जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई - रामदास आठवलेंवर आमचे कोणतेही उपकार नाहीत. ते स्वतंत्र आहेत. त्यांनी जेथे जायचे तेथे त्यांना जाऊ द्यात. आपल्याला फक्त एकाच गोष्टीची चिंता आहे, ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे आता काय होणार? असा सवाल करीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारच्या मेळाव्यात शिवशक्ती-भीमशक्तीवर जोरदार कोरडे ओढले. दिव्य मराठीने सर्वात प्रथम जे वृत्त प्रसिद्ध केले होते त्या दादर स्थानकाला चैत्यभूमी हे नाव देण्यावरही आजच्या मेळाव्यात शिक्कामोर्तब करण्यात आले. राष्ट्रवादी...
  June 11, 03:07 AM
 • मुंबई - राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन सोहळ्यात गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवराळ भाषेला उत्तर देताना केलेल्या वक्तव्याने शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच घायाळ झालेले आहेत. त्यामुळेच लगेच एक पत्रक काढून त्यांनी आबांच्या उत्तराला प्रत्युत्तर दिले आहे.सोमय्या मैदानात आयोजित सोहळ्यात उद्धव ठाकरेंच्या शिवराळ भाषेला उत्तर देताना आर. आर. पाटील यांनी म्हटले की, आम्हाला अशा इरसाल शिव्या येतात ज्या उद्धव ठाकरे यांनी कधीही ऐकल्या नसतील. त्यातली एक जरी शिवी पडली तर...
  June 11, 02:58 AM
 • मुंबई - मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी १ हजार ८८ कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १९० कोटी रुपये ३१ जुलैपर्यंत देण्याचा आदेश कृषी व पशुसंवर्धन खात्याने काढला असून महसूल व वन खात्याकडून या रकमेची तरतूद करण्यात आली आहे. अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आणि काही कारणांमुळे गेल्या तीन वर्षात राज्यातील शेतक-यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यांना नुकसानभरपाई मिळावी या मागणीसाठी सत्तारूढ व विरोधी पक्षातर्फे सतत मागणी केली जात असे. या...
  June 11, 02:55 AM
 • मुंबई । पुण्याचा घोडे व्यापारी हसन अली खान याच्या बनावट पासपोर्ट प्रकरणात पनामा येथील भारताचे राजदूत विष्णू हाडे यांचेही नाव घेतले जात असून मुंबई पोलिसांनी शुक्रवारी त्यांना चौकशीसाठी पाचारण केले आहे. पोलिसांनी हाडे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे पत्र पाठवले असून त्याबाबत अजून वेळ निश्चित केलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) रजनीश सेठ यांनी दिली. खान याच्या पासपोर्ट प्रकरणात मुंबई पासपोर्ट अधिकायाने हाडे यांच्या सांगण्यावरून खानचा पासपोर्ट त्वरित मंजूर केला...
  June 11, 02:48 AM
 • मुंबई । २६ जुलैच्या महाप्रलयंकारी पावसामुळे मुंबईत डॉप्लर रडार बसवण्याची योजना सरकारने जाहीर केली होती. पण हे डॉप्लर रडार बसविण्यासाठी गेल्या सात वर्षात अनेक अडचणी येत होत्या. मात्र, आता सर्व अडचणींचा अडथळा पार करत डॉप्लर रडार मुंबईसह नागपूरमध्ये बसविण्यात आले आहे. या डॉप्लर रडारमुळे नैसर्गिक संकटांना प्रभावीपणे तोंड देता येऊ शकते. मुसळधार पाऊस पडणारे ढग आणि समुद्रात निर्माण होणारे चक्रीवादळ यांची आधीच माहिती मिळविण्यासाठी सध्या जगात डॉप्लर रडार हे सर्वाधिक प्रभावी तंत्रज्ञान...
  June 11, 02:46 AM
 • मुंबई - विहिरीला पाणी नाही, सातबारा मिळत नाही, पिकांचं नुकसान झालं, शाळेची भिंत पडली, जातीचा दाखला हवाय... असे अनेक स्थानिक पातळीवरचे प्रश्न घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय, मंत्रालयात येणा-या आणि तासन्तास प्रवेशाच्या रांगेत ताटकळत राहून मग मंत्र्यांच्या दालनाबाहेर दिवस खर्च करणा-या ग्रामीण जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी आता अधिकारीच त्यांच्या गावात जाणार आहेत. लोकशाही दिनाच्या पार्श्वभूमीवर आता प्रत्येक ग्रामपंचायतीत राज्य शासनाच्या वतीने ग्रामस्थ दिन सुरू करण्यात येणार आहे....
  June 11, 02:45 AM
 • मुंबई - मुंबईला भेडसावणा-या विविध प्रश्नांबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी मंत्रालयात विरोधी पक्ष आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली. याप्रसंगी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी फक्त आमदारांबरोबर चर्चा करण्याऐवजी विविध विभागांच्या अधिका-यांनाही बैठकीला बोलावण्याची सूचना केली. तर मुंबईच्या दृष्टीने धोरणात्मक विषय मांडले तर मला निर्णय घेणे योग्य होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विरोधी पक्षाच्या आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे मुंबईच्या समस्येबाबत चर्चा करण्यासाठी...
  June 11, 02:43 AM
 • मुंबई । भरधाव वेगाने येणा-या ट्रकने धडक दिल्याने सायकलवरून जाणाया १४ वर्षीय मुलाचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या प्रकरणी कासारवडवली पोलिसांनी ट्रकचालक राजेंद्र गौड याला अटक केली आहे. सुमीत नगराळे (वय १४) हा गुरुवारी सकाळी सात वाजता सायकलवरून घोडबंदरहून नागरा बंदरच्या दिशेने जात होता. या दरम्यान भरधाव येणाया ट्रकने सुमीतला धडक दिली. त्यानंतर आजूबाजूला जमलेल्या लोकांनी सुमीतला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
  June 11, 02:42 AM
 • मुंबई - बॉलीवूडमध्ये गंभीर विषयावर चित्रपट बनविण्यात हातखंडा असलेल्या प्रकाश झा यांच्या आगामी आरक्षण या चित्रपटाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चनची भूमिकादेखील जरा हटके असणार आहे. या चित्रपटात अमिताभच्या वाट्याला आरक्षणाचे समर्थन करणारी भूमिका आली आहे. तो एका शिक्षकाची भूमिका करत असून, आरक्षण हे समाजातील काही दुर्बल घटकांना आधार देत असते, अशा आशयाची ही भूमिका असणार आहे. या चित्रपटात आमचा जात-पात या गोष्टीवर विश्वास नाही; परंतु असे आरक्षण दिल्याने काही लोकांना...
  June 11, 02:41 AM
 • मुंबई- राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बाराव्या वर्धापनदिनानिमित्त शुक्रवारी येथे आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक हक्क परिवर्तन परिषदेमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करण्यामध्ये सर्वच नेत्यांमध्ये चढाओढ लागल्याचे चित्र होते.शरद पवारांप्रती आपली निष्ठा दाखविण्याची एकही संधी नेत्यांनी सोडली नाही.सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर सामाजिक परिवर्तन जर कोणी केले असेल तर ते फक्त शरद पवार यांनीच, असे सांगून टाकले. मराठवाड्यातील...
  June 10, 03:54 PM
 • मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 12 वर्धपनदिनानिमित्त आयोजित मेळाव्याचा परिणाम मुंबईतील वाहतुकीवर झाला. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतूक खोळंबली. तर मुंबईत प्रवेश करणारी जवळपास सगळीच रस्ते जाम झाली आहेत. मुंबई- पुणे महामार्गाच्या बाजुला असलेल्या चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर या समता हक्क परिवर्तन परिषदेचे आयोजन करण्यात आले होतो. राज्यभरातून कार्यकर्ते मुंबई दाखल झाले होते. कार्यकर्त्यांनी आपली वाहने दोन लाईनमध्ये मेगा हायवेच्या बाजुने लावली होती. त्यामुळे हायवेवर जाम लागला...
  June 10, 03:34 PM
 • मुंबई: मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात आज,(शुक्रवार) सकाळपासूनच सुरु झालेल्या पावसामुळे सुखद गारवा निर्माण झाला आहे. आतुरतेने मृगाच्या पावसाची वाट पाहणारे मुंबईकर चिंब झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत संततधार पाऊस सुरू झाला आहे. एका बाजूला पहिल्या पावसाचे स्वागत तर दुस-या बाजूला पावसामुळे कामे खोळंबल्याने नाके मुरडली जात आहे. काही भागात पाणी साचल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही गाडया उशिराने धावताहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील...
  June 10, 11:44 AM
 • कल्याण: अंबरनाथ येथून सुटणारी अंबरनाथ-सीएसटी लोकलमध्ये शिवशक्ती- भीमशक्तीच्या महामेळाव्याला जाणया शिव-भीमसैनिकांनी चांगलाच धिंगाणा घातला. त्यामुळे मुंबईतील चाकरमान्यांना मात्र प्रचंड त्रास सहन करावा लागला. दोनशेच्या जवळपास कार्यकर्ते मोर्चासाठी अंबरनाथ स्थानकावर थांबले होते. फलाट क्र. 2 वरुन सुटणारी सीएसटी लोकमध्ये ते सर्व कार्यकर्ते शिरले आणि लोकलच्या डब्यात आणि दरवाज्यात भगवे-निळे झेंडे लावले. एवढेच नव्हे तर काही कार्यकर्त्यांनी मोर्चाचे बॅनर आणि झेंडे मोटरमनच्या...
  June 10, 11:13 AM
 • मुंबई: आठवलें तुमची मला चिंता वाटते. तुम्ही ज्या मार्गाने गेला आहात तो मार्ग डॉ. बाबासाहेबांच्या विचारांपासून दूर नेणारा आहे. जरा विचार करा! अशा मार्मिक शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामदास आठवले यांचे कान टोचले. राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून समता हक्क परिवर्तन परिषदेचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते. राज्याच्या विविध भागांतून असंख्य कार्यकर्ते भर पावसात या परिषदेला उपस्थित होते. मुंबईतच गुरुवारी शिवशक्ती आणि भीमशक्ती मेळाव्यानंतर या...
  June 10, 09:41 AM
 • मुंबई - राज्यातील सरकारविरोधात शिवशक्ती-भीमशक्तीने गुरुवारी आयोजित केलेल्या महामेळाव्याचा पावसाने फज्जा उडविला. दुपारपासून सुरू झालेल्या पावसाने शिवसैनिक- भीमसैनिकांना आझाद मैदानापासून दूरच ठेवल्याने या मेळाव्याची अवस्था अगदीच केविलवाणी झाली होती. या सभेला मुंबईकर शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्त्यांची गर्दी कमी होती. मात्र बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांची बयापैकी उपस्थिती होती. लाखोंच्या गर्दीची स्वप्ने पाहणा-या या महामेळाव्याला अवघे २५ हजारांच्या आसपासच गर्दी असल्याने...
  June 10, 03:18 AM
 • मुंबई - मंत्री आणि आमदार यांनी एखाद्या प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिस स्टेशनला दिलेल्या सूचना किंवा फोन यांची नोंदणी करू नये, या राज्य सरकारच्या पत्रकावर मुंबई उच्च न्यायालयाने टीका केल्यानंतर त्यात कायद्याप्रमाणे आवश्यक त्या सूचनांची नोंद करावी, असा बदल करण्यात येणार आहे.सरकारने ११ नोव्हेंबर २०१० रोजी काढलेल्या परिपत्रकावर न्यायालयाने बुधवारी टीका केली होती. सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी या पत्रकाविरोधात याचिका दाखल केली होती. पोलिसांनी मंत्री किंवा आमदारांच्या सूचना का...
  June 10, 03:11 AM
 • मुंबई - जमिनीवरून पाण्यावर किंवा पाण्यावरून नौकेवर अशा प्रकारे सर्वत्र सहज संचार करण्यास सक्षम असणा-या आणि तरीही प्रचलित हेलिकॉप्टर अथवा विमानापेक्षाही स्वस्त असणारी आणि पर्यटकांचा आनंद द्विगुणीत करणारी विमानसेवा (अँफिबियन विमान) लवकरच राज्यात सुरू होणार आहे. मेहेर या कंपनीने आज त्याबाबत पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांना सादरीकरण केले, त्यावर जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत महाराष्ट पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्य शासनाला ठोस प्रस्ताव सादर केल्यास दिवाळीपर्यंत ही सेवा...
  June 10, 03:08 AM
 • मुंबई - जगविख्यात चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या निधनानंतर त्यांना आदरांजली वाहत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हुसेन यांचा दफनविधी भारतात व्हावा, अशी इच्छा व्यक्त केली आहे.हिंदू देव-देवतांच्या अश्लिल चित्रे काढल्यामुळे वादात अडकलेल्या एम एफ हुसेन यांना 2006 साली भारताबाहेर जावे लागले होते. त्यामुळे भारतात त्यांच्याविषयी अनेकांच्या मनात राग होता. मुळचे व्यंगचित्रकार असलेले राज ठाकरे यांनी हुसेन यांना आदरांजली वाहिली आहे. मराठीच्या मुद्द्यावर लढणारे राज ठाकरे...
  June 9, 02:42 PM
 • मुंबई: स्थानिक संस्था कर रद्द होणार नाही, तो व्यापा-यांना भरावाच लागेल. अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एलबीटीसंदर्भात झालेल्या बैठकीत सांगितले. सह्याद्री अतिथीगृहात बुधवारी ही बैठक झाली. बैठकीला सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, व्यापारी महासंघाचे अतुल शहा, प्रदीप कापडिया, सदानंद कोरगावकर, सुधीर आपटे तर शासनाचे प्रतिनिधी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, महानगरपालिकेचे एलबीटी अधिकारी संजय सरनाईक उपस्थित होते. जकात...
  June 9, 11:00 AM
 • मुंबई: राज्यात भ्रष्टाचार करणा-या, महागाईने जनतेला त्रासून सोडणा-या आणि दलितांवर अत्याचार करणा-या आघाडी सरकारविरोधात येथील आझाद मैदानावर शिवशक्ती- भीमशक्ती एकवटली. सरकारला उलथून पाडण्यासाठी जनतेकडून पाठिंब्याची गरज आहे, असे या महामेळाव्यात आवाहन करण्यात आले. मेळाव्याला शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले, शिवसेना नेते मनोहर जोशी, भाजपचे एकनाथ खडसे, शिवसेना महिला आघाडीच्या अध्यक्षा निलम गो-हेसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र...
  June 9, 10:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात