जाहिरात
जाहिरात
Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • ठाणे- एकीकडे पुरागोमी महाराष्ट्राचा डंका पिटला जात असताना, दुसरीकडे कौमार्य चाचणीमुळे बहिष्कार टाकल्याची घटना घडली आहे. कौमार्य चाचणीसाठी विरोध केल्यामुळे कुटुंबावर बहिष्कार घातलाच, पण कुटुंबातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर, त्याच्या अंत्ययात्रेवरही बहिष्कार घातल्याची संतापजनक घटना अंबरनाथमध्ये घडली. अंबरनाथच्या विवेक तमायचीकर यांनी कौमार्य चाचणीला विरोध केला म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचातीने, त्यांच्या आजीच्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होण्यास गावातील लोकांना मज्जाव...
  May 15, 02:07 PM
 • ठाणे- चार्जिंगला लावलेल्या फोनचा फोट झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अॅपल आयफोनचा चार्जिंगदरम्यान स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली. अमित भंडारी असे या जखमी तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे. अंबरनाथमधील कोहोजगाव या ठिकाणी राहणाऱ्या अमितने गेल्यावर्षी अॅपल कंपनीचा आयफोन-6 हा स्मार्टफोन खरेदी केला होता. रविवारी (12 मे) त्याच्या फोनची बॅटरी कमी असल्याने त्याने घरात फोन चार्जिंगला लावला. चार्जिंगला...
  May 15, 01:43 PM
 • मुंबई - विधानसभेतील विरोधी पक्ष नेते काँग्रेसचे राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेले काही दिवस जोरात सुरू होती. परंतु आत्ताच भाजपमध्ये जाऊन काही काम करता येणार नसल्याने अधिवेनशनानंतर विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किंवा लागू झाल्यावर राधाकृष्ण विखे -पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भाजपमधील वरिष्ठ सूत्रांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. लोकसभा निवडणुकीत मुलगा सुजय याच्यासाठी शिर्डीची जागा सोडावी अशी मागणी राधाकृष्ण विखेपाटील...
  May 15, 09:38 AM
 • मुंबई - वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या २०१९-२० वर्षाच्या प्रवेश प्रक्रियेला राज्य सरकारने २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. यासंबंधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे (सीईटी) आयुक्त तथा सक्षम प्राधिकारी आनंद रायते यांच्या सहीने मंगळवारी मुदतवाढीचे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षात वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण प्रवेश प्रक्रियेत विशेष आर्थिक मागास वर्ग (एसईबीसी) आरक्षण लागू करता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला...
  May 15, 08:50 AM
 • मुंबई - महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याविरुद्ध आरोप करणारे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना रितेश देशमुखने सडेतोड उत्तर दिले आहे. माझे वडील कधीही मला रोल मिळवून देण्यासाठी कुणाला बोलले नाहीत असे रितेशने स्पष्ट केले. मुंबई हल्ल्यांच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख आपला मुलगा रितेश देशमुखला चित्रपटात रोल मिळवून देण्यात मशगूल होते असा आरोप गोयल यांनी केला होता. रितेशने गोयल यांचे नाव न घेता त्यांना सोशल मीडियावरून प्रत्युत्तर दिले. माजी...
  May 14, 10:50 AM
 • मुंबई - मराठा आरक्षणानुसार पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देण्यास सर्वाेच्च न्यायालयाने मनाई केल्यानंतर मराठा संघटनांनी राज्य सरकारविराेधात मुंबईत आंदाेलन सुरू केले आहे. आज मनसे, राष्ट्रवादीनेही या आंदाेलनात उडी घेऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन चर्चाही केली. दरम्यान, एसईबीसी प्रवर्गानुसार झालेले वैद्यकीय पदव्युत्तरचे या शैक्षणिक वर्षातील प्रवेश कायम ठेवावे या मागणीसाठी राज्य सरकार पुन्हा सर्वोच्च न्यायालयात दाद...
  May 14, 08:48 AM
 • मुंबई- वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशापासून वंचित राहीलेल्या मराठा विद्यार्थ्यांच्या आदोंलनाला राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता मनसेने पाठिंबा दर्शवला आहे. राष्ट्रवादी आणि मनसेने आंदोलनाला पाठिंबा दिल्याने राज्य सरकार आदोंलन मिटवण्यासाठी हालचाली करण्यास सुरुवात केली आहे. सरकारकडून याबाबत अध्यादेश काढणार असल्याचे बोलले जात आहे. आंदोलक विद्यार्थ्यांची गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर गिरीश महाजन यांनी आझाद मैदानावर जाऊन...
  May 13, 05:52 PM
 • ठाणे- माझा दुष्काळ दौऱ्याचा कुठलाही प्लॅन नाही. दुष्काळाचे टुरिझम करण्यात अर्थ नाही, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली. ठाण्यात आज मनसे पदाधिकाऱ्यांचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्रातील दुष्काळाबाबत माहिती घेण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही राज म्हणाले. 29 हजार गावात दुष्काळ, मग सिंचनाची काय कामे झाली? सरकार काय करत आहे? आधीच्या सरकारमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मग आताच्या सरकारमध्ये...
  May 13, 04:13 PM
 • मुंबई -वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतून बाद केलेल्या मराठा समाजाच्या २५० विद्यार्थ्यांचा प्रश्न राज्य सरकारने दोन दिवसांत सोडवावा, अन्यथा मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा रस्त्यावर उतरेल, असा इशारा क्रांती मोर्चाच्या संयोजकांनी रविवारी दिला. तसेच हा तिढा सुटेपर्यंत आझाद मैदानावर सुरू असलेले उपोषण कायम ठेवण्याचा निर्णयही आंदोलक विद्यार्थ्यांनी घेतला आहे. राज्यात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजाच्या...
  May 13, 10:21 AM
 • मुंबई : मुंबईतील दादर पश्चिमेकडील पोलिस कॉलनीत आग लागली आहे. सिलेंडरच्या स्फोटामुळे ही लागल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये श्रावणी चव्हाण या 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास ही आग लागली. तिसऱ्या मजल्यावरील एका घरात सिलेंडरचा स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.
  May 12, 03:41 PM
 • लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे संपले असून यात महाराष्ट्रातील ४८ जागांसह देशातील ४२५ मतदारसंघांचे भवितव्य यंत्रात बंदिस्त झालेले आहे. येथील निकालावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वा भाजपचेच नव्हे, तर महाराष्ट्रातील पाच प्रमुख राजकीय पक्षांचे भविष्यही अवलंबून आहे. तसे नसते तर शरद पवार यांच्यासारख्या अनुभवी नेत्याने अगोदरच मतदान यंत्रावर शंका घेण्याची वेळ आली नसती. ही निवडणूक बहुतांश पक्षांसाठी निर्णायक आहे. यात भाजप आघाडीवर आहे याविषयी शंका नाही. काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक सोपी...
  May 12, 10:38 AM
 • मुंबई -मुंबईच्या डबेवाल्यांनी प्रिन्स हॅरी व मेगन मर्कल या शाही दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या बाळास वाळे, तोडे, करगोटा व गळ्यातला गोफ अशा चांदीच्या दागिन्यांची भेट पाठवली आहे. डबेवाल्यांनी हा ऐवज मुंबईतील ब्रिटिश कौन्सिलच्या इंग्लंडच्या दूतावासाकडे सुपूर्द केला. इंग्लंडचे युवराज व प्रिन्स हॅरीचे पिता प्रिन्स चार्ल्स आणि मुंबईचे डबेवाले यांचे मोठे ऋणानुबंध आहेत. प्रिन्स हॅरी व पत्नी मेगन यांना नुकतेच पुत्ररत्न झाले. प्रिन्स चार्ल्स आजोबा झाले आहेत. चार्ल्स हे मुंबईच्या...
  May 12, 10:28 AM
 • मुंबई -मनसे प्रमुख राज ठाकरे हे १० मेपासून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जाणार होते. मनसे पदाधिकाऱ्यांनीच ही माहिती दिली होती. मात्र, राज ठाकरे हे दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर गेले नसून मुंबईतच आहेत. १३ तारखेला त्यांनी ठाण्यात एक पदाधिकारी मेळावा बोलावला असून या मेळाव्यानंतर ते दुष्काळ दौऱ्याबाबत निर्णय घेतील, अशी माहिती मनसेचे संदीप देशपांडे यांनी दिव्य मराठीशी बोलताना दिली. तसेच राज ठाकरे १० तारखेपासून दौऱ्यावर जाणारच नव्हते....
