जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई- प्रसिद्ध चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांच्या पाली हिल्स भागातील बंगल्याच्या निरीक्षणासाठी स्थानिक न्यायालयाने आयुक्तांची नियुक्ती केली होती. या निर्णयाला आव्हान देणारी दिलीपकुमार यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली. प्रसिद्ध चित्रपट कलावंत दिलीपकुमार यांचा पाली हिल्स येथे इतर चित्रपट कलावंतांच्या रांगेतच आलिशान बंगला आहे. या बंगल्याची किंमत सुमारे शंभर कोटी असल्याचे सांगितले जाते. १९५३ मध्ये दिलीपकुमार यांनी हा बंगला किरायाने घेतला होता. या...
  June 9, 01:32 AM
 • मुंबई - मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर झालेल्या एका विचित्र अपघातात तीन जण ठार झाले आहेत. एक्सप्रेस हायवेवरील फुडमॉलजवळ ट्रक, टेम्पो, कार आणिर एक अज्ञात वाहन अशा चार गाड्या एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा अंत झाला आहे. मृतांमध्ये कारमधील दोन लहान मुलं आणि एका महिलेचा समावेश आहे. या अपघातातील सहा जखमींना नवी मुंबईच्या एमजीएम हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
  June 8, 11:17 PM
 • मुंबई - कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने आघाडी धर्माचे पालन नकरण्याचाच विचार पक्का केला आहे की काय असा प्रश्न सध्या पडत आहे. मुंबई महापालिकेच्या दोन वॉर्डातील पोटनिवडणूकांत आघाडी धर्म पाळण्या एवजी दोन्ही पक्षांनी स्वतंत्र उमेदवार देवून आघाडीत बिघाडी झाल्याचे स्पष्ट केले आहे. वॉर्ड क्रमांक 111 (कांजूर) आणि वॉर्ड क्रमांक 181 (माहीम) या दोन वॉर्डात पोटनिवडणूक होत आहे. यातील एका जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसने दावा केला होता.मात्र, या दोन्ही वॉर्डात मागच्या निवडणुकांत कॉंग्रेसच्या...
  June 8, 08:27 PM
 • मुंबईतील स्कायवॉक हा अत्यंत चर्चेचा विषय झाला होता. स्कायवॉक प्रकल्पावर झालेला खर्च आणि सर्व स्थरातून झालेल्या विरोधाचा परिणाम म्हणून आता पुन्हा स्कायवॉक न उभारण्याचा निर्णय 'एमएमआरडीए'ने घेतला आहे. इंडियन मर्चंट चेंबरने आयोजित केलेल्या चर्चासत्रात महानगर आयुक्त राहुल अस्थाना यांनी ही माहिती दिलीय. 'एमएमआरडीए' चे मुंबई व्हिजन कार्यक्रमातंर्गत 'आयएमसी' ने महानगर आयुक्त अस्थाना यांना निमंत्रित केले होते. , स्कायवॉक हा एक प्रयोग होता. त्याचा पुनर्विचार करण्याची गरज वाटल्याने आता नवे...
  June 8, 06:35 PM
 • मुंबई - देशातील सर्वात उत्तम सार्वजनिक बससेवा, असा लैकिक असलेल्या मुंबईच्या बेस्ट सेवेतील वाहकांकडून महिला प्रवाशांना चांगली वागणूक मिळत नाही. यामुळे ब-याच महिला वाहकांना घाबरतात. बसमधून प्रवास करताना त्यांना घाबरतात. बसमधून प्रवास करताना त्यांना असुरिक्षत वाटते, असा निष्कर्ष अमेरिकेतील एका आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनीने एका सर्वेक्षणातून काढला आहे. विशेष म्हणजे, या सर्वेक्षणाचा अहवाल मंगळवारी जागतिक बँकेला मुंबईत सादर करण्यात आला. डबगर्ल ग्लोबल अॅडव्हाझर्स या आंतराराष्ट्रीय...
  June 8, 04:23 PM
 • मुंबई-प्रगतीशील महाराष्ट्राला विविध गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून झोपडपट्टीमुक्त करण्याचा दावा राज्य सरकारकडून सातत्याने केला जात असला तरी तब्बल 40 टक्के जनता आजही झोपडपट्टीतच राहत असल्याची गंभीर बाब केंद्राच्या नगरविकास उच्चाधिकार तज्ज्ञ समितीने राज्य शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. दळणवळणाच्या सुविधांच्या बाबतीतही राज्य मागास असल्याचा ठपका या समितीने ठेवला आहे. केंद्रीय नगरविकास विभागाने नियुक्त केलेल्या नागरी पायभूत सुविधा उच्चाधिकार समितीच्या अहवालाचे आणि...
  June 8, 07:41 AM
 • मुंबई - पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयने आता बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्यावर निशाणा साधला आहे. शाहरुख खानचा बहुचर्चित रा-वन हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्याची वेबसाइट हॅक करण्यात आयएसआयचा हात आहे.मागील आठवड्यात सलमान खानचा रेडी प्रदर्शित झाल्यानंतर काही तासांतच हा चित्रपट पाकिस्तानमधील काही वेबसाइटवर उपलब्ध झाला होता. त्यामुळे निर्मात्यांचे मोठे नुकसान झाले. आयएसआयच्या निशाण्यावर आता शाहरुख खान व सलमान खान असल्याचे बोलले जात आहे. कोट्यवधींची...
  June 8, 06:53 AM
 • मुंबई - सीआयडी मालिकेतील कलाकारांचे आता पडद्यावर लग्न लावून द्यावे. अनेक वर्षे झाली, सीआयडीचे सगळेच कलाकार एकटेच आहेत. त्यांचे लग्न होणार की नाही, याची मला काळजी वाटते, अशा खेळीमेळीच्या वातावरणात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी सीआयडीच्या कलाकारांची भेट घेतली. गेल्याच आठवड्यात या टीमला लता मंगेशकर यांनी आपल्या घरी जेवणासाठी आमंत्रित केले होते.गेल्या 14 वर्षांपासून सोनी टीव्हीवर सीआयडी मालिका सुरू आहे. लतादीदी या मालिकेच्या फॅन आहेत. या मालिकेतील सर्व कलाकार लता मंगेशकर यांना खूपच...
  June 8, 06:47 AM
 • मुंबई - इतिहासातील काका मला वाचवा हे भयोद्गार सर्वांनाच ठाऊक आहेत. मात्र राज्याच्या नव्याने रचल्या जाणा-या राजकीय इतिहासात पुतण्या तू असे केलेस तर मी वाचणार नाही हे उदगार आता सर्वतोमुखी होऊ शकतील, अशी परिस्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी शिवसेना-भाजपला शिंगावर घेतल्याचे पाहून चिडलेल्या शरद पवार यांनी पक्षातील आपल्या विश्वासू साथीदारांकरवी हा प्रकार तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यामागे येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर दीड-दोन वर्षांतच...
  June 8, 05:28 AM
 • मुंबई - भीमशक्ती-शिवशक्ती युती आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत दादर चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार काँग्रेस पक्षाने केला आहे. त्यासाठी इंदू मिलची जागा मिळावी यासाठी मुख्यमंत्री आता थेट पंतप्रधानांना साकडे घालणार आहेत.प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे यंदा सामाजिक समता वर्ष साजरे केले जात असून समाजातील दुर्बल घटकांचे प्रश्न सुटावेत यासाठी सर्व प्रश्नांचा मसुदा तयार करण्यासाठी पक्षाच्या वतीने डॉ....
  June 8, 05:24 AM
 • मुंबई - काँग्रेस आघाडी सरकारच्या विरोधात एकत्र आलेल्या शिवशक्ती-भीमशक्तीने ९ जून रोजी आयोजित केलेल्या मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून, पाऊस आला तरीही हा मोर्चा यशस्वी होणारच, असे ठाम प्रतिपादन शिवसेना-भाजप आणि रिपाइंच्या नेत्यांनी मंगळवारी केले. या मोर्चाच्या तयारीबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोहे, भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस अनिल देसाई, भाजपचे विनोद तावडे, राज पुरोहीत, पराग अळवणी, अतूल भातखळकर आणि रिपाइंचे अर्जुन डांगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती दिली. नीलम गोहे...
  June 8, 05:19 AM
 • मुंबई - रामदेव बाबा यांचे शांततेच्या मार्गाने चाललेले आंदोलन पोलिसी दडपशाहीने मोडून काढण्याची नैतिक जबाबदारी घेऊन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) अध्यक्ष रामदास आठवले यांनी मंगळवारी केली. रामदेव बाबांना पाठिंबा देणारे पाकिस्तानी नव्हे, तर भारतीयच होते. असे असताना हे आंदोलन ज्या प्रकारे काँग्रेसने मोडून काढले ते समर्थनीय नाही. सरकारच्या या कारवाईने आणीबाणीची आठवण करून दिली. आणीबाणीनंतर जसे सगळे विरोधी...
  June 8, 05:17 AM
 • मुंबई । मालाड येथे चार तरुणांच्या झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलीस अजूनही आरोपींपर्यंत पोहोचलेले नाहीत. मात्र या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा योग्य तपास न केल्याप्रकरणी कुरार व्हिलेज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. एन. संख्ये यांची मंगळवारी तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रविवारी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचे पर्यवसान चार तरुणांची निर्घृण हत्या करण्यात झाले होते. स्थानिकांनी पोलिसांवर आरोप केला होता की,...
  June 8, 05:14 AM
 • मुंबई - स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता राज्य सरकार सचिन आणि सुप्रिया पिळगावकर यांची मदत घेणार असून त्यांच्या माध्यमातून राज्यात जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. मोबाइल व इलेक्ट्रिसिटीची बिले, पाण्याच्या बाटल्या यांवरही संदेश आणि लोगो लावण्यात येतील, अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. आरोग्य विभागातर्फे स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीवर त्या सदस्य आहेत. बीड, औरंगाबाद, पुणे, जळगाव आणि सातारा जिल्ह्यांमध्ये मुलींचा जन्मदर खूपच कमी असल्याने या...
  June 8, 05:13 AM
 • पाकिस्तानी गायक अदनान सामीला परदेशातील कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी देशाबाहेर जाण्याची परवानगी उच्च न्यायालाने दिली आहे. यामुळे अदनानला दुबई, आॅस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेतील कार्यक्रमात सहभागी होता येणार आहे. परवानगी देतानाच अदनानने त्याविरोधात सुरू असलेल्या खटल्यास उपस्थित राहण्यासह दीड कोटी रुपयांची हमी देण्यास सांगण्यात आले आहे.याशिवाय फेमाअंतर्गत खटल्यास हजर राहण्याच्या प्रमुख अटीसह दीड कोटी रुपयांची हमीही देण्यास सांगितले आहे. खटल्यास गैरहजर राहिल्यास...
  June 7, 11:37 PM
 • मुंबई: मालाडजवळ असणा-या कुरार व्हिलेजजवळ चार युवकांची गळा चिरून हत्या झाल्याप्रकरणी निष्काळजीपणाच्या आरोपावरुन कुरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मोहन संख्ये यांची सोमवारी तडकाफडकी बदल करण्यात आली. संख्ये यांनी तपासात दिरंगाई केली असा आरोप चारही तरुणांच्या नातेवाईकांनी केला होता. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलीस विभागाने सांगितले. त्यांच्या जागी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण नलावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, मालाड जवळ असणा-या कुरारजवळ राहणा-या...
  June 7, 11:04 PM
 • मुंबई: मुंबईतील सगळ्यात मोठा समजला जाणारा लालबागच्या उड्डाण पुलाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते मंगळवारी उद्घाटन करण्यात आले. वाहतुकीसाठी हा पुल खुला करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील हा चौथा मोठा पूल असून त्यामुळे सीएसटी ते सायन अंतर या पुलामुळे कमी झाले आहे. हा पुल बांधण्यासाठी दीडशे कोटी रुपये खर्च आला आहे.
  June 7, 10:43 PM
 • मुंबई: येत्या 24 तासात संपूर्ण राज्यासह देशाच्या काही भागात वरुणराजाचे आगमन होणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले आहे. झारखंड आणि बंगालच्या उपसागरात काही ठिकाणी हवेचा उच्च दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे अरबी समुद्र, महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात मान्सून सक्रिय होणार असल्याचेही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमान निकोबार, केरळ,महाराष्ट्र, गुजरात राज्यात ठिकाणी पाऊस होईल. तर दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाबमधील हवामान मात्र उष्ण राहील, असा...
  June 7, 09:23 PM
 • मुंबई- समुद्रकिनार्यावर होणारे अनधिकृत बांधकाम तोडण्याचे अधिकार जिल्हाधिकारी व सागर तटीय संनियंत्रण समितीला देण्यात आले आहेत. त्यामुळे आता तरी तटीय क्षेत्रावरील अनधिकृत बांधकामांना आळा बसेल, असे राज्य पर्यावरण विभागाला आशा आहे.राज्याला फार मोठा समुद्र किनारा लाभलेला आहे. या ठिकाणी वाढणारी पर्यटकांची संख्या पाहून अनधिकृत बांधकामांते पेव फुटले आहे. चिरीमिरी घेऊन स्थानीय अधिकार्यांकडून अशा बांधकामांना अभय दिले जाते. मात्र सरकारला जर या समुद्रकिनार्यांची योग्य माहिती मिळाली तर...
  June 7, 08:36 AM
 • मुंबई- कर चोरी प्रकरणातील आरोपी हसन अलीच्या प्रकृतीविषयी दुर्लक्ष केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी अंमलबजावणी संचालनालयावर ताशेरे ओढले. हसनची प्रकृती चांगली ठेवणे ही संचालनालयाची जबाबदारी नाही का, असा सवाल न्यायालयाने केला. दरम्यान, हसनला तातडीने उपचारासाठी जॉर्ज रुग्णालयात पाठविण्यात यावे, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.दोन रूग्णालयांच्या अहवालावर न्या. बी.एच. र्मलापल्ले व यु.डी. साळवी यांच्या पिठाने तपास अधिकार्यांचे कान उपटले आहेत. हसन अलीला मागील आठवड्यात जेजे...
  June 7, 07:11 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात