हे छायाचित्र छत्तीसगड आणि ओडिशाची सर्वात लांब नदी महानदीचे आहे. रायगड शहरापासून २५ किमीवरील सूरजगडमध्ये श्रावण महिन्यात महानदीच्या पात्राची रुंदी सुमारे दोन किमी होते. पण यंदा पाऊस कमी झाल्याने तेथे कोरडे मैदान दिसत आहे. जेथे नदी तुडुंब भरलेली राहत होती, तेथे गवत उगवले आहे. आज १२ राज्यांत जोरदार पावसाची शक्यता: मान्सून आसाम, मेघालय, सिक्कीम, गुजरातचे सौराष्ट्र, कच्छ, केरळमध्ये सक्रिय आहे. हवामान विभागानुसार, प. बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार, यूपी, उत्तराखंड, पूर्व मप्र, हिमाचल,...
  July 23, 10:05 AM
 • मुंबई -लिंगायत समाजातील हिंदू वीरशैव, हिंदू लिंगायत व रेड्डी या उपजातींना इतर मागासवर्गात समावेशासंदर्भातील प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साेमवारी दिले. तसेच मंगळवेढा येथील जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर स्मारकाचा आराखडा लवकरच मंजूर करण्यात येणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. त्या वेळी...
  July 23, 09:42 AM
 • मुंबई -काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या नारायण राणे यांना भाजपनेही आपल्या खेळीने पुरते नामोहरम केल्याचे दिसून येत आहे. राणे यांचा भाजपला फायदा होईल, असे वाटल्याने त्यांना भाजपतर्फे राज्यसभेवर पाठवण्यात आले. यासाठी भाजपने शिवसेनेची नाराजीही पत्करली. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची नाराजी नको म्हणून राणे यांना दूर ठेवत आहेत. यासाठीच त्यांच्या मराठी आत्मचरित्राच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचे म्हटले जात आहे....
  July 23, 09:41 AM
 • मुंबई -९ ऑगस्ट या क्रांतिदिनी राज्यातील सर्व विरोधी पक्ष एकत्रितपणे मुंबईत ईव्हीएमविरोधी मोर्चा काढणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी पत्रकारांना दिली. थाेरात म्हणाले, राज्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीतल्या सभांना जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद होता. गावागावात लोक टीव्हीसमोर बसून राज यांच्या सभा पाहत होते. मात्र या सर्व लोकांची मते कुठे गेली, हे त्यांना आणि आम्हालाही समजले नाही. मी १९६२ पासून निवडणुका पाहत आहे. स्वत: ७...
  July 23, 09:02 AM
 • मुंबई- माझ्या वाढदिवसानिमित्त खर्चाची उधळपट्टी करण्यापेक्षा मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करा, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यभरातील विविध व्यक्ती, संस्थांनी तब्बल पावणेदाेन काेटींच्या देणग्या साेमवारी एका दिवसात या निधीत दिल्या. मात्र या सर्व देणग्यांत अमूल्य ठरली ती नगर जिल्ह्यातील मजुरी करणाऱ्या महिलेने पाठवलेली १०१ रुपयांची मनिआॅर्डर. आपल्या कॅन्सरग्रस्त भाच्याला मुख्यमंत्री निधीतून मिळालेल्या मदतीमुळे जीवदान मिळाल्यामुळे...
  July 23, 08:34 AM
 • मुंबई - येथील वांद्रे परिसरात असलेल्या एमटीएनएलच्या 9 मजली इमारतीला सोमवारी अचानक आग लागली. आग ज्या ठिकाणी लागली तेथे किमान 100 लोक अडकले. या घटनेची माहिती मिळताच फायर ब्रिगेडचे 14 बंब घटनास्थळी दाखल झाले. तसेच सर्वांनाच सुखरूप काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. ही आग प्रामुख्याने इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोबतच, कुठल्याही प्रकारची जीवितहानी यात झालेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, या इमारतीच्या चौथ्या मजल्याला आग लागली. सोबतच...
  July 22, 06:22 PM
 • मुंबई - कामोठे शहरातील अंदर्गत रस्त्यावर भरधाव स्कोडाने दिलेल्या धडकेत दोन जण ठार तर पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात वर्षीय चिमुकल्याचा समावेश आहे. रविवारी (21 जुलै) संध्याकाळी रस्त्यावर गर्दीच्यावेळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे चालकाने सुरुवातीला डाव्या बाजूच्या दुचाकीला धडक दिली, त्यानंतर विरुद्ध दिशेने रस्त्याच्या कडेने चालणाऱ्या पादचाऱ्यांना उडवले. चार दुचाकींना धडक देत आणि पादचाऱ्यांना उडवत स्कोडाने रस्त्याच्या कडेला उभ्या...
  July 22, 11:36 AM
 • मुंबई -आगामी विधानसभा निवडणूक भाजप आणि शिवसेना युती एकत्र लढणार असून मुख्यमंत्री म्हणून मी पुन्हा राज्यात येतोय, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या प्रदेश कार्य समितीच्या बैठकीत केला. मी केवळ भाजपचाच मुख्यमंत्री नसून भाजपबरोबर शिवसेना, रिपाइं आणि रासपचाही मुख्यमंत्री असल्याचे स्पष्ट करत फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदावर दावा करणाऱ्या शिवसेनेला या वेळी जोरदार टोला लगावला. मुख्यमंत्री म्हणाले, युतीबाबत संभ्रम नाही. कोणी कोणत्या जागा घ्यायच्या याचा निर्णय लवकरच होईल....
  July 22, 09:34 AM
 • मुंबई -काँग्रेस-राष्ट्रवादी आगामी विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढल्यास १० जागांवर थांबतील. वेगळे लढूनही युतीला मात्र १७० जागा मिळतील, असा दावा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती असून युतीबाबतचा मुख्यमंत्रिपदाचा व खातेवाटपाचा निर्णय तेच घेतील, असेही ते म्हणाले. गोरेगाव येथे आयोजित केलेल्या पक्षाच्या विशेष कार्य समितीच्या बैठकीत बोलत होते. या वेळी पाटील यांनी उपस्थित...
  July 22, 09:29 AM
 • मुंबई -राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. शिवसेनेने आगामी मुख्यमंत्री आपलाच असेल, असे जाहीर केले असताना रविवारी मुंबईत गोरेगाव येथे पार पडलेल्या भाजपच्या विशेष कार्यसमितीच्या बैठकीत आगामी मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असा दावा करण्यात आला. एवढेच नव्हे तर पदाधिकाऱ्यांना सर्व २८८ जागांसाठी तयारी करण्याचे आदेश भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी भाजपच्या यशाची कारणे विशद करताना सांगितले की, अनेक वर्षांची...
  July 22, 08:27 AM
 • मुंबई - भाजपच्या मुंबईतील राज्य कार्यकारिणीची बैठक आज (रविवार दि 21) पार आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे.पी नड्डा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह राज्यातील अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. आगामी विधानसभेसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.एक ऑगस्ट ते 31 दरम्यान मुख्यमंत्र्यांचीराज्यभर महाजनादेशयात्रा निघणारआहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी...
  July 21, 07:44 PM
 • मुंबई -मुंबईतील कुलाबाच्या ताज हॉटेलमागील चर्चील चेंबर या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीत एकाचा होरपळून मृत्यू झाला. रविवारी (21 जुलै) दुपारी 12.15 च्या सुमारास ही आग लागली. या आगीत अनेकजण अडकले होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. कुलाबातील चर्चील चेंबर ही फार जुनी इमारत आहे. या इमारतीला दुपारी 12.15 च्या सुमारास भीषण आग लागली. आग संपूर्ण मजल्यावर...
  July 21, 06:42 PM
 • मुंबई - श्रीलंकेत ईस्टर दिवशी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर शिवसेनेने मुंबईतही बुरख्यावर बंदी आणण्याचे म्हटले होते. आता याचा परिणामही पाहण्यास मिळत आहे. मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये बुरखा घालून आलेल्या महिलेला हॉस्पिटलमध्ये प्रवेश दिला नाही. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यानंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. रुग्णाच्या नातेवाईकाने मोबाइलमध्ये हे दृष्य कैद केले आहे. चेंबूर येथील रहिवासी असलेली ही महिला आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेली...
  July 21, 12:27 PM
 • मुंबई - मुंबईतील वसईच्या सातीवली भागात भाजपच्या एका कार्यकर्त्यांने भर बाजारात एका महिलेसह तिच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. आरोपी आनंद सिंह वसईच्या भोईदा पाडात भाजपचा पदाधिकारी आहे. आनंद सिंहला आमच्या जमिनीवर कब्जा मिळवायचा आहे यामुळे त्याने आमच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचे पीडित कुटुंबाने सांगतिले. महिलेच्या फिर्यादीवरून आनंद सिंह विरोधात वालीव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....
  July 20, 01:26 PM
 • मुंबई- मुंबईतील कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नीलम गेस्ट हाऊसमध्ये काल(19 जुलै)रात्री एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गेस्ट हाऊसमधील रुममध्ये एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत, तर त्याच रूममध्ये एक तरुणी मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तरुणांचे नाव अरुण गुप्ता तर तरुणीचे नाव प्रतिभा प्रसाद आहे. प्रतिभाची हत्या करुन अरुणने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्रतिभा ही मुंबईच्या घाटकोपर...
  July 20, 01:04 PM
 • मुंबई - काँग्रेस कार्यकारी अध्यक्षा आणि तिवसाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या पोलिस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसोबत हाणामारी करण्याचा आरोप करण्यात आला. मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये कर्नाटकच्या आमदाराची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी पोलिस आणि यशोमती यांच्या शाब्दिक वाद झाला. या पूर्ण घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. कर्नाटकच्या आमदाराला भेटण्यासाठी गेल्या होत्या यशोमती यशोमती ठाकूर आणि पोलिस यांच्यात शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात शाब्दिक वाद पाहण्यास मिळाला. यशोमती...
  July 20, 12:09 PM
 • मुंबई -९ ऑगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी चले जाव असा इशारा ब्रिटिशांना दिला होता. त्याच धर्तीवर आगामी ९ ऑगस्ट रोजी ईव्हीएम चले जाव असा नारा देत एका सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या मोर्चात मनसेप्रमुख राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते उपस्थित राहाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेतर्फे सोशल मीडियावर तसे संदेशही प्रसारित केले जाऊ लागले आहेत. तसेच जर बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या नाहीत तर निवडणुकांवर राज ठाकरे बहिष्कार...
  July 20, 09:05 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात