Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई: मुंबई क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) अध्यक्षपदाच्या निवडणुकीला रणधुमाळीला सुरुवात होण्यासाठी तिला रंग चढू लागला आहे. आता केंद्रीय ग्रामविकासमंत्री विलासराव देशमुख यांचा मुंबईतील पत्ता वादाच्या भोव-यात सापडला आहे. त्यांच्या पत्त्यावर वेंगसरकर यांच्या गटाने आक्षेप घेतला आहे. 15 जुलैला होणा-या एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विलासराव देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता देशमुख आणि माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्यात थेट लढत होणार आहे. मुंबईतल्या...
  July 10, 05:19 PM
 • मुंबई: मुंबईतील पवई, कुर्ला आणि ठाण्यातील अनेक गर्भलिंग चाचणी केंद्रांवर रविवारी पोलिसांनी छापे टाकले. या केंद्रांमध्ये बेकायदेशीर रित्या गर्भलिंग चाचणी केली जात होती. पोलिसांनी सामाजिक संस्थांच्या मदतीने ही कारवाई केली आहे. यात काही नर्सिंग होमचा समावेश आहे. या प्रकारणी एका डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गर्भलिंग चाचणी करीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मुंबईतील पवई आणि कुर्ला आणि ठाणे परिसरातील अनेक केंद्रामध्ये गर्भलिंग तपासणी केली जात असल्याच्या अनेक तक्रारी...
  July 10, 04:02 PM
 • मुंबई- वळू, विहीर चित्रपटानंतर प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा बहुप्रतीक्षेत असलेला देऊळ हा चित्रपट 23 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नाना पाटेकर, नसिरुद्दीन शहा, दिलीप प्रभावळकर, मोहन आगाशे, उषा नाडकर्णी असे पट्टीचे कलाकार आहेत. श्वाससारख्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटामुळे मराठी चित्रपटसृष्टीला सुगीचे दिवस पाहयला मिळत आहेत. दरम्यान मराठी चित्रपट तयार करताना काही दिग्दर्शक हे केवळ अनुदान लाटण्यासाठी चित्रपटाचे निर्माण करताना दिसतात....
  July 10, 06:37 AM
 • मुंबई- अण्णा म्हणाले की, त्यांना पुरस्कार देणार्याचे हात स्वच्छ आहेत आणि म्हणूनच त्यांनी पुरस्कार स्वीकारला तेव्हा माझे हात कायम स्वच्छच राहतील यासाठी मी आटोकाट प्रयत्न करेन, असे वचन प्रसिद्ध अभिनेता नाना पाटेकर यांनी अण्णा हजारे यांना दिले. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना स्टार माझातर्फे स्टार सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले तेव्हा अभिनेते नाना पाटेकर प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी नाना पाटेकरांनी अण्णांची एक छोटेखानी मुलाखत घेतली. या मुलाखतीत देशासाठी...
  July 10, 06:28 AM
 • मुंबई- शहरात घुसणार्या भरतीच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवण्यात येणार्या महत्त्वाकांक्षी बृहन्मुंबई स्टॉर्म वॉटर ड्रेनेज (ब्रिमस्टोवॉड) प्रकल्पाच्या खर्चात नियोजित रकमेपेक्षा अवाच्या सव्वा वाढ झाल्यामुळे केंद्रीय नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेची कानउघाडणी केली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी 616 कोटी रुपये खर्च येणार होता; पण आता तो खर्च 3535 कोटींवर जाऊन पोहोचला आहे. नवी दिल्ली येथे मागील महिन्यात झालेल्या बैठकीत अतिरीक्त पालिका आयुक्त असीम गुप्ता व पालिकेचे या...
  July 10, 05:17 AM
 • मुंबई- मंत्रिमंडळात स्वच्छ चारित्र्याचेच मंत्री ठेवा, असा सल्ला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधानांना दिला आहे. राजकीय नेत्यांच्या मी भेटी घेत होतो, म्हणजे माझी त्यांच्याशी सलगी आहे असे नव्हे. लोकपाल विधेयकाबद्दल माहिती देण्यासाठी मी त्यांना भेटत होतो; परंतु आता राज ठाकरे सोडा, कोणत्याच राजकीय नेत्याला भेटणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. टू-जी घोटाळ्यात कपिल सिब्बल यांचे नाव आल्याबद्दल विचारले असता त्यांनी सिब्ब्ल यांच्या राजीनाम्याची मागणी केली. अण्णा दोन...
  July 10, 05:13 AM
 • मुंबई- महिलांवरील लैगिक अत्याचाराचा किंवा विनयभंगाचा गुन्हा आता अजामीनपात्र होणार आहे. स्त्रियांकडे वाकड्या नजरेने बघणार्या टवाळखोर लोकांना अद्दल घडविण्याच्या दृष्टीने भारतीय दंड विधानाच्या कलम 354 मध्ये दुरस्ती करण्याचे राज्य ठरविले आहे. राज्यातील गुन्हेगारीचा आलेख उंचावत चाललेला असताना, महिलांवर होणार्या अत्याचाराचे प्रमाणही वाढत आहे. हे चित्र महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला तडा देणारे असल्याने त्या विरोधात ठोस पावले उचलण्याचा निर्णय गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी घेतला...
  July 10, 04:39 AM
 • मुंबई- अनुकूल आयकर मूल्यांकन अहवाल देण्याच्या बदल्यात एका सॉफ्टवेअर इंजिनिअरकडून 2 लाख २० हजारांची लाच घेताना मुंबईतील आयकर आयुक्त आर.पी. मीना यांना शनिवारी त्यांच्या साथीदारासह सीबीआयने अटक केली. नरिमन पॉइंटवरील एका सॉफ्टवेअर कंपनीला २००६-२००७चा मूल्यांकन अहवाल अनुकूल करून देण्यासाठी मीना यांनी अडीच लाख मागितले होते. कंपनीच्या तक्रारीवरून सीबीआयने मीना यांचा सी.ए. यू.पी. पै यास रंगेहाथ पकडले व नंतर मीना यांना त्यांच्या घरातून अटक केली.
  July 10, 04:17 AM
 • मुंबई- अभिनेत्री रसिका जोशी यांच्या निधनाने हिंदी चित्रसृष्टीही हळहळली आहे. गेल्या ९ वर्षांपासून रसिका यांना रक्ताचा कर्करोग असतानाही त्याचा त्यांच्या कामावर कुठलाही परिणाम नव्हता. तुषार कपूरसोबत एका चित्रपटात रसिका जोशींनी त्याची आई साकारली. दोघांमध्ये अभिनयतंत्र आणि सिनेमाबद्दल सेटवर बरीच चर्चाही होत असे. रसिका यांच्या मृत्यूनंतर तुषार कपूरची प्रतिक्रिया होती, खूप बोलणे व्हायचे, त्यांचा अभिनय पाहून थक्क व्हायला होई, पण माझ्या दृष्टीने त्यांना कॅन्सर होता, ही बाब अधिक...
  July 10, 02:30 AM
 • मुंबई- ध्येयवादाच्या साक्षीने स्वर्गीय बाबा आमटेंच्या जीवनात प्रवेश करून आनंदवन येथे शून्यातून विश्व निर्माण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाया साधनातार्इंच्या निधनाने आनंदवन पोरके झाले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली. कुष्ठरोग बरा होत नाही या पारंपरिक गैरसमजाला आमटे कुटुंबीयांनी कृतीतून छेद दिला. बाबांच्या सहवासात साधनाताईंनी आनंदवनला मानवतेचा चेहरा प्राप्त करून दिला. त्या महाराष्ट्राचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनामुळे...
  July 10, 02:19 AM
 • मुंबई - काँग्रेस नेते राहुल गांधी यांना जर शेतक-यांचा एवढाच पुळका आहे तर, त्यांनी जैतापूरला भेट द्यावी व प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात शेतक-यांनी व मासेमारांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे आव्हान शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. राहुल गांधी यांनी जैतापूरमध्ये आंदोलनाचे नेतृत्व केले, तर शिवसेना नक्कीच या आंदोलनात सहभागी होईल. जमिनीच्या मुद्द्यांवर आणि त्यांच्या छळाबाबत इतकीच आत्मीयता वाटत असेल तर त्यांनी नेतृत्व जरुर करावे असे ठाकरे यांनी...
  July 9, 09:49 PM
 • मुंबई- मुंबईचे आयकर आयुक्त (अपिल) रामफुल मीना आणि त्यांच्या एका साथीदाराला अडीच लाख रुपयांची लाच घेताना मुंबईत शनिवारी अटक करण्यात आली. मीना यांनी १० लाखांची मागणी केली होती. मात्र तडजोडीची रक्कम अडीच लाख रुपये ठरली. त्याबाबत त्यांच्याविरुध्द तक्रार आल्यानंतर सीबीआयने सापळा रचून मीना व त्यांच्या सहकाऱंयाला अटक केली असल्याची माहिती सीबीआयचे उपसंचालक ऋषिराज सिंग यांनी दिली.
  July 9, 07:56 PM
 • मुंबई: सगळे राजकारणी एकाच माळेतील मणी असून मला कोणत्याही पक्षाच्या नेत्याला भेटायचे नाही. माझ्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा लोकपाल विधेयकासाठी सुरु असलेल्या आंदोलनासाठी एकत्र या, असा टोला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे लगायला. मुंबईतल्या भष्ट्राचार निर्मुलन समितीच्या कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी शनिवारी ते बोलत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काय आणि उपमुख्यमंत्री अजित पवार काय, हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत. माझी लढाई ही...
  July 9, 06:34 PM
 • मुंबई: मुंबईतील दादर भागातील रानडे रोड येथील युनियन बँकेच्या शाखेवर शुक्रवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे 15 लाखांची रोकड लंपास केली. शनिवारी सकाळी बँक उघडल्यानंतर बँकेत चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरटे हे सराईत असल्याने त्यांनी डुप्लिकेट चावीच्या मदतीने बॅँकेचे कुलूप उघडून बँकेत चोरी केल्याचे समजले आहे. बँकेत चोरी झाल्याचे समजताच घटनास्थळी पोलिस आणि श्वानपथक दाखल झालं असून पुढील तपास सुरु आहे. चोरटयांना बँकेतील अधिकायांनी तर मदत तर केली नाही ना असा पोलिसांना संशय...
  July 9, 02:45 PM
 • मुंबई: मुंबईतल्या डांबरवाला बिल्डींग परिसरात दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याच्यावर हल्ला झाला होता. त्यात त्याच्या ड्रायवरची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी उमेद उर रहेमान आणि आसिद जान मोहम्मद शेख यांना न्यायालयाने शनिवारी 12 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. छोटा राजनच्या गँगमधील शार्पशूटर अशी ओळख असलेल्या उमेदला मुंबई क्राइम ब्रान्चने गोव्यातील आरम्बोल बीचवर अटक केली होती. त्याच्यासह त्याचे सावत्र वडिल आसिद जान मोहम्मद शेख यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले...
  July 9, 11:36 AM
 • मुंबई - गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अप्पर जिल्हाधिकारी संवर्गातील तब्बल ७५ अधिका-यांच्या मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी बदल्या केल्या. सनदी अधिका-यांखालोखाल महत्त्वाच्या मानल्या जाणा-या या संवर्गात महत्वाच्या पदावर वर्णी लागावी म्हणून गेल्या काही दिवसांपासून अधिका-यांनी लॉबिंग केल्यामुळे रात्री उशिरापर्यंत बदल्यांचा घोळ सुरू होता.मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने या बदल्या केल्या जात आहेत. मात्र अप्पर जिल्हाधिकायांच्या बदल्याचे अधिकार मुख्यमंत्र्याचे आहेत आणि त्यांना...
  July 9, 02:49 AM
 • मुंबई - दिवसभर पडत असलेला पाऊस आणि त्यात बिल्डरचा हलगर्जीपणा यामुळे मीरा रोड भागात ११ मजुरांना प्राण गमवावे लागले. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीची संरक्षक भिंत मजुरांच्या झोपड्यांवर कोसळली. एका मजुराची प्रकृती चिंताजनक आहे. तन्वी बिल्डरतर्फे हे बांधकाम काशिमीरा पोलिस स्टेशननजीक सुरू आहे. पाया खोदण्याचे काम सुरू असताना संरक्षक भिंतीजवळ माती टाकली जात होता. दिवसभराच्या पावसामुळे मातीचा दबाव वाढल्याने ही भिंत दुपारी जेवणाच्या वेळी विश्रांती घेत असलेल्या मजुरांच्या झोपड्यांवर...
  July 9, 02:47 AM
 • मुंबई- धमकीचे फोन येणे हे राजकारण्यांसाठी नवीन नाही. विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार कृष्णा हेगडे यांना एक असा एसएमएस आला की, ते घाबरण्याऐवजी आश्चर्यचकित झाले. कारण, एसएमएसद्वारे धमकी येणे हा प्रकार कुणाच्याही दृष्टीने धक्कादायकच. नांदेड येथील अडाणी आणि असहाय शेतक-याचा हा प्रताप होता. जीव प्यारा असेल, तर स्टेट बँक आॅफ इंडियाच्या ३१४९३०७५८ या खात्यावर २० हजार रुपये जमा करा. असे न केल्यास हकनाक जीव गमवावा लागेल, असा हा एसएमएस होता. हेगडे यांनी तत्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तपासाअंती हा...
  July 9, 02:30 AM
 • मुंबई- नवपरिणीत वधूची हनिमूनसाठी महाबळेश्वरला जाण्याची इच्छा असल्यामुळे आपल्याला बाहेर जाण्याची परवानगी द्यावी, ही १९९३च्या बॉम्बस्फोटांतील आरोपी अदनान मुल्ला याची विनंती उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यामुळे हनिमूनसाठी जाण्याचे मुल्लाचे स्वप्न भंगले आहे. न्यायमूर्ती एन. एच. पाटील आणि न्यायमूर्ती आर. वाय. गानू यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. या प्रकरणाचा खटला सुरू असून मुल्लावरील आरोपदेखील गंभीर आहेत. त्यामुळे हनिमूनसाठी त्याला बाहेर जाण्याची परवानगी नाकारत असल्याचे...
  July 9, 02:24 AM
 • मुंबई- ऐश्वर्या राय गरोदर असल्याच्या बातम्या आल्यानंतर लगेचच शिल्पा शेट्टीही गरोदर असल्याची बातमी आली होती; मात्र तिने या बातमीचे खंडन केले आहे. मी गरोदर असल्याच्या बातम्या तद्दन खोट्या आहेत. माझे व पती राज कुंद्राचे संबंध बिघडले असल्याच्या बातम्याही आमचे शत्रू जाणूनबुजून पेरत आहेत, असे शिल्पाने सांगितले. शिल्पाने म्हणाली की, माझ्या गरोदरपणाची आणि पती राजबरोबरचे संबंध बिघडल्याची बातमी इंटरनेटवर वाचून मला धक्काच बसला. या बातमीत काहीही तथ्य नाही. आजकाल आगापिछा नसलेल्या बातम्या...
  July 9, 02:13 AM
 
जाहिरात

RECOMMENDED