जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई -शनिवारी दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे आपल्या खासदारांसह जाणार आहेत. या बैठकीचे आमंत्रण देण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला. भाजपचे निमंत्रण उद्धव ठाकरे यांनीही स्वीकारले आहे. शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेनेच्या विजयी खासदारांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे आभार व्यक्त केले आणि त्यांच्याशी चर्चाही केली. एनडीएची शनिवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली असून पुन्हा एकदा...
  May 25, 09:50 AM
 • मुंबई- येथील माउंट एव्हरेस्टवरून खाली परत येत असताना पाय घसरल्याने भारतीय गिर्यारोहक अंजलिी एस. कुलकर्णी यांच्या मृत्यू झाल आहे. मुंबईच्या रहिवासी अंजलींनी बुधवारी एव्हरेस्ट सर केला होता. तर गुरुवारी परत येत असताना कॅम्प 4 मध्ये त्यांची प्रकृती खराब झाली आणि त्यांच्या मृत्यू झाला. या क्लायम्बिंग सीजनमध्ये आतापर्यंत 13 गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. थुप्डेन शेरपा यांनी सांगितल्यानुसार, 55 वर्षीय अंजलींनी पती शरद कुलकर्णीसोबत बुधवारी सकाळी माउंट एव्हरेस्ट सर केला होता. परत येत...
  May 24, 04:59 PM
 • देशभरातील निकालाप्रमाणेच महाराष्ट्रातही भाजपसोबत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. ४८ मतदारसंघांपैकी २३ जागा भाजपने तर १८ शिवसेनेने राखल्या आहेत. राष्ट्रवादी चार तर काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. ४१ ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवून अनेकांची राजकीय समीकरणे माेडीत काढली.
  May 24, 12:14 PM
 • मुंबई -लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धर्मनिरपेक्ष विचारधारेचे नुकसान करून जातीयवादी पक्षांना मदत केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीमुळेच अनेक मतदारसंघांत काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना अपयश पत्करावे लागल्याचा ठपका त्यांनी ठेवला. स्वत:च्या आणि राज्यातील काँग्रेसच्या कामगिरीच्या पराभवाची आपण जबाबदारी स्वीकारत असल्याचे ते म्हणाले. मात्र, काँग्रेसच्या भविष्यातील...
  May 24, 12:06 PM
 • मुंबई -लाव रे तो व्हिडिओ आणि मोदी-शहा या जोडगोळीला भारताच्या राजकीय क्षितिजावरून हद्दपार करा, असे आवाहन करणाऱ्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख न करता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाव रे ते फटाके म्हणत त्यांना टोला लगावला. तसेच अमित शाह यांच्याशी फोनवर चर्चा करून अभिनंदन केले असून आता नरेंद्र मोदी यांच्याशीही संपर्क साधणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कोणाच्याही पराभवाचा विचार न करता विजयाचा आनंद साजरा करूया, असे म्हणत त्यांनी पार्थ...
  May 24, 12:00 PM
 • मुंबई -आगामी विधानसभा निवडणूक आणि केंद्रातील भाजप सरकारला राज्यातून मिळालेला मोठा कौल या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील मंंत्रिमंडळात महाराष्ट्राला अर्ध्या डझनहून अधिक मंत्रिपदे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मावळत्या मंत्रिमंडळात राज्यातून भाजपचे पाच, तर शिवसेनेचे एक मंत्री होते. त्यापैकी शिवसेनेचे अवजड उद्योगमंंत्री अनंत गिते यांचा पराभव झाला असला तरी नितीन गडकरी आणि सुभाष भामरे या भाजपच्या मंत्र्यांचा विजय झाला आहे. नवीन मंत्रिमंडळात शिवसेनेच्या...
  May 24, 11:44 AM
 • मुंबई - महाराष्ट्रातील सुमारे १० लाेकसभा मतदारसंघांत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील पराभवास अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी कारणीभूत ठरल्याचे चित्र मतदानाच्या आकडेवारीवरून समाेर आले आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या या आराेपाचे प्रकाश आंबेडकरांच्या पत्नी डाॅ. अंजली मायदेव खंडन मात्र करतात. आम्हाला कोणाच्याही पाडापाडीचे राजकारण करायचे नाही, तर वंचितांचे हक्क राजकारणाच्या ऐरणीवर आणण्याचे राजकारण करायचे आहे, त्यामुळे बाळासाहेबांच्या दोन्ही...
  May 24, 09:09 AM
 • काँग्रेसने ऐनवेळी शिवसेनेतून आयात केलेल्या बाळू धानोरकरांनी लाज राखली नसती तर काँग्रेसमुक्त महाराष्ट्राचे भाजपचे स्वप्न सिद्धीस जाऊ शकले असते. काँग्रेसचा बालेकिल्ला असणाऱ्या आणि अगदी आणीबाणीतही पाठराखण करणाऱ्या या राज्यात काँग्रेस शब्दशः भुईसपाट झाली आहे. देशातल्या डझनभर राज्यांत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. पर्याय म्हणून स्वतःला सिद्ध करण्यात काँग्रेसला आणि विरोधकांना आलेले अपयश हे या निकालाचे मुख्य कारण आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट निर्माण झाली, त्याला...
  May 24, 08:13 AM
 • मुंबई / औरंगाबाद - देशभरात 7 टप्प्यांमध्ये झालेल्या 17 व्या लोकसभेच्या मतदानाची मोजणी सुरू आहे. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 48 पैकी 23 जागा जिंकल्या होत्या.2014 मध्ये आलेली मोदी लाट 2019 मध्ये सुद्धा कायम असल्याचे प्राथमिक निकालांतून स्पष्ट होत आहे. भाजप आणि शिवसेना युतीला मिळणाऱ्या जागा पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. तर भाजप अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप मुख्यालय गाठले. यावेळी सर्वच भाजप नेत्यांचे जंगी स्वागत करून विजयाचा...
  May 23, 07:48 PM
 • मुंबई -लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरूवात झाली आहे. देशभरासह राज्यातही भाजप पक्ष आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने ईव्हीएम बाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. मागाठाणे येथील EVM नंबर आणि सहीमध्ये तफावत असल्याचे उर्मिलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. उर्मिलाने याबाबतचे ट्वीट देखील केले आहे. On the form of EVM 17C from Magathane, the signatures and the machine numbers are different. A complaint has been filed with the Election Commission. Urmila Matondkar (@OfficialUrmila) 23 May 2019 गोपाळ...
  May 23, 01:09 PM
 • मुंबई -भारतात वापरले जाणारे ईव्हीएम सॅटेलाइटद्वारे किंवा प्रत्यक्ष तारेने जोडल्याशिवाय हॅक करता येणे शक्य नाही. कारण त्यात रिमोट ऑर्डर स्वीकारण्यासाठी रिसिव्हर नसते, असे संगणकतज्ज्ञ असलेले काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे म्हणणे आहे. मात्र, विद्यमान राज्यकर्त्यांनी त्यात काही डिव्हाइस बसवून घेतले असेल तर सांगता येत नाही, अशी टिप्पणीही ते करतात. दिव्य मराठीशी अनौपचारिकपणे बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. भारताच्या निवडणूक आयोगाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील...
  May 23, 12:13 PM
 • टीम दिव्य मराठी - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर आली आहे. प्रमुख स्पर्धेत असलेल्या उमेदवारांत प्रचंड धाकधूक वाढली असून त्यांनी विजयासाठी देव पाण्यात घातले आहेत. शिवाय मतदारांतही निकालाची प्रचंड उत्कंठा आहे. मराठवाड्यातील आठही लोकसभा मतदारसंघात जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण केली असून दोन दिवसांपासूनच मतमोजणी केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हिंगोली: वंचितमुळे कुणाचे नुकसान? हिंगोली लोकसभेत काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व बहुजन...
  May 23, 09:01 AM
 • मुंबई - प्रत्येक अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळ विस्ताराच्या बातम्या येतात आणि एखाद्या हवा गेलेल्या फुग्याप्रमाणे विरूनही जातात. आताही १७ जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार असल्याने सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि त्यासाठी काही नावांचीही चर्चा सुरू झाली आहे. मात्र, भाजपमधील वरिष्ठ मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार या वेळी मंत्रिमंडळ विस्तार होणार नसून नव्या सरकारमध्येच नवे मंत्रिमंडळ पाहायला मिळेल, असे दिव्य मराठीशी बोलताना स्पष्ट केले. फडणवीस यांनी शिवसेनेला...
  May 22, 08:59 AM
 • मुंबई : लोकसभा निवडणुका पार पडल्या असून निकालाअगोदरच भाजप-सेना सरकारने विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेचे लक्ष समोर ठेवून राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची तयारी सरकार करत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याअगोदर 2017 मध्ये देवेंद्र सरकारने कर्जमाफी केली होती. त्यानंतर आता परत एकदा विधानसभा निवडणुकांपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन मोठा डाव खेळण्याची तयारी सरकारने केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपतर्फे मुंबईत...
  May 21, 01:42 PM
 • मुंबई -एक्झिट पोलच्या अंदाजावर आमचा विश्वास नाही, देशात अनुकूल सरकार येईल, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी दिली. तसेच राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जागी विधानसभेचे नवे विराेधी पक्षनेते निवडण्याचे सर्वाधिकार पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्याचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकमताने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले. विखे पाटील यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवा नेता निवडण्यासाठी सोमवारी विधानभवनात...
  May 21, 10:14 AM
 • मुंबई - देशातील शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर रविवारी जाहीर झालेल्या एक्झिट पाेलमध्ये एनडीएच बहुमताने सत्तेवर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ते एेकून सत्ताधारी भाजप- शिवसेनेच्या नेत्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या असल्या तरी यापेक्षाही जास्त जागा आपल्याला मिळू शकतील, असा त्यांचा दावा आहे. तर विराेधी पक्ष काँग्रेसला हे एक्झिट पाेल अजिबात मान्य नाहीत. देशात पुन्हा माेदींचेच सरकार येणार यात शंका नसून यात एकट्या भाजपला ३०० पेक्षा जास्त जागा मिळू शकतील, असा दावा...
  May 21, 09:57 AM
 • मुंबई -निवडणुका होतील... निकाल लागत राहतील, मात्र सध्या जे सत्तेवर आहेत ते हिमालयात जाऊन बसले आहेत. राजधानी दिल्ली सोडून त्यांनी हिमालयात जाणं पसंत केलं आहे, असा टाेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अायाेजित इफ्तार पार्टीत ते बाेलत हाेते. आज देशात एक वेगळीच परिस्थिती आहे. देश कोणत्या वाटेवर जाईल, सत्ता कोणत्या विचारांच्या पक्षाची येईल हे स्पष्ट व्हायला अवघे दोन दिवस उरले आहेत, असेही पवार यांनी सांगितले....
  May 21, 09:36 AM
 • मुंबई -पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी आरक्षणाची सवलत पूर्वलक्षी प्रभावाने उपलब्ध करून देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी साेमवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे आजपासूनच हा कायदा लागू झाल्याने मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणानुसार प्रवेशाचा मार्ग माेकळा झाला. दरम्यान, या अध्यादेशावर राज्यपालांनी सही करू नये म्हणून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी राजभवनासमोर निदर्शनेही केली. ३० मेपर्यंत मुदतवाढ?...
  May 21, 08:48 AM
 • मुंबई- महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस 13 ते 16 जागांवर विजय मिळवेल. यात बीड, मावळ, शिरूर, बारामती आणि उस्मानाबाद या जागांवर विजय निश्चित आहे, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार असतानाही निकालाचा अंदाज चुकला होता. एक्झिट पोलचा कल खरा ठरला तर, आम्हाला प्रचारात सरकारविरोधी जो राग दिसला तो कुठे गेला? यामुळे ईव्हीएम आणि इतर यंत्रणेवर संशय करायला जागा आहे, असेही ते म्हणाले. एक्झिट पोलमध्ये एनडीएला 300 च्या वर जागा मिळताना दिसत आहेत....
  May 20, 07:22 PM
 • मुंबई- राज्यातील विविध 20 जिल्ह्यांमधील 146 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तसेच 62 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंचपदांच्या आणि विविध ग्रामपंचायतींमधील 6 हजार 719 सदस्यपदांच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून 2019 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज.स.सहारिया यांनी आज दिली. सहारिया यांनी सांगितले की, जुलै 2019 ते सप्टेंबर 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. सार्वत्रिकसह सर्व...
  May 20, 06:44 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात