जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- गोरेगावमधील वनराई भागात बुधवारी सकाळी रियान इंटरनॅशनल पब्लिक स्कूलच्या बसला भीषण अपघात झाला. भरधाव बस झाडावर आदळली. या अपघातात अटेंडेंटचा जागीच मृत्यू झाला तर ड्रायव्हरसह पाच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये एकूण 39 विद्यार्थी होते. स्कूल बसचा अपघात झाल्याची माहिती मिळताच मुंबई पोलिस घटनास्थळी पोहोचली. असा झाला अपघात.. मिळालेली माहिती अशी की, अपघात सकाळी आठ वाजेच्या सुमारास झाला. स्कूल बस...
  March 20, 12:12 PM
 • मुंबई- आगामी निवडणूक ही मोदी - शहा विरुद्ध देश असून मोदीमुक्त भारतासाठी सर्व विरोधकांनी एकत्र यायला हवे, असा पुनरुच्चार करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी भाजपविरोधात प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. आपल्याला लोकसभा निवडणूक लढवण्यात कोणताही रस नसल्याचे सांगतानाच निवडणुकीच्या काळात आपण ज्या सभा घेऊ त्या मोदी-शहा यांच्या विरोधातील सभा असतील. त्यांना मतदान न करणे हेच आपले ध्येय असेल, अशी घोषणाही राज यांनी मंगळवारी केली. पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना राज यांनी लोकसभा...
  March 20, 11:57 AM
 • तामिळनाडूतील 2 आयकॉन आता या जगात नाहीत. त्यानंतरही तामिळनाडूतील ही निवडणूक दोघांच्या सावलीतच लढवली जात आहे. तीन मुद्द्यांतून समजून घ्या. जयललिता (अण्णाद्रमुक), करुणानिधी (द्रमुक) एकमेकांचे विरोधक कसे झाले. 1. शत्रुत्वाच्या मागची कहाणी 18 ऑक्टोबर 1972 रोजी एमजीआर यांनी अण्णाद्रमुकची स्थापना केली. त्यापूर्वी ते द्रमुकमध्येच हाेते. करुणानिधींचे खास मित्र हाेते. जया व करुणानिधींमध्ये पहिले भांडण एमजीआरच्या एका सभेत झाले. मदुराईतील या सभेत एमजीआर यांनी करुणानिधी यांना सांगितले की, जयालाही...
  March 20, 11:49 AM
 • मुंबई- रेल्वे ट्रॅकवर उभे राहून मोबाइलवर पबजी खेळ (Pubg Game) खेळणार्या दोघांना हिंगोलीतीत सुपरफास्ट हैदराबाद-अजमेर फास्ट एक्स्प्रेसने चिरडली. ही धक्कादायक घटना गेल्या आठवड्यात शनिवारी (ता.16) घडली. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरु केली आहे. नागेश गोरे (24), स्वप्निल अन्नापूर्णे (22) अशी मृतांची नावे आहेत. दोघे मोबाइलवर पबजी खेळण्यात एवढे दंग होते की, ट्रॅकवर फास्ट ट्रेन केव्हा आली हे त्यांना समजलेच नाही. काय आहे पबजी? पबजी हा एक ऑनलाइन गेम आहे. हिंसक प्रवृत्तीच हा गेम असून अबालवृद्धांवर त्याचा...
  March 19, 07:02 PM
 • माढा (सोलापूर)- जिकडे..तिकडे..फक्त माढा..माढा! माढ्यातून उमेदवारी कोणाला? सर्वत्र हाचविषयचर्चे आहे. मूळातआधी माढ्याच्या विकासाचा तिढा सोडवा.. असा सूर मतदार संघातील जनतेमधून निघताना दिसत आहे. उमेदवारींच्या तिढ्यापेक्षा विकासाचा तिढा महत्त्वाचा असून तो तत्काळ सोडवावा अशी अपेक्षा मतदारांनी व्यक्त केली आहे. उमेदवार राष्ट्रवादीचा असो की भाजपचा.. अगोदर विकासाचे काय ते बोला, असा सूर जनतेमधून निघतो आहे. सामान्य जनतेला उमेदवारीशी काही देणे-देणे नाही. जनता फक्त विकासाची अपेक्षा करते आहे. माढा...
  March 19, 06:23 PM
 • मुंबई- केरळमध्ये कॅन्सरने पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह टॅक्सीच्या डिक्कीतून आणणार्या पतीला पोलिसांंनी पकडले. चौकशीत धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे, मृतदेह महाराष्ट्रात नेण्यासाठी अॅम्बुलन्स चालकांनी 45000 रुपये भाडे मागितले होते. पैसे नसल्याचे पत्नीचा मृतदेह टॅक्सीच्या डिक्कीतून आणण्याची वेळ त्याच्यावर आली. केरळ वैद्यकीय प्रशासनाने अॅम्बुलन्सची व्यवस्था करून दिली नसल्याचा दावाही पीडित व्यक्तीने केला आहे. मिळालेली माहिती अशी की महाराष्ट्रातील रहिवासी चंद्रकला (45)...
  March 19, 06:13 PM
 • नागपूर- २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा निवडून आलेल्या खासदारांपैकी संपत्तीत सर्वाधिक वाढ जाहीर करणार्या खासदारांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे या तिसर्या तर सातार्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे पाचव्या क्रमांकावर आहेत. सुप्रिया सुळे यांची संपत्ती ५१ कोटींवरून (२००९) २०१४ मध्ये ११३ कोटींवर पोहोचली असून संपत्तीतील ही वाढ १२१ टक्के आहे. तर उदयनराजेंच्या संपत्तीत ११ कोटींवरून (२००९) ६० कोटींची (२०१४) म्हणजेच ४१७ टक्के वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नॅशनल...
  March 19, 05:05 PM
 • मुंबई- काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची जोरदार चर्चा मंगळवारी राजकीय वर्तुळात सुरु झाली. विखे पाटील यांनी आपला राजीनामा काँग्रेस हायकमांडकडे सोपवला असून काँग्रेस अध्यक्ष याबाबत लवकरच निर्णय घेणार आहेत, अशी माहिती समोर आली. मात्र, आपण राजीनामा दिला नसल्याचे खुद्द राधाकृष्ण विखे-पाटील यांनी खुलासा केला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय यांनी भाजपमध्ये...
  March 19, 03:20 PM
 • मुंबई- लोकसभा निवडणुकीच्या काही महिने अगोदरच भाजपने राज्यातील खासदारांचे प्रगतिपुस्तक तयार केले होते. त्यात ८ ते १० खासदारांच्या प्रगतिपुस्तकावर लाल शेरा उमटला होता. त्यापैकी ५ खासदारांचा पत्ता या निवडणुकीत कापला जाण्याची शक्यता आहे. मंगळवारी किंवा बुधवारी भाजपच्या उमेदवारांची यादी जाहीर हाेईल, त्यात या मतदारसंघात नवीन चेहरे दिले जातील, अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. भाजपकडून उमेदवारांची यादी तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. गडचिरोलीचा मतदारसंघ अनुसूचित...
  March 19, 11:33 AM
 • पणजी- गोव्याचे मुख्यमंत्री आणि माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकरांना साश्रृनयनांनी लष्करी इतमामात पर्रीकरांना अखेरचा निरोप देण्यात आला. मिरामार बीचवर आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला होता. यावेळी मनोहर भाई अमर रहे..च्या घोषणा देण्यात आल्या. लढवय्या नेता हरपला, असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त केली होती. दरम्यान, मनोहर पर्रीकर यांची रविवारी (ता.17) सायंकाळी 6 वाजून 40 मिनिटांला प्राणज्योत मालवली. ते स्वादुपिंडाच्या कर्करोगाने(पॅंक्रियाटिक कॅन्सर)...
  March 18, 06:38 PM
 • मुंबई- वरळीजवळ समुद्रात रेवती नावाची बोट बुडाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोटीतील काही जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेली माहिती अशी की, अपघातग्रस्त बोटीत सात जण होते. सहा जण सुरक्षित असून एक जण बेपत्ता आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात...
  March 18, 05:20 PM
 • मुंबई- मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवाराच्या प्रचारसभेत पाकव्याप्त काश्मिरमधील बालाकोट आणि इतर ठिकाणचे अतिरेक्यांचे अड्डे हवाई बॉम्ब हल्ल्याने नष्ट करावेत, असा सल्ला मी दिल्याचा प्रसारमाध्यमांनी उल्लेख केला. परंतु तो माझ्या वक्तव्याचा विपर्यास आहे. मी सदर बैठकीत सल्ला दिला नसून केंद्र सरकारच्या या संदर्भातील धोरणास माझ्यासह सर्व राजकीय पक्षप्रमुखांची संमती होती, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहे. मीडियावाले उलटसुलट बातम्या...
  March 18, 05:19 PM
 • मुंबई- राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली असून त्यासंबंधीच प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे.: मनसेने गेल्या लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे यंदा मनसे लोकसभा निवडणूक लढणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले होते. आता या सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मनसेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा आज केली. मनसे यंदाची लोकसभा निवडणूक लढविणार नाही, याची सर्वांनी नोंद घ्यावी असे प्रसिद्धीपत्रक पक्षाचे नेते...
  March 17, 07:06 PM
 • मुंबई- भाजपने जालन्यातून प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी दिली असली तरी जालन्याचा तिढा अद्याप कायम आहे. शिवसेना नेते राज्यमंत्री अर्जुन खोतकर जालन्यातून लोकसभा लढविण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. यावर तोडगा काढण्यासंदर्भात अर्जुन खोतकर यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. उभय नेत्यांची बैठक संपली असून जालन्याच्या जागेबाबत रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित औरंगाबादमधील बैठकीत निर्णय घेण्यात येणार आहे. जालन्याचा तिढा मातोश्रीवरही...
  March 16, 04:06 PM
 • पणजी- मागील एक वर्षापासून पॅनक्रियाटिक कॅन्सरने (स्वादुपिंडाचा कर्करोग) ग्रस्त असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे ब्लड प्रेशर शुन्यावर आल्याची माहिती आमच्या सूत्रांनी दिली आहे. मात्र, या वृत्ताला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, गोव्यात पर्रीकरांवर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. 14 फेब्रुवारी, 2018 पर्रीकरांची प्रकृती खालवली होती. त्यानंतर त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. दुसर्या दिवशी त्यांना...
  March 16, 04:01 PM
 • मुंबई - मुंबईतील पादचारी पुलांच्या दुरवस्थेबाबत मध्य रेल्वेने साडेतीन वर्षांपूर्वीच एका पत्राद्वारे अवगत केलेले असतानाही सरकारने ती बाब गांभीर्याने न घेतल्याबाबत माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. मुंबईतील सर्व पुलांची श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी मागणीही केली. याशिवाय मुंबईतील या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले असतानाही तो कोसळल्याने या संपूर्ण ऑडिट प्रक्रियेचीही चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. मध्य रेल्वेने ११ नोव्हेंबर २०१५ ला...
  March 16, 10:54 AM
 • मुंबई - एखादा माणूस एकदा चूक करताे तेव्हा त्याला माफ केले जाते. परंतु मुंबर्इत या चुका वारंवार घडत असून त्याला माफी कशी द्यायची. सीएसटी पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालेला नसून ताे खूनच आहे. पुलाचे स्ट्रॅक्चरल आॅडिट झाल्याचे सांगितले जात आहे. हे आॅडिट नेमके काय केले, हे मी खाेदून काढणार. पुढे काय हाेर्इल ते माहिती नाही पण मी माझ्या बहीणीसाठी काही तरी करू शकलाे असे समाधान तरी मिळेल... सीएसटीच्या पूल दुर्घटनेत मृत्युमूखी पडलेल्या जीटी रुग्णालयातील परिचारिका रंजना तांबे यांचे धाकटे बंधू...
  March 16, 10:48 AM
 • मुंबई - स्वभावाने मनमिळाऊ, कामात प्रामाणिक असणाऱ्या आमच्या रुग्णालयातील नर्स अचानक कायमच्या दूर जातील असे आम्हाला स्वप्नातही कधी वाटले नव्हते. त्यांचे कुटुंब निराधार झाले आहे, अशा भावना जीटी रुग्णालयातील परिचारिकांनी व सहकर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या. गुरुवारी मुंबईतील सीएसटीसमाेरील पूल दुर्घटनेत तीन नर्स मृत्युमुखी पडल्या. त्यापैकी अपूर्वा प्रभू, रंजना तांबे या जीटी रुग्णालयात कार्यरत हाेत्या, तर भक्ती शिंदे सेंट जाॅर्ज रुग्णालयात नाेकरीस हाेत्या. या तिघींनाही जीटी रुग्णालयात...
  March 16, 10:46 AM
 • मुंबई - दाेन वर्षांपूर्वी २३ जणांचे बळी घेणाऱ्या एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतर मुंबईतील पुलांची दुरवस्था समोर आली होती. त्यातून काही बोध घेण्याअगोदरच वर्षभरानेच अंधेरी रेल्वे स्थानकाजवळील गोखले पूल पडला. यानंतर पुन्हा एकदा पुलांची दुरवस्था दूर करण्यासाठी आयआयटी मुंबई आणि रेल्वेच्या अभियंत्यांनी मुंबईतील ४४५ पुलांचे ऑडिट केले होते. त्यात गुरुवारी सीएसटीसमाेरील पडलेला हिमालय (कसाब) पूल सुरक्षित असल्याचे म्हटले होते. जर पूल सुरक्षित होता तर पडला कसा, असा प्रश्न आता विचारण्यात...
  March 16, 10:43 AM
 • मुंबईवर हल्ला करणारा नराधम अजमल कसाब अकरा वर्षांपूर्वी ज्या पुलावरून पळून गेला होता, तोच पूल कोसळला आणि सहा जण जिवाला मुकले. निरपराधांचे बळी घेणारा कसाब फासावर लटकला तरीही हे खून ज्यांनी केले त्यांचे काय करायचे? हे खून यांनी आज नाहीत केलेले. गेली अनेक वर्षे हेच तर सुरू आहे. मुंबईसारख्या महानगरात आणि मायानगरीत जे घडते आहे, त्यामुळे आपण मध्ययुगात आहोत की काय, असे भय वाटू लागले आहे. गेल्या दीड वर्षातली ही तिसरी दुर्घटना. अंधेरीत ब्रिज कोसळतो, एल्फिन्स्टन स्टेशनवर पूल कोसळल्याच्या अफवेने...
  March 16, 09:42 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात