Home >> Maharashtra >> Mumbai

Mumbai News

 • मुंबई - मतदारसंघातील एका गणेश मंडळाच्या भेटीदरम्यान गणपती बाप्पा मोरया असा जयघोष केल्याबद्दल एमआयएमचे भायखळ्याचे आमदार वारीस पठाण यांनी मुस्लिम समाजाची माफी मागितली आहे. पठाण यांचा व्हिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्याविरुद्ध मुस्लिम समाजातील काही कट्टरवाद्यांनी आघाडी उघडली होती. हिंदू देवतेचा जयघोष केल्याप्रकरणी पठाण यांनी समाजाची माफी मागावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने मुस्लिम समाजातून तीव्र प्रतिक्रिया...
  8 mins ago
 • मुंबई- काँग्रेस-राष्ट्रवादीने 2019 च्या निवडणुकीच्या तयारीसाठी बैठकांचे सत्र सुरू केले असतानाच आता भाजपही बैठका घेण्यास सुरुवात करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवार आणि गुरुवारी दादरमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयात प्रदेश कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि भाजपचे मंत्री, आमदार, पदाधिकारी आणि महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे उपस्थित राहाणार आहेत. आगामी निवडणुका आणि शिवसेनेसोबत युतीबाबत बैठकीत...
  07:41 PM
 • ठाणे- एखाद्या प्रकरणात शारीरिक संबंधासाठी अल्पवयीनाने दिलेला होकार कायद्याच्या दृष्टिकोनातून आपसातील सहमती ठरत नाही, असे ठाण्यातील स्थानिक न्यायालयाने म्हटले आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी सुनावणीवेळी न्यायाधीश पी. पी. जाधव यांनी हे स्पष्ट केले. त्यांनी 31 वर्षीय आरोपी देवेंद्र गुप्ताला 7 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेसह 15 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. 2 ऑक्टोबर 2015 रोजी देवेंद्रने 16 वर्षीय पीडितेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला. तितक्यात पीडितेच्या आईने दार...
  07:16 PM
 • ठाणे- मराठा समाजातील तरुणांना शिक्षण, व्यवसाय, रोजगार यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या समाजातील तरुणांनी केवळ नोकऱ्या मागू नयेत तर नोकऱ्या देणारे बनावे यासाठी आम्ही अनेक योजना कार्यान्वित केल्या आहेत. तसेच मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आल्यानंतर आम्ही त्याला अनुरूप कालबद्ध कार्यक्रम तयार करीत आहोत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. तसेच माथाडी कामगारांसाठी नवी मुंबईत दोन टप्प्यात 5 हजार घरे आरक्षित ठेवण्यात...
  06:20 PM
 • मुंबई- गोव्याच्या मुख्यमंत्रिपदी मनोहर पर्रीकरच राहतील, नेतृत्त्वबदल होणार नाही, असे आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले आहे. पर्रीकर हे गोव्यात नाहीत. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये ते कर्करोगावर उपचार घेत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत गोव्याचे प्रशासन हे ढेपाळले आहे. मुख्यमंत्री व त्यांचे कॅबिनेट पक्षाची सोय म्हणून काम करीत नसते, तर राज्याचे गाडे पुढे नेण्यासाठी काम करीत असते. पर्रीकर यांच्या आजारपणामुळे व गैरहजेरीमुळे गोव्यात एकप्रकारे अनागोंदीचे...
  05:24 PM
 • मुंबई- ज्येष्ठ पार्श्वगायिका अनुराधा पौडवाल यांची एका बिल्डरने फसवणूक केल्याचे समोर आले आहे. अनुराधा यांनी विरार (पश्चिम) मधील ग्लोबल सिटी परिसरात दोन फ्लॅट खरेदी केले होते. मात्र, बिल्डरने त्यापैकी एक फ्लॅट अनुराधा पौडवाल यांच्यासह दोन ते तीन जणांना विकून आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी विरारमधील अर्नाळा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अविनाश डोले, राजीव सुलेरी अशी आरोपींची नावे आहे. त्यांनी मंदार असोसिएट नावाने कंपनी स्थापन केली होती. या कंपनीच्या माध्यमातून...
  04:14 PM
 • बीड - राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या भव्य स्मारकाच्या लोकार्पणाची घोषणा केली आहे. येत्या दस-याला 18 ऑक्टोबररोजी बीडमधील सावरगाव घाट येथे स्मारकाचा लोकार्पण सोहळा होणार आहे. स्वत: पंकजा मुंडे यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या स्मारकाद्वारे पंकजा मुंडेंचा भगवान गडाला शह देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. ट्विटमध्ये पंकजा मुंडेंनी म्हटले आहे की, गणपती विसर्जनानंतर आता चाहूल लागली आहे ती दसरा मेळाव्याची. मुंडे साहेबानी सुरु केलेली...
  03:58 PM
 • मुंबई - अभिनेता दलीप ताहिलने दारूच्या नशेत कार चालवत ऑटोला टक्कर दिली आहे. यात ऑटोचालकासह युवक व युवती जखमी झाले आहेत. रविवारी रात्री ही घटना घडली. यानंतर अभिनेता दलीप ताहिलला खार पोलिसांनी अटक केली होती. नंतर जामिनावर त्यांची सुटका करण्यात आली. घटनास्थळावरून फरार झाला अभिनेता ऑटोला टक्कर दिल्यानंतर ताहिल यांनी घटनास्थळावरून पळ काढला होता. मात्र रविवारी रात्री गणेश विसर्जनाच्या मिरवणुका सुरू असल्याने त्यांना जास्त दूर जाता आले नाही व अपघातात जखमी झालेल्या युवक-युवतीने त्यांना...
  03:12 PM
 • नवी दिल्ली- पैसा फिक्स्ड डिपॉझिटसारखा ब्लॉक होऊ नये आणि चांगले रिटर्नही मिळायला हवे, असे प्रत्येक वाटते. परंतु, हे शक्य होत नाही. मात्र, आता काही बँका सेव्हिंग अकाऊंटवर एफडी आणि आरडीसारखे रिटर्न देत आहेत. विशेष म्हणजे निर्धारित मुदतीत पैसा गुंतवावाही लागत नाही. स्मॉल फायनान्स बँकांमध्ये मिळत आहे एफडीसारखे रिटर्न स्मॉल फायनान्स बॅंक विविध स्कीममध्ये डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज देत आहेत. वास्तविक स्टेट बॅंक ऑफ इंडिया (SBI), एचडीएफसी बॅंक आणि आयसीआयसीआय बॅंक सारख्या लेंडर्सच्या तुलनेत...
  11:01 AM
 • व्हिडिओ: मुंबईच्या भिवंडीमध्ये 8 वर्षीय मुलीचा बिल्डिंगच्या तिस-या मजल्यावरुन पडल्यामुळे मृत्यू झाला. ही चिमुकली बालकनीमध्ये स्टूलवर चढून खाली पाहत होती. मुलीचे बॅलेंस अचानक बिघडले आणि ती तिस-या मजल्यावरुन पडली. मुलगी पडल्यामुळे लोक तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. परंतु रविवारी संध्याकाळी मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे नाव तकदीर सईद मोमिन होते. या पुर्ण घटनेत पोलिसांना मुलीच्या मृत्यूविषयी माहिती मिळाली नाही. पोलिसांनुसार, त्याच्याजवळ फक्त हॉस्पिटलमध्ये मुलीचा मृत्यू झाला...
  10:49 AM
 • सरकार कच्च्या तेलाची आयात घटवण्याचा विचार करत आहे. इंडियन ऑइलचा दावा- तेल महाग झाल्याने मागणी कमी होईल, यामुळे आयात कमी केल्यावर परिणाम होणार नाही. एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत पेट्रोल 7% महाग, परंतु विक्रीत कमी नाही. डिझेल 5 महिन्यांत 9% महाग, विक्री 14% घटली. मुंबई - चारही मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल मंगळवारी 14 पैशांनी महाग झाले. मुंबईत रेट 90.22 आणि दिल्लीत 82.86 रुपयांपर्यंत पोहोचले. तेल कंपन्यांनी लगातार सहाव्या दिवशी पेट्रोलचे रेट वाढवले. डिझेलच्या दरांमध्ये 10 ते 11 पैशांची वाढ झाली. सोमवारी...
  10:07 AM
 • मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठिंब्यावर आपण खासदार बनलो हाेतो, या पवारांच्या वक्तव्यात तथ्य नाही. पवार माझ्या खासदारकीबाबत संपूर्ण: खोटे बोलत आहेत, असा आराेप करत प्रमोद महाजन यांच्यासाठी त्यांनी राज्यसभेची जागा का सोडली हाेती, याचा पवारांनी खुलासा करावा, असे आव्हान भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष व माजी खासदार अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर हे आपल्या पाठिंब्याने खासदार झाले होते, असा दावा पवार यांनी मागच्या आठवड्यात केला होता. त्यावर...
  08:11 AM
 • ठाणे- एका २८ वर्षीय तरुणाचा खून करून मृतदेह ठाण्यातील कापूरबावडी येथील हॉटेल परिसरात पुरल्याची घटना उघडकीस आली. तपस चंदा असे मृताचे नाव असून तो पश्चिम बंगाल येथील रहिवासी आहे. तपस हा कापूरबावडी येथील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र, तीन महिन्यांपूर्वी त्याने नोकरी साेडली होती. गेल्या काही महिन्यांपासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता एक जण तपसचा मृतदेह हॉटेल परिसरात...
  07:37 AM
 • मुंबई- तिहेरी तलाकशी संबंधित अध्यादेशाला सामाजिक संस्था व वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. राष्ट्रपतींनी बुधवारीच या अध्यादेशावर स्वाक्षरी केली आहे. यानुसार तिहेरी तलाक अवैध मानले जाणार असून तलाक दिल्यास पतीला सुमारे ३ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकेल. या कायद्याचा गैरवापर होऊ नये, यासाठी त्यात जामिनाची तरतूदही आहे. मात्र, हा अध्यादेश अवैध, निरर्थक असल्याचा दावा रायझिंग व्हाॅइस फाऊंडेशनने केला आहे. तर, यामुळे मुस्लिम समाजातील पुरुषांच्या मूलभूत अधिकारांचे हनन होत...
  07:15 AM
 • मुंबई- १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना अखेर सहाव्या वेतन आयोगाचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वित्त विभागाने या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पत्र पाठवून सहाव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू असल्याचे कळवले आहे. राज्य सरकारने १ जानेवारी २००६ पासून सर्व कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू केल्या होत्या. परंतु १ जानेवारी २००६ ते २६ फेब्रुवारी २००९ या कालावधीत...
  06:59 AM
 • मुंबई - पोलिसांनी मुंबईत राहणाऱ्या दोन महिलांच्या तावडीतून एका 14 वर्षीय मुलाची सुटका केली आहे. त्या मुलाला सध्या बाल सुधार गृहात पाठवण्यात आले आहे. मूळचा नागपूरचा असलेला हा मुलगा अवघ्या आठवीला शिकत होता. परंतु, काही दिवसांपूर्वीच त्याने नागपूर सोडून मुंबई गाठली. पोलिसांनी मुलाची ज्या दोन महिलांच्या तावडीतून सुटका केली, त्यापैकी एक त्याची मामी आहे. तसेच त्या दोन्ही महिला मुंबईतील बारमध्ये डान्सर आहेत. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही महिलांसह एकूण 4 जणांना अटक केली. बार डान्सर होऊ इच्छित...
  12:06 AM
 • मुंबई - ठाण्यातील भिवंडी येथे 8 वर्षीय मुलीचा ईमारतीच्या तिस-या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. ईस्लामपूरा येथे ही घटना घडली. सईदा मोमिन असे या मुलीचे नाव आहे. तपासामधून समोर आले आहे की, सईदा बाल्कनीमध्ये एका स्टूलवर उभी राहून तेथे असलेल्या एका जाळीच्या कुंपनावरून खाली पाहत होती. याचदरम्यान ही जाळी तुटली व सईदा थेट डोक्यावर खाली कासळली. यामुळे सईदा गंभीररीत्या जखमी झाली. दुर्घटनेनंतर शेजारच्यांनी तिला तात्काळ रूग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. ही...
  September 24, 03:03 PM
 • मुंबई- महाराष्ट्राचे आराद्य दैवत गणपती बाप्पाला दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी भक्तीमय वातावरणार निरोप देण्यात आला. सोमवारी सकाळी नऊ वाजेदरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन गिरगाव चौपाटीवर करण्यात आले. यावेळी एक बोट पलटली. सुदैवाने बोट पलटल्याने बुडालेल्या व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्यात फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई महानगरपालिकेचे पीआरओ तानाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, बोट पलटल्याने पाच जण पाण्यात...
  September 24, 12:44 PM
 • मुंबई - दहा दिवसांच्या मुक्कामानंतर रविवारी गणपती बाप्पाने भक्तांचा निरोप घेतला. अत्यंत भावपूर्ण मनाने लाडक्या गणपती बाप्पाला भाविकांनी निरोप दिला. मुंबईतील मानाचा गणपती समजला जाणारा मुंबईचा राजा म्हणजेच गणेश गल्लीच्या राजाचे गिरगाव चौपाटीवर विसर्जन करण्यात आले. त्या पाठोपाठ लालबागच्या राजाचेही विसर्जन करण्यात आले. लालबागच्या राजाचे विसर्जन सकाळी साडे आठच्या दरम्यान लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. खोल समुद्रात लालबाच्या राजाचे विसर्जन झाले. विशेष म्हणजे...
  September 24, 12:03 PM
 • नवी दिल्ली- शेअर बाजार शुक्रवारी अक्षरश: हादरला. सकाळी बाजार सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सेन्सेक्सने ३६८ अंकांची घेतलेली उसळी दुपारनंतर टिकू शकली नाही. पाहता पाहता शेअर्स गडगडू लागले आणि अवघ्या १० मिनिटांत सेन्सेक्स १,१२७ अंकांनी ढासळला. दिवसभराच्या व्यवहारातील ही घसरण १,४९५ अंकांची नोंदली गेली. दिवसअखेर बाजार सावरला आणि सेन्सेक्स केवळ २७९.६२ अंकांनी घसरून ३६,८४१.६० अंकांवर बंद झाला. दुपारनंतर सेन्सेक्समध्ये ८४८ अंकांची सुधारणा झाली. निफ्टी ९१.२५ अंकांनी घसरून ११,१४३.१० अंकांवर बंद...
  September 24, 07:40 AM
 
जाहिरात

RECOMMENDED