Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तो म्हणजे धारावीच्या पुनर्विकासाला विशेष प्रकल्प दर्जाची मान्यता देण्यात आली. मागील अनेक वर्षांपासून धारावीच्या पुनर्विकासाचा मुद्दा प्रलंबित होता. धारावीचा एकत्रित पुनर्विकास करण्यात येणार असून त्यासाठी जागतिक पातळीवर टेंडर मागवण्यात येईल. जागतिक निविदा प्रक्रियेद्वारे अंमलबजावणी करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. पुढील सात वर्षांत धारावी पुनर्विकास प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट...
  October 16, 04:15 PM
 • मुंबई- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. पर्रीकर स्वादूपिंडाच्या गंभीर आजारावर ग्रस्त आहेत. दरम्यान गोव्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे आमदार सुभाष शिरोडकर आणि दयानंद सोपटे यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन आमदारकीचा राजीनामा दिला आहे. आमदार विश्वजी राणे यवांनी केली मध्यस्थी.. आरोग्यमंत्री आणि भाजपचे आमदार विश्वजित राणे यांच्या मध्यस्थीने काॅंग्रेसचे दोन आमदार भाजपच्या गळाला लागले आहे. आमदार सोपटे...
  October 16, 02:47 PM
 • मुंबई- #Metoo या वादळाचा तडाखा बॉलिवूडमधील अनेक दिग्गज अभिनेत्यांना बसला आहे. त्यात संस्कारी बाबूजी अर्थात आलोक नाथ, नाना पाटेकर, कैलाश खेर, विकास बहल यांच्यासह अनेक अभिनेत्याचा समावेश आहे. या मंडळींवर अनेक अभिनेत्री तसेच महिलांनी लैंगिक शोषणाचा आरोप केला आहेत. आता मायानगरीतील एक अभिनेत्याने त्याच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराला वाचा फोडली आहे. सिनेम रेस-3 मध्ये सलमान खानच्या भावाची भूमिका केलेला अभिनेता साकिब सलिम याने त्याच्यावर झालेल्या लैंगिक गैरवर्तनाबाबत जाहीर वाच्यता केली आहे....
  October 16, 02:38 PM
 • मुंबई - सोमवारी मलाड वेस्टमध्ये माइंडस्पेसजवळ झुडपांमध्ये एका ट्रॅव्हल बॅगमध्ये आढळलेल्या 20 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाचे रहस्य पोलिसांनी अवघ्या 4 तासांतच उलगडले आहे. हा मृतदेह मॉडेल मानसी दीक्षितचा आहे. मानसीच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी तिच्या एका मित्राला अटक केली आहे. यामुळे झाली मॉडेलची हत्या बांगूरनगर पोलिसांच्या मते, मिल्लतनगरातील रहिवासी मुजम्मिल सईद (20) नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. मुजम्मिलने आपला गुन्हा कबूल केला आहे. त्यने सांगितले की, घटनेच्या वेळी...
  October 16, 12:36 PM
 • मुंबई -अवघ्या सहा महिन्यांत राज्य भारनियमनमुक्त करू, या प्रमुख घोषणेसह भाजपने आपल्या २०१४ च्या निवडणूक जाहीरनाम्यात विजेच्या संदर्भात दिलेले एकही आश्वासन राज्यातील विद्यमान भाजप सरकारला पूर्ण करता आलेले नाही. याउलट राज्याच्या ऊर्जा विभागाचा सध्याचा कारभार हा जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाच्या अगदी विपरीत दिशेने सुरू असल्याचे चित्र आहे. जाहीरनाम्यात विजेच्या संदर्भात काय होत्या घोषणा आणि काय आहे वस्तुस्थिती याचा दिव्य मराठीने घेतलेला आढावा. चार वर्षांपूर्वी विधानसभा...
  October 16, 10:03 AM
 • मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही प्रखर हिंदुत्वाचा अंगीकार करणार असून दसरा मेळाव्यात हिंदुत्वाचा एल्गार करीत राम मंदिर बांधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर निकराचा हल्लाबोल करणार आहेत. दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे हिंदुत्वावरून भाजपवर निशाणा साधणार असल्याची माहिती शिवसेनेतील सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या मते, दसरा मेळावा शिवसैनिकांसाठी उत्सव असायचा. बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक येत. उद्धव...
  October 16, 09:58 AM
 • मुंबई - राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरपोच दारू देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे वक्तव्य केल्याने सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. विरोधकांसोबतच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याचे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळग्रस्तांना मदत देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात शिवसेनेने जारी केलेल्या पत्रकात...
  October 16, 09:11 AM
 • मुंबई - लालबागच्या राजाकडे नवस करण्यासाठी रांगा लावून दर्शनाची आस असलेल्या भाविकांप्रति मंडळाच्या कार्यकर्त्यांची वाढलेली अरेरावी व थेट पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत गेलेली मजल आता संपुष्टात येणार आहे. अनेक वर्षे सरकार मंडळावर वचक बसवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हे शक्य होत नव्हते. आता एक समिती स्थापन करून मंडळाच्या कामकाजावर देखरेख करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. लालबागचा राजा...
  October 16, 09:09 AM
 • मुंबई- दादर फुलमार्केटमध्ये शुक्रवारी सकाळी साडे सात वाजता मनोजकुमार मौर्य (35) यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी दादर पोलिसांनी दोन मारेकर्यांना अटक केली आहे. दिल्लीतील एका व्यावसायिकाने ही हत्या घडवून अाणल्याचे समोर आले आहे. मारेकर्यांन 50 हजार रुपयांत मनोज यांच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. मिळालेली माहिती अशी की, मनोजकुमार मौर्य यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी राजेंद्र अहिरवार (30) आणि हेमेंद्र कुशवाह (19 ) या दोघांना अटक केली आहे.दिल्लीतील व्यावसायिक...
  October 15, 07:48 PM
 • मुंबई- राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणार्या शिवस्मारकाच्या कामास अखेर मुहुर्त मिळाला आहे. मुंबईजवळील अरबी समुद्रात उभरण्यात येणार्या शिवस्मारकाच्या प्रत्यक्ष कामास येत्या 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी दिली आहे. शिवस्मारकासाठीच्या अपेक्षित खर्चात 643 कोटींनी वाढ झाल्याचेही मेटे यांनी सांगितले आहे. कुठे होणार शिवस्मारक? - मुंबईजवळील अरबी समुद्रात...
  October 15, 07:48 PM
 • मुंबई- उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घरपोच दारू देण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार असल्याचे वक्तव्य केल्याने सरकार चांगलेच अडचणीत आले आहे. विरोधकांसोबतच सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही यावर टीका केली आहे. घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्याचा प्रकार हास्यास्पद आणि धक्कादायक असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेने जारी केलेल्या पत्रकात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, घरपोच दारूच्या बाटल्या पोहोचवण्यापेक्षा महाराष्ट्रातील...
  October 15, 07:10 PM
 • मुंबई- लालबागच्या राजाकडे नवस करण्यासाठी रात्रंदिवस रांगा लावून दर्शनाची आस असलेल्या भाविकांप्रति मंडळाच्या कार्यकर्त्यांची वाढलेली अरेरावी आणि चक्क पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत गेलेली मजल आता संपुष्टात येणार आहे. गेली काही वर्षे सरकार मंडळावर वचक बसवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे हे शक्य होत नव्हते. आता धर्मादाय आयुक्तांनी एक समिती स्थापन करून मंडळाच्या कामकाजावर देखरेख करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी दिव्य...
  October 15, 07:03 PM
 • मुंबई/ दिल्ली- हरियाणातील पलवळमधील उटावड येथे उभारण्यात येणार्या मशिदीसाठी पाकिस्तानी दहशतवादी हाफिज सईदची संघटना संगठन लश्कर-ए-तोयबाने पैसा पुरविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संदर्भात एनआयए चौकशी करत आहे. चौकशी अंती पोलिसांनी तीन जणांना दिल्लीतून अटक केली होती. त्यापैकी एक आरोपी मोहम्मद सलमान हा उटावड येथील राहाणारा आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली मशिदीचे बांधकाम सुरु होते. 3 ऑक्टोबरला एनआयए आणि पोलिसांनी उटावडमध्ये केली चौकशी.. एनआयएने पोलिसांच्या मदतीने 3 ऑक्टोबरला...
  October 15, 04:31 PM
 • पीडित विद्यार्थिनीने स्किन प्रॉब्लमनंतर स्लीवलेस ड्रेस परिधान केला होता विद्यार्थिनींच्या आंदोलनानंतर वार्डनला पाठविले सक्तीच्या रजेवर.. मुंबई- एसएनडीटीच्या विद्यार्थिंनी जुहू परिसरातील हॉस्टेलच्या वॉर्डनवर लैंगिक शोषण आणि जबरदस्तीने कपडे उतरविण्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी सोमवारी सकाळी सांताक्रूज पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थिनींनी विद्यापीठाकडे वॉर्डनला निलंबित करण्याची मागणी केली होती. रविवारी विद्यापीठाच्या गेटवर आंदोलन केले होते....
  October 15, 03:15 PM
 • मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील वाद मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिस सोमवारी प्रमुख साक्षीदार डेजी शाह हिचा जबाब नोंदविणार आहेत. शाह हिला ओशिवारा पोलिस स्टेशनमध्ये बोलविण्यात आले आहे. नाना पाटेकर यांनी आपल्यासोबत गैरवर्तवणूक केली तेव्हा डेजी शाह तिथे उपस्थित होती. डेजी असिस्टेंट कोरियोग्राफर म्हणून काम करत होती, असे तनुश्रीने पोलिसांत तक्रार देताना सांगितले होते. डेजी शाह हिने या प्रकरणी तनुश्रीला...
  October 15, 03:07 PM
 • मुंबई - एअर इंडियामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमान उड्डान घेण्यासाठी सज्ज होते. त्याचवेळी अचानक एक एअर होस्टेस विमानातून खाली पडली. ती गंभीररित्या जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विमान कंपनीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय-864 मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी सज्ज होते. त्यावेळी चालक दलच्या महिला सदस्याने दार बंद करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तोल गेल्याने ती...
  October 15, 10:35 AM
 • मुंबई - राज्यातील साखर कारखाने शेतकऱ्यांकडून ऊस घेताना वजनकाट्यात माप मारत असल्याची अनेक शेतकऱ्यांची व शेतकरी संघटनांची तक्रार असते. त्याची दखल घेऊन मागच्या हंगामात गाळप घेतलेल्या खासगी आणि सहकारी अशा १८६ साखर कारखान्यांच्या वजनकाट्यांची संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात अाली. त्याचा अहवाल नुकताच सहकार विभागाला सादर करण्यात अाला असून त्यात एकाही कारखान्याच्या वजनमापात घाेळ नसल्याचे स्पष्टीकरण या पथकांनी दिले अाहे. या पथकात वैधमापन शास्त्रचे...
  October 15, 08:21 AM
 • नवी दिल्ली/मुंबई- देशातील सर्वात मोठी सरकारी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोबाइल क्रमांक जोडणी बंधनकारक केली आहे. मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला नाही तर या ग्राहकांची नेट बँकिंग सुविधा बंद केली जाऊ शकते. ग्राहकांना मोबाइल क्रमांक नोंदणीसाठी आपले खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जावे लागेल. आपला मोबाइल क्रमांक खात्याशी जोडला गेलेला आहे की नाही याची पडताळणी ग्राहक एसबीआय.डॉट कॉमवर करू शकतील. ग्राहकांना एसएमएस आणि इ-मेल अलर्टसाठी मोबाइल क्रमांक...
  October 13, 09:04 PM
 • मुंबई- शिवसेना स्वबळावर लढण्याचे म्हणत असली तरी लोकसभेसाठी शिवसेना-भाजपमध्ये युती होईल आणि विधानसभेसाठी दोघेही वेगळे लढतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना केले. तसेच काही दिवसांपूर्वी लोकसभा-विधानसभा निवडणुका एकत्र होतील, असे भाकीत त्यांनी वर्तवले होते, मात्र यावर बोलताना त्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचे भाकीत वर्तवले. रफाल प्रकरणावर प्रतिक्रिया विचारता शरद पवार म्हणाले, रफाल...
  October 13, 08:47 PM
 • मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्यातील #Metoo वाद टोकाला पोहोचला आहे. नाना पाटेकर यांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी तनुश्री दत्ताने शनिवारी केली आहे. तनुश्रीने आपल्या वकिलांमार्फत ओशिवरा पोलिसांना अर्ज करुन ही मागणी केली आहे. दरम्यान, लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तनुश्रीने नाना पाटेकरा यांच्या विरोधात तक्रार नोंदवली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांनीही तनुश्रीला कायदेशीर नोटिस बजावली आहे. त्या दिवशी सेटवर घडले ते...
  October 13, 08:14 PM
 
जाहिरात

RECOMMENDED