  May 12, 10:23 AM
 • मुंबई- महाराष्ट्रात सध्या भीषण दुष्काळ असतानाही राज्याने आपल्या हक्काचे 46 टीएमसी पाणी गुजरातला दिल्याचा आरोप मनसेचे नेते आणि माजी आमदार नितीन भोसले यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सर्व करत असून त्यांच्याकडे याचे कोणतेही उत्तर नसल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी जनतेला खोटी माहिती दिल्याचा आरोप भोसले यांनी केला. राज्यातल्या 13 जिल्ह्यात भीषण दुष्काळ आहे....
  May 11, 05:32 PM
 • मुंबई- मराठा समाजातील मुलांच्या वैद्यकीय प्रवेश सवलतीचा तिढा सुटला नाहीये. यामुळेच आता मराठा समाजातील विद्यार्थी आझाद मैदानावर आंदोलनाला बसणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या शैक्षणिक सवलतीबद्दल विचार करण्यासाठी उद्या मुंबईतील शिवाजी मंदिरात मराठा मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पाडणार आहे. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण मराठा आरक्षणांतर्गत अण्णाभाऊ पाटील...
  May 11, 03:36 PM
 • विरार : मुंबईच्या विरारमध्ये एका स्थानिक क्रिकेटपटूने आईसह विषारी औषध पिऊन आत्महत्या केली. विनोद प्रकाश चौगुले (25) आणि संजीवनी प्रकाश चौगुले (42) असे आत्महत्या करणाऱ्यांचे नाव आहेत. दोघांनी राहत्या विषारी औषध घेऊन आपली जीवन संपवले. नारंगी येथील साई हेरिटेज या इमारतीत दोघे भाड्याने राहत होते. काल रात्री सव्वा आठच्या सुमारास ही बाब उघडीस आली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. विरार पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. पोलिसांनी आकस्मिक...
  May 11, 02:09 PM
 • मुंबई- शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना माहिती दिली होती की, मातोश्री बॉम्बस्फोटाने उडवून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हत्येचा कट रचण्यात आला आहे. त्यानंतर ठाकरे कुटुंबीयांनी मातोश्री सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात देऊन खळबळ माजवली आहे. मात्र, अद्याप पुस्तक वाचले नसल्याने प्रतिक्रिया देता येणार नाही, असे पवारांनी सांगितले अाहे. नारायण राणे यांनी नो होल्ड बार्ड, माय इयर्स इन पॉलिटिक्स या नावाने इंग्रजीत आत्मचरित्र लिहिले असून...
  May 11, 09:19 AM
 • मुंबई -माझ्यावर इतके आरोप करण्यात आले, पण एकही गोष्ट सिद्ध झालेली नाही, नुसते आरोप करण्यात आले. माझा कायद्यावर विश्वास आहे. मला तुम्ही ५ वर्षे इतका त्रास दिला तरी मी इथेच आहे, अशा शब्दांत काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधींचे पती रॉबर्ट वाड्रांनी भाजपवर टीका केली. वाड्रा यांनी शुक्रवारी मुंबईत येऊन मुंबादेवीचे दर्शन घेतले. या वेळी पत्रकारांशी बोलताना वाड्रा म्हणाले, माझ्या पत्नीच्या कुटुंबाने देशासाठी आयुष्य दिले आहे. प्रियंका, राहुल यांच्या रक्तातच देशसेवा आहे. बदल व्हावा, असे...
  May 11, 09:13 AM
 • मुंबई -विधानसभा डोळ्यासमोर ठेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिवपदी खांदेपालट केला आहे. सेवानिवृत्तीला सहा महिने बाकी असतानाच मुख्य सचिव यूपीएस मदान यांना बाजूला करत त्यांच्या जागी मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील मुंबई महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची वर्णी लागली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे परदेशात सुटीवर असताना झालेला बदल सरकारातील सहभागी शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील लोकमताचा अंदाज आला आहे. त्यातून धडा घेत...
  May 11, 09:08 AM
 • मुंबई -मुंबई पालिकेचे आयुक्त अजाेय मेहता राज्याचे नवे मुख्य सचिव असतील. मेहता १९८४ च्या बॅचचे आयएएस आहेत. विद्यमान मुख्य सचिव यूपीएस मदान यांच्या सेवानिवृत्तीला सहा महिने बाकी असतानाच त्यांना पदावरून दूर करण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एच. सहारिया सप्टेंबरमध्ये निवृत्त होतील. त्यांच्या जागी मदान यांची नियुक्ती हाेऊ शकते. तर मेहता यांच्या जागी प्रवीण परदेशी यांचे नाव चर्चेत आहे.
  May 11, 08:24 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